पुन्हा एकदा सनी ठरतेय गुगलवर ‘नंबर 1’

पुन्हा एकदा सनी ठरतेय गुगलवर ‘नंबर 1’

सनी लिओन हे नाव कोणाला माहीत नाही असं नाही. भारतामध्ये गुगल सर्चमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वात जास्त सर्च होणाऱ्या व्यक्तींमध्ये सनी लिओनने बाजी मारली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार सलमान खान आणि शाहरूख खान यांना मागे टाकत सनीने 1 क्रमांक पटकावला आहे. याआधीदेखील सनी लिओनचे सर्वात जास्त सर्च गुगलवर करण्यात आले होते. पण आता पुन्हा सनीने सर्चमध्ये पहिला क्रमांक पटकावल्याचं दिसून येत आहे. 

गुगल ट्रेंड्स अनालिस्टनुसार झालं सिद्ध

गुगल ट्रेंड्स अनालिस्टनुसार, सनीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी आणि त्याशिवाय तिचा बायोपिक ‘करणजित कौर : द अनटोल्ड स्टोर ऑफ सनी लिओन’ या दोन्ही गोष्टींसाठी सनीच्या नावाचा जास्त सर्च होत आहे. याशिवाय सनीसंबंधित जास्त सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये पूर्वोत्तर राज्य आघाडीवर आहेत. ज्यामध्ये मणिपूर आणि आसाम या राज्यांची नावं समोर आली आहेत. तसंच भारताच्या इतर राज्यातही सनीच्या नावाचा सर्च आहे. पण ही दोन राज्य सध्या आघाडीवर आहेत. 

हा विनोदी अभिनेता सनी लिओनसोबत करणार हॉरर चित्रपटात काम

सनीने दिले धन्यवाद

गुगल सर्चवर आघाडीवर असल्याचं सनीला कळल्यानंतर तिने प्रतिक्रिया दिली आहे. सनीने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, तिने सांगितले, ‘माझ्या टीमने मला याबद्दल माहिती दिली आणि याचं सर्व श्रेय मी माझ्या चाहत्यांना देऊ इच्छिते. जे नेहमीच माझ्यावर इतकं प्रेम करतात. ही एक वेगळीच भावना असून मला खूप मस्त वाटत आहे.’ मागच्यावर्षीदेखील सनी भारतामध्ये सर्वात जास्त सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर होती. सलग दोन वर्ष सनीने हे स्थान अबाधित ठेवलं आहे. भारतामध्ये सर्वात जास्त सर्च होणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात पुढे नावं असतात ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान आणि सनी लिओन. या तिनही मोठ्या व्यक्तींना मागे टाकत सनीने गुगल सर्चमध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. 

अरबाज खानसमोर का ढसाढसा रडली सनी लिओनी

सनी सध्या मुलांंच्या संगोपनात व्यग्र

View this post on Instagram

Happy Holi from the Weber’s!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी मोठ्या पडद्यावर कमी दिसत असली तरीही ती टीव्हीवरील स्प्लिट्सविला या कार्यक्रमाची संचालक म्हणून काम करत आहे. शिवाय तिला अनेक फॉलोअर्स आणि चाहते आहेत. सनीने  2017 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली असून सरोगसीने 2018 मध्ये तिच्या दोन मुलांचा जन्म झाला आहे. आपल्या तिन्ही मुलांसमवेत सनी बराच वेळ घालवताना व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्या कामाबरोबरच सनी मुलांचं संगोपन करण्याच व्यग्र आहे. आपल्या तिन्ही मुलांना नेहमीच सनी आणि तिचा नवरा वेबर शाळेत ने आणि करताना अथवा फिरायला घेऊन जाताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत असतात. सनी आपल्या मुलांचे नेहमीच लाड करताना आणि त्यांना जपताना दिसते. सध्या सनीचे चाहते तिचा कोणता चित्रपट येणार याकडे डोळे लावून बसले आहेत. नुकताच सनीचा ‘अर्जुन पटियाला’ हा चित्रपट येऊन गेला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. तसंच सनीच्या बायोपिकचा लवकरच दुसरा भाग येत असल्याचंही म्हटलं जात आहे. पण नक्की कधी याची तारीख अजून घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहते सध्या तिच्या बायोपिकच्या पुढील भागाची नक्कीच वाट पाहात आहेत. 

करणजीत कौर ते सनी लिओन….जाणून घ्या सनी लिओनची लाईफ जर्नी