Good News: सलमानच्या घरी येणार नवा पाहुणा, ‘खान’दान आनंदी

Good News: सलमानच्या घरी येणार नवा पाहुणा, ‘खान’दान आनंदी

सलमान खानच्या घरात पुन्हा एकदा आनंद साजरा करण्यासाठी कारण मिळालं आहे. सलमानची सर्वात लहान आणि आवडती बहीण अर्पिता खान शर्मा पुन्हा एकदा गरोदर असल्याची बातमी आहे. सध्या बऱ्याचदा वांद्रामधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये अर्पिताच्या फेऱ्या चालू असून ती एका प्रसिद्ध डॉक्टरांनाही कन्सल्ट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही ही न्यूज ‘खान’दान अथवा अर्पिता आणि तिचा नवरा आयुष यांच्याकडून अधिकृत करण्यात आली नसली तरीही सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे खरं असल्याचं म्हटलं जात आहे. एका इंग्रजी न्यूजपेपरने ही बातमी दिली असून सध्या याचीच चर्चा आहे. 

अहिल आता होणार मोठा भाऊ

Instagram

अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी 2014 मध्ये हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्यानंतर त्यांनी अहिल या मोठ्या मुलाला जन्म दिला. तर आता अहिल तीन वर्षांचा असून तो मोठा भाऊ होणार आहे. आयुषने गेल्याचवर्षी बॉलीवूडमध्येही आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नसला तरीही त्याच्या अभिनयाची मात्र चर्चा झाली. अर्पिता आपला नवरा आयुषला खूपच पाठिंबा देते. तर अहिल बऱ्याचदा आपला मामा सलमानबरोबर सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दिसतो. सलमानचं अहिलवर खूपच प्रेम असून तो नेहमीच त्याला खेळवत असताना दिसून येतो. आता पुन्हा एकदा सलमानच्या घरात एक नवा पाहुणा येणार असून सध्या सर्वच आनंदी असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

आयुष आणि अर्पिता नेहमीच शेअर करतात पोस्ट

Instagram

आयुष आणि अर्पिता हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. इतकंच नाही तर आपल्या व्हेकेशनचे फोटो तसंच घरातील वेगवेगळ्या पार्टीजचे फोटोही हे दोघं पोस्ट करत असतात. आयुष नेहमीच अर्पिताला जपताना दिसतो. तर आयुष सध्या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तोदेखील सोशल मीडियावरून नेहमी अर्पिता आणि अहिलची आठवण येत असल्याच्या पोस्ट शेअर करत असतो. 

सलमानचं अहिलवर खूप प्रेम

View this post on Instagram

Ahil n his mamu ...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान नेहमीच आपल्या पुतणे आणि भाचा भाचीसह असलेले व्हिडिओ पोस्ट करत असतो. सलमानला लहान मुलं खूपच आवडतात आणि त्यांच्याशी खेळताना तोदेखील लहान होऊन जातं हे आता त्याच्या चाहत्यांनाही माहीत आहे. अर्पिता ही सलमान आणि त्याच्या घरातील प्रत्येकाची लाडकी आहे. त्यामुळे आता अर्पिताकडे असणाऱ्या गुड न्यूजमुळे पुन्हा एकदा घरात आनंदीआनंद झाला असणार हे नक्की. अहिलबरोबर सलमानचे व्हिडिओ त्याच्या जन्मापासून बघण्यात आले आहेत. आता लवकरच पुन्हा एकदा लहान बाळाबरोबर सलमान दिसणार याचाच त्याच्या चाहत्यांना आनंद होत आहे. तर काही जणांना सलमान खाननेदेखील सरोगसीमार्फत लवकरच बाबा व्हावं असा सल्लाही त्याला दिला आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या बाळाला बघण्याची खूपच इच्छा आहे. त्यामुळे त्याच्याकडून ही गुड न्यूज कधी मिळणार याचीच वाट त्याचे चाहते बघत आहेत. अर्पिताच्या या गुड न्यूज पाठोपाठ सलमानचीही अशी न्यूज आली तर सर्वांनाच आनंद होईल असंही आता म्हटलं जात आहे. अजूनही हे सलमानच्या घरातून सांगण्यात आलं नसलं तरीही ही बातमी खरी असल्याचं म्हटलं जात आहे.