वेगवेगळे रत्न घालून अंगठी जडवली जाते. खूप जण वेगवेगळ्या लाभानुसार राशीला अनुसरुन खास अंगठी बनवून घेतात. पाचू, हिरा, निलम, मोती, पोवळे असे वेगवेगळे रत्न या अंगठीमध्ये बसवून घेतले जातात. पण तुम्ही कधी कासवाच्या आकाराच्या अंगठीबद्दल कधी काही ऐकले आहे का? काही जणांच्या बोटात तुम्ही कासवाची अंगठी घातलेली पाहिली देखील असेल. राशीतील दोष दूर करण्यासाठी कासवाची अंगठी घातली जाते. पण तुम्ही केवळ फॅशन म्हणून अशा प्रकारे कासवाची अंगठी घालत असाल तर जाणून घेऊया कासवाच्या अंगठीचे फायदे आणि नेमकं कोणत्या राशीच्या व्यक्तिंनी ही अंगठी धारण करावी.
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
कासवाच्या अंगठीचे फायदे
कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे तो सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. पौराणिक दाखल्यानुसार कासव हा प्राणी समुद्र मंथनातून बाहेर आलेला आहे त्यामुळे तो ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. शास्त्रानुसार कासव हा लक्ष्मीप्रमाणे संपत्ती, ऐश्वर्य आणि शांतीचे प्रतीक आहे तो त्यामध्ये वृद्धी करण्यास मदत करतो. त्यामुळे आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी आणि आपल्याकडे लक्ष्मीचा वास कायम राहण्यासाठी कासवाच्या आकाराची ही अंगठी घातली जाते. शिवाय पुराणांमध्ये भगवान विष्णूंच्या कच्छप या अवताराचाही उल्लेख आहे. त्यामुळे भगवान विष्णूचीही कृपा राहते. अकासवाची अंगठी ही नेहमी चांदीमध्येच असावी. अन्य कोणत्याही धातूमध्ये ती जडवण्याचा विचार असेल तर कासव हा नेहमी चांदीचा असावा आणि उर्वरित अंगठी ही वेगळ्या धातूमध्ये जडवली तरी चालू शकते.
कोण घालू शकतात ‘पुखराज’,जाणून घ्या त्याचे फायदे-तोटे
या राशींसाठी कासवाची अंगठी आहे अशुभ
कासवाची अंगठी घालण्याचे बरेच फायदे आहेत. हे फायदे खूप असले तरी देखील सगळ्याच राशीचे लोक ही अंगठी घालू शकत नही. विशेषत: मेष, कन्या, मीन आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी ही अंगठी घालू नये. ही अंगठी घातल्यामुळे तुमचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. त्यामुळे शक्यतो अशांनी कोणताही सल्ला न घेता कासवाची ही अंगठी मुळीच घालू नये. जर तुम्ही अशी अंगठी घातली असेल तर ती काढून टाका. कारण त्यामुळे तुम्हाला काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाही.
तुम्हालाही येते का पहाटे जाग, मग वाचाच
अशी परिधान केली जाते कासवाची अंगठी
राशीच्या या अंगठ्या खूपच शक्तिशाली असतात. त्यामुळे अशा अंगठी घालण्याची एक विशिष्ट पद्धत असते. कासावाची ही अंगठी जर तुम्ही योग्य सल्ल्यामनुसार घालण्याचा विचार करत असाल तर ही अंगठी घालताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
- कासवाची अंगठी करुन आणल्यानंतर ती निरशा दुधात काही काळासाठी ठेवली जाते.
- त्यानंतर ती गंगाजलाने धुतली जाते. अंगठी स्वच्छ कपड्याने पुसून ती लक्ष्मी मातेच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवावी आणि मग लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे. त्यानंतरच अंगठी परिधान करावी.
- धनाची देवता लक्ष्मी हिचा वार शुक्रवार असल्यामुळे ही अंगठी शुक्रवारी परिधान केली जाते. ही अंगठी नेहमी उजव्या हाताच्या पहिल्या किंवा मधल्या बोटामध्ये परिधान करतात. अंगठी घालताना कासवाचे मुख अंगठी घारण करणाऱ्याच्या दिशेने असावे तरच त्याचा फायदा होतो.
कासवाची अंगठीचे फायदे, ती कोणी घालावी आणि कशी परिधान करावी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती लगेच शेअर करा.