प्रत्येक वयानुसार तुमच्या त्वचेच्या समस्या बदलत असतात. जसं जसं तुमचं वय वाढू लागतं तशा त्वचेवर एजिंगच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. वयानुसार आपण त्वचेची काळजी घ्यायला हवी. एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी अँटी एजिंग प्रॉडक्ट वापरले जातात. मात्र या उत्पादनांचा वापर योग्य वयातच सुरू करायला हवा. म्हणूनच अँटी एजिंग प्रॉडक्ट कोणत्या वयापासून वापरायला सुरू करावे हे तुम्हाला माहीत असायला हवं. आपली त्वचा काही ठराविक वयात बदलत असते. याचं कारण वयानुसार तुमच्या त्वचेवरील डेडस्कीन निघून जाते आणि नवीन स्कीन निर्माण होत असते. आपल्या हेल्दी स्कीनसाठी त्वचेतील पेशींची पुर्ननिर्मिती होणं गरजेचं आहे. त्वचेचं हे लाईफ सायकल सुरू राहण्यासाठी त्वचेची योग्य काळजी योग्य वयापासून घ्यायला हवी. जस जसे तुमचे वय वाढू लागते तस तसे हे लाईफ सायकल मंदावते. ज्यामुळे वाढत्या वयात त्वचा डल आणि निस्तेज दिसू लागते. सहाजिकच जेव्हा तुमचे वय वाढू लागते तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. यासाठी वयानुसार तुम्ही तुमच्या स्कीन केअर रूटीनमध्ये बदल करायला हवा.
Shutterstock
अँटी एजिंग प्रॉडक्ट वापरणे कधी सुरू करावे –
‘प्रिकॉशन इज बेटर दॅम क्युअर’ हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. म्हणूनच त्वचेच्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्वचेची योग्य काळजी घ्यायला हवी. जस जसे तुमचे वय वाढू लागते तस तसे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, एजिंगच्या खुणा दिसू लागतात. म्हणूनच उतार वय येण्याआधीच अँटी एजिंग प्रॉडक्ट वापरण्यास सुरूवात करा. वीस ते तीस या वयातही त्वचेची योग्य काळजी घेण्यास सुरूवात केली तर चाळीशीनंतर एजिंगच्या खुणा कमी जाणवतात.
Shutterstock
विसाव्या वयापासून त्वचेची अशी घ्या काळजी
वयाच्या विशीनंतर तुमच्या त्वचेमध्ये अनेक बदल दिसू लागतात. म्हणूनच या वयापासून त्वचेची निगा राखण्यास सुरूवात करावी. चेहऱ्यासाठी साबणाऐवजी माईल्ड फेस वॉशचा वापर करा. त्याचप्रमाणे चांगल्या टोनिंग क्रीमने तुमची त्वचा हायड्रेट ठेवा. या वयात अल्कोहोल युक्त टोनरचा वापर करणे टाळा. आठवड्यातून दोनदा त्वचेला क्लिंझरने क्लिन अप करून एखादा मड मास्क अथवा अॅलोवेरा जेल लावा. कोरफडाच्या गराचा मास्क तुम्ही दररोज सकाळी अथवा रात्री वापरू शकता. या काळात नेहमी आयुर्वेदिक आणि केमिकल फ्री उत्पादने वापरावी.
Shutterstock
वीस ते तीस या वयात अशी घ्या काळजी –
जेव्हा तुम्ही विशीतून तिशीत प्रवास करू लागाल. तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर सौम्य एजिंगच्या खुणा दिसण्यास सुरूवात होते. यासाठीच या काळापासून तुम्ही अँटी एजिंग प्रॉडक्टचा वापर सुरू करायला हवा. साधारणपणे पंचवीस ते तीस या वयात तुम्ही हे प्रॉडक्ट आवर्जून वापरायला हवेत. कारण यामुळे तुमच्या त्वचेतील कोलेजीनला प्रोत्साहन मिळते शिवाय यामुळे तुमच्या त्वचेची लवचिकता वाढते. एजिंगच्या खुणा न दिसण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा क्लिन करा आणि आठवड्यातून तीन ते चार वेळा मडमास्क वापरा. प्रखर सुर्यप्रकाशही तुमच्या त्वचेवर परिणाम करत असतो. यासाठीच सुर्यप्रकाशात जाताना सनस्क्रीन क्रीमचा वापर आवर्जून करा. सनस्क्रीन निवडताना ते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडा.
तीस ते चाळीस या वयात त्वचेची अशी घ्या काळजी –
मॅनोपॉज नंतर महिलांच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसणं सामान्य आहे. पस्तिशीनंतर मॅनोपॉजच्या प्रक्रियेला हळू हळू सुरूवात होते. याची लक्षणे मात्र चाळीस ते पंचेचाळीस या वयात जाणवतात. लक्षात ठेवा मॅनोपॉजमुळे त्वचेतील कोलेजीनची निर्मिती कमी होते. शिवाय शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो. यासाठी या वयामध्ये अँटी एजिंग क्रीम वापरणं अत्यंत गरजेचं आहे. या काळात वापरण्यासाठी अनेक अँटी एजिंग जेल, क्लिंझर, अँटी एजिंग फेसपॅक, नाईट क्रीम उपलब्ध असतात. नैसर्गिक उपाय करण्यासाठी तुम्ही या काळात दररोज कोरफडाच्या गराचा वापर चेहऱ्यावर करू शकता. जर योग्य काळजी घेतली आणि योग्य वयात अँटी एजिंग क्रीमचा वापर सुरू केला तर तुम्ही उतार वयातही चिरतरूण दिसाल.
थोडक्यात तुम्ही पंचविस ते तीस या वयातच अँटी एजिंग क्रीमचा वापर सुरू करायला हवा. चाळीशीनंतर याचा वापर केल्यावर योग्य परिणाम जाणवेलच असं नाही.
चेहऱ्यावरील एजिंगच्या खूणा कमी करण्यासाठी वापरा हे ऑल इन वन अँटी एजिंग क्रीम
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा नको असतील तर बदला तुमच्या या ‘5’ सवयी
कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय (Anti-Aging Home Remedies In Marathi)