ADVERTISEMENT
home / Natural Care
हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो सगळ्यांनाच हवा असतो. मग त्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात. महागड्या फेशिअल ट्रिटमेंटपासून ते औषधं असे बरेच काही घेतले जाते. हे करुन तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो खरा. पण तो ग्लोही असतो अगदीच तात्पुरता…जर तुम्हाला तुमच्या चेहरा कायमच ग्लो करणारा हवा असेल तर तुमच्या पोटात काही नॅचरल ड्रिंक्स जाणे गरजेचे आहे. आज आपण अशाच काही नॅचरल ड्रिंक्सविषयी जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो आणण्यासाठी आहारात असू द्या ही फळं

गाजर-बीट ज्यूस

shutterstock

ADVERTISEMENT

व्हिटॅमिन A,B आणि C ने युक्त असलेले गाजर-बीट ज्यूस तुम्ही रोज प्यायला हवे. बीटाचा रस पिण्याची सवय अनेकांना असते. पण जर तुम्ही त्यात गाजर घालतेल तर तुम्हाला त्याचे फायदे लवकर मिळतील. 

एक गाजर आणि एक बीट घेऊन त्याची सालं काढून त्याचा रस तयार करुन घ्या. उरलेल्या चोथा तुम्ही सूपमध्ये वापरु शकता. किंवा काही जण त्यापासून फोडणीची कोशिंबीरही तयार करतात. रोज सकाळी नाश्तानंतर तुम्हाला अशा प्रकारचा रस पिण्यास काहीच हरकत नाही. बीटाचा रस तुम्हाला डिटॉक्स करायला मदत करतो. तर गाजरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A असते. महिनाभर या रसाचे सेवन करुन पाहा तुम्हाला फरक जाणवेल. 

चेहऱ्यावर हवा इन्स्टंट ग्लो तर मग ट्राय करा चॉकलेट फेस पॅक

डाळींंबाचा रस

ADVERTISEMENT

shutterstock

पावसाळ्यात डाळींब चांगली मिळतात. तसे तर वर्षभर डाळींब मिळतात. डाळींबाचा रस तुमच्या त्वचेसाठी अत्यंत चांगला असतो. इतर फळांच्या तुलनेत यामध्ये अँटीऑक्सिंडट अधिक असते. याचा फायदा तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करायला होतो. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग यामुळे दूर होतात. डाग गेल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येऊ लागतो. त्यामुळे तुमच्या नित्य सेवनात डाळींबाचा रस असायला काहीच हरकत नाही.

अनेक ठिकाणी डाळींबाचा रस चेहऱ्यालादेखील लावला जातो. पण हा रस चेहऱ्याला लावण्यापेक्षा तुम्ही तो प्यायला तर तुम्हाला त्वचेसोबत अन्य अनेक फायदे या रसामुळे मिळतील. 

डाळींबाचा रस काढणे थोडे किचकट काम आहे. कारण तुम्हाला आधी डाळींबाचे दाणे काढून मग तुम्हाला तो तुम्हाला करावा लागतो

ADVERTISEMENT

पपई आणि लिंबाचा रस

shutterstock

पपई आणि लिंबाचा रसही तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या त्वचेसाठी चांगला असतो. तुम्हाला पपई खायला आवडत असेल तर फारच उत्तम. पण जर तुम्ही फळ खात नसाल तर पपईचा रस करुन त्यात लिंबू पिळून तुम्ही तो रस पिऊ शकता. या रसाच्या सेवनामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक झालेला जाणवेल. जर तुम्हाला याची चव आणखी वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये काकडीदेखील घालू शकता. 

जाणून घ्या खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

ADVERTISEMENT

अॅलोवेरा आणि चेरी ज्यूस

shutterstock

अॅलोवेरा जेलचे अनेक फायदे आहेत. तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्याचे काम अॅलोवेरा करते. अॅलोवेरा जेल लावल्यामुळे तुम्हाला इतके चांगले फायदे मिळू शकतात. तर अर्थातच त्याच्या सेवनामुळेही तुम्हाला फायदे मिळू शकतात. अॅलोवेरा आणि चेरी असे कॉम्बिनेशन तुमच्या चेहऱ्यासाठी फारच चांगले असते. अॅलोवेरा जेल (चेहऱ्याला लावणारी जेल नाही)आणि चेरी या फळाचा गर काढून तुम्ही हा रस करुन घ्या आणि साधारण महिनाभर प्या. तुम्हाला फरक जाणवेल.

हे ही असू द्या लक्षात

  • हे काही रस आहे जे तुम्ही पिऊ शकता आणि तुमच्या चेहऱ्यावर महिन्याभरात ग्लो आणू शकता.पण फळांचा रस घेतल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास  जाणवत असेल तर त्या रसाचे सेवन तातडीने बंद करा. 
  • फळांचे रस खूप वेळ काढून मग ते घेऊ नका. कारण अशा रसांवर प्रक्रिया होऊन त्याचे विष देखील होऊ शकते. त्यामुळे छान ताजा रस काढून मस्त फळांचा रस काढा आणि तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणा.
  • एकावेळी सगळे रस ट्राय करु नका.एखाद्या ठराविक रासाचे महिनाभर सेवन असू द्या. 
11 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT