DIY सौंदर्य

गरोदरपणात फॉलो करा सोप्या ब्युटी टिप्स, दिसा सुंदर

Dipali Naphade  |  Mar 11, 2021
गरोदरपणात फॉलो करा सोप्या ब्युटी टिप्स, दिसा सुंदर

गरोदरपणा म्हटला की एक वेगळा आनंद आणि उत्साह असतो. पण त्याचबरोबर आता आपले सौंदर्य बिघणार, शरीराचा आकार बदलणार हादेखील एक विचार मनात कुठेतरी असतो. पण बाळाला जन्म द्यायचा म्हटला की आपले जास्त लक्ष लागून राहते ते बाळाकडे. पण तरीही गरोदरपणात आपण आपल्या त्वचेकडे आणि सौंदर्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काही सोप्या ब्युटी टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही अथवा तुमच्या घरात कोणतीही महिला गरोदर असेल तर तिला नक्की या टिप्स फॉलो करायला तुम्ही सांगा. म्हणजे बाळाच्या जन्मानंतरही तुमची त्वचा नक्कीच चांगली आणि तुकतुकीच राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा.

जास्त पाणी पिणे

Shutterstock

गर्भावस्थेदरम्यान आपल्या शरीराला जास्त पाण्याची गरज असते. तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला अगदी नऊ महिने नैसर्गिक चमक हवी असेल आणि अगदी बाळंतीण झाल्यानंतरही ही चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकवून ठेवायची असेल तर पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. आपल्या शरीराला सतत हायड्रेट करत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अगदी गरोदरपणातही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या त्वचेमध्ये मऊ आणि मुलायमपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्सचा वापर नक्की करा.

व्यायाम नियमित करणे गरजेचे

Freepik.com

गरोदरपणात व्यायाम कसा करायचा अशा प्रश्न तुम्हाला येणं साहजिक आहे. पण गरोदर असताना तुम्हाला काही योगासने आणि व्यायामाचे प्रकार करता येतात. जेणेकरून तुमचे शरीर बांधेसुत राहते. मॅटरनिटी योग अथवा मेडिटेशन यासारख्या गोष्टी गरोदर असताना करता येता. गरोदरपणात येणारा थकवा यामुळे निघून जातो आणि मानसिक चिडचिडही कमी होते. त्यामुळे चेहऱ्यावर थकवा दिसत नाही आणि सौंदर्य टिकून राहते. सुरूवातीपासूनच तुम्ही ही सवय लावली तर पूर्ण गरोदरपणात तुम्हाला त्रास होणार नाही.

गरोदरपणानंतर सर्वात जास्त बाळाबरोबर स्वतःचीही काळजी घ्यावी लागते

मुरूमांपासून करा सुटका

गरोदरपणामुळे अंगातील उष्णता वाढते आणि बऱ्याच जणांना चेहऱ्यावर मुरूमं येण्याचा त्रासही सहन करावा लागतो. मग अशावेळी तुम्ही दिवसातून दोन वेळा नियमितपणे क्लिंन्झर अथवा फेसवॉशने आणि गार पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर धूळ, माती, प्रदूषण साठू देऊ नका. तसंच या काळात तेलमुक्त मॉईस्चराजर आणि मेकअपचा वापर तुम्ही करा. तसंच जास्तीत जास्त नैसर्गिक राहाता येईल याचा विचार करा. गरोदरपणात यामुळे मुरूमं येणे कमी होईल. त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स महत्वाच्या असातात.  त्याचा वापर करा. 

केसांची घ्या काळजी

freepik.com

गरोदरपणाच्या काळात केसगळती ही अत्यंत कॉमन समस्या मानली जाते. पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. गरोदरपणाच्या काळात केसांची नवी स्टाईल करा. हेअर कलरिंग, स्ट्रेटनिंग या गोष्टी करणे टाळा. कारण याचा थेट परिणााम बाळावरही होतो. नियमित केसांना तेल लावा आणि मालिश करा. जेणेकरून तुमची झोप व्यवस्थित होऊ शकेल आणि केसगळती कमी होईल. या काळात केस अधिक कोरडे होत असतात त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष पुरवा. केसांची काळजी घेताना सतत केस धुत राहू नका. यामुळे केस तुटण्याची समस्याही निर्माण होते. त्यामुळे नैसर्गिक काळजी घेता येईल इतकी काळजी घ्या.

स्टायलिश कपड्यांची करा निवड

Freepik.com

गरोदरपणात आधीचे कपडे नक्कीच तुम्हाला घट्ट होतात. मग आपण कशाला सुंदर दिसायचे असा विचार अजिबात करू नका. गरोदरपणातही तुम्ही स्टायलिश कपड्यांची निवड करून अधिक सुंदर दिसू शकता. तुम्ही जितक्या आनंदी राहाला स्टायलिश राहाल तुम्हाला अधिक आनंद मिळेल. त्यामुळे आपल्यासाठी व्यवस्थित कम्फर्टेबल आणि स्टायलिश कपड्यांची निवड करून सौंदर्यात भर घाला. अशाच काही प्रेगनन्सी आऊटफि आयडियाजदेखील तुम्हाला दिसतील. अनेक सेलिब्रिटीही आता या स्टाईल्स फॉलो करतात. 

स्ट्रेचमार्कपासून स्वतःला ठेवा दूर

गरोदरपणात स्ट्रेच मार्क्स येणे हे काही नवे नाही. पण ते कायम राहू नयेत यासाठी तुम्हाला त्याची काळजी घेण्याची आवश्यकता असते. कारण गरोदरपणानंतर पोटावरील वण तसेच कायम दिसतात. स्ट्रेचमार्क्सपासून वाचण्यासाठी तुमची त्वचा मॉईस्ट राहणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बायोऑईल अथवा अन्य तेलाचा वा लोशनचा वापर करून घेऊ शकता. त्वचेमध्ये मॉईस्ट राहिले तर स्ट्रेचमार्क्स येत नाहीत. त्यामुळे ही बाब नक्की लक्षात ठेवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य