ADVERTISEMENT
home / Ayurveda
चमकदार त्वचेसाठी घरगुती आयुर्वेदीक फेसमास्क

चमकदार त्वचेसाठी घरगुती आयुर्वेदीक फेसमास्क

चमकदार त्वचा हवी असेल तर आपण अनेकदा पार्लरमध्ये जातो. पण तुम्हाला माहीत आहे का असे काही घरगुती आयुर्वेदीक फेसमास्क आहेत जे तुम्हाला त्वरीत चमक मिळवून देतात. चमकदार त्वचेसाठी तुम्ही घरगुती आयुर्वेदीक फेसमास्कचा वापर केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. त्वचेवर चमक तर येतेच पण त्याशिवाय त्वचा अधिक निरोगी आणि स्वच्छ राखण्यास मदत मिळते आणि त्वचेमधील रक्तप्रवाह वाढून त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसते. चेहऱ्याच्या मांसपेशींना यामुळे अधिक टोन मिळतो. त्वचेची इलास्टिसिटी योग्य राखली जाते. तसंच छिद्रांमधून अतिरिक्त मळ आणि धूळ बाहेर फेकली जाते. त्यामुळे या घरगुती आयुर्वेदीक फेसमास्कचा उपयोग करून घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल नक्की हे कोणते फेसमास्क आहेत? तर त्याविषयी तुम्हाला आम्ही अधिक माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

पुदीना- दही फेसमास्क

Shutterstock

चेहऱ्यासाठी हे चांगले कॉम्बिनेशन आहे. 1-1 चमचा दही आणि मुलतानी माती घ्या. त्यात 1 चमचा पुदीना पावडर मिक्स करा. दह्यामध्ये हे दोन्ही भिजवून साधारण अर्धा तास तसंच बाजूला ठेऊन द्या. नंतर पुन्हा नीट फेटून घ्या आणि चेहऱ्याला लावा. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि पुन्हा थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील फरक त्वरीत जाणवेल.

ADVERTISEMENT

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक

अंडे आणि मधाचा फेसपॅक

Shutterstock

अंडे आणि मध हे दोन्ही चेहऱ्यावर उत्तम चमक आणण्यासाठी फायदेशीर ठरतात. मधामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावर चमक आणण्यास उपयुक्त असतात. अर्धा चमचा मध घ्या. त्यात 1 अंड्याचा पिवळा भाग मिक्स करा. त्यात 1 चमचा दुधाची पावडर घालून व्यवस्थित फेटून घ्या. ही जोडी जाडसर तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवा. 

ADVERTISEMENT

 

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी आयुर्वेदीक फेसमास्क

तेलकट त्वचा असणाऱ्यांना चेहऱ्याची खूपच काळजी घ्यावी लागते. चेहऱ्याला काहीही लाऊन चालत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काही खास आयुर्वेदीक फेसमास्क आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या फेसमास्कचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर कायम चमक राखून ठेऊ शकता.

बटाट्याच्या फेसमास्क

Shutterstock

ADVERTISEMENT

बटाटा हा चेहऱ्यावरील काळेपणा घालवून चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करतो. 1-1 चमचा बटाट्याचा रस आणि मुलतानी माती मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर तुम्ही चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि पुन्हा थंड पाण्याने  धुवा आणि चेहऱ्यावर फरक पाहा. 

पपईचा फेसमास्क

Shutterstock

पपई ही त्वचेवर चमक आणण्यासाठी योग्य फळ आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पपईचा खाऊन आणि अगदी त्वचेवर वापर करून दोन्ही फायदा होतो. पपईमध्ये आढळणारे गुण हे चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. 1 चमचा पपई मॅश करून ती चेहऱ्याला लावा. सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात लिंबाचा रसही मिक्स करून वापरू शकता. या दोन्हीच्या मिश्रणाने चेहऱ्यावर चमक राखण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

अंडे आणि मुलतानी मातीचा फेसपॅक

Shutterstock

मुलतानी माती ही चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. तसंच याचा कोणतीह दुष्परिणाम चेहऱ्यावर होत नाही. 1 अंड्याचा सफेद भाग, त्यात 1 चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट, अर्धा चमचा पाणी घालून मिक्स करून अर्धा तास भिजवून ठेवा. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर 15 मिनिट्स लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि फरक पाहा. 

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

ADVERTISEMENT

सर्व त्वचेसाठी आयुर्वेदीक फेसपॅक

आम्ही खाली दिलेले फेसमास्क हे कोणत्याही स्वरूपाच्या त्वचेवर तुम्हाला वापरता येतील. तुम्ही हे घरगुती फेसमास्क वापरून आपली त्वचा अधिक चमकदार बनवू शकता. 

सफरचंदाचा फेसमास्क

Shutterstock

सफरचंद खाऊन त्वचा चांगली होते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र याचा फेसपॅक वापरल्यानेही तितकाच फायदा मिळतो हे कमी जणांना ठाऊक असेल. तुम्हाला त्वचा अधिक चमकदार हवी असेल तर तुम्ही एक सफरचंद सोलून ब्लेंडरमधून पेस्ट करून घ्या. त्यात मध मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिट्स झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

ADVERTISEMENT

बदाम आणि मधाचा फेसमास्क

Shutterstock

बदाम हा चेहऱ्याला अधिक चमक येण्यासाठी फायदेशीर ठरतो. 2 चमचे वाटलेली बदाम बेस्ट, त्यात अर्धा चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला त्वरीत चेहऱ्यामध्ये फरक दिसून येईल. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि माती निघून जाण्यासही मदत मिळते. 

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

ADVERTISEMENT

मधाचा फेसमास्क

Shutterstock

मध हे त्वचेला अधिक मुलायम आणि चमकदार बनवते. मध आपल्या चेहऱ्यावर अतिशय पातळ लेअर स्वरूपात लावा आणि पंधरा मिनिट्सने कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला तुमची त्वचा अधिक मुलायम आणि चमकदार दिसून येईल. 

कॉर्नफ्लेक्स आणि ऑईल वॉटर फेसमास्क

1 चमचा बदाम तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 2 चमचा पाणी, 1 चमचा कॉर्नफ्लेक्स पावडर, दोन चमचे तेल हे सर्व मिक्स करून घ्या. कॉर्नफ्लेक्स  पावडर आणि पाणी फेटून त्यात तेल हळूहळू मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर कोमट पाण्याने आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवा. 

ADVERTISEMENT

स्ट्रॉबेरी फेसपॅक

Shutterstock

स्ट्रॉबेरी ही चेहऱ्यावर अधिक नैसर्गिक आणून देते. 3 स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात 1 चमचा गुलाबजल मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. अर्धा तास झाल्यावर चेहरा कोमट पाण्याने आणि मग थंड पाण्याने धुवा.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT