उत्तम आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. किमान एक मूठ तरी ड्रायफ्रुट खावे असे सांगितले जाते. ड्रायफ्रुटमधील मनुका हा प्रकार अनेकांना आवडतोच असा नाही.काही जणांना दाताखाली गोड आवडत नाही म्हणून ते चिवडा, लाडूमधील मनुका कटाक्षाने बाहेर काढून टाकतात. पण जर तुम्ही काळे मनुके खात नसाल तर आजपासूनच ते खायला घ्या. कारण काळ्या मनुक्याचे (Black Raisins) अफाट फायदे आहेत. म्हणूनच आज जाणून घेऊया काळे मनुके खाण्याचे फायदे.
Table of Contents
- काळा मनुका म्हणजे काय? (What is Black Raisins In Marathi)
- काळ्या मनुकामधील पोषक घटक (Nutrients In Black Raisins In Marathi)
- काळ्या मनुक्याचे आरोग्यवर्धक फायदे (Health Benefits of Black Raisins In Marathi)
- केसांसाठी काळ्या मनुकाचे खाण्याचे फायदे (Benefits of Black Raisins for Hair In Marathi)
- त्वचेसाठी काळ्या मनुकाचे खाण्याचे फायदे (Benefits of Black Raisins for Skin In Marathi)
- काळ्या मनुक्यांचे सेवन करण्याच्या पद्धती (How to Eat Black Raisins In Marathi)
- तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
काळा मनुका म्हणजे काय? (What is Black Raisins In Marathi)
द्राक्ष वाळवून त्यापासून मनुका बनतो हे सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण काळ्या मनुक्याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. काळा मनुका नेमका कशापासून बनवला जातो? किंवा कोणत्या प्रतीचा काळा मनुका हा आरोग्यासाठी चांगला असतो. या बद्दल अनेकांना शंका असते. द्राक्षांच्या प्रकारावरुन मनुक्याचे प्रकार ठरलेले असतात. म्हणजे हिरवा, काळा, जांभळा,चॉकलेटी अशा रंगांमध्ये मनुके मिळतात. फळांच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार मनुक्यामध्ये प्रकार मिळतात. आता तर बाजारात सिडलेस द्राक्ष मिळतात त्यामुळे मनुक्याचे सिडलेस असे प्रकार पाहायला मिळतात. चांगल्या दुकानातून आणि चांगल्या ठिकाणाहून तुम्ही मनुके घेतल्यास उत्तम
अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित
काळ्या मनुकामधील पोषक घटक (Nutrients In Black Raisins In Marathi)
काळे मनुके आरोग्यासाठी चांगले आहेत असे म्हणताना या काळ्या मनुक्यामध्ये नेमके पोषक घटक कोणते असतात ते देखील जाणून घेऊया
साखर: 59.19 ग्रॅम
डाएटरी फायबर: 3.7 ग्रॅम
फॅट: 0.46 ग्रॅम
प्रोटीन: 3.07 ग्रॅम
कॉपर, आर्यन, मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स
जाणून घ्या पिस्ता खाण्याचे फायदे
काळ्या मनुक्याचे आरोग्यवर्धक फायदे (Health Benefits of Black Raisins In Marathi)
मनुक्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. आता आपण आरोग्यासंदर्भातील फायदे जाणून घेऊयात.
1. अॅनेमिया करते कमी (Treats Anemia)
रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा अॅनेमियाचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे.किंवा तुमच्या शरीरातील रक्त कमी झाले असतील तरी देखील काळा मनुका खायला हवा. काळ्या मनुक्यामधील व्हिटॅमिन B, आर्यन आणि कॉपर तुमच्यातील रक्त वाढवण्यास मदत करते.
2. योग्य पद्धतीने वाढवते वजन (Helps To Gain Weight)
जर तुम्हाला वजन वाढवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तर तुम्ही तुमचे वजन योग्य पद्धतीने वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे योग्य पद्धतीने वजन वाढवण्यासाठी तुम्ही काळा मनुका खायला हवा. मनुक्यामध्ये ग्लुकोझ आणि फ्रुकट्रोस असते जे तुमच्या शरीरातील उर्जा वाढवते. तुमचे वजन वाढवताना कोलेस्ट्रॉल दूर ठेवते.
3. टेन्शन करते कमी (Reduces Tension)
तुमच्या शरीराला उर्जा पुरवण्याचे काम काळा मनुका करत असते. जर तुम्ही नैराश्येत असाल तर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचे काम काळा मनुका करते. तुमचा ताण दूर करण्यास काळा मनुका मदत करते. त्यामुळे तुम्ही मनुक्याचे सेवन करायला हवे.
4. डोळ्यांचे आरोग्य सुधारते (Eye Care)
Shutterstock
तुम्हाला नजरेसंदर्भाील काही तक्रारी असतील तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे कारण डोळ्यांच्या आरोग्यासाठी काळा मनुका महत्वाचा असतो. काळ्या मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या डोळ्याचे आरोग्य सुधारते तुमचा नजरेचा दोष कमी करते. या शिवाय तुमची दृष्टी अधिक चांगली करण्यास मदत करते.
5. दातांसाठी चांगले (Dental Care)
दातांना किड लागणे, दात दुखणे आणि दात तुटणे अशा तक्रारी असतील तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे. कारण काळ्या मनुक्यामध्ये oleanolic acid असते. जे तुमच्या दातांसाठी चांगेल असते. त्यामुळे तुम्हाला दातांसंदर्भात काही तक्रारी असतील तर तुम्ही काळे मनुके खायला हवेत.
6. हाडांना आणते बळकटी (Healthy Bones)
हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शिअम महत्वाचे असते. जर तुम्हाला अंडी किंवा दूध आवडत नसेल तर तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करा. काळ्या मनुक्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळते. म्हणूनच तुमच्या हाडांना बळकटी येण्यासाठी तुम्ही काळा मनुका खा.
वाचा – शिळी पोळी खाण्याचे आरोग्यदायी लाभ
7. सेक्ससंदर्भातील तक्रारी करते दूर (Treats Sexual Problem)
काळ्या मनुक्यामध्ये Arginine नावाचा घटक असतो. हा घटक पुरुषांसाठी आवश्यक असतो. जर सेक्सची इच्छा कमी झाली असेल किंवा तुमच्या पार्टनरला त्याची काहीच आवड नसेल तर तुम्ही त्याच्यामधील सेक्स प्लेझर वाढवण्यासाठी मनुका फायदेशीर ठरतो. दिवसातून किमान दोनवेळा तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मनुके खायला द्या.
8. बद्धकोष्ठतेचा त्रास करते कमी (Relief from Constipation)
Shutterstock
जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर मग तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे. कारण काळ्या मनुक्याच्या सेवनामुळे तुम्हाला शौचाला साफ होऊ शकते. दिवसातून फक्त दोनदा याचे सेवन करा तुमचा त्रास कमी होईल.
9. कॅन्सरला ठेवते दूर (Prevents Cancer)
कॅन्सरला रोखण्याचे कामही काळा मनुका करते. त्यामुळे तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे. महिलांमध्ये कॅन्सरचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता तुम्हाला काळ्या मनुक्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
10. मधुमेह ठेवते नियंत्रणात (Control Diabetes)
आता ज्यांना गोड खाणे टाळता येत नाही अशांनी मनुका खायलाच हवा. कारण मनुक्यामध्ये असलेला गोडवा हा नैसर्गिक असतो. मनुक्याच्या सेवनामुळे तुमची गोड खाण्याची हौस हमखास भागते. त्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुमच्या रक्तातील साखर त्यामुळे नियंत्रणात राहते.
केसांसाठी काळ्या मनुकाचे खाण्याचे फायदे (Benefits of Black Raisins for Hair In Marathi)
आरोग्यासोबतच काळा मनुका तुमच्या केसांसाठी फारच चांगला आहे. केसांसाठी काळा मनुका कसा फायदेशीर आहे ते देखील जाणून घेऊयात.
1. तुमच्या केसांचा रंग टिकवते (Protects Hair Color)
Shutterstock
केसांसाठी मनुका चांगलाच फायदेशीर आहे. काही जणांचे केस फार लहान वयात पांढरे होतात. तुमच्या या समस्येसाठी काळा मनुका अत्यंत फायदेशीर आहेत. तुमच्या केसांच्या रंगासाठी व्हिटॅमिन C आवश्यक असते. काळ्या मनुक्याच्या सेवनामुळे तुमच्या केसांचा रगं टिकण्यास मदत होते.
2. केसांच्या वाढीला देते चालना (Accelerate Hair Growth)
जर तुमच्या केसांची वाढ म्हणावी तशी होत नसेल तर मग तुम्हाला काळा मनुका खाण्याची गरज आहे. काळ्या मनुक्यातील व्हिटॅमिन B, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असते. मनुक्याच्या सेवनामुळे तुमचा रक्सपुरवठा सुरळीत होतो आणि तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
3. मजबूत केसं (Stronger Hair)
केसांच्या वाढीसोबत केसांची मजबूतीही महत्वाची असते. तुमचे केस चांगल राहावे या साठी काळे मनुके उत्तम आहेत. तुमच्या केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम काळा मनुका करते. त्यामुळे तुमची केसगळतीही थांबते. जर तुम्हाला केसगळती त्रास असेल तर मग तुम्ही हे नक्की खायला हवे.
4. केसातील कोंडा करते दूर (Prevents Dandruff)
केसांची त्वचा कोरडी पडली की, मग तुम्हाला कोंड्याचा त्रास होतो. तुमची केसांची त्वचा कोरडी होण्यापासून तुम्हाला काळे मनुके फायदेशीर ठरतात. काळे मनुके जर तुम्ही रोज खाल्ले तर तुमचा कोंडा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
5. कोमल आणि चमकदार केस (Soft and Shiny Hair)
कोमल आणि चमकदार केस सगळ्यांनाच हवे असतात. जर तुम्हाला असे केस हवे असतील तर तुम्ही काळे मनुके खायला हवेत. कारण काळ्या मनुक्याच्या सेवनामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होतात. परिणामी तुमचे केस कोमल आणि चमकदार होतात.
त्वचेसाठी काळ्या मनुकाचे खाण्याचे फायदे (Benefits of Black Raisins for Skin In Marathi)
केसांसोबत तुमच्या त्वचेसाठीही मनुका फारच फायदेशीर आहे. जर तुम्हाला त्वचेसंदर्भातील काही समस्या असतील तर तुम्ही मनुक्याचे सेवन करायला हवे. जाणून घेऊया मनुक्याचे त्वचेसाठीचे फायदे
1. चांगल्या स्किनसेलची निर्मिती (Regeneration of Skin Cell)
आपल्याला जी त्वचा चांगली दिसते. त्याचे कारण त्या त्वचेखाली असणारे स्किनसेल जर तुमचे स्किनसेल चांगले असतील तर तुमची त्वचा कायमच चांगली राहते. तुमची त्वचा डॅमेज झाली असेल तर तुम्हाला काळा मनुका खाण्याची गरज आहे. कारण काळ्या मनुकाच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेखालील आवश्यक असलेल्या स्किनसेल्सची पुर्ननिर्मिती करते.
2. चमकदार त्वचा (Radiant Skin)
त्वचा चांगली असण्यासोबत ती चमकदार असणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर मग तुम्ही काळे मनुके खायला हवेत. कारण काळ्या मनुकाच्या सेवनामुळे तुमची त्वचा चमकदार दिसू लागतो. त्यामुळे तुम्ही दररोज काळ्या मनुक्याचे (black raisins) अगदी हमखास सेवन करा.
3. चिरतरुण राहण्याचे रहस्य (Anti-Aging Properties)
Shutterstock
तुमच्या स्किनसेल डॅमेज झाल्या असतील तुमच्या त्वचेतील कोलॅजन आणि इलास्टीन कमी झाले असेल तर तुमची त्वचा तुमच्या वयापेक्षा अधिक थोराड वाटू लागते. जर तुम्हाला ही तुमची त्वचा अशी जाणवत असेल तर मग तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे. कारण त्यामुळे तुमची त्वचा लवकर इलास्टीसिटी सोडत नाही. तुमची त्वचा जास्त काळासाठी चिरतरुण राहते.
4. डल स्किनवर करते काम (Treat Dull Skin)
तुमच्या शरीरात वाईट घटकांचे प्रमाण जास्त झाले असतील तर मग त्याचा त्रास तुमच्या चेहऱ्यावर जाणवू लागतो. तुमच्या त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात तुमची त्वचा डल होऊ लागते. तुम्हाला हा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही काळे मनुके खायला हवेत. कारण काळ्या मनुकाने तुमचा चेहरा स्वच्छ आणि चांगला होऊ शकतो.
5. त्वचा ठेवते हेल्दी (Keep Skin Healthy)
त्वचेसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन C तुम्हाला काळ्या मनुक्यातून मिळते. तुम्ही जर काळ्या मनुक्याचे नित्य सेवन केले तर तुमच्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यात काळा मनुका मदत करते. या शिवाय मनुक्यामध्ये असलेले इतक आवश्यक घटकही तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असतात.
काळ्या मनुक्यांचे सेवन करण्याच्या पद्धती (How to Eat Black Raisins In Marathi)
- काळे मनुके तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता. यामध्ये तुम्हाला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही.
- शिवाय जर तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने मनुके खायचे असतील तर तुम्ही मनुके रात्री पाण्यात भिजत घाला. रात्रभर मनुके पाण्यात भिजत घातल्यामुळे ते फुगतात. अशा मनुक्यांचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते कारण मनुक्यांमधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा अधिक फायदा आपल्याला अशा सेवनामुळे होतो.
- उपाशी पोटी जर तुम्ही काळ्या मनुक्यांचे सेवन केले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळू शकेल.
- दुधात कुस्करुन जर तुम्ही मनुक्यांचे सेवन केले तरी देखील तुम्हाला चालू शकते. रात्रभर मनुके भिजत घाला. सकाळी छान मिक्सरमधून दुधासोबत फिरवून घ्या. तयार शेक तुमच्यासाठी परिपूर्ण असून तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
- दिवसातून केवळ दोनवेळाच तुम्ही मनुक्याचे सेवन करु शकता.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. तुम्ही रोज काळे मनुके खाल्ले तर काय होईल?
काळ्या मनुक्यामध्ये पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. त्याच्या नित्यसेवनामुळे तुमच्या शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. रक्त शुद्धीकरणाला काळे मनुका चालना देते. त्यामुळे तुम्हाला आरोग्यासोबतच इतर फायदेही मिळण्यास मदत होते म्हणूनच तुम्ही रोज काळे मनुके साधारण मुठभर खाल्ले तरी चालू शकतील.
2. डायबिटीज असेल तर काळे मनुके खाल्ले तर चालतात का?
मनुके हे द्राक्ष सुकवून तयार केले जातात. त्यामुळे फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर मनुक्यांमध्ये उतरते त्यामुळे तुम्हाला डाएबिटीज असली तरी तुम्ही काळ्या मनुक्यांचे सेवन करु शकता. आता जर तुम्हाला फारच गोड काहीतरी खावेसे वाटत असेल तर मग तुम्ही मनुके खाल्ले तर उत्तमच कारण त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
3. काळे मनुके हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात का?
काळ्या मनुक्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशिअममुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. शिवाय काळ्या मनुक्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स घातक कोलेस्ट्रॉलपासून दूर ठेवतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही तुम्ही काळे मनुके खायला हवेत.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.