ADVERTISEMENT
home / Bridal Makeup
नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लुक्स (Celebritry Bridal Makeup Looks In Marathi)

नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लुक्स (Celebritry Bridal Makeup Looks In Marathi)

लग्न हा एक असा खास क्षण आहे, ज्यावेळी आपल्यापैकी कोणालाच लुक्सबाबत तडजोड करायची नसते. आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस जेव्हा प्रत्येक नववधूला सर्व सोहळ्यांमध्ये सुंदर आणि खास दिसायचं असतं.कितीही टेन्शन्स असली तरीही ती चेहऱ्यावर न दिसू देता हे सगळं तिला पार पाडायचं असतं. ह्या सर्वात एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तिचा मेकअप.असा मेकअप जो तिला सूट करेल आणि सौंदर्याला चारचांद लावेल. खरंच आहे ना… कितीही महागाचे कपडे आणि ज्वेलरी असो जोपर्यंत तुमचा मेकअप चेहऱ्याला सूट करणारा नसेल तोपर्यंत तुमचा लूक पूर्ण होणार नाही. तुमच्या लूकमध्ये महत्वाची भूमिका तुमचा मेकअप पार पाडत असतो.तुमच्या खास दिवसासाठी ब्युटी एक्सपर्ट भारती तनेजा सांगत आहेत, काही खास सेलिब्रिटी ब्रायडल लुक्स जे तुम्ही तुमच्या लग्नात ट्राय करू शकता.

पारंपारिक भारतीय लुक

सेलिब्रिटी लुक

बोल्ड लुक

ADVERTISEMENT

पारंपारिक भारतीय लुक (Traditional Indian Look)

Bridal look 1

पारंपारिक भारतीय लूक कधीच आउटडेटेड होऊ शकत नाही. आपल्या देशात अनेक संस्कृती आणि त्यांच्या विविध परंपरा आहेत. कपडे, ज्वेलरी आणि विधींबरोबरच मेकअपचे पण अनेक प्रकार आहेत. इथे आपल्या निरनिराळ्या पारंपारिक पोशाखात आणि मेकअप लूक्समध्ये प्रत्येक नववधू सुंदर दिसत असते. पारंपारिक मेकअप प्रत्येक नववधूच्या संस्कृती आणि परंपरेप्रमाणे अगदी वेगळा असतो. मग ते पंजाबी लग्न असो, बंगाली असो वा ख्रिश्चन. प्रत्येक लग्नातील मेकअप हा वेगळ्या पध्दतीने केला जातो. जसं पंजाबी नववधूच्या कपाळावर टिकली असणं तितकंसं महत्वाचं नाही. तर बंगाली नववधूंमध्ये टिकली आवश्यक असते. याउलट ख्रिश्चन नववधूला अजिबातच टिकली लावली जात नाही. अशाच बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या पारंपारिक पध्दतीनुसार लक्षात ठेवाव्या लागतात. पारंपारिक भारतीय लूक मेकअपसोबत रॉयल क्लासिक पारंपारिक कपडेच छान दिसतात.

सेलिब्रिटी लुक (Celebrity Look)

स्वतःच्या लग्नात करीना आणि ऐश्वर्यासारखं सुंदर प्रत्येकीलाच दिसायचं असतं. करीनाने तिच्या लग्नाच्या दिवशी गॉर्जियस मेकअप आणि सुंदर ब्रायडल ड्रेसने अनेकांना घायाळ केलं होतं. तर ऐश्वर्याने ही तिच्या लग्नात गोल्डन कांजीवरम आणि गोल्ड मेकअपने चारचांद लावले होते. ह्या सेलिब्रिटीजनी येत्या काळातील अनेक होऊ घातलेल्या नववधूंना अनेक आयडियाज दिल्या. तसंच तुम्ही ही तुमच्या लग्नाच्या दिवशी सेलिब्रिटींचा बोल्ड मेकअप लूक फॉलो करून तुमचे स्वप्न साकार करू शकता.

बोल्ड लुक (Bold Look)

Bridal look 2

ADVERTISEMENT

आजकाल बोल्ड लूक खूपच चर्चेत आहे कारण बोल्ड इज ब्युटीफूल. तो काळ गेला जेव्हा नववधू काही ठराविक रंगांचे जसे चेरी पिंक, रेड किंवा मरून कलरचे ब्रायडल आउटफिट्स घालायच्या. नवीन जनरेशनच्या नववधू आपला लूक स्पेशल आणि वेगळ्या रंगांमध्ये पसंत करतात. ब्यूटी एक्सपर्ट भारती तनेजा अशाच बोल्ड नववधूंसाठी सांगत आहेत बोल्ड आणि ब्यूटीफल मेकअपच्या स्टेप्स, ज्यामुळे तुम्ही लग्नाच्या दिवशी दिसाल परफेक्ट.  

1) हायलायटर (Highlighter) 

हायलायटर हे एक जादुई प्रोडक्ट आहे, ज्याचा वापर परफेक्ट लूकसाठी केला जातो. तुमचे डार्क सर्कल्स अगदी आरामात लपवतं. तजेलदार लूकसाठी हे तुमच्या चीक बोन्स, नाकाला आकार देण्यासाठी आणि कपाळाच्या मधोमध लावा.

2) कॉन्ट्यूर (Conturing) 

कॉन्ट्यूरिंगमुळे तुमचे फिचर्स  रिडिफाइन, रिशेप आणि हायलाइट करता येतात. जसं चीक बोन्स, हनुवटी, नाक इ. ह्यामुळे तुमचा चेहरा शार्प, बोल्ड आणि डागविरहीत दिसतो. पण ह्याचा जास्त वापर ही करू नये.

Read More: Makeup Products In Marathi

ADVERTISEMENT

3) ब्लशर (Blusher) 

ब्लश किंवा चांगला ब्रॉन्झर तितकासा खास दिसत नाही परंतु जेव्हा तो त्वचेमध्ये मिसळला जातो तेव्हा ते आपल्या गालाच्या हाडांचा देखावा उंचावते आणि आपला लुक छान दिसतो.

4) आयशॅडो (Eyeshadow) 

जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन वस्तूंचा पहिल्यांदाच वापर करता आणि जुन्या वस्तूला बाहेरचा रस्ता दाखवता, त्याला म्हणतात बोल्ड. म्हणूनच जेव्हा आयशॅडोचा विषय येतो तेव्हा गोल्ड, पीच आणि हॅवी स्मोकी आईज अशा एक्सपेरिमेंट करायला घाबरू नका. पण करण्याआधी ते तुमच्या ब्रायडल आउटफिट्सवर चांगलं दिसतंय का?, हे नक्की पहा. तुमच्या मेकअपमध्ये अजून रंगत आणण्यासाठी विविध रंगांचा वापर करण्यास काहीच हरकत नाही.

5) आयलाईनर (Eyeliner) 

खरंतर जेट ब्लॅक आयलाईनर तुमच्या डोळ्यांना बोल्ड आणि ड्रामाटीक लूक देतं, तरीही तुम्ही तुमच्या कपड्यांप्रमाणे आजकाल ट्रेंडमध्ये असलेले गोल्डन, ब्लू, ग्रीन असे रंगीत आयलाईनर ही वापरून पाहू शकता. पण एका गोष्टीची काळजी घ्या की, तुमचं आयलाईनर वॉटरप्रूफ असावं. त्यासोबतच काजळ आणि व्हॉल्युमायजिंग मस्कारा लावायला विसरू नका. चेहऱ्याच्या गरजेनुसार आर्टिफिशियल आयलॅशेजचा ही वापर करता येईल. ज्यामुळे तुमचे डोळे मोठे आणि आकर्षक दिसतील.

6) लिपकलर (Lip Colour) 

ब्राइडल मेकअपमध्ये आपल्या आउटफिटनुसार नेहमी डार्क रंगाचा वापर केला पाहिजे. जसं मरून, डार्क रेड इ. ह्यानंतर तुम्हाला हवं असल्यास परफेक्ट पाउटसाठी लिप प्लमरसोबत एक्सपेरिमेंट करू शकता. जर तुम्हाला तुमच्या लग्नात बोल्ड ऐवजी गोड आणि नाजूक दिसायचं असेल तर ओठांवर न्यूड किंवा लाइट शेड्स जसं पिंकमधील शेड्सचा वापर करावा. आपल्या चेहऱ्यानुसार लाइट शेड्सचा वापर केल्याने तुम्हाला फ्रेश लूक मिळेल आणि त्यासोबतच दुसरे फिचर्स ही हाइलाइट होतील.

ADVERTISEMENT

7) ग्लिटर आईज मेकअप (Glitter Eyes Makeup)

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यापेक्षा डोळ्यांना जास्त हायलाइट करायचे असेल तर तुम्हाला ग्लिटर आय मेकअप करावा लागेल. ह्या मेकअपमध्ये शायनी आयलायनर, कलर्ड काजल आणि बोल्ड मस्कारा यांचा वापर केला जातो. ग्लिटर डोळ्यांमुळे तुम्हाला पूर्णपणे हटके आणि स्टनिंग हॉट लूक मिळतो. ह्यासाठी तुमच्या ब्रायडल आउटफिटला साजेसे रंग वापरा.  

Image courtesy – Instagram

हेही पहा:

लग्नसराईमध्ये या 15 गाण्यांनी मोहरेल नववधूचे मन 

ADVERTISEMENT

सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी

लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश

फुलांच्या वरमालांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)

13 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT