ADVERTISEMENT
home / Recipes
Paushtik Ladoo Recipe In Marathi

पौष्टिक लाडू रेसिपी मराठी (Paushtik Ladoo Recipe In Marathi)

तुमच्या कोणत्याही भूकेच्यावेळी खाता येईल असा हेल्दी पर्याय म्हणजे ‘लाडू’. पूर्वी सणासुदीला लाडू बनवण्याची पद्धत होती. पण आता मात्र आपण वर्षभर वेगवेगळे लाडू करत असतो. डब्यात नेण्यासाठी, मधल्या वेळच्या भुकेसाठी, अरबटचरबट खाण्यावर मात करण्यासाठी आपण लाडूचे सेवन हल्ली करतो. आपल्याकडे कित्येक प्रकारचे लाडू बनवले जातात. गव्हाचे लाडू, मेथीचे लाडू किंवा रवा लाडू इतक्यावरच लाडूच्या रेसिपी थांबत नाहीत. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लाडू बनवू शकता. आज आपण अशाच काही पौष्टिक लाडूच्या रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपी सोप्या आहेतच पण पौष्टिकसुद्धा आहेत. चला तर मग करुया सुरुवात.

बेसनाचे लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)

बेसनाचे लाडू

Instagram

ADVERTISEMENT

घरी अगदी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे बेसनाचा लाडू. दिवाळी असो किंवा कोणताही सण आपण घरी झटपट असे बेसनाचे लाडू करतो. पण काहींना तरीही हे लाडू व्यवस्थित जमत नाहीत. 

साहित्य:  1 वाटी चणा डाळ, 1 वाटी तगार, ½ वाटी साजूक तूप, वेलची पूड

कृती: 

  •  एका कढईत चणा डाळ छान भाजून घ्या. डाळीवर थोडे डाग येऊ लागले की, तुमची डाळ भाजली अशी समजा 
    डाळ भाजून झाल्यावर ती मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्या. 
  • कढईमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये बेसन थोडे थोडे करुन बेसन भाजून घ्या. साधारण तीन ते चार मिनिटं फुलवून घ्या. 
    अत्यंत मंद गॅसवर ही रेसिपी करा. लागेल तितकं तूप घालून छान भाजून घ्या. 
  • खरपूस असा सुगंध आला की, समजा बेसन छान भाजले आहे. 
  • बेसन भाजले हे कळण्याची उत्तम खूण म्हणजे त्याचा गोळा होतो. या बेसनात दोन चमचे पाणी घाला.  गॅस बंद करुन बेसनाचे मिश्रण थंड करा. 
  • त्यात तगार किंवा पिठी साखर घाला. वेलची पूड घालून लाडू बांधून घ्या. 

टीप : बेसनाचा लाडू टाळूला चिकटावा आणि तो बसका होऊ नये असे वाटत असेल तर बेसन हे रवाळ हवे. 

ADVERTISEMENT

वाचा – रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

मेथी लाडू रेसिपी (Methi Paushtik Ladoo Recipe In Marathi)

मेथी लाडू रेसिपी

Instagram

ADVERTISEMENT

खूप जण मेथीचा लाडू कडू लागतो म्हणून खात नाही. पण मेथीचे लाडू चविष्ट आणि तितकेच पौष्टिक असतात. तुम्हीही घरच्या घरी पटकन मेथीचे लाडू बनवू शकता. 

साहित्य: 1 कप मेथीदाण्याची पावडर, 50ग्रॅम डिंक, ड्रायफ्रुटचे काप, 1 कप भाजलेले गव्हाचे पीठ, ¼ वाटी खारकाची पूड, 1 वाटी सुकं खोबरं, 1 ¼ कप गूळाची पूड, वेलची पूड, जायफळ पूड, सुंठ पावडर, तूप, ¼ चमचा खसखस  

कृती: 

  • एका भांड्यात मेथी दाणा पावडर, भाजलेले गव्हाचे पीठ, ड्रायफ्रुट्स, खारकाची पूड, गूळाची पावडर, भाजलेली खसखस, भाजलेलं सुकं खोबरं एकत्र करुन घ्या. 
  • त्यात डिंक, सुंठ पावडर, जायफळ पूड, वेलची पूड खाला. डिंक मोठा असेल तर फोडून घ्या. 
  • दोन मोठे चमचे तूप गरम करुन ती या मिश्रणावर ओता. आणि गरम गरम लाडू वळून घ्या. 

टीप: मेथीचे लाडू करताना मेथी नेहमी जाडसर दळा.

ADVERTISEMENT

डिंकाचे लाडू रेसिपी (Dinkache Ladoo Recipe In Marathi)

डिंकाचे लाडू रेसिपी

Instagram

अत्यंत पौष्टिक अशा डिंकाचे लाडूही अनेक जण बनवतात. डिंक छान फुलला की, त्या लाडवाला छान क्रिस्प येते. हा लाडू एकदम छान लागतो. अगदी एक लाडू खाल्ला तरी तो पुरेसा असतो. 

साहित्य: 1 वाटी डिंक,1 ½ वाटी सुकं खोबरं, ½  वाटी मिक्स ड्रायफ्रुट,  ½ वाटी खारीक पावडर, 1 वाटी तूप, ¼ कप खसखस, 1 वाटी गूळ

ADVERTISEMENT

कृती:  

  • एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यामध्ये डिंक छान फुलवून घ्या. डिंक तूप तापल्यानंतर त्यामध्ये सोडा म्हणजे डिंक छान पटपट फुलेल. डिंक जास्त करपू देऊ नका. नाहीतर तो कडवट लागतो. 
  • त्याच पॅनमध्ये  मिक्स ड्रायफ्रुट (बदाम, काजू, पिस्ता), खसखस परतून घ्या. 
  • थोडेसे तूप घालून खारीक पावडर परतून घ्या. त्याच पद्धतीने तुम्हाला सुके खोबरेही भाजून घ्यायाचे आहे. 
  • सगळे सुके पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्या. म्हणजे लाडू वळताना त्रास होणार नाही. (डिंक हाताने कुस्करुन घातला तरी चालेल) 
  • लाडूसाठी नेहमी सेंद्रिय गुळाची निवड करा. त्यामुळे लाडू चांगले वळले जातात. एका पॅनमध्ये उरलेले तूप गरम करुन त्यात गूळ घालून विरघळून घ्या. वितळलेले गूळ सुक्या मिश्रणात घालून लाडू छान वळून घ्या. 

टीप: हल्ली बाजारात रेडिमेड खारीक पूड मिळते. त्यामुळे घरी पूड करण्याचा हट्ट करु नका. साधारण 15 दिवस हे लाडू टिकतात. 

तांदळाच्या पिठाचे लाडू (Rice Flour Ladoo In Marathi)

ADVERTISEMENT

गव्हाचे लाडू (Atta Laddu Recipe In Marathi)

गव्हाचे लाडू

Instagram

चपाती खायला आवडत नसेल अशांना गव्हाच्या लाडूचा खुराक देण्यास काहीच हरकत नाही. गव्हाचा लाडू चवीला छान लागतो आणि त्याचे फायदेही खूप आहेत.

साहित्य: 2 कप गव्हाचे पीठ, 2 कप मखाणा, 100 ग्रॅम डिंक, ½ वाटी सुकं खोबरं, 2 मोठे चमचे खसखस, आवडीनुसार ड्रायफ्रुट, ½  चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड, 1 कप तूप, 1 कप साखर 

ADVERTISEMENT

कृती:  

  • एक कढई आचेवर ठेवून खसखस छान भाजून घ्या. 
  • खसखस भाजून झाल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच भांड्यात दोन मोठे चमचे तूप घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये डिंक फुलवून घ्या. 
  • आवडीचे ड्रायफ्रुट्स भाजून घ्या. 
  • त्यातच मखाणा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजा. तो बाजूला काढून त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घ्या. 
  • मिक्सरच्या भांड्यात मखाणा, भाजलेलं सुकं खोबरं घेऊन एका मिक्सरमधून फिरवा. (फार बारीक दळू नका). डिंकही हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करा. सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. 
  • त्याच भांड्यात थोडे उरलेले तूप घालून गव्हाचे पीठ छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. 
  • एका मोठ्या ताटात सगळे सुके साहित्य एकत्र करा. 
  • आता वेळ आहे गूळाचा पाक करण्याची भांड्यात किसलेला गूळ घेऊन तो वितळवून घ्या. वितळेल्या गुळात थोडे तूप घाला. म्हणजे त्याचा छान ग्लॉस दिसेल. 
  • गव्हाचे पीठ, डिंक, सुकं खोबरं मखाणा एकत्र करुन त्यात गूळाचा पाक ओता लाडू छान मस्त वळू घ्या. 


टीप: गव्हाचे पीठ छान खरपूस भाजले की,  लाडू छान लागतात. ते गव्हाचे पीठ आहे असे ओळखता ही येत नाही. 

बेकिंग करताना उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

ड्रायफ्रुट लाडू (Dry Fruit Paushtik Ladoo Recipes In Marathi)

ड्रायफ्रुटचे लाडू

Instagram

जर तुम्हाला लाडू फार आवडत नसतील. पण तुम्हाला काहीतरी पौष्टिक खायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट लाडू खाऊ शकता.

साहित्य: 1 वाटी सुका मेवा (बदाम, पिस्ता, काजू,) ½ वाटी अंजीर, ½ वाटी खजूर, 1 मोठा चमचा तूप 

ADVERTISEMENT

कृती: 

  • एका भांड्यात तूप गरम करुन त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट भाजून घ्या.
  • अंजीर आणि खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या. 
  • तयार मिश्रण एकत्र करुन त्याचे लाडू वळून घ्या.

टीप: हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत

खजुराचे लाडू (Khajoor Paushtik Ladoo Recipes In Marathi)

खजूराचे लाडू

Instagram

ADVERTISEMENT

जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे पण गोड खाण्याची इच्छा तुम्हाला कमी करता येत नसेल तर तुम्ही पौष्टिक असे खजूराचे लाडू खाऊ शकता. खजूर लाडू बनवणेही फार सोपे आहे. 

साहित्य: 1 वाटी खजूराचा गर,  ¼ चमचा खसखस, ½ वाटी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट, 1 चमचा तूप

कृती: 

  • खजूराचा गर एका मिक्सीमध्ये वाटून घ्या. 
  • एक पॅन गरम करुन त्यामध्ये खसखस भाजून घ्या. 
  • पॅन मध्ये तूप घेऊन त्याच ड्रायफ्रुट भाजून घ्या. 
  • सगळे साहित्य एकत्र करुन त्याचे लाडू वळून घ्या. 

टीप: खजूर गोड असते त्यामुळे त्यात कोणतीही जादा साखर किंवा गूळ घालू नका. 

ADVERTISEMENT

मोतीचूर लाडू रेसिपी (Motichur Laddu Recipe In Marathi)

मोतीचूर लाडू रेसिपी

Instagram

लग्नसमारंभासाठी मोतीचूर लाडू एकदम मस्त पर्याय आहे. तुम्हालाही घरच्या घरी मोतीचूर लाडू  बनवायचे असतील तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बनवू शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य: 2 वाट्या बेसन, तळण्यासाठी तूप किंवा तेल,  टरबूजच्या बिया, काजू, पिस्ता, 1 वाटी साखऱ, 1 ½ वाटी पाणी, वेलची पूड, आवडीनुसार रंग 

कृती : 

  •  एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याचा पातळ घोळ करुन घ्या. 
  • तूप किंवा तेल गरम करुन त्यामध्ये बुंदी तळून घ्या. मोतीचूरसाठी लहान बुंदीच चांगल्या असतात. त्यामुळे लहान बुंदी पाडून घ्या. 
  • एका कढईत साखर घेऊन त्यात 1 ½ वाटी पाणी घालून त्याचा पाक करुन घ्या.या पाकात तुम्ही रंगही घालू शकता.
  •  त्यात तळलेल्या बुंदी घालून छान फुगू द्या. त्यात वेलची पूड, टरबूजच्या बिया, पिस्ता घालून लाडू वळून घ्या. 

टीप: पाक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये लिंबू पिळा. 

व्हेज रेसिपी (Veg Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

बुंदीचा लाडू (Boondi Ladoo Recipe In Marathi)

बुंदीचा लाडू

Instagram

अनेक लग्नांमध्ये किंवा काही क्वचित प्रसंगी आपण घरीच बुंदीचे लाडू बनवतो. बाहेरुन लाडून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीत छान बुंदीचा लाडू बनवू शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य: ½ किलो बेसन, 2 कप पाणी, ½ किलो साखर, 1 कप पाणी , वेलची पूड

कृती:

  •  बुंदी तयार करण्यासाठी तुम्ही रेडिमेड बेसन वापरु शकता किंवा घरी वाटलेले बेसनही वापरु शकता. 
  • बेसन छान चाळून त्यामध्ये  2 कप पाणी घाला. बेसनाचे घोळ तयार करा. पण ते फार पातळ नको. 
  • बुंदीचा झारा घेऊन तेलात बुंदी तळून घ्या. (रंग हवा असल्यास तुम्ही बेसनात रंगही घालू शकता. 
  • एका कढईत साखर घेऊन त्यात एक कप पाणी घाला आणि त्याचा एक तारी पाक करुन घ्या. पाकात वेलची पूड घाला.गरम गरम पाकात बुंदी घालून ती चांगली फुगू द्या.
  • बुंदीचे मस्त लाडू वळून घ्या. 

टीप: बुंदी छान पाडायची असेल तर बुंदीचा खास झारा मिळतो तो घ्या. त्यामुळे बुंदी छान मोत्याच्या दाण्यासारख्या होतात. 

ADVERTISEMENT

शेंगदाण्याचा लाडू (Peanut Paushtik Ladoo Recipes In Marathi)

शेंगदाण्याचा लाडू

Instagram

अगदी कधीही खाता येईल असा मस्त लाडू म्हणजे शेंगदाणा लाडू. शेंगदाणा लाडू वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. त्यातील एक सोपी पद्धत आपण आता पाहूया. 

साहित्य: 1 वाटी शेंगदाणे, ¼ वाटी चिक्कीचा गूळ 

ADVERTISEMENT

कृती:

  • एका तव्यात शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून शेंगदाणे भरडून घ्या. 
  • चिक्कीचा गूळ वितळवून तुम्ही त्यामध्ये भरडलेले शेंगदाणे घाला. 
  • हाताला तूप लावून  शेंगदाण्याचा लाडू वळून घ्या. 

टीप : शेंगदाण्याचा पाक खूप टणक करु नका. ते चांगले लागत नाहीत.

रवा लाडू रेसिपी (Rava Ladoo Recipe In Marathi)

रवा लाडू रेसिपी

ADVERTISEMENT

Instagram

खूप जणांना रव्याचे लाडू फार आवडतात. दिवाळीत हा पदार्थ अगदी हमखास केला जातो. पण आता अगदी वर्षभर हे लाडू सर्रास केले जातात.

साहित्य:1 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर, 1/2 वाटी सुके खोबरे, 1 कप दूध,1 चमचा तूप, मनुके, वेलची पूड

कृती:  

ADVERTISEMENT
  • एक पॅन घेऊन त्यामध्ये तूप घेऊन त्यात मनुके भाजून घ्या. मनुके थोडे फुगले की, त्यात रवा घाला. रवा छान भाजला पाहिजे. पण त्याचा रंग बदलता कामा नये. 
  • भाजलेल्या रव्यात वेलची पूड,सुकं खोबरं घालून छान भाजून घ्या.
  • त्यात पिठी साखर घालून छान परतून घ्या. 
  • एका भांड्यात हे मिश्रण काढून कोमट दूध अगदी लागेल तसं घाला आणि मस्त लाडू वळून घ्या. 

टीप: रव्याचे लाडू पाकातही करता येतात. पण त्यापेक्षाही ही पद्धत फार सोपी आहे. 

कुरमुऱ्याचा लाडू (Kurmura Paushtik Ladoo Recipes In Marathi)

कुरमुऱ्याचा लाडू

Instagram

लहान मुलांना कुरमुऱ्याचा लाडू खूप आवडतो. हा लाडू अगदी पाच मिनिटात तयार होतो. मधल्या वेळी खाण्यासाठी हा मस्त स्नॅक आहे.

ADVERTISEMENT

साहित्य: 4 वाटी कुरमुरे, 1 कप  गूळ, 1 चमचा तूप 

कृती: 

  • कुरमुरे थोडेसे भाजून घ्या म्हणजे ते कुरकुरीत होतात. 
  • किसलेला गूळ एका भांड्यात वितळवण्यासाठी ठेवावा. त्यामध्ये एक चमचा तूप घालावे. 
  • गूळाच्या पाकाला साधारण एक उकळी फुटली की पाक बंद करावा. कुरमुऱ्याचा लाडूसाठी गोळी पाक व्हायला हवा.
  • त्यात कुरमुरे घालून हाताला पाणी लावून लाडू वळून घ्या. 

टीप: चिक्कीचा गूळ कुरमुरे छान वळता येतात. कुरमुऱ्याचे लाडू महिनाभर तरी टिकतात 

राजगिऱ्याचा लाडू (Rajgira Ladoo Recipe In Marathi)

राजगिऱ्याचा लाडू

ADVERTISEMENT

Instagram

उपवासासाठी खाल्ला जाणारा राजगिरा लाडू तोंडाची चव बदलतो. लहानमुलांनाही हे लाडू फार आवडतात. 

साहित्य: 1 वाटी राजगिरा, ¼ वाटी गूळ 

कृती:  

ADVERTISEMENT
  • एका कढईत गूळ वितळून घ्या
  • गूळ वितळला की, त्यात मावेल तितका राजगिरा घालायचा आहे. कधी कधी गुळाच्या तुलनेत राजगिरा जास्त लागतो. 
  • मिश्रण एकत्र करुन मस्त गरम असतानाच लाडू वळून घ्या. 

टीप: राजगिरा झाडू टणक चांगला लागत नाही. म्हणून यासाठी चिक्कीचा गूळ अजिबात वापरु नका.

नारळाचे लाडू (Coconut Ladoo Recipe In Marathi)

खोबऱ्याचा लाडू

Instagram

ओल्या खोबऱ्यापासून तयार झालेले लाडू अनेकांना आवडतात. नारळासोबत त्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ घातलेले असतात. त्यामुळे ते चवीला आणि आरोग्याला चांगले असतात.

ADVERTISEMENT

साहित्य: 1वाटी खोबलेलं नारळ, 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, 2 मोठे चमचे तूप, पाऊण वाटी पाणी, ½.वाटी ड्रायफ्रुटची पूड,वेलची पूड 

कृती:

  •  कढईत तूप गरम करुन त्यामध्ये रवा छान भाजून घ्या. तो छान लालसर तांबूस झाला की, काढून ठेवा. 
  • त्याच तूपात ओलं खोबरही छान परतून घ्या. ते मिक्सरमध्ये थोडं वाटून घ्या.
  •  त्याच पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून त्याचा एकतारी पाक करुन घ्या. पाक खूप घट्ट होता कामा नये. 
  • गॅस बंद करुन पाक थोडा थंड होऊ द्या. त्यामध्ये वेलची पूड, रवा, खोबरं, ड्रायफ्रुट घालून लाडू वळून घ्या. 

टीप: हे लाडू जास्त टिकत नाही. फार तर दोन ते चार दिवसच टिकू शकतात. त्यामुळे ते कमीत कमी करा. 

तिळाचे लाडू (Til Ladoo Recipe In Marathi)

तिळाचा लाडू

ADVERTISEMENT

Instagram

तिळाचे लाडू हा असा पदार्थ आहे जो अगदी दरवर्षी संक्रातीच्या निमित्ताने खाल्ला जातो. तिळाचे लाडूही आरोग्यासाठी चांगले असतात. हिवाळ्यासाठी हा लाडू अगदी बेस्ट पर्याय आहे. 

साहित्य:  ¾ कप अनपाॉलिश तिळ, ½ कप तूप, ¼ कप शेंगदाण्याचे जाडसर कूट, 1 मोठा चमचा तूप 

कृती:

ADVERTISEMENT
  • एक पॅन घेऊन तिळ छान भाजून घ्या. याला साधारण गोल्डन रंग यायला हवा. 
  • त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घेऊन गूळ वितळवून घ्या. गूळ वितळायला साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात. 
  • गॅस बंद करुन त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, तिळ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. 
  • गरम असतानाच हाताला तूप लावून लहान लहान लाडू वळून घ्या. 

टीप : चिक्कीचे गूळ वापरणार असाल तर लाडू छान बाईंड होतो. पण जर तुम्ही साधे आणि रोजचे गूळ वापरणार असाल तर थोडं बाईंडिग येण्यासाठी गूळ गरम करताना त्यामध्ये एक चमचा दूध घाला.

काळ्या तिळाचे लाडू (Black Til Paushtik Ladoo Recipes In Marathi)

काळ्या तिळाचे लाडू

Instagram

ADVERTISEMENT

पांढऱ्या तिळाचे लाडू तुम्ही अगदी हमखास ऐकले असतील खाल्ले असतील. संक्रातीच्या दिवशी अगदी हमखास हा लाडू केला जातो. पण तुम्ही कधी काळ्या तिळाचे लाडू ऐकले आहेत का? कोकणात अगदी हमखास हा लाडू करण्याची पद्धत आहे. 

साहित्य: ½ वाटी काळे तिळ, ½ कप गूळ,  ½ कप भाजलेले शेंगदाणे, 1 मोठा चमचा तूप, ¼ चमचा वेलची पावडर, जायफळ पावडर

कृती:

  • तिळ चांगले भाजून घ्या. 
  • एका भांड्यात उरलेले सगळे कोरडे साहित्य एकत्र करा. ( तिळ, शेंगदाणे, वेलची आणि जायफळ पावडर) 
    एका पॅनमध्ये गूळ घेऊन ते छान वितळवून घ्या. 
  • वितळलेल्या गूळामध्ये तिळाचे मिश्रण घालून. हाताला थोडे तूप लावून गरम गरम लाडू वळून घ्या .

टीप: गूळाचा पाक आपल्याला खूप वेळ उकळवायचा नाही.कारण असे केल्यामुळे तुमचे लाडू खूप टणक होतील असे लाडू खाताना खूप त्रास होतो. काळे तिळ उष्ण असतात.त्यामुळे याचे सेवन थंडीत अवश्य करा. 

ADVERTISEMENT

आता तुम्ही नक्की या सोप्या लाडूच्या रेसिपी ट्राय करा आणि हेल्दी राहा.

देखील वाचा – 

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

23 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT