DIY सौंदर्य

चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

Dipali Naphade  |  Oct 1, 2020
चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

चंदन (Chandan or Sandalwood) हे अनादीकाळापासून आपल्या त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक साधन मानले गेले आहे. आपली सुंदरता अधिक दिसावी आणि त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी नैसर्गिक साधन म्हणून चंदनाचा वापर करण्यात येतो. तरूण, निरोगी, चमकदार, सुंदर आणि आकर्षक त्वचा मिळविण्यासाठी आणि तेदेखील कोणत्याही दुष्परिणामांशिवाय हे चंदनाच्या फेसपॅकने सहज शक्य होते. खरं तर सुंदर आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण चंदनाचा उपयोग करून तुम्ही पाहिला आहे का? आयुर्वेदीक आणि घरगुती उपायांमध्ये चंदनाचे नाव नक्कीच पहिले घेतले जाते. कोणत्याही दुप्षरिणामांशिवाय उत्कृष्ट आणि अधिक चमकदार आणि डागविरहित त्वचा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चंदनाच्या फेसपॅकचा वापर घरच्या घरी करू शकता. कशा प्रकारे हा फेसपॅक बनवायचा आणि त्याचा कसा वापर करायचा ते या लेखातून आपण पाहू. 

चंदनाचा फेसपॅक मिनिटामध्ये आणेल चेहऱ्यावर चमक

Shutterstock

चंदन हे अँटिसेप्टिक आणि अँटिऑक्सिडंट म्हणून प्रसिद्ध आहे. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अगदी पूर्वीपासून याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे त्वरीत तुम्हाला चेहऱ्यावर चमक हवी असेल तर चंदनाचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. 

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल

चंदनाच्या फेसपॅकने सुरकुत्या आणि काळेपणा होतो दूर

Shutterstock

तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील आणि काही कारणाने चेहऱ्यावर काळे डाग दिसत असतील. तर ते घालविण्यासाठी चंदनाचा फेसपॅक उत्तम उपाय आहे. तसंच हा फेसपॅक करणं अतिशय सोपं आहे आणि खर्चिकही नाही. 

व्यस्त आयुष्यात हवा असेल Instant Glow तर ट्राय करा 11 घरगुती उपाय

चंदन फेसपॅक लावा आणि तरूण दिसा

Shutterstock

चंदनाने चेहऱ्याला कोणतीही इजा होत नाही. चंदन हे नैसर्गिक अँटिसेप्टिक स्वरूपात वापरले जाते. त्यामुळे बाजारातील अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही तुम्हाला याचा उपयोग केलेला दिसून येतो. चंदनाचा हा फेसपॅक लाऊन तुम्ही  अधिक तरूण आणि सुंदर दिसू शकता. 

चंदन फेसपॅक आणि त्याचे त्वचेसाठी विविध फायदे – Sandalwood Powder Face Packs For Face

चंदनाचा फेसपॅक करतो मुरूमं दूर

Shutterstock

तुम्ही जर चेहऱ्यावरील मुरूमांपासून त्रस्त असाल आणि कितीही प्रयत्न करून मुरूमं जात नसतील तर तुम्ही चंदनाचा वापर करून नक्की पाहा. यामुळे तुम्हाला नक्की फायदा मिळतो. 

चंदनाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे अवश्य जाणून घ्या

नाईट क्रिमपेक्षाही अधिक ताजी आणि निरोगी त्वचा मिळते चंदनाने

Shutterstock

हल्ली बरेच जण अनेक नाईट क्रिम्सचा वापर चेहरा तजेलदार दिसावा यासाठी करत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? चंदनाचा वापर करून तुम्हाला अधिक ताजी आणि निरोगी त्वचा मिळू शकते. याचा कसा वापर करायचा जाणून घेऊया. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य