‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं….तुमचं आणि आमचं एकदम सेम असतं’ प्रेम म्हटलं की, मंगेश पाडगावकरांची ही कविता (Marathi Prem Kavita) आठवणार नाही. असं मुळीच होणार नाही. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी मनात भावना या नेहमीच त्या असतात. मनातील प्रेमाची भावना कवितेतून (Love Poem In Marathi) मांडली गेली तर त्यातून प्रेमाचा अधिक वर्षाव होतो. चला तर प्रेमवीरांसाठी जाणून घेऊया मराठी प्रेम कविता (Prem Kavita In Marathi)
Table of Contents
- मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita)
- बायकोसाठी मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita For Wife/Gf)
- प्रिय नवरोबांसाठी मराठी प्रेम कविता (Love Poem In Marathi For Husband)
- मराठी प्रेम कविता स्टेटस (Marathi Love Poem Status For Whatsapp)
- मराठी प्रेम कविता थोडक्यात (Short Love Poem In Marathi)
- मराठी प्रेम कविता चारोळ्या (Marathi Prem Kavita Charolya)
मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita)
Marathi Prem Kavita
मराठी प्रेम कविता या प्रेम भावना व्यक्त तर करतातच. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कधी त्यात रुसवा येतो तरी कधी गोडवा.. पण याच सगळ्यातून वाट काढत प्रत्येक जण आपला सुखाचा किनारा शोधत असतो. तुम्हीही प्रेमात असाल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुम्हालाही निघायचे असेल प्रेम प्रवासात तर मराठी प्रेम कविता तुम्हाला नक्की पाठवता येतील.
- प्रेम कधी रुसण असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतसुद्धा!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं- मंगेश पाडगावकर - आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम - कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी, कुणा येई तराणे
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद - गुलाबाचं फुल देणं
प्रेम असतं
पाकळीसमान तिला जपणं
प्रेम असतं,
तिला हसवणं म्हणजे
प्रेम नसतं
तिच्या सुखासाठी आपलं हसणं
प्रेम असतं,
तिला नेहमी सावरणं
प्रेम नसतं
सोबत राहून साथ तिची देणं
म्हणजे प्रेम असतं - खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं
आज आहे उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं
एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु
प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून
जात नसतं
कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं - भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती- कुसुमाग्रज - तुझ्या त्या
नजरेतील नजाकतीला
कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही
तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं
तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते
या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल! - कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात ,
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ,
साद घाली मना,
झोंबणारा हा गार वारा
शहारलेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या,
त्यावेळी लाभलेला तू
एक प्रेम किनारा! - प्रेम करणं सोपं नसतं…
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं…
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं…
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं…
कारण प्रेम करणं सोपं नसतं…
शाळा कॉलेजांत असच घडतं…
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं…
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं…
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं…
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं…
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं…
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं…
कारण प्रेम करणं सोपं नसतं…
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं…
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं…
फोन कडे नेहमी लक्ष ठेवावं लागतं…
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं…
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं…
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं…
एवढ सगळं करणं खूप कठीण असतं…
आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं. - आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.
आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.
आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.
आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं. – अभिजीत दाते.
वाचा – Rain Poems In Marathi
बायकोसाठी मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita For Wife/Gf)
Marathi Prem Kavita For Wife/Gf
बायको किंवा प्रेयसीवर प्रेम व्यक्त करायचे असेल तर तिलाही कविता पाठवून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करु शकता. बायकोचा रुसवा घालवण्यासाठी आणि तिच्यावर प्रेमाची बरसात करण्यासाठी खास मराठी प्रेम कविता
- चांदण्यात राहणारा मी नाही,
भीतींना पाहणारा मी नाही
तू असलीस नसलीस तरीही
शून्यात तुला विसरणारा मी नाही - सखे,
हातात हात घेशील तेव्हा
भिती तुला कशाचीचच नसेल
अंधारातील काजवा तेव्हा
सूर्यापेक्षा प्रखर दिसेल
सहवासात तुझ्या,
आयुष्य म्हणजे,
नभात फुललेली चांदणरात असेल - तुझी सोबत असताना,
जीवनात फक्त सुखांचीच,
अविरत बरसात असेल
प्रेम काय आहे माहीत नाही,
पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल
तर मला जन्मो जन्मी हवयं - मी मागे नसतानाही,
असल्याचा भास होतो ना तुला!
लोकांशी महत्वाचं बोलतानाही
माझा जोक आठवतो ना तुला!
आपण गर्दीत चालतानाही,
माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!
इतरांसोबत जोरात हसतानाही,
माझा दुरावा रडवतो ना तुला!
कधी उदास वाटतानाही,
माझा चेहरा हसवतो ना तुला!
तुला नको असतानाही,
माझा आवाज लाजवतो ना तुला!
तू शब्दांनी नाकारतानाही
चेहराच सांगतो ना
मी आवडतो तुला!- विद्या भूतकर - तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते
बायको तू मला माझ्या परिही प्रिय वाटतेस
प्रेमाने तुझ्या मला दिली आयुष्याला दिशा
तू नसशील तर आयुष्याची होईल दशा
कितीही भांडलो तरी नाही होऊ शकत तुझ्यापासून दूर
सतत तू सोबत असावे हीच माझी इच्छा - बायको, बायको लाडाची बायको
कितीही बोललो तरी घेते कायम समजून
तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ
तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ - प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते
कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस
संसार म्हटला की, आल्या कुरबुरी
तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस
इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस
तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही - तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे
गवत पात्यावर फुललेल्या
मोहक फुलासारखं
मोराच्या पिसाऱ्यावरील
वेधक मोरपंखी डोळ्यांसारखं
समुद्रातील फेसाळलेल्या
उधाण लाटेसारखं
क्षितिजावरील उगवलेल्या सूर्याच्या
विखुरलेल्या उन्हासारखं
माळावर चांदण्याची
लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं - तू खूप प्रेम करतेस म्हणून
तुझ्याशी भांडायला आवडते
भांडण झाल्यावर
तुझा रुसवा काढायला आवडते
तू जवळ नसल्यावर तुझी
आठवण काढायला आवडते
आणि तू जवळ असल्यावर
तुला चिडवायला आवडते
तुझ्यावर प्रेम करत नाही
हे भासवायला आवडते
आणि तू जवळ नसल्यावर
तुझ्या आठवणीत रडायला आवडते
वाचा – ब्रेकअप शायरी (Breakup Shayari Marathi)
प्रिय नवरोबांसाठी मराठी प्रेम कविता (Love Poem In Marathi For Husband)
प्रिय नवऱ्यासाठी खास कविता पाठवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रेम कविता शोधून काढल्या आहेत. लग्नाच्या वाढदिवसासाठी संदेश पाठवण्याऐवजी तुम्ही या प्रेम कविता पाठवू शकता.
Love Poem In Marathi For Husband
- तो बोलायला लागला की,
मी हरवून जाते,
त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच
लाजेने गुलाबी होते - मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय
तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं - तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळुवार स्पर्श…
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…
तुझ्या आठवणी म्हणजे
विरह सागरात हरवलेली नाव… - तुझ्या कुकंवाशी माझं
नात
जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात
घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं
कितीही संकटे आली
तरी,
तुझा हात माझ्या हाती,
असावा,
आणि मृत्यूलाही जवळ
करताना,
देह तुझ्या मिठीत असावा - तुझ्या येण्याने माझे
आयुष्य झाले पुरे
तुझ्या येण्याने माझ्या
जगण्याला मिळाले अर्थ नवे - हजारो नाते असतील पण त्या,
हजार नात्यात
एक नाते असे असते
जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा
सोबत असतो तो म्हणजे ‘नवरा’ - माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझं स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण - तुझ्या कवेत मला
माझे आयुष्य सारे काढायचे आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे
तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ
तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ - तुझ्यासाठी जीव देणारे
खूप जण भेटतील
पण माझ्यासारखा जीव लावणारी
कोणीही मिळणार नाही - तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
वाचा – क्युट रिलेशनशिप स्टेट्स
मराठी प्रेम कविता स्टेटस (Marathi Love Poem Status For Whatsapp)
तुम्हाला थेट कविता पाठवायची नसेल पण व्हॉटसअॅप स्टेटस ठेवून आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही प्रेम कविता स्टेटसही ठेवू शकता. प्रेमातील विविध भाव व्यक्त करणाऱ्या सुंदर चारोळ्या.
Marathi Love Poem Status For Whatsapp
- तुझ्या एका हास्यासाठी
चंद्रसुद्धा जागतो,
रात्रभर तिष्ठत तो आभाळात थांबतो - तू ओढ लावते मला
मी खेचला जातो पुन्हा
तू सांगते मला, मी सांगतो तुला - रात्री तुझी आठवण मला झोपू देत नाही
सकाळी तुझे स्वप्न मला उठू देत नाही - खरं प्रेम ते असतं
ज्यामध्ये तुमच्या सुखापेक्षा
समोरच्या व्यक्तिच्या सुखाचा
जास्त विचार असतो - रात्री जागून विचार करणं
प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं
प्रेम असतं
हातात हात धरुन चालणे
प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं
प्रेम असतं - एक मिनिटं पण तासांसारखा वाटतो
जेव्हा आपण एखाद्याला खूप मिस करतो - तुझं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहीत नाही
पण माझं प्रेम तुझ्यावर जीवापाड आहे, हे तुला माहीत असायला हवं - झाले शब्द आठवणींचे
मनातच ते सांडले
विखुरलेल्या शब्दांना काव्यरुप लाभले - हो, हो तुझ्यावरच प्रेम करतो,
सरळ सांगता येत नाही म्हणूनच रोज स्टेटस ठेवतो - तुझ्या प्रेमाची आस मला, रोज पाहतो तुला
आज तरी बघशील मला ऑनलाईन तेव्हाच तर देईन मी तुला लाईन
वाचा – Trust Quotes In Marathi | विश्वास सुविचार मराठी
मराठी प्रेम कविता थोडक्यात (Short Love Poem In Marathi)
आपल्या प्रेमाची कबुली तुम्हाला काही ओळीतून द्यायची असेल तर अशा शब्दबद्ध केलेल्याकाही कविता आहेत ज्यातून तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करता येईल. प्रेम आहेच अशी जादू जी व्यक्त करण्यासाठी पाठवू शकता प्रेम संदेश
Short Love Poem In Marathi
- तू कविता असशील तक
मला शब्द बनायचं आहे
तुला मिळवायचं नाही तर
मला तुझे व्हायचे आहे - घेऊन मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलयं
आता तूच समजावं याला - पुन्हा त्या पाऊल वाटांवरती
वळू लागले माझे पाऊल
जिथे तू भेटली होती
आणि पावसाची झाली होती चाहूल - मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही
प्रेम हे असचं असतं
कारण शब्दात सांगता येत नाही - तुझ्यावर माझे प्रेम हे समुद्राच्या
रागासारखा आहे,
इतका शक्तिशाली आणि सखोल तो
कायमचा राहील - अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेरपर्यंत,
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे,
तरीही न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे - थोडं अंतर राहू दे
क्षणभर तुला डोळे भरुन पाहू दे- चंद्रशेखर गोखले - तुझ्या कुशीत येताना
माझ्या श्वासास वादळं उठतात
या वादळांना भिऊनच माझे डोळे मिटतात- चंद्रशेअर गोखले - प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याही
शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याची काहीच गरज भासणार नाही - ती म्हणते चंद्र ताऱ्यात हरवून जाऊ रात्ररात्र,
तुझा नि माझा श्वास एकच देह नाममात्र
वाचा – Taunting Quotes On Relationships In Marathi
मराठी प्रेम कविता चारोळ्या (Marathi Prem Kavita Charolya)
अगदी कमीत कमी शब्दात मनातील भावना व्यक्त करण्याचे काम चारोळ्या करतात. चार ओळीतून आपले प्रेम व्यक्त करणे हे सोपे वाटत असले तरी त्यातून तुमच्या मनातील भावना थेट तुमच्या जोडीदाराच्या मनाशी जाऊन भिडतात. आपल्या जोडीदाराशी असलेली मैत्री अतूट असते त्याच्यासाठी मैत्री चारोळ्याही करू शकता.
Marathi Prem Kavita Charolya
- दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित उन पडलं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं- सुधीर मोघे - कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसवणारं
भरलेल्या आसवांचे डोळे पुसरणारं
कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं
केल पोरकं जगानं तरी आपले करुन घेणारे - प्रेमाची चाहूल लागताच
साद तुला दिली
आयुष्यभराची साथही देईन
पण तू ती निभवण्याची शपथ द्यायली हवी - तुझ्या प्रेमाच्या ओंजळीत तू मला सामावून घे
तुझ्या प्रेमाने मला सगळ्या जगाचा विसर पडू दे
प्रेमाची हीच साथ तुझी मला कायम लाभू देत - प्रेमाने प्रेमासाठी काय केलं
हे जाणून घेणे मला वाटत नाही गरजेचे
तुझे प्रेम हेच माझ्यासाठी खूप काही सांगून गेलं - आता तू म्हणशील
तूझं माझ्यावर प्रेम नाही
पण ते न दाखवण्यातच
मला तुझी माझ्याबद्दलची ओढ दाखवते - तुला पाहिलं आणि मनात माझ्या कालवायला लागलं
तुला पाहतच तुझा दिवाना होऊन गेलो
आता हात तुझा माझ्या हातात आहे
आणि हीच साथ मी तुला आयुष्यभर देणार आहे - केलं आहे मी प्रेम
तुझ्या सुंदर डोळ्यांवर
शांत स्वभावावर
आणि तुझ्या गोबऱ्या गालांवर - साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला
उशाखाली फोटो तुझा चांदरातीला - तुझ्या गालावरची खळी पाहून
दिवाना मी झालो
तुझ्या त्या गोड हसण्यावर
मी पुरता वेडा झालो
आता या सुंदर प्रेम कविता पाठवून जोडीदारावरील तुमचे प्रेम व्यक्त करा.