ADVERTISEMENT
home / Recipes
Idli Recipe In Marathi

Idli Recipe In Marathi | जाणून घ्या लुसलुशीत इडली कशी बनवतात

‘इडली’ हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडीचा पदार्थ. सकाळ-दुपार-संध्याकाळ अगदी कोणत्याही वेळी खाता येईल असा पोटभरीचा प्रकार म्हणजे लुसलुशीत इडली. इडली हा खरा तर साऊथ इंडियन पदार्थ. मुंबईत कितीतरी साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत. पण भारतातच नााही तर  इतर देशांमध्येही इडली इतकी प्रचलित झाली आहे की, आता इडली- चटणी आणि सांबार ही डिश सगळीकडे हमखास मिळते. शाळेतील पिकनिक असू दे की सुट्टीचा दिवस घरात इडली ही बनवलीच जाते.  घरात इडली बनवण्याचा खास एक दिवस प्रत्येकाकडे ठरलेला असतो.   तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवला जाणाऱ्या या पदार्थांची चव तुम्ही नक्कीच चाखली असेल.  गोल गोल आकाराची गोलाकार इडली वाफवून ती साच्यातून काढली जाते आणि मग खोबऱ्यायाची चटणीरोजचीच साधी इडली नाही. इडलीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात.  ते सगळेच प्रकार अगदी घरी करता येतील असे आहेत. म्हणूनच अशा इडल्यांची खास रेसिपी आम्ही शोधून काढली आहे. या रेसिपी तुम्ही घरी ट्राय करु शकता.

Plain Idli Recipe In Marathi | प्लेन इडली

Plain Idli Recipe In Marathi
Plain Idli Recipe In Marathi

Instagram

पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत अशी इडली बनवायची म्हणजे पहिल्यांदा अगदी साधी आणि पारंपरिक इडली बनवता यायला हवी. जाणून घेऊया प्लेन इडलीची रेसिपी

साहित्य:
1 कप उडिदाची डाळ, 1 कप तांदूळ, मीठ, मेथी दाणे

ADVERTISEMENT

कृती:

  • उडिदाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये पाणी घालून साधारण 6 तास हे मिश्रण भिजत ठेवा. याचदरम्यान त्यामध्ये दोन ते चार मेथीचे दाणे घाला
  • मिक्सरमध्ये पाण्याचा अंदाज घेऊन बॅटर जाड होणार नाही याची काळजी घेत त्यात पाणी घाला.
  • इडलीपात्र गरम करुन त्यामध्ये तेल घालून इडल्या वाफवायला घ्या. इडली सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा.

Ragi Idli Recipe In Marathi | नाचणीची इडली

Ragi Idli Recipe In Marathi
Ragi Idli Recipe In Marathi

Instagram

खूप जणांना पौष्टिक इडली म्हणून नाचणीची इडली खाण्याचा सल्ला दिला जातो. ही इडली नुसती हेल्दी नाही तर चविष्टसुद्धा लागते.

साहित्य: 
1 कप नाचणीचे पीठ, 1 कप रवा, चवीनुसार मीठ, 1 कप फेटलेले दही,½ कप पाणी, बेकिंग सोडा, आवडीच्या भाज्यांची फोडणी

ADVERTISEMENT

कृती:

  • एका भांड्यात नाचणीचे पीठ, रवा एकजीव करुन घ्या. त्यामध्ये फेटलेले दही आणि पाणी घालून मिश्रण एका बाजूला ठेवून द्या.
  • एका फोडणी पात्रात आवडीच्या भाज्या घेऊन मोहरी हिंगाची फोडणी तयार करा ती बॅटरमध्ये घाला.
  • सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा घालून इडली पात्रातील मोल्डमध्ये इडल्या घाला. 10 मिनिटं तरी वाफू द्या
    मस्त सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा.

Rava Idli Recipe In Marathi | रवा इडली

Rava Idli Recipe In Marathi
Rava Idli Recipe In Marathi

Instagram

इडली खायचा मूड झाला असेल आणि घरी तयार बॅटर नसेल अशावेळी तुम्हाला रवा इडली बनवता येईल. रवा ईडली बनवणे फारच सोपे आहे. जाणून घेऊया साहित्य-कृती

साहित्य:
1 ½ कप बारीक रवा, 2 कप दही, ¼ कप पाणी, ¼ चमचा इनो फ्रुट सॉल्ट, तेल आणि चवीनुसार मीठ

ADVERTISEMENT

कृती :

  • एका भांड्यात बारीक रवा आणि दही एकत्र करुन घ्या. दही जरी कमी वाटत असेल किंवा जास्त झालं असं वाटत असेल तरी काही हरकत नाही. कारण रवा फुलल्यानंतर मिश्रण छान घट्ट होते.
  • रवा दह्यात छान फुलून आला की त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला ( गरज वाटली तर) सगळ्यात शेवटी म्हणजे इडली करायला घेणार त्या आधी त्यामध्ये तेल आणि मीठ घालून एकत्र करा. एका बाजूला इडलीचे पात्र तयार करुन ठेवा.
  • त्यानंतर इनो फ्रुट सॉल्ट घालून मिश्रण छान एकजीव करुन घ्या आणि गरम गरम इडली पात्रात इडल्या छान शिजायला ठेवा. गरमा गरम आणि झटपट इडली तयार.
    ही चटणी आणि सांबार तयार.

वाचा – डोसा बनवण्याचे निरनिराळे प्रकार

Fry Idli Recipe In Marathi | फ्राय इडली

Fry Idli Recipe In Marathi
Fry Idli Recipe In Marathi

Instagram

इडल्या उरल्या की, त्या फेकून न देता त्यापासून फ्राय इडली बनवू शकता. अशा इडल्याही चटपटीत आणि चांगल्या लागतात.

ADVERTISEMENT

साहित्य:
4 ते 5 शिळ्या इडल्या, शेजवान चटणी सर्व्ह करण्यासाठी

फोडणीसाठी :
तेल, मोहरी, मिरची, तिखट, कोथिंबीर, चाट मसाला

कृती :

  • शिळ्या इडल्या घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करुन घ्या. एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, मिरची, हिंगाची फोडणी द्या.
  • फोडणी चांगली तडकली की त्यामध्ये इडल्यांचे तुकडे घाला. वरुन चाट मसाला किंवा थोडेसे लाल तिखट घाला. वरुन कोथिंबीर भुरभुरा.

Poha Idli Recipe In Marathi | पोहा इडली

Poha Idli Recipe In Marathi
Poha Idli Recipe In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

पोह्यांचा उपयोग करुनही सुंदर इडल्या केल्या जातात. या इडल्या चवीला फारच छान लागतात. जाणून घेऊया इडली बनवण्याची विधी

साहित्य:
1 कप रेग्युलर पोहे, 1 कप इडली रवा किंवा कोणताही जाड रवा, 1 कप दही, मीठ, तेल,सोडा

कृती:

  • मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये पोहे थोडे जाडसर वाटून घ्या, त्यामध्ये रवा आणि दही घालून बॅटर एकजीव करुन घ्या.
  • बॅटर थोड्यावेळासाठी रेस्ट करायला ठेवा. 10-15 मिनिटांनी त्यामध्ये इनो सॉल्ट आणि मीठ घालून एकजीव करु घ्या.
  • इडलीपात्र तेल लावून ग्रीस करुन घ्या. मोल्डमध्ये इडलीचे बॅटर घालून इडल्या शिजवून घ्या.

वाचा – इडली-डोसा बॅटर बनवण्याची योग्य पद्धत

ADVERTISEMENT

Podi Idli Recipe In Marathi | पोडी इडली

Podi Idli Recipe In Marathi
Podi Idli Recipe In Marathi

Instagram

पोडी इडली हा प्रकार तुम्ही अनेकदा साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये नक्कीच खाल्ला असेल. पोडी हा एक विशिष्ट डाळींपासून तयार केलेला मसाला किंवा बुक्की असते. ही फार चविष्ट असते.

साहित्य:
तयार मिनी इडली, मोहरी, तेल, कडिपत्ता, हिंग आणि पोडी पावडर

कृती:

ADVERTISEMENT
  • मिनी इडली तयार करुन घ्या. या मिनी इडल्या तयार करुन झाल्यानंतर त्या थंड करुन घ्या.
  • एका भांड्यात तेल गरम करुन मोहरी, कडिपत्ता, हिंग घालून छान परतून घ्या.
  • तयार इडली घालून त्या परतून घ्या आणि त्यामध्ये पोडी पावडर घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.
  • अशाप्रकारे लुसलुशीत इडली प्रकारातील पोडी इडली तयार

Kanchipuram Idli Recipe In Marathi | कांचिपुरम इडली

Kanchipuram Idli Recipe In Marathi
Kanchipuram Idli Recipe In Marathi

Instagram

कांचिपुरम इडली हा देखील फारच चवीने खाल्ला जाणारा प्रकार आहे जर तुम्ही ही इडली खाऊन पाहिली नसेल तर हा प्रकार नक्की करुन पाहा. कांचिपुरम इडलीला कोविल इडली असे देखी म्हटले जाते. ही इडली ग्लासात किंवा बांबूमध्ये करण्याची पद्धत आहे. ही इडली मऊ होण्यासाठी ही काही खास गोष्टी जाणून घेणे महत्वाचे असते.

साहित्य:
इडलीचे तयार बॅटर, शेंगदाणे, कडिपत्ता, हिंग, जीरं, मोहरी, उडिदाची डाळ

कृती:

ADVERTISEMENT
  • इडलीचे बॅटर तयार करुन घ्या. या इडलीचे खासियत असे की ही इडली फोडणी देऊन केली जाते.
  • त्यामुळे फोडणीपात्र घेून त्यामध्ये तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कडिपत्ता, हिंग, मोहरी, जीरं,उडिदाची डाळ आणि शेंगदाणे घालून छान परतून घ्या.
  • थोडीशी हळद घालून ही फोडणी बॅटरमध्ये घाला. एकजीव करुन इडली मोल्डमध्ये भरा आणि इडली स्टिम करायला ठेवून द्या.
  • लुसलुशीत इडली तयार

Paneer Vegetable Idli Recipe In Marathi | पनीर व्हेजिटेबल इडली

Paneer Vegetable Idli Recipe In Marathi
Paneer Vegetable Idli Recipe In Marathi

Instagram

थोडा हेव्ही, चटपटीत आणि मस्त इडलीचा प्रकार तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला पनीरपासूनही इडलीही तुम्हाला बनवता येईल. पनीर व्हेजिटेबल इडली बनवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

साहित्य:
इ़डलीचे बॅटर, ¼ किलो पनीर, कांदा, चाट मसाला, लाल तिखट, ढोबळी मिरची, कोथिंबीर, शेजवान सॉस, सोया सॉस,आलं-लसूणचे बारीक तुकडे

कृती:

ADVERTISEMENT
  • इडली पात्र गरम करुन ठेवा. इडली पात्रातील भांड्याला तेल लावून ठेवा.
  • भाजीला फोडणी देण्यासाठी तेल गरम करुन त्यामध्ये आलं-लसूणचे बारीक तुकडे ढोबळी मिरची, कांदा परतून घ्या. त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून परतून घ्या.
  • त्यामध्ये सोया सॉस, शेजवान सॉस आणि मीठ घालून छान परतून घ्या. वरुन कोथिंबीर घालून ही भाजी थंड करुन घ्या.
  • इडली पात्र घेऊन त्यामध्ये एक अर्धा डाव इडलीचे बॅटर घालून त्यावर थोडी भाजी घाला. त्यावर पुन्हा एकदा बॅटर घालून हे पात्र इडली पात्रामध्ये ठेवा. पनीर व्हेजिटेबल इडली तयार(या मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता.)

Spinach & Moong Dal Idli Recipe In Marathi | पालक आणि मूग डाळ इडली

Spinach & Moong Dal Idli Recipe In Marathi
Spinach & Moong Dal Idli Recipe In Marathi

Instagram

इडलीचा बेत थोडा हेल्दी करायचा असेल तर तुम्ही पालक आणि मूग डाळीपासून इडली बनवू शकता. या इडल्याही चवीला फार छान लागतात. जर तुम्हाला अशी इडली बनवायची असेल तर जाणून घ्या रेसिपी

साहित्य:
1 वाटी पिवळी मूग डाळ, ¾ कप पालकची पाने, तेल, मीठ, मिरची,1 चमचा दही, इनो सॉल्ट

कृती:

ADVERTISEMENT
  • मूग डाळ साधारण 3 तासांसाठी भिजत घाला. मूगडाळ चांगली भिजली की, पालक-मिरची आणि मूग डाळीची चांगली पेस्ट करुन घ्या. या पेस्टमध्ये दही घालून मिश्रण थोडा वेळ असेच राहू द्या.
  • इडली पात्र गरम करुन थाळीला तेल लावून घ्या. ज्यावेळी इडल्या पात्रात भरणार त्या आधी इनो सॉल्ट घालून मिश्रण एकजीव करा आणि इडल्या तयार करुन घ्या.
  • मस्त चटणीसोबत लुसलुशीत इडली एन्जॉय करा.

Bread Idli Recipe In Marathi | ब्रेड इडली

Bread Idli Recipe In Marathi
Bread Idli Recipe In Marathi

Instagram

ब्रेडपासूनही इडली बनवता येते. ही इडली खाल्ल्यानंतर तुम्हाला ही इडली बॅटरपासून तयार केली नाही असे मुळीच वाटणार नाही.

साहित्य:
पांढऱ्या ब्रेडच्या तीन ते चार स्लाईस, 1 वाटी इडलीचा रवा, 1 वाटी दही, आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

ADVERTISEMENT
  • ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्या. कडा काढलेले ब्रेड मिक्सरच्या भांड्यात घालून ते छान बारीक करुन घ्या. ब्रेड स्लाईसचा चुरा एका भांड्यात काढून त्यामध्ये इडलीचा रवा , दही आणि मीठ घालून एकजीव करा. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.
  • इडलीपात्र गरम करा. इडली पात्र गरम झाल्यानंतर पात्रातील थाळी काढून त्याला तेल लावा आणि इडली वाफवायला ठेवा.
  • ही इडली छान लुसलुशीत होते. गरमा गरम इडली चटणी सोबत सर्व्ह करा.

Cooked Rice Idli Recipe In Marathi | शिजलेल्या भाताची इडली

Cooked Rice Idli Recipe In Marathi
Cooked Rice Idli Recipe In Marathi

Instagram

शिजलेल्या भातापासूनही तुम्हाला पटकन अशी मस्त इडली तयार करता येऊ शकते. ही इडली चवीला फारच उत्तम लागते. ही इडली बॅटरपासून तयार केलेली आहे असे तुम्हाला मुळीच वाटणार नाही

साहित्य:
1 कप शिजलेला भात, 1 कप रवा,  ¼ कप दही,  मीठ, इनो सॉल्ट, तेल

कृती:

ADVERTISEMENT
  • शिजलेला भात एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या.
  • तयार बॅटरमध्ये रवा आणि दही, मीठ घालून ते काही काळासाठी बाजूला ठेवा. रवा चांगला फुगला की, त्यामध्ये इनो सॉल्ट घाला
  • इडली पात्र गरम करुन इडली थाळी घेऊन त्यामध्ये इडलीचे तयार बॅटर घालून झटपट इडल्या तयार.

Stuffed Rava Idli Recipe In Marathi | स्टफ्ड रवा इडली

Stuffed Rava Idli Recipe In Marathi
Stuffed Rava Idli Recipe In Marathi

Instagram

रवा इडली कशी बनवायची ते जाणून घेतल्यानंतर आता त्यापासून स्टफ्ड इडल्या कशा बनवायच्या ते जाणून घेणार आहोत.

साहित्य: 
1 ½ कप रवा, 2 कप दही, चवीनुसार मीठ, तेल, इनो फ्रुट सॉल्ट

भाजीसाठी :
मसाला डोश्यात असते तशी बटाट्याची भाजी

ADVERTISEMENT

कृती:  

  • इडली पात्र गरम करुन ठेवा. दुसऱ्या बाजूला रवा इडलीचे बॅटर आधीच तयार करुन ठेवा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून इडलीचे बॅटर पसरवा त्यावर अगदी चमचाभर भाजी घाला. त्यावर रवा इडलीचे बॅटर पुन्हा घालून  ही थाळी इडली पात्रात ठेवा. इडल्या चांगल्या शिजवून घ्या.
  • मस्त तिखट चटणीसोबत ही इडली सर्व्ह करा. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. इडलीचे मिश्रण लगेच आंबट होते का ?

इडलीचे पीठ लगेच आबंट होत नाही. पण उन्हाळ्यात पीठ जितक्या लवकर येते. तितक्याच लवकर पीठ आंबण्याची शक्यता असते. पीठ लवकर आंबू द्यायचे नसेल तर जेवढे हवे तेवढे काढून घ्या आणि तेवढेच पीठ वापरा. म्हणजे सगळे पीठ आंबणार नाही. थंडी आणि पावळ्यात पीठ लवकर येत नाही त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता नसते.

2. वजन कमी करण्यााठी इडली चांगली आहे का ?

अजिबात नाही, इडली हा तांदूळ आणि उडिदापासून बनवलेला पदार्थ आहे. तांदूळ हा वेटलॉससाठी चांगला नाही. तांदूळामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. उलट ज्यांना वजन वाढवायचे असेल तर इडली आणि काही साऊथ इंडियन पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

3. इडली शिजण्यासाठी किती वेळ लागतो ?

इडली शिजण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं आणि जास्तीत जास्त 15 मिनिटांचा वेळ लागतो. त्यापेक्षा जास्त वेळ इडली शिजायला लागत नाही. जर इडली शिजायला जास्त वेळ लागत असेल तर तुमचं बॅटर चांगलं झालेलं नाही हे लक्षात घ्या.

4. इडली बॅटरमध्ये बेकिंग सोडा का घातला जातो ?

इडलीचे बॅटर आदल्या दिवशी वाटून ते फुगत ठेवले जाते. बॅटर आंबवण्याची प्रक्रिया असे याला म्हणतात. बॅटर आंबल्यानंतरच ते हलके होते. बरेचदा इडलीचे पीठ लवकर आंबून येत नाही.त्यामुळे इडल्या लुसलुशीत लागत नाही. अशावेळी इडलीला जाळी पडण्यासाठी आणि इडली हलक्या होण्यासाठी बेकिंग सोडा अगदी किंचित घातला जातो.

08 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT