ADVERTISEMENT
home / Wedding Accessories
लग्नात हेव्ही वर्क केलेला लेहंगा वापरणार तर असा ड्रेप करा दुपट्टा

लग्नात हेव्ही वर्क केलेला लेहंगा वापरणार तर असा ड्रेप करा दुपट्टा

लेहंग्यात तुमचे रूप खुलून दिसण्यासाठी त्यावर योग्य पद्धतीने दुपट्टा ड्रेप करणं गरजेचं आहे. सध्या निरनिराळ्या पद्धतीने दुपट्टा ड्रेप करण्याचा ट्रेंड आहे. आता तर लग्नात नवरीला लेहंग्यावर दोन दुपट्टे ड्रेप करण्याची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. ग्रेसफुल लुकसाठी लेहंग्यावर दुपट्टा कॅरी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने हे  दुपट्टे ड्रेप करू शकता. तुम्ही  कसा दुपट्टा ड्रेप यावर तुमचा ब्रायडल लुक अवलंबून आहे. यासाठी जाणून घ्या दुपट्टा ड्रेप करण्याच्या काही सोप्या ड्रेपिंग स्टाईल्स ज्यामुळे तुमचा ब्रायडल लुक जास्त आकर्षक दिसेल.

लेहंग्यावर दुपट्टा ड्रेप करण्यासाठी स्टायलिश टिप्स –

लेहंग्यावर तुमचा दुपट्टा अगदी शार्प आणि स्टनिंग स्टाईलने ड्रेप करा. जर तुमचा दुपट्टा जाळीदार अथवा ट्रांन्सफरंट असेल तर तो एका टोकाच्या बाजूने तो समोरून पदरासारखा ड्रेप करा आणि त्याचा पदर तुमच्या डोक्यावर घ्या आणि दुपट्टाचे दुसरे टोक साडीप्रमाणे कबंरेत ड्रेप करा.

Instagram

ADVERTISEMENT

जर दुपट्टा अगदी साधा असेल तर त्याच्या प्लेट्स काढा आणि पदराप्रमाणे खांदयावर पिन अप करा. दुपट्ट्याचा बाकीचा भाग मागच्या बाजूला सोडा. या लुकमध्ये तुम्ही सुंदर तर दिसालच शिवाय तुम्हाला कंम्फर्टेबलही वाटेल.

Instagram

जर लग्नात तुम्ही दोन दुपट्टे ड्रेप करणार असाल. तर एक दुपट्टा तुमच्या डोक्यावर पिन अप करा आणि दुसरा दोन्ही खांद्यावर मोकळा सोडा. मात्र कॅरी करताना या दोन्ही दुपट्टांचे काठ एकत्र करून घ्या. 

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने दुपट्टा ड्रेप करायचा असेल तर काहीच हरकत नाही. एक दुपट्टा डोक्यावर घ्या आणि दुसरा खांद्यावर हा लुक लग्नात अगदी क्लासिक दिसतो.

ADVERTISEMENT

Instagram

जर तुमचा लेहंगा आणि ब्लाऊज खूप हेव्ही वर्क केलेला असेल तर दुपट्टा नेहमीच कमी वर्क केलेलाच कॅरी करा. कारण यामुळे तुमच्या लेहंग्याचे वर्क उठून दिसेल आणि तुम्हाला लेहंगा कॅरी करणं सोपं जाईल.

एखादा साधा आणि हलका दुपट्टा तुम्ही याप्रमाणे मागच्या बाजूने तुमच्या दोन्ही हातावर सोडू शकता फक्त यामुळे तुम्हाला थोडं अनकन्फर्मेटेबल वाटू शकतं. पण जर तुम्ही उत्तम पद्धतीने कॅरी करू शकला तर हळद अथवा संगीत सेरेमनीला हा लुक मस्तच दिसेल. 

ADVERTISEMENT

Instagram

लग्नात युनिक आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही एक दुपट्ट्याच्या ऐवजी त्याच रंगाचं एखादं जॅकेटदेखील कॅरी करू शकता. ज्यामुळे तुमच्या लेहंगा आणि ब्लाऊजवरील डिझाईन व्यवस्थित दिसू शकेल. विधींपुरता तुम्ही डोक्यावरून एक दुपट्टा ड्रेप करू शकता. जॅकेट घ्यायचं नसेल तर दुपट्टाच एखाद्या जॅकेट अथवा श्रगप्रमाणे ड्रेप करा.

Instagram

ADVERTISEMENT

जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने दुपट्टा कॅरी करण्याचा कंटाळा आला असेल तर या ट्रिक्स तुम्हाला दुपट्टा कॅरी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्ही याचप्रमाणे निरनिराळ्या पद्धतीने दुपट्टा ड्रेप करून लग्नात स्वतःला ट्रेंडी आणि मॉर्डन लुक देऊ शकता. तुम्हाला आम्ही सांगितलेल्या या टिप्स कशा वाटल्या आणि तुम्हाला लग्नातील फॅशन ट्रेंडविषयी आणखी काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

राशीनुसार निवडा तुमच्या ‘ब्रायडल आऊटफिट’चा रंग

लग्नाची साडी अथवा लेहंग्याची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

‘40’ हॉट आणि सेक्सी हनीमून ड्रेस (Honeymoon Dresses In Marathi)

06 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT