ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
सिताफळाच्या पानाचे फायदे

त्वचा आणि केसांचे सिताफळाच्या पानाचे फायदे (Benefits Of Sitafal In Marathi)

सिताफळ हे एक सिझनल फळ आहे. सध्या बाजारात सिताफळं मिळायला सुरूवात झाली आहे. वास्तविक प्रक्रिया करून तुम्ही सिताफळ अगदी वर्षाचे बाराही महिने टिकवून ठेवू शकता. पण जे फळ ज्या हंगामात पिकतं ते त्याच सिझनमध्ये खाण्यात एक वेगळीच मौज असते. हंगामी काळात ते फळ अगदी ताज्या स्वरूपात मिळत असल्यामुळे त्याचे चांगले फायदे आरोग्यावर होत असतात. सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. सिताफळ हे पित्तानाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे. काही जणांना पिकलेल्या सिताफळाचा गर खायला आवडतो तर काहीजणांना त्याच्यापासून तयार केलेलं मिल्कशेक आणि बासुंदी. कशाही स्वरूपात खाल्लं तरी सीताफळ खाण्याचे फायदे शरीरावर नक्कीच मिळू शकतात. फक्त सिताफळ हे एक गोड चवीचं फळ असल्याने ते मधुमेहींनी अती प्रमाणात खाऊ नये. यासाठीच जाणून घ्या सिताफळाच्या पानाचे फायदे (benefits of sitafal in marathi) काय आहे.

Benefits Of Sitafal In Marathi

सिताफळामधील पोषकतत्वं (Nutrients In Citrous Fruit)

सिताफळामध्ये अनेक पोषक घटक असतात. सिताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6  असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. एका सिताफळामुळे तुमच्या दिवसभराच्या व्हिटॅमिन्सची गरज नक्कीच भागवली जाऊ शकते. शिवाय त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फॉफ्सरस, सोडीयम, लोह आणि पुरेसे फायबर्स असतात. ज्याचा तुमच्या आरोग्य, त्वचा आणि केसांवर चांगला फायदा होतो. 

ADVERTISEMENT

Nutrients In Citrous Fruit

सिताफळाचे 10 आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Sitafal In Marathi)

सिताफळ नियमित खाण्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी दररोज एक सिताफळ सिझनमध्ये खाण्याचा प्रयत्न करा. 

1. वजन नियंत्रित ठेवते (Controls Weight)

जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर सिताफळ एक उत्तम फळ आहे. तुम्ही सिताफळ मधल्यावेळेत लागलेली भुक भागवण्यासाठी अथवा जेवणासोबत स्वीट डीश म्हणून खाऊ शकता. सिताफळामुळे तुमच्या कॅलरिज वाढत नाहीत आणि मेटाबॉलिझदेखील सुरळीत राहते. सिताफळ खाण्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे सतत भुक लागत नाही. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होते. 

ADVERTISEMENT

2. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते (Helps Boost Immunity)

सिताफळ हे नैसर्गिक अॅंटिऑक्सिडंट आहे. यातील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. नियमित एक सिताफळ खाण्यामुळे तुम्ही आजारपणापासून दूर राहू शकता. सिताफळामुळे फ्री रेडीकल्सपासून तुमचे संरक्षण होते आणि तुम्ही निरोगी राहता. 

3. इंस्टंट उर्जा मिळते (For Instant Energy)

सिताफळ हे एक उर्जेचं एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश वाटतं. एखाद्या दिवशी अती दगदग अथवा थकवा जाणवत असेल तर सिताफळ खाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते. कमजोर हाडं आणि स्नायूंवर सिताफळ खाणं हा पर्याय फारच उत्तम आहे. 

4. कॅन्सरपासून संरक्षण होते (Protects Against Cancer)

आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून रोजच्या आहारात सिताफळाचा समावेश जरूर करा. कारण सिताफळामध्ये कर्करोगावर मात करण्याचे सामर्थ्य आहे. विविध प्रकारच्या कर्करोगावर मात करण्यासाठी सिताफळ हे एक आयुर्वेदिक औषध म्हणून वापरण्यात येत आहे. सिताफळातील पोषक घटक कर्करोगापासून तुमचा बचाव करतात. 

5. मेंदूचे कार्य सुधारते (Improves Brain Function)

सिताफळामध्ये बी कॉप्लेक्स व्हिटॅमिन आहे. ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळू शकते. सततचा ताणतणाव, चिंता, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव दूर करण्यासाठी  सिताफळाचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. कारण एका मध्यम आकाराच्या सिताफळामध्ये 0.6 ग्रॅम व्हिटॅमिन B6 असते. 

ADVERTISEMENT

6. दात मजबूत होतात (Stronger Teeth)

दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सिताफळाचा वापर करू शकता. जर तुम्ही सततच्या दातदुखी अथवा हिरड्यांच्या त्रासाने त्रस्त झाला असाल तर हा उपाय जरूर करा. सिताफळाची साल सुकवून तुम्ही ती तुमच्या दात आणि हिरड्यांसाठी वापरू शकता. ज्यामुळे तुमचे दात आणि हिरड्या मजबूत होतील. 

7. अशक्तपणा कमी होतो (Weakness Is Reduced)

आजकाल योग्य पोषण न झाल्यामुळे आणि रक्ताचे प्रमाण कमी असल्यास अॅनिमियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्यामुळे सतत थकवा आणि चक्कर अशी लक्षणे जाणवतात. पुरूषांपेक्षा महिलांना या समस्येचा त्रास  अधिक होत असते. मात्र सिताफळात लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सिताफळ खाण्यामुळे तुमच्या शरीरातील लोहची कमतरता भरून निघू शकते. 

8. दृष्टी सुधारते (Improves Vision)

सिताफळातील काही पोषकघटकांमुळे तुमचे दृष्टीदोषदेखील कमी होऊ शकतात. सिताफळात व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या अथवा दृष्टीबाबत असलेल्या समस्या कमी होतात आणि तुमची दृष्टी तेज होते. 

9.आर्थ्राटीसचा धोका कमी होतो (Reduces Arthritis)

सिताफळात भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम आणि योग्य प्रमाणात कॅल्शिअम असते. जे तुमची हाडे आणि सांध्यावर योग्य परिणाम करते. शिवाय सिताफळ नियमित खाण्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. सांध्यांमधील आमवात कमी झाल्यामुळे तुम्हाला भविष्यात आर्थ्राटीस होण्याचा धोका आपोआप कमी होतो. 

ADVERTISEMENT

Also Read Health Benefits Of Asafoetida In Marathi

10. ह्रदयरोगापासून बचाव होतो (Prevents Heart Disease)

आजकालच्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे ह्रदयावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालता आहे. काम आणि चिंता यामुळे ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ह्रदयातील मांसपेशींना मॅग्नेशियमची गरज असते. सिताफळात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे ह्रदयविकारापासून दूर राहण्यासाठी सिताफळ खाणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. 

Prevents Heart Disease

ADVERTISEMENT

सिताफळाचे 5 त्वचेवर होणारे फायदे (Sitafal Benefits In Marathi For Skin)

सिताफळ जसं तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम  आहे तसंच ते तुमच्या त्वचेसाठी वरदान आहे. नियमित सिताफळ खाण्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि नितळ होते.

1. त्वचा चमकदार होते (Shinny Skin)

सिताफळ हे फक्त एक चविष्ठ फळ नसून एक उत्तम सौंदर्यप्रसाधनदेखील आहे. सिताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि नितळ दिसू लागते. यासाठी दररोज नास्त्याला अथवा मधल्यावेळी एक सिताफळ खा. 

2. स्कीन इनफेक्शन अथवा जखम लवकर बरी होते (Skin Infection Gets Better)

सिताफळाच्या आतील गराची पेस्ट तुम्ही तुमच्या तोंडातील अल्सर, फोड यावरदेखील लावू शकता. कारण सिताफळात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमच्या जखमा लवकर बऱ्या होतात. एखादी जखम अथवा इनफेक्शन बरं करण्यासाठी तुम्ही मलमासारखा सिताफळाच्या गराचा वापर करू शकता. शिवाय याचा कोणताही साईड इफेक्ट नक्कीच होत नाही. 

3. त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात (Aging Marks On The Skin Decrease)

आजकाल बाहेरील धुळ, माती, प्रदूषणाचा परिणाम तुमच्या त्वचेवर लगेचच दिसून येत असतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा ऐन तारूण्यात दिसू लागतात. पण नियमित सिताफळ खाण्यामुळे तुमच्या शरीराचे व्यवस्थित पोषण होते, त्वचा नितळ आणि चमकदार होते. शिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या, डार्क सर्कल्स कमी होतात. 

ADVERTISEMENT

4. एक्नेची समस्या कमी होते (Acne Problems Are Minimized)

नियमित सिताफळ खाण्यामुळे तुमच्या त्वचेतील सीबमची निर्मिती नियंत्रणात राहते. ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला अॅक्ने अथवा पिंपल्सचा त्रास कमी प्रमाणात होतो. शिवाय हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर सिताफळाचा गर आणि लिंबाचा रस मिक्स करून लावू शकता. ज्यामुळे एक्नेमुळे होणारा दाह कमी होऊ शकतो. 

5. त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होते (Skin Detoxes Naturally)

त्वचेला सुंदर दिसण्यासाठी नियमित डिटॉक्स करणं गरजेचं आहे. जितकी तुमची त्वचा डिटॉक्स होते तितकाच तुमचा चेहरा ग्लो करू लागतो. यासाठी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी तुम्ही दररोज एक सिताफळ खाऊ शकता. 

Skin Detoxes Naturally

सिताफळाचे तुमच्या केसांवर होतात हे 5 फायदे (Sitafal Benefits In Marathi For Skin)

सिताफळामुळे तुमची त्वचा चमकदार आणि  मऊ होते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या केसांवरदेखील याचा चांगला परिणाम होऊ शकतो. सिताफळ खाऊन अथवा खाली दिल्याप्रमाणे वापरून तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकता. 

ADVERTISEMENT

1. केस मऊ आणि मुलायम होतात (Hair Becomes Soft)

सिताफळाच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. आजकाल सततच्या प्रदूषणाचा परिणाम नकळत तुमच्या केसांवर होतो. ज्यामुळे ते निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. यासाठीच केसांवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर केसांना सिताफळाच्या बियांचे तेल लावा. ज्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं.

2. केसांमधील उवा कमी होतात (Hair Follicles Decrease)

लहान मुलांना वारंवार उवा अथवा लिखांचाच त्रास होत असेल तर हा उपाय जरूर करा. सिताफळाच्या बियांची पावडर वस्त्रगाळ करून घ्या. ही पावडर नारळाच्या तेलात मिसळून मुलांच्या केसांवर लावा. दहा मिनीटांनी केस धुवून टाका. मात्र हे मिश्रण केसांवर लावल्यावर ते मुलांच्या डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यामुळे मुलांना अंधत्व येऊ शकतं. 

3. केस पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी (Prevent Hair From Becoming White)

सततची काळजी आणि चिंता यामुळे आजकाल अनेकांना तरूणपणीच केस पांढरे होण्याची समस्या सतावताना दिसते. अकाली केस पांढरे झाल्यामुळे ते सतत कलर करावे लागतात. मात्र जर तुम्ही नियमित सिताफळ खात असाल तर केस लवकर पांढरे होणे थांबू शकते. 

4. केसांची वाढ चांगली होते (Hair Growth Is Good)

केसांच्या उत्तम वाढीसाठी केसांच्या मुळांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. सिताफळातील पोषक घटकांमुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो, केस मजबूत होतात आणि कमी गळतात. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ नक्कीच चांगली होते. 

ADVERTISEMENT

5. केसांमधील कोंडा कमी होतो (Tendons In Hair Are Reduced)

सिताफळामुळे तुमच्या केसांमधील त्वचेचं रक्षण होतं ज्यामुळे त्वचेला इनफेक्शन होत नाही. सिताफळातील पोषक घटकांमुळे सीबमची निर्मिती नियंत्रणात राहते आणि केसांमध्ये कोंडा होत नाही. जर तुम्हाला सतत कोंड्याचा त्रास होत असेल तर सिताफळ खाण्यास सुरूवात करा. 

सिताफळाचा करा असा वापर (Use Of Aloe Vera)

सिताफळ तुम्ही असंच मधल्यावेळी अथवा भुक लागल्यावर खाऊ शकता. मात्र त्याचे विविध प्रकार करून खाण्यात एक वेगळाच आनंद आहे. 

मिठाई (Sweets)

सिताफळाचा गर काढून तो तुम्ही एखाद्या मिठाईत वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या कोणत्याही मिठाईला सिताफळाचा फ्लेवर मिळू शकतो. काजूकतली अथवा एखाद्या गोड वडीमध्ये तुम्ही सिताफळाचा गर घालून ते तयार करू शकता. 

ADVERTISEMENT

लहान मुलांसाठी (Young Children)

तुमचं बाळ जर पाच वर्षांच्या खालील असेल तर त्याला नेहमी पौष्टिक आणि स्वादिष्ट काय द्यावं ही चिंता तुम्हाला नक्कीच सतावत असेल. अशावेळी तुमच्या बाळाला तुम्ही सिताफळाचा गर नक्कीच भरवू शकता. 

सिताफळ प्युरी (Sitafal Pure)

सिताफळ हे एक सिझनल फळ आहे. त्यामुळे ते ठराविक काळापुरतंच बाजारात उपलब्ध असतं. मात्र जर तुम्हाला वर्षभर सिताफळ खायचं असेल तर तुम्ही सिताफळाचा गर फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. 

केकसाठी (For The Cake)

केक अथवा बेकरी प्रॉडक्टसमध्ये नेहमीच निरनिराळे बदल केले जात असतात. जर तुम्हाला केकमध्ये सिताफळाचा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही सिताफळाचा वापर केक करताना करू शकता.

जॅमसाठी (For Jams)

सिताफळ टिकवून वर्षभर खाण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सिताफळाचं जॅम करून ठेवणं. सिझन असताना सिताफळाचा जॅम तयार करा आणि वर्षभर सिताफळ खाण्याचा आनंद घ्या. 

ADVERTISEMENT

सिताफळाबाबत काही महत्त्वाचे प्रश्न – FAQ’s

1. सिताफळ ताजे आणि पिकलेले आहे कसे ओळखावे ?

सिताफळ हिरवेगार आणि मऊ झालेले असेल तर ते खाण्यासाठी अगदी योग्य आहे असे समजावे. शिवाय पूर्ण पिकलेल्या सिताफळाचे डोळे म्हणजेच त्याच्यावरील उंचवटे मोठे असतात. मात्र काळपट झालेले आणि फुटलेले सिताफळ जास्त दिवस टिकू शकत नाही.

2. सिताफळ अती प्रमाणात खाण्यामुळे दुष्परिणाम होतो का ?

होय कारण कोणतीही गोष्ट अती प्रमाणात खाणे शरीरासाठी नक्कीच योग्य नाही. सिताफळ हे थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे ते अती प्रमाणात खाण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

3. सिताफळाच्या बिया विषारी असतात का ?

सिताफळाच्या बिया शरीरासाठी नक्कीच हितकारक नाहीत. त्यामुळे सिताफळ खाताना त्या तुमच्या पोटात जाणार नाहीत याची काळजी घ्या.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

शुद्ध तुपाची ओळख करणे जाते कठीण, मग असे ओळखा शुद्ध ‘तूप’

किवी (Kiwi) तुमच्या फिटनेस आणि त्वचेसाठी आहे वरदान, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

08 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT