सुंदर आणि मजबूत नखं तुमच्या हाताच्या सौंदर्यात भर घालत असतात. अनेक महिला यासाठी नखं वाढवतात आणि नखांवर निरनिराळे नेल आर्ट करून घेतात. पण शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या नखांवरदेखील दिसू लागतो. निस्तेज आणि ठिसूळ नखांवर कितीही घरच्याघरी मेनिक्युअर करा अथवा नेल स्पा केला तरी त्याचा परिणाम जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. तुम्ही जे काही अन्नपदार्थ खाता त्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर आणि पर्यायाने सौंदर्यावर होत असतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला नखांना सुदृढ आणि निरोगी ठेवणारे डाएट शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमची नखं सुंदर आणि मजबूत होतील.
Shutterstock
नखांना मजबूत करण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश
तुमचा डाएट कसा आहे यावर तुमच्या नखांचे आरोग्य अवलंबून आहे यासाठी हे खाद्यपदार्थ आहारात जरूर समाविष्ट करा.
अंडी –
अंडे हे प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहे हे आपल्याला माहीत असेलच. अंड्यातून मिळणारे प्रोटिन्स तुमच्या केस आणि नखांसाठी अतिशय उत्तम ठरते. नखं मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी शरीराला पुरेशा प्रोटिन्सची गरज असते. यासाठीच तुमच्या नेहमीच्या नाश्त्यामध्ये अथवा आहारात एग व्हाईटचा समावेश जरूर करा. अंड्याचा पांढरा बलक तुमच्या संपूर्ण शारीरिक वाढ आणि विकासासाठी गरजेचा आहे. त्यामुळे दररोज एक अंडे आहारात असण्यास काहीच हरकत नाही.
Shutterstock
भोपळ्याच्या बिया –
नखांचे आरोग्य बिघडले की ती पिवळसर आणि ठिसूळ दिसू लागतात. अशा निस्तेज झालेल्या नखांसाठी आहारात भोपळ्याच्या बिया अवश्य असाव्या. कारण यामुळे तुमच्या नखांचा पिवळेपणा आणि ठिसूळपणा कमी होऊ शकतो. नखांच्या उत्तम आरोग्यासाठी शरीराला झिंकची गरज असते. भोपळ्याच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात झिंक आहे. जे तुमच्या आरोग्यासाठी आणि नखांच्या सौंदर्यासाठी फायदेशीर ठरते.
दही –
दह्यामध्ये कॅलशिअमचे प्रमाण मुबलक असते. हाडे, केस आणि नखांच्या मजबूतीसाठी शरीराला भरपूर कॅलशिअमचीच गरज लागत असते. दह्यात कॅलशिअमसोबत लॅक्टिक अॅसिड असते ज्यामुळे तुमची त्वचा आणि नखे चमकदार होतात. यासाठीच नखाच्या आरोग्यासाठी आणि त्यांना मजबूत आणि चमकदार करण्यासाठी दररोज तुमच्या आहाराच एक वाटी दही असायलाच हवे.
Shutterstock
निरनिराळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये –
भारतीय खाद्यसंस्कृतीत विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यांचा वापर करण्यात येतो. कारण या डाळी आणि कडधान्ये आपल्या शरीराला लोह, प्रोटिन्स, झिंक आणि बायोटिन पुरवत असतात. या सर्व घटकांची तुमच्या नखांच्या वाढीसाठी अत्यंत गरज असते. म्हणूनच तुमचा आहार हा नेहमी डाळ आणि कडधान्यांने परिपूर्ण असावा.
सुंदर आणि सुदृढ दिसण्यासाठी संतुलित आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे. या चार खाद्यपदार्थांमधून तुम्हाला प्रोटिन्स, झिंक,कॅलशिअम अशा अनेक घटकांचा पूरवठा होऊ शकतो. म्हणूनच आहारात हे फक्त चार खाद्यपदार्थ नियमित घेऊन तुम्ही तुमच्या नखांचे सौंदर्य नक्कीच वाढवू शकता. शिवाय यामुळे तुम्हाला नखांसाठी वारंवार मेनिक्युअर अथवा स्पादेखील करावं लागणार नाही. नखं अधिक सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी त्यांच्यावर हे सुंदर नेलपेंट अवश्य लावा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
तुमचीही सुंदर वाढवलेली नखं अचानक तुटतात, मग करा हे उपाय (Home Remedies For Weak Nails In Marathi)
नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)