ADVERTISEMENT
home / Care
प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी

प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी

सध्या मस्त सुट्टीचे दिवस सुरु आहेत. छान समुद्रकिनारी किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये अनेक जण आपला वेळ घालवत असतील. पण जरा तुम्ही तुमच्या केसांना हात लावून पाहा तुमचेही केस हाताला रुक्ष वाटतायत का? किंवा तुमच्या केसांमध्ये खूप गुंता होतोय असे वाटते का? मग आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या केसांची अगदी सहज काळजी घेऊ शकता आणि तुमचे केस या उन्हाळ्यात खराबही होणार नाही.

अपरलीपवरील केस काढताय, मग या गोष्टी माहीत करुन घ्या

 तुमच्या केसांच्याही बाबतीत होते का असे ?

tangled-hair

  • केस रुक्ष, राठ होतात.
  • केसांचा प्रचंड गुंता होतो
  • घामामुळे केसांमधून वास येतो
  • केस विंचरताना तुटतात
  • केस बांधताना त्रास होतो

अशी घ्या केसांची काळजी

हेअर सिरम ठेवा सोबत

serum on hair

ADVERTISEMENT

तुम्ही जिथे फिरायला जाणार आहात. तेथील हवामान थोड्याफार फरकाने तुमच्या रोजच्या हवामानापेक्षा वेगळे असू शकते.अशावेळी तुम्हाला तुमच्या केसांचा गुंता अगदी सहज सोडवायचा असेल तर तुम्ही तुमच्यासोबत चांगले सिरम ठेवा. केस विंचरण्याआधी तुम्ही तुमच्या केसांना सिरम लावा म्हणजे केसांचा गुंता अगदी सहज सुटेल.

कोरड्या केसांसाठी केस धुणे

हेअरब्रशचा करा वापर

brushing hair

अनेकदा केस स्ट्रेट केल्यानंतर हेअरब्रश वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे केस तुटत नाही. जर तुम्ही अजूनही चपटा कंगवा वापरत असाल तर आताच तुम्ही त्याला हेअरब्रशने रिप्लेस करा. कारण हेअरब्रशने केसांचा गुंता सुटण्यास मदत होते. प्रवासात तुम्ही हेअरब्रश घेऊन जा. शक्य असेल त्यावेळी तुम्ही केस विंचराच. कारण त्यामुळे तुमच्या केसांमधील गुंता दिवसाअखेर काढण्यास तुम्हाला त्रास होणार नाही.

ADVERTISEMENT

या ट्रिक्सने तुमचेही केस दिसतील लांबसडक

केस बांधून ठेवा

hair braids

बाहेर गेल्यानंतर केस मोकळे सोडून फोटो काढायला अनेकांना आवडते आणि चांगले फोटो येत असतील तर केस मोकळे सोडायलाच हवेत. एखाद्या स्पॉटवर जाऊन केस सोडण्याआधी तुम्ही तुमचे केस बांधले तर उत्तम. जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही वेणी घालू शकता. जर तुम्ही स्ट्रेटनिंग केले असेल आणि तुम्हाला वेणी बांधता येत नसतील तर तुम्ही पोनीटेल बांधा.स्कार्फ घ्या.

कॉटनचा स्कार्फ वापरा

cotton scarf

ADVERTISEMENT

अनेक जण केसांची काळजी घेण्यासाठी स्कार्फ वापरतात. पण तुम्ही वापरत असलेला स्कार्फ कॉटनचा आहे की नाही ते पाहा. उन्हाळ्यात कॉटन स्कार्फचा वापर करणे हे बंधनकारक असते. त्यामुळे बाहेर असाल तेव्हा कॉटनचा स्कार्फचा वापर करा.त्यामुळे तुम्हाला घाम कमी येईल. पण जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही तुमच्यासोबत सतत टॉवेल ठेवा. केसांमधील पाणी टिपून घ्या.

घरच्या घरी झटपट केस वाढवण्याचे उपाय

ड्राय शॅम्पूचा करा वापर

dry shampoo

हल्ली बाजारात ड्राय शॅम्पू अनेक ठिकाणी मिळतात. तुम्ही जिथे जात आहात तेथील पाणी तुमच्या केसांसाठी चांगले असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्यक्ष  केस धुण्यापेक्षा तुम्ही ड्राय शॅम्पू वापरु शकता. त्यामुळे तुमचे केस स्वच्छ होतीलच. शिवाय केसांना घामाचा वास येणार नाही. जर तुमच्याकडे ड्राय शॅम्पू नसेल तर तुम्ही बेबी पावडरही केसांच्या स्काल्पला लावू शकता.

ADVERTISEMENT

तुम्ही हे ड्राय शॅम्पू ट्राय करु शकता

BBLUNT Back To Life Dry Shampoo For Instant Freshness Beach Please- 550 Rs.

Batiste Dry Shampoo Instant Hair Refresh Fruity & Cheeky Cherry- 299RS.

Wella Professionals EIMI Dry Me Dry Shampoo- 900Rs.

ADVERTISEMENT

*पण ड्राय शॅम्पूचा वापर उगाचच करु नका. त्यामुळेही तुमचे केस खराब होऊ शकतात. आठवड्यातून दोनदा प्रयोग केल्यास ठिक. पण जास्तवेळा नको.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

केस लवकर वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Essential Oils To Get Rid Of White Hair In Marathi

ADVERTISEMENT

Oils For Hair Growth & Tips In Marathi

(फोटो सौजन्य-Shutterstock)

20 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT