लवंग नक्कीच आकाराने लहान आहे मात्र लवंग खाण्याचे फायदे चमत्कारी आहेत. अनादी काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही करण्यात आला आहे. यामध्ये असे औषधीय गुण आहेत जे शरीरात असलेल्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. खरं तर याचा जास्तीत जास्त उपयोग हा जेवणामध्ये आणि सर्दीमुळे नाकातून पाणी येणे अथवा खोकला झाला असल्यास, करण्यात येतो. पण त्याव्यतिरिक्तही लवंग आणि लवंग तेलाचे फायदे अनेक आहेत. लवंग फायदे नक्की काय आहेत ते आपण लेखातून जाणून घेणार आहोत. कदाचित याबाबत बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यामुळे या गोष्टीची अधिक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लवंग औषधीय असून लवंग खाण्याचे फायदे (lavang khanyache fayde) नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
लवंग काय आहे? (What Is Clove)
लवंगेचे झाड हे नेहमी फुललेले दिसून येते. अगदी पूर्वीपासून लवंगेच्या सुक्या कळ्यांचा उपयोग करून घेण्यात येत आहे. भारतामध्ये याचा वापर हा मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्यासाठीच लवंग जास्त प्रचलित आहे. याचे वैज्ञानिक नाव सिजीजियम अरोमॅटिक असून साधारण 9 वर्षाने एका झाडाला लवंगेचे फूल येतं. हे फूल सुकवून लवंग तयार होते. लवंग ही अतिशय औषधीय असून अनेक वर्षांपासून याचा उपयोग केला जातो. यामध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट्सचा अधिक प्रभाव असतो. याशिवाय अँटिव्हायरल आणि एनाल्जेसिक गुणांनीही लवंग उपयुक्त आहे. यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये याचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येतो. आरोग्यस्वास्थ्यासाठी लवंगेचा उपयोग करून घेण्यात येतो.
लवंगेचे पोषक तत्व (Nutritional Value Of Clove)
लवंगमधून शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व मिळतात.
- यामध्ये पाणी, एनर्जी, फायबर, कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज ही मिनरल्स तर विटामिन सी, विटामिन बी, थियामिन बी, कोलीन, बीटेन, विटामिन ई, विटामिन के या सगळ्याचा समावेश आहे.
- त्यामुळे लवंग ही शरीराला अतिशय उपयुक्त ठरते. मुळात तुम्हाला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी लवंगेचा उपयोग करून घेता येतो.
- यातील पोषक तत्वे ही शरीराला अनेक आजारांशी लढा देण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे नियमित आपल्या जेवणातही लवंगेचा उपयोग करण्यात येतो. तसंच काही आजारांवर लवंग हा रामबाण इलाज आहे.
- विशेषतः दातदुखीसारख्या आजारांवर. या पोषक तत्वामुळे लवंग खाण्याचे फायदे काय होतात ते आपण पुढे पाहूया.
लवंग खाण्याचे फायदे (Lavang Che Fayde In Marathi)
लवंगेचे अनेक फायदे आहेत आणि त्यापैकी आपल्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते आपण सर्वात पहिले जाणून घेऊया.
ओरल हेल्थ
लवंगेच्या पाकळ्या या ओरल मायक्रो ऑर्गेनिजम (तोंडात निर्माण होणारे सूक्ष्म जीव) 70 टक्के कमी करतात. यामुळे बऱ्याच टूथपेस्टमध्ये तुम्हाला लवंग वापरण्यात आलेली दिसून येते. तुळस, टी ट्री ऑईलसह जर तुम्ही लवंगेचा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी माऊथ वॉश तयार केलं तर याचा तुम्हाला खूपच फायदा होतो. मुळात दातदुखीवरील हा रामबाण इलाज आहे. तुम्हाला दातदुखीपासून दूर राहायचं असेल आणि श्वासाची दुर्गंधी कमी करायची असेल तर तुम्ही दिवसातून एक तरी लवंग खायला हवी. यामुळे तुमच्या दातील किटाणू मरण्यास मदत मिळते. लवंगेपासून तयार करण्यात येणाऱ्या तेलानेही फायदा मिळतो. तसंच हिरड्यांवरील इन्फेक्शन कमी करण्यास याची मदत मिळते. लवंगमध्ये युजेनॉल नावाचे असणारे तत्व दातांमधील दुखणे कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसंच प्लाक आणि कॅरिजपासूनही लवंग वाचवण्यास मदत करते.
सर्दी – खोकल्यावरील उपाय
लवंगेतील गुण हे सर्दी आणि खोकल्यावरही उपायकारक आहेत. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव असल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. वास्तविक एक्सपक्टोरेंटप्रमाणे लवंग काम करते जे आतील बरगड्यांपासून तोंडापर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करण्याचे काम करते. लवंग घालून काढा तयार करा आणि तो प्या. यामुळे लवकर सुटका मिळते.
मधुमेहापासून सुरक्षा
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी लवंगेचा वापर करता येतो. मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण अधिक असते. रक्तातील ग्लुकोज कमी करून लवंग मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. एका शोधानुसार, लवंगमध्ये अँटिहायपरग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक आणि हेपेटोप्रोटेक्टिव्ह गुण असतात जे मधुमेहाची समस्या कमी करण्यासह लिपिडमध्ये सुधारणा आणण्याचे आणि यकृत वाचविण्याचे काम करतात. लवंगेसह त्याचे तेलही ग्लुकोज कमी करून लिपीड प्रोफाईल सुधारण्याचे काम करते आणि किडनीसंबंधी काही समस्या असल्यास, मधुमेहाच्या रुग्णांना वाचविण्याचे काम करते.
इन्फ्लमेशनला लढा देण्यासाठी
लवंग इन्फ्लेमेशनशी लढण्यासाठीही उपयुक्त आहे. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो जो शरीरात अँटिइन्फ्लमेटरी एजेंटप्रमाणे काम करतो. हा घटक इन्फ्लमेशनमुळे होणारे आजार आणि त्वचेसंबंध होणाऱ्या समस्यांपासून वाचविण्याचे काम करतो. इन्फ्लमेशनमुळे होणारे अॅक्ने कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.
पचनासाठी उपयुक्त
लवंग शरीरातील एंजाइम्सना उत्तेजित करून पचनक्रिया बूस्ट करण्याचे काम करते. याचे सेवन आतड्यात होणाऱ्या जळजळीचा स्तर कमी करून अपचनाची समस्या कमी करण्याचे काम करते. पोट फुगणे, गॅस होणे, अपचन, मळमळ, डायरिया आणि उलटी होण्यासारख्या त्रासांपासून सुटका देण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय लवंग आणि त्याचे तेल पेप्टिक अल्सरच्या लक्षणांनाही कमी करते. ज्यांना अपचानाची समस्या आहे त्यांना लवंगेत एक चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
वजन कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर
लवंगच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता. एका रिसर्चनुसार लवंगेत अँटिओबेसिटी प्रभाव असतो. त्यामुळे चरबी नियंत्रणात ठेवण्यास याची मदत मिळते. एनसीबीआय (National Center for Biotechnology Information) च्य वेबसाईटवर असलेल्या एका शोधानुसार, चरबीयुक्त पदार्थ सेवन करण्याने जी जाडी वाढते ती कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे अँटिओबेसिटी गुण वजन नियंत्रित करण्यास मदत करते. घरगुती उपाय करण्यासह वजन कमी करण्यासाठी योग आणि व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कॅन्सरसाठी लाभदायक
मेडिकल रिसर्चनुसार ट्यूमर वाढण्यापासून थांबविण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. लवंगमध्ये एथिल एसिटेट अर्कामुळे अँटिट्यूमर गुण आढळतात. यामुळे कॅन्सरची जोखीम कमी करण्यास मदत मिळते. रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे ओलिक अॅसिड असल्यामुळे लवंग अँटिट्यूमरने प्रभावित आहे. तसंच यावर अधिक अभ्यास चालू आहे. आतडी, त्वचा आणि डायजेस्टिव्ह कॅन्सरच्या बाबतीत लवंग तेल किमोप्रिव्हेंटिव्ह भूमिका निभावते. कॅन्सरवरील हा उपाय नाही. मात्र एका उपायांपैकी एक आहे.
तणाव कमी करण्यासाठी
Shutterstock
लवंगमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे तणाव होणाऱ्या पॅथोलॉजिकल परिवर्तन नियंत्रणात आणण्यास मदत करतात. रिसर्चनुसार, लवंगमध्ये अँटिस्ट्रेस अॅक्टिव्हिटी तणाव कमी करण्यासाठी असणारे गुण आढळतात. जे अजून स्पष्ट झालेले नाही. पण लवंगमुळे तणाव कमी होतो. लवंग तेलामध्ये मानसिक थकवा कमी करण्याची ताकद आहे. यामुळे अनिद्रा, स्मृतीहानी, चिंता कमी होते.
डोकेदुखी आणि दातदुखीवर परिणामकारक
पूर्वीपासून डोकेदुखीवर उपाय म्हणून लवंग फायदेशीर ठरते. लवंगेमध्ये एनाल्जेसिक गुण असतात, जे दात आणि डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात. त्याशिवाय लवंगेचे तेलही दात आणि डोकेदुखीसाठी उपयुक्त ठरते. लवंगेचे तेल दाताला लावल्यास दातदुखी आणि या तेलाचा वास घेतल्यास, डोकेदुखी कमी होते.
दातांवर प्लाक साचण्यास हे खाद्यपदार्थ असतात कारणीभूत
लिव्हरसाठीही उपयुक्त
लवंग फायदा हा लिव्हरसाठीही होतो. एका अभ्यासानुसार, पॅरासिटामोलमुळे होणारा लिव्हरचा त्रास कमी करण्यसाठी लवंगेचा वापर करता येतो हे सिद्ध झाले आहे. हे सायटोप्लज्मिक एंजाइम्सची पातळी कमी करून लिव्हरला होणारा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.
दम्यासाठी लवंगचा फायदा
लवंगमध्ये असलेले युजेनॉल दम्यासाठी चांगले मानण्यात येते. एका शोधानुसार, हा घटक अँटिअस्थमेटिक प्रभावी असून दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना याची मदत मिळते. यामधील ब्रोन्कोडायलेटर आणि इम्यनोमॉड्युलेटरी गुणांमुळे अँटिअस्थेमेटिक ड्रगप्रमाणे क्षमतेमुळे दम्याच्या लोकांना फायदा मिळतो. लवंग तेलाचा सुगंध नाकातील नळी साफ करण्यास मदत करतो. तसंच दमा, खोकला, सर्दी, सायनस यासारख्या समस्याही लवंगेने बऱ्या होतात. दम्यापासून सुटका मिळण्यासाठी लवंग आणि त्याच्या तेलासह मध आणि लसूण मिश्रण एकत्र करून त्याचे सेवन करा.
वाचा – असे करा सायनस वर घरगुती उपाय
अॅक्ने
त्वचेवर होणारे अॅक्ने आणि मुरूमांना कमी करण्यासाठीही लवंगेचा उपयोग होतो. यामध्ये इन्फ्लेमेटरी कमी करणारे गुण आढळतात. अर्थात बॅक्टेरियामुळे होणारे अॅक्ने कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. यामुळे तुम्हाला त्वचेवर इन्फेक्शन होत असेल तर लवंगेचा फायदा करून घेता येतो.
लवंगेचा वापर (Uses Of Clove)
लवंग आपण दैनंदिन जीवनात अनेक तऱ्हेने वापरू शकतो. याचा वापर कसा करायचा ते आपण जाणून घेऊया.
- फ्लेवरिंग एजंट स्वरूपात याचा वापर भारतीय मसाला, लोणचं आणि सॉसमध्ये करता येतो
- लवंगचे गुण आणि सुगंधामुळे याचा उपयोग अरोमाथेरपीसाठीही करण्यात येऊ शकतो
- लवंग पाण्यात उकळून याचे पाणी माऊथवॉश म्हणून वापरू शकता
- जेवण करण्यासाठी पदार्थात स्वादासाठी लवंग वापरतात
- एक कप गरम पाण्यात पाव चमचा लवंग पावडर घालून सकाळी आणि रात्री प्यायल्यास, वजन कमी करण्यास मदत मिळते
- लवंगेच्या तेलाचे काही थेंब घेऊन कपाळावर मसाज केल्यास तणावमुक्त राहू शकता. घरगुती उपाय म्हणून याचा वापर करू शकता
- हिरड्यांमध्ये दुखत असेल आणि सूज आली असेल तर लवंगेच्या तेलाचे काही थेंब त्याठिकाणी लावा. हळूहळू मसाज करा
- गळ्यात झालेले संक्रमण आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यात एक लहान चमचा लवंग चूर्ण मिक्स करून त्याने गुळण्या करा
- ब्लॅक टी मध्ये एक लवंग टाकून याचे सेवन करा. यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो
- श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी एक लवंग चघळा
- दात दुखत असल्यास, दाताखाली लवंग ठेवा. थोड्यावेळात दातदुखी कमी होईल
लवंग खाण्याचे नुकसान (Side Effects Of Clove)
लवंग खाण्याचे फायदे तर आपण पाहिले, पण याने काही नुकसान होते का तेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया लवंग खाण्याचे दुष्परिणाम. अति लवंग खाल्ल्यास होते खालील नुकसान
- रक्त पातळ होते
- डोळ्यांमध्ये जळजळ होते
- त्वचेवर अलर्जी होते
- लिव्हर डॅमेज होते
- अधिक सेवन केल्यास, पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन नावाचे हार्मोन कमी होऊ शकते
- गर्भावस्थामध्ये खाऊ नका
- अधिक सेवनाने विष तयार होते
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. एका दिवसात किती लवंग खाऊ शकतो?
दिवसातून आपण साधारण 2.5 मिलिग्राम लवंग आपल्या वजनाच्या हिशेबाने खाऊ शकतो. यापेक्षा अधिक सेवन केल्यास रक्तात विष तयार होण्याची शक्यता असते. अर्थात दिवसातून साधारण दोन ते तीनपेक्षा अधिक लवंग खाऊ नयेत. लवंग फायदे आणि नुकसान यावरच अवलंबून असते.
2. लवंगेमुळे रक्तदाब वाढतो का?
पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मँगनीज ही मिनरल्स लवंगेत असतात. लवंगमध्ये पोटॅशियम असल्याने हार्ट रेट आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम लवंग करते. त्यामुळे याने रक्तदाब वाढला जात नाही तर अगदी नियंत्रणात राहतो.
3. लवंग अँटिव्हायरल आहे का?
हो लवंग अँटिव्हायरल आहे. अँटिव्हायरल आणि एनाल्जेसिक गुणांनीही लवंग उपयुक्त आहे. यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये याचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येतो. आरोग्यस्वास्थ्यासाठी लवंगेचा उपयोग करून घेण्यात येतो.
4. रक्तप्रवाहासाठी लवंग खाणं परिणामकारक आहे का?
हो. लवंगेचे सेवन हे रक्तप्रवाह चांगला करण्यासाठी परिणामकारक आहे. मात्र याचे अतिसेवन होणार नाही याकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
देखील वाचा –