सौंदर्य

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

Dipali Naphade  |  Jul 26, 2019
मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला चेहऱ्यावर मेकअप करायला तर नक्कीच आवडतो. पण हा मेकअप रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नीट साफ करून झोपता ना ?  यावर जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर मग तुम्ही त्यासाठी अत्यंत सतर्क राहायला हवं हे नक्की. आपली त्वचा अतिशय संवदेनशील असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं रसायनयुक्त मेकअपच चेहऱ्याला लावून झोपणं योग्य नाही. कारण जर तुम्ही मेकअप न काढता झोपत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर तुमचं वय लवकर दिसू लागतं. हे खरं आहे. मेकअप न काढता झोपणं म्हणजे तुम्ही एजिंगसारख्या समस्येला आमंत्रण देत आहात असा त्याचा अर्थ होतो. जे तुमच्या त्वचेसाठी अजिबातच चांगलं नाही. 

आता प्रश्न असा येतो की, हा मेकअप नक्की काढून कसा टाकायचा? तुम्हाला बऱ्याचदा पाण्याने अथवा साबणाने धुवून मेकअप काढायचीदेखील सवय असते. पण तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, तुम्ही मेकअपसाठी ज्याप्रमाणे ब्रँडेड उत्पादनांचा वापर करता त्याचप्रमाणे तुम्ही मेकअप काढण्यासाठीही ब्रँडेड रिमूव्हरचा वापर करायला हवा. मग तुमच्या मनात असा प्रश्न येतो की, ब्रँडेड रिमूव्हर हे नक्कीच महाग असणार. पण असं नाही. अनेक चांगले ब्रँडेड रिमूव्हर हे तुम्हाला 300 रूपयांच्या आत मिळतात. जाणून घेऊया अशी कोणती अप्रतिम उत्पादनं आहेत जी तुमच्या त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. 

गार्नियर स्किन नॅचरल मायकेलर क्लींजिंग वॉटर

हे एक ऑल इन वन मेकअप रिमूव्हर आहे. जे तुमच्या चेहऱ्यावरील मेकअपसह तुमच्या डोळे आणि ओठांवरील मेकअपही संपूर्णपणे साफ करायला फायदेशीर ठरतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे हे तुमच्या चेहऱ्यावर ऑईली दिसत नाही आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुगंध नसतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तीही मेकअप काढण्यासाठी याचा वापर करू शकतात. तसंच हे मेकअप रिमूव्हर लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहरा पुन्हा पाण्याने धुवायची गरजही भासत नाही. फक्त एक लक्षात ठेवा की, डोळ्यांवरील मेकअप काढण्यासाठी तुम्ही कापसाचा वापर करा आणि अजिबात जोरजोरात घासू नका. अतिशय हलक्या हाताने तुम्ही हा मेकअप काढा. 

रेटिंग- 4.4 स्टार। किंमत- ₹ 175

Also Read: सर्वोत्तम टॅन मलई
 

मेबेलीन न्यूयॉर्क क्लीन एक्स्प्रेस टोटल क्लीन मेकअप रिमूव्हर

जास्त काळ टिकणारा आणि वॉटरप्रूफ मेकअप काढून टाकण्यासाठी हे रिमूव्हर सक्षम आहे. तसंच तुमच्या पापण्यांच्या केसांना कोणतंही नुकसान न पोहचवता हे रिमूव्हर अतिशय सॉफ्टनेसने काम करतं. डर्मोटोलॉजिस्ट टेस्टेड असल्यामुळे हे त्वचेला कोणत्याही तऱ्हेची अलर्जी येऊ देत नाही. तसंच तुम्हाला हे ऑनलाईनदेखील त्वरीत मिळतं. 

रेटिंग- 4.4 स्टार। किंमत- ₹ 310

बायोटिक बायो आलमंड ऑईल

बायोटिक ब्रँडचं हे एक आयुर्वेदिक ऑईल आहे. हे कोरड्या त्वचेला लक्षात घेऊन बनवण्यात आलं आहे. एरंडेल, सनफ्लॉवर, कडिलिंब, सोया आणि बदाम यासारख्या गोष्टींनी मिळून हे ऑईल बनवण्यात आलं आहे. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी मेकअप काढण्यासाठी या रिमूव्हरचा वापर करावा. या रिमूव्हरचा वापर केल्याने तुमची त्वचा कोरडी होत नाही आणि कितीही मेकअप असला तरीही हे रिमूव्हर अगदी सहज तुमच्या त्वचेवरील मेकअप काढून टाकायला मदत करतं. 

रेटिंग- 4.2 स्टार। किंमत- ₹ 149

वाचा: सर्वोत्कृष्ट मेकअप कलाकार

लॅक्मे अॅब्सोल्यूट बाय – फेज्ड मेकअप रिमूव्हर

तुम्हाला लॅक्मेची सवय असेल तर चांगलं आहे. पण जर तुम्ही कधी हे उत्पादन वापरून पाहिलं नसेल तर निदान एकदा तरी हे वापरून पाहायला हवं. लॅक्मे अॅब्सोल्यूटचं हे मेकअप रिमूव्हर तुमचा मेकअप साफ करण्याबरोबरच तुमच्या चेहऱ्याला एक फ्रेश फिलदेखील आणून देतो. तसंच तुमची त्वचा हायड्रेट करण्यासाठीही या रिमूव्हरची मदत होते. हे रिमूव्हर तुमच्या संवेदनशील डोळ्यांचीही योग्य काळजी घेतं आणि तुमच्या डोळ्यांची जळजळ होऊ देत नाही. 

रेटिंग- 4.2 स्टार। किंमत- ₹ 300

निवा रिफ्रेशिंग क्लीझिंग मिल्क

या रिमूव्हरचं खास वैशिष्ट्य हे आहे की, मेकअप साफ करण्यासह हे रिमूव्हर तुमची त्वचा मॉईस्चराईजदेखील करतं. नॉर्मल त्वचेसाठीच हे रिमूव्हर बनवण्यात आलं आहे. यामध्ये व्हॅनिला, मध आणि बदाम यांचं मिश्रण असून विटामिन ई देखील असल्यामुळे हे त्वचेच्या आत जाऊन त्वचेचं योग्य पोषण करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच हे तुमची त्वचा तजेलदार ठेवतं. 

रेटिंग- 4.4 स्टार। किंमत- ₹ 159

 

 

Also Read How To Do Makeup At Home In Marathi

हेदेखील वाचा

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

त्वचेला डीटॅन करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं, जे करतील तुमच्या त्वचेचं संरक्षण

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक

Read More From सौंदर्य