साडी… हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता आणि लाडका असा कपड्याचा प्रकार आहे. साडी नेसणे ही एक कला आहे. जी भारतीयांनी अवगत गेली आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी साडी नेसणे महिलांना सगळयात जास्त पसंत असते. साडी कशी नेसावी ही देखील एक कला आहे. लांब लचक कपड्याचा तुकडा ड्रेप केला जातो. त्यामुळे येणारा ग्रेस हा महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवत असतो. भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात. या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहे. इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काहीना काही वैशिष्ट्य आहे. ते तुम्हाला माहीत असायला हवा. आजच तुमचे साडीचे कपाट उघडा आणि बघा तुमच्याकडे कोणत्या साड्या नाहीत. आणि भारतीतल साड्यांचे प्रकार आणि saree name list in marathi मधून तुमच्याकडे नसलेली साडी नक्की विकत घ्या.
Table of Contents
- पैठणी – Paithani Saree
- बनारसी – Banarasi Saree
- कांजिवरम साडी – Kanjeevaram Saree
- जामदनी साडी – Jamdani Saree
- बांधणी – Bandhani
- कसवू साडी – Kasavu Saree
- मुगा सिल्क साडी – Muga Silk Saree
- फुलकारी साडी – Phulkari Saree
- कलमकारी साडी – Kalamkari Saree
- चंदेरी साडी – Chanderi Saree
- टसर सिल्क साडी – Tusser Silk Saree
- पोचमपल्ली साडी – Pochampally Saree
- मैसूर सिल्क साडी – Mysore Silk Saree
- कांथा साडी – Kantha Saree
- अशी ठेवा साडी जपून – Tips For Saree Care In Marathi
- FAQ’S
पैठणी – Paithani Saree
साडींची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती साडी म्हणजे पैठणी. प्रत्येक महिलेकडे एकतरी पैठणी असतेच. पैठणीचा काठ किंवा त्याचा प्रकार हा कितीही कॉमन झाला तरी देखील तो एव्हरग्रीन असा पर्याय आहे. येवल्याची ओळख असलेल्या या साडीचे हल्ली अनेक प्रकार मिळतात. ट्रेडिशनल काठ, मुनिया काठ, मोर काठ, फुलांची काठ असे विविध प्रकारचे काठ देखील मिळतात. पूर्वी पदरावरती जर तारिचा मोर अशी या साडीची ओळख होती. पण आता या साडीच्या पदरावर नुसते मोर नाही. तर वेगवेगळ्या नक्षी असतात. श्रीकृष्ण, मोठा मोर, पोपट, राधाकृष्ण अशा विविध डिझाईन्स मन आकर्षित करणाऱ्या असतात. पैठणी साडी डिझाईन्स या वेगवेगळ्या आणि आकर्षक असतात. पैठणी साड्यांमध्ये सेमी पैठणी, हँडलूम, मशीनमेड असे प्रकार असतात. त्यानुसार याची किंमत ठरत असते. साधारणपणे खरी पैठणी 12 हजारांपासून पुढे मिळते. या साड्यांची किंमत लाखापर्यंत वाढत जाते.
महिलांनो तुमच्या कपाटात एक तरी पैठणी असायलाच हवी.
बनारसी – Banarasi Saree
येवल्याची ओळख जशी पैठणी आहे. तशीच वाराणसीची ओळख बनारसी साडी आहे. वाराणसीतील बेनारस (Benares) या नावावरुनच या साडीचे नाव बनारसी साडी असे पडले. बनारसी साडी ही सगळ्या साड्यांच्या प्रकारामधील एक उत्तम साडी समजली जाते. बनारसी साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेली जरी आणि काम. पूर्वीच्या काळी या साड्यांमध्ये खऱ्या सोने, चांदीच्या जरी घातल्या जात होत्या. आता यात सोन्याच्या किंवा चांदीच्या ताऱ्या असत नाहीत. पण तरीदेखील या साडीची खासियत त्याची डिझाईन आहेच. फुल, मोती, कलगा आणि पानाफुलांची विशिष्ट जरी बॉर्डर यासाडीचा रीचनेस वाढवते.
मुघल काळापासून या साड्यांची नोंद आहे. पूर्वीच्या काळी या साड्या वेविंग करुन म्हणजेच एक एक धागा जोडून बनवल्या जायच्या. ज्याला आपण हँडलूम असे म्हणतो. ही एक साडी बनवण्यासाठी साधारण 15 दिवस जायचे. साहजिकच या साड्यांची किंमत जास्त असायची. साड्यांच्या लिस्टमधील (saree name list in marathi) ही महत्वाची अशी साडी आहे.
आता बनारसी साड्या बनारस येथेच नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये बनवल्या जातात. त्यामुळेच या साड्या सहज उपलब्ध होतात. बनारसी साड्या सिल्क, कोरा, जरी, जॉर्जेट अशा मटेरिअलमध्ये मिळतात. बनारसी साड्यांच्या युनिक पॅटर्नमुळे या साड्या कायम वेगळ्या ठरतात. त्यामुळे या साड्या तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात. या साड्यांची रेंज साधारण 10 हजारांच्या पुढेच असते. पण हल्ली अगदी 2 हजारापासून या सारख्या दिसणाऱ्या साड्या मिळतात.
कांजिवरम साडी – Kanjeevaram Saree
तामिळनाडूमधील कांचिपुरम राज्यातील या साडीला कांचिपुरम साडी किंवा कांजिवरम साडी म्हणून ओळख आहे. तामिळनाडूमध्ये खास लग्नकार्यासाठी ही साडी आवर्जून नेसली जाते. त्यामुळेच या ठिकाणी साडीचा हा प्रकार खूपच जास्त प्रचलित आहे. याशिवाय केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देखील ही साडी नेसली जाते.
कांजिवरम साडीचे विशेष काय? असे विचाराल तर या साडीचा कापड हा जास्त काळासाठी टिकतो. त्यामुळे ही साडी जास्त टिकते. कांजिवरम साडीमध्ये तीन वेगवेगळ्या सिल्क दोऱ्यांचा वापर केला जातो. त्यात चांदीच्या तारादेखील वापरल्या जातात. त्याचे वेव्हिंग चांगले असल्यामुळे ही साडी टिकते. शिवाय त्यामुळे त्याचे वजन देखील जास्त असते.
कांजिवरम साड्या या चमकदार असतात. यासाड्यांची युनिक डिझाईन त्यांची किंमत ठरवते.
कांजिवरम साड्या या लाखांच्या घरातसुद्धा मिळतात. पण हल्ली स्वस्तात मिळणाऱ्या साड्या देखील आहेत.
जामदनी साडी – Jamdani Saree
मुघल काळात तयार झालेली आणखी एक साडी म्हणजे जामदनी साडी. या साडीला जामदनी हे नाव आता पडले आहे. पण ही साडी अजूनही काही ठिकाणी धकाई (Decai) या नावाने ओळखली जाते. बांग्लादेशमधील धकाई म्हणजेच आताचे ढाका यावरुन या साडीचे नाव पडले आहे. या साडीच्या शोधामुळे अनेकांना अर्थाजनाचा एक मार्ग मोकळा झाला. 14 व्या शतकापासून या साडीचे नाव आहे. भारतातील साड्यांचे प्रकार जाणून घेताना ही साडी जाणून घ्यायला हवी.
बांग्लादेशमध्ये या साडीचा शोध लागला. ही साडी कॉटन प्रकारातील आहे. त्यामुळे ही साडी मऊ आणि तलम असते. अशा साड्या दिसायला खूपच रिच असतात. हँडलुम प्रकारातील ही साडी मस्लिन (Muslin) या कापड प्रकारातील आहे. त्यामुळे हे कापड खूपच जास्त सुंदर दिसते. जामदनी साड्यांना जगभरात मागणी आहे. या साडी अगदी रोज नेसण्यापासून ते काही खास कार्यक्रमांना देखील नेसल्या जातात. जामदानी साड्यांवर फुलांच्या आणि हलक्या कपड्यांच्या डिझाईन्स असतात. त्यामुळे या साड्या वेगळ्या ठरतात. या साड्या बांग्लादेशमध्ये प्रत्येक ठिकाणी मिळतात.
जामदनी साड्या या 1हजार पासून अगदी 10 हजारापर्यंत किंवा त्याहून अधिक किंमतीत मिळतात.
बांधणी – Bandhani
बांधणी साडी म्हटली की, आपल्याला गुजरात राज्याची आठवण आल्यावाचून राहणार नाही. गुजरातमधील खत्री कम्युनिटीने या विशिष्ट प्रकारच्या साडी प्रकाराला सुरुवात केली. हल्ली टाय डाय प्रकारातील कपडे खूप प्रसिद्ध आहेत. तशाच या साड्या असतात. बांधणीच्या साड्या या एव्हरग्रीन अशा प्रकारातील आहे. या साडी बनवण्यासाठी एक बंधन बांधले जाते. म्हणजेच ते विशिष्ट पद्धतीने बांधले जाते. त्यावरुनच त्याचे नाव ‘बांधणी’ असे नाव पडले. ही एक जुनी कला असून ती गुजराज आणि राजस्थान या भागात या साड्या बनवल्या जातात.
गुजरातमध्ये ही साडी खूपच जास्त वापरली जाते. अनेक मंगलमयी प्रसंगी गुजराती महिला या साड्या नेसतात. या साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांचे रंग छान ब्राईट असतात. लाल, केशरी, निळा, गुलाबी, मल्टी कलर अशा वेगवेगळ्या रंगामध्ये या साड्या मिळतात. या साड्या सिल्क आणि कॉटन अशा स्वरुपात मिळतात. महागड्या करण्यासाठी त्यावर वर्क देखील केले जाते. त्यामुळे या साड्यांची किंमत देखील वाढत जाते.
कसवू साडी – Kasavu Saree
कसवू साडी ही केरळमधील साडी म्हणून फारच प्रसिद्ध आहे. केरळमध्ये अनेक मंगलप्रसंगी नेसली जाते. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही साडी मोती रंगाची असते. या साडीची बॉर्डर गोल्डन रंगाची असते. त्यामुळे ही साडी अत्यंत सात्विक आणि शुद्ध अशी वाटते. या साडीला कसवू नाव पडण्याचे कारण म्हणजे यामधील असलेली गोल्डन जरी. त्यावरुन या साडीचे नाव कसवू साडी असे पडले. saree name list in marathi मध्ये या साडीचे नाव आवर्जून घेतले जाते.
कसवू साड्या या केरळमध्ये लग्न लागताना देखील नेसल्या जातात. त्यामुळे या साड्या अगदी कॉटनपासून सिल्क अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बनवल्या जातात . या साडीला कसारागोड साडी असे देखील म्हटले जाते. केरळमध्ये या साडीचे विशेष महत्व आहे. कारण ही साडी केरळाचे ट्रेडिशन दाखवते.जर तुम्हाला काही खास कार्यक्रमांसाठी थोडे वेगळे दिसायचे असेल तर तुम्हाला ही साडी घेता येईल. या साड्या तुम्हाला अगदी 5 हजारांपासून पुढे मिळतात.
मुगा सिल्क साडी – Muga Silk Saree
सिल्क साडीतील आणखी एक प्रकार म्हणजे मुगा सिल्क साडी. ही साडी आसाम राज्याची ओळख आहे. अगदी पूर्वीपासून आसाम हे राज्य उत्तम सिल्क साड्यांसाठी ओळखले जाते. या ठिकाणी उत्तम क्वालिटीच्या सिल्क साड्या मिळतात. मुगा नावाच्या किड्यापासून हे सिल्क मिळते म्हणून या साडीचे नाव मुगा साडी असे म्हणतात.
मुगा सिल्क साडीचा रंग हा मुळातच पिवळसर असतो. त्यावर लाल, हिरवा आणि काळ्या रंगाचे काम केलेले असते. मुगा सिल्क साडीच्या प्रिंट्ससोबतच या साडीवर थ्रेड वर्क देखील केले जाते. त्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते. आसामचा बिहू तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला त्यामध्ये महिला नेसतात त्या साड्या देखील नक्कीच माहीत असतील. या साड्या विशिष्ट प्रकारच्या असतात. आसाममधील प्रत्येक महिलेकडे ही साडी असतेच. तुम्हालाही वेगळ्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही या साड्या घ्यायल्या हव्यात.
फुलकारी साडी – Phulkari Saree
फुलकारी हा प्रकार पंजाब राज्याशी निगडीत असा साडीचा प्रकार आहे. याठिकाणी धाग्याचे जे काम केले जाते त्याला फुलकारी असे म्हणतात.त्याचा वापर करुन जी साडी बनवली जाते त्याला फुलकारी साडी असे म्हणतात. फुलकारी साड्यांमध्ये जॉमेट्रिकल आकार काढले जातात. उदा. चौकोन, आयत, त्रिकोण असे काही आकार त्यामध्ये असतात. त्यामुळे या साड्या वेगळ्या दिसतात.
गेल्या कित्येक वर्षांपासून फुलकारी साड्या किंवा हे एम्ब्रोडरी काम बदलत चाललेले आहे. त्यामुळे आता पूर्वीसारख्या फुलकारी साड्या बनवल्या जात नाही. 7 व्या शतकापासून या प्रकारच्या कपड्याची नोंद आहे. फुलकारी साड्यांप्रमाणेच बिहारमधील काशिदा वर्कशी साधर्म्य असलेले आहे. पंजाबमध्ये नववधूला डोक्यावर देण्यासाठी हा कपडा वापरला जातो. या शिवाय काठाच्या साडी डिझाईन्स दिसायला खूपच सुंदर असतात.
कलमकारी साडी – Kalamkari Saree
कलमकारी साडी ही मूळ इराणची आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश या भागात अशाप्रकारची कलाकारी पाहायला मिळाली. कलमकारी साड्या या सध्याच्या काळात खूपच प्रसिद्ध आहेत. कलमकारी डिझाईन ही पानाफुलांची बनवली जाते. हँड प्रिटेंट किंवा ब्लॉक प्रिंटचा उपयोग करुन याची डिझाईन बनवली जाते. या साड्यांचे वैशिष्ट्य असे की, या साड्यांसाठी नैसर्गिक रंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळे या साड्यांचा रंग हा फिक्कट होत जातो. माहितीनुसार ही साडी बनवण्यासाठी साधारण 23 वेगवेगळ्या पायऱ्या समाविष्ट असतात.
खऱ्या कलमकारी साड्या या कॉटन मटेरिअलमध्ये मिळतात. त्यामुळे या साड्या नीट जपाव्या लागतात. त्यांना इस्त्री करुन कडक नेसता आल्या तर त्या अधिक चांगल्या दिसतात.
चंदेरी साडी – Chanderi Saree
भारतातील साड्यांचे प्रकारमधील आणखी एक महत्वाची साडी म्हणजे चंदेरी साडी. चंदेरी साडी ही मध्य प्रदेशाची ओळख आहे. चंदेरी साडीच्या नोंदी या अगदी दुसऱ्या शतकापासून दिसून येतात. या साडीमध्ये मालवा आणि बुंदेलखंडाची कला सामावलेली आहे. पूर्वीच्या काळात राणी-महाराणींच्या साडी कलेक्शनमध्ये अशा प्रकारची साडी हमखास असायची. चंदेरी साड्या सिल्क, चंदेरी कॉटन आणि सिल्क कॉटन अशा स्वरुपात मिळतात. चंदेरी साड्या प्लेन असतात. पण कालांतराने त्यावर अनेक नक्षीकाम देखील दिसून आले. चंदेरी साड्यांवर पानाफुलांची, पक्ष्याची नाजूक अशी डिझाईन असते. यामध्ये बॉर्डरला जरी काम केलेले असते. त्यामुळे या साड्या वेगळ्या आणि उठून दिसतात.
चंदेरी साड्या जरी साध्या दिसत असल्या तरी देखील या साड्या महाग असतात. या साड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या चापून चोपून बसतात.
टसर सिल्क साडी – Tusser Silk Saree
टसर सिल्क साडी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. याला तुसा, तुसर, तुसार आणि कोसा साडी अशा नावाने देखील ओळखले जाते. एका विशिष्ट सिल्क वर्मपासून हे सिल्क मिळते. सिल्कचे हे किडे जांभुळ आणि ओकच्या झाडावर सापडतात. सिल्क वर्मला सुकवण्यासाठी ते उन्हात ठेवले जाते. ककून सुकल्यानंतर ते उकळत्या पाण्यात टाकले जाते आणि मग सिल्क थ्रेड काढले जातात. सिल्कमध्ये उकळत्या पाण्यातून सिल्क काढणे हे देखील महत्वाचे असते. त्यामुळे हे काम अगदी जपून केले जाते.
या साडीचे प्रॉडक्शन भागलपूर आणि त्या आजुबाजूच्या इतर गावांमध्ये केले जाते. त्यामुळे ही साडी खेड्यापाड्यातून मोठ्या मेहनतीने बनवून आणली जाते. टसर सिल्क साड्या दिसायला कितीही सुंदर असल्या तरी देखील त्या खूप नाजूक असतात. अशा साड्या जास्त काळासाठी टिकत नाहीत. अशा साड्या विरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या साड्या जपाव्या लागतात.
हल्ली अगदी 1 हजार रुपयांपासून या साड्या मिळतात.
पोचमपल्ली साडी – Pochampally Saree
पोचमपल्ली साडी ही देखील तुम्ही अनेक मोठ्या साड्यांच्या दुकानात पाहिली असेल. पोचमपल्ली साडी ही तेलंगणाशी निगडीत अशी साडी आहे. हल्ली आपण ज्या इक्कतच्या साड्या पाहतो या साड्या तेलंगणामधून आलेल्या आहेत. अशाच डिझाईन्स पोचमपल्ली साड्यांमध्ये असतात. तेलंगणामध्ये पोचमपल्ली नावाचे गाव आहे या ठिकाणी या पोचमपल्ली साड्या बनवल्या जातात. या गावाच्या आजुबाजूला असणाऱ्या गावांमध्ये देखील अशा साड्या विणल्या जातात .
पोचमपल्ली साड्या कॉटन, सिल्क आणि सिको सिल्क अशा प्रकारात मिळतात. त्यामुळे या साड्या खूपच छान बसतात.पोचमपल्ली साड्यांची डिझाईन्स खूप जुनी आहे अशा नोंदी देखील अनेक ठिकाणी दिसतात.
माहीत आहे का?: पोचमपल्ली साड्या तुम्ही सगळ्यात जास्त पाहिल्या असतील तर एअर इंडियाच्या कॅबिन क्रूनी नेसलेल्या. एअर इंडिया विमानाच्या एअरहोस्टेस या साड्या नेसतात.
मैसूर सिल्क साडी – Mysore Silk Saree
देशात एकूण 20 हजार टन इतके सिल्क निर्माण केले जाते. त्यातील कर्नाटकात 9 हजार मेट्रिक टन इतके मल्बेरी सिल्क एकट्याने केले जाते. त्यामुळे कर्नाटकात कपड्यांचे आणि साड्यांचे प्रकार अधिक मिळतात. मैसूर सिल्क साडी ही कर्नाटकातील मैसूर या भागात होते. टिपू सुलतानच्या काळात कर्नाटकात खूप मोठ्या प्रमाणात सिल्क घेतले जात होते.
मैसूर सिल्क साडी हल्ली जरी स्वस्तात मिळत असली तरी खऱ्या साड्यांचे वैशिष्ट विचाराल तर त्यामध्ये चांदी आणि अगदी कमी प्रमाणात सोन्याच्या जरीचा वापर केला जातो. त्यामुळे या साड्यांची किंमत ही खूप जास्त असते. पण खरी मैसूर सिल्क साडीचा काठ, साडीचे अंग हे खूप बारकाईने केलेले असते. या साड्या ऑनलाईन घेण्याऐवजी तुम्ही तेथील योग्य विक्रेत्याकडून घेणेच योग्य असते.
कांथा साडी – Kantha Saree
काथा साडी ही बंगालची ओळख आहे. काथा साडीवर सुंदर अशी एम्ब्रोडरी केलेली असते. काथा साडी मागेही एक कहाणी आहे. ज्याप्रमाणे आपण गोधडी जुन्या कपड्यांना घेऊन बनवतो अगदी त्याचप्रमाणे या साडीवर देखील पॅचवर्क केले जाते. काथा या वर्कवरुन या साडीला कांथा साडी असे नाव पडले आहे. पण आसाम, पश्चिम बंगालच्या अनेक राज्यांमध्ये जुन्या कॉटन साड्या, धोतर यांचा कपडा घेऊन त्याला जोडून चादरी, उशीची कव्हर बनवली जातात.
कांथाची साडी बनवताना ती कॉटन अथवा सिल्क या मटेरिअलवर बनवली जाते. प्लेन अशा कॉटन साडीवर धाव दोऱ्याने वेगवेगळ्या नक्षी बनवल्या जातात. त्यामुळे या साडी खूपच सुंदर दिसतात. सिल्क साडीवर पॅचवर्क देखील केले जाते त्यामुळे या साड्या खूपच सुंदर दिसतात. साडीवरील कांथा वर्कवरुन त्याची किंमत ठरते. अशी एक साडी तुमच्याकडे नक्कीच असायला हवी अशी आहे.
अशी ठेवा साडी जपून – Tips For Saree Care In Marathi
साडी कितीही रुपयाची असतो ती साडी जपून ठेवणे फारच गरजेचे असते. तुम्ही अगदी कोणतीही साडी नेसत असाल तरी साडीची काळजी कशी घ्यावी त्यासाठी सोप्या टिप्स
- साडी एकदा नेसल्यानंतर लगेच धुवायला टाकू नका. साधारण 7 ते 8 वापरानंतर साडी धुणे गरजेचे असते.
- साड्या या नेहमी ड्राय क्लीन कराव्यात. विशेषत: सिल्कच्या साड्या तुम्ही ड्राय क्लीन कऱणेच योग्य असते. त्यामुळे साड्या स्वच्छ होतात.
- काही साड्यांमध्ये जरी काम जास्तीचे असते. अशा साड्या आपण रोज नेसू असे होत नाही. जर तुम्ही साड्या रोज नेसत नसाल तरी देखील तुम्ही साड्यांची घडी मोडून ती पुन्हा घडी करुन ठेवायला हवी. त्यामुळे साड्या या विरत नाही आणि घडीत फाटत नाही.
- जर तुमच्याकडे महागड्या साड्या असतील ज्यामध्ये सोने चांदीच्या जरी असतील अशा साड्यांना तुम्ही उन दाखवणे देखील गरजेचे असते. सकाळच्या उन्हात तुम्ही साडी अगदी काही वेळासाठी ठेवली तरी देखील त्यांना चांगले उन मिळते.
- साड्या हँगरला लावून ठेवत असाल तरी देखील त्या साड्या काढून तुम्ही त्यांची तपासणी करायला हवी.
- एखाद्या साडीला थोडे डाग असतील आणि ते जाण्यासारखे असतील तर तुम्ही तेवढाच भाग थोडा धुवायला हवा आणि वाळवायला हवा. साडीसाठी अगदी लाईट असे डिटर्जंट वापरणे नेहमीच चांगले.
अशा पद्धतीने तुम्ही साड्यांची काळजी घ्यायला हवी.
FAQ’S
भारतात साड्यांचे एकूण किती प्रकार मिळतात?
भारतात प्रामुख्याने 30 साड्यांचे प्रकार मिळतात. वेगवेगळ्या राज्याची काहीतरी खासियत असते. त्या ठिकाणी बनवणारा कापड त्यानुसार साड्यांचे प्रकार ठरत असतात आणि त्यात भर पडत असते. पण साडीचे काही ठळक प्रकार आहेत. जे सर्वसाधारणपणे 30 आहेत असे मानले जाते.
साड्यांची काळजी घेण्यासाठी काय करावे?
साड्यांची काळजी घेणे तसे फारच सोपे आहे. साड्या या सतत धुणे चांगले नाही. त्यामुळे साड्यांचा रंग आणि पोत खराब होतो. साड्या नेसून झाल्यानंतर त्या वाळवून मगच त्या कपाटात ठेवून द्याव्यात. साधाऱण 7 ते 8 वेळ साडी नेसल्यानंतर साडी धुण्यास काहीच हरकत नाही. ज्या साड्यांना ड्राय क्लिनिंगची गरज असते. त्या साड्या तशाच धुवायला हव्यात. त्यामुळे साड्या चांगल्या राहण्यास मदत मिळते.
साडी नेसण्याची योग्य पद्धत कोणती?
साडी नेसण्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. साडी नेसणे तसे सोपे आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडा सराव हवा. साडीचा निऱ्या आणि पदराचा भाग हा खरा शो असतो. तो नीट काढता आला तर साडी एकदम चापून चोपून बसते. त्यामुळे साडी नेसण्याचा सतत सराव करायला हवा.
हे हि वाचा,
गुडीपाडव्यासाठी साडी लुक्स
नेटच्या साडीची अशी राखा निगा