घर आणि बगीचा

आरोग्यासाठी होतात पिंपळाचे पानाचे फायदे, जाणून घ्या (Peepal Tree Benefits In Marathi)

Dipali Naphade  |  Nov 7, 2019
Peepal Tree Information In Marathi

पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहीत असतं. पण त्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजलं गेलं आहे पण त्याचा खरा फायदा होतो तो आरोग्यासाठी. पिंपळाच्या झाडाचे महत्व खूप आहे. हे असं झाड आहे जे दिवसातील 24 तास तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देतं. याच्या पानांचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो. नक्की काय फायदा होतो हेच आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. केवळ आपल्यासाठी लहानपणीपासून मोठं झाड असतं इतपत पिंपळाच्या झाडाची माहिती (peepal tree information in marathi) आपल्या सर्वांनाच असते. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याासाठी त्याच्या पानांचा उपयोग (pimpalachya panacha upyog) करून घेता येतो. खरं तर अनेक रोगांवर याची पानं गुणकारी आहेत. जाणून घेऊया नक्की काय पिंपळाचे पानाचे फायदे.

पिंपळ नक्की काय आहे? (What Is Peepal In Marathi)

Peepal Leaves In Marathi

पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाचं मूळ हे खूप दूरवर पसरतं. अनेक जुन्या पुराण्या आयुर्वेदीक ग्रंथामध्ये पिंपळाचं झाड आणि त्याच्या पानाबद्दल अनेक गुण सांगण्यात आले आहेत. पिंपळाच्या पानाच्या प्रयोगामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा अधिक प्रमाणात मिळतो. तसंत तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज आली असेल अथवा त्रास होत असेल तर तुम्हाला पिंपळाच्या पानाचा उपयोग करून घेता येतो. तसंच सेक्शुअर स्टॅमिना वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि गर्भधारणेसाठीदेखील याची मदत होते. पिंपळाच्या पानामुळे रक्त चांगले होते आणि त्याच्या सालीमुळे तुमचं पोटदेखील साफ राहातं.

घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या टिप्स

पिंपळाच्या पानाचे आरोग्यासाठी फायदे (Health Benefits Of Peepal Leaves In Marathi)

 

पिंपळाच्या झाडाचं हे वैशिष्ट्य आहे की, याची मूळं,  सालं, पानं आणि फळं या सगळ्याचा तुमच्या आरोग्यासाठी उपयोग होतो. पिंपळाचे पान खाण्याचे फायदे तर खूप आहेत पण बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही. केवळ पौराणिक महत्त्व लोकांना माहीत आहे. त्यामुळे याचे नक्की काय फायदे आणि गुण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो.

वाचा – कडूलिंबाचे फायदे (Benefits Of Neem In Marathi)

श्वासाच्या त्रासावर गुणकारी

 

बऱ्याच जणांना श्वासाचा अथवा दम्याचा त्रास असतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सुक्या फळांचा उपयोग करून घेऊ शकता. पिंपळाची सुकी फळं तुम्ही वाटून घ्या आणि साधारण 2-3 ग्रॅम या प्रमाणात 14 दिवस पाण्यातून सकाळ – संध्याकाळ तुम्ही घ्या. यामुळे श्वासाचा आजार आणि खोकलादेखील निघून जातो.

दातांसाठी

Peepal Leaves Benefits In Mararhi For Teethache

 

पिंपळाची साल पाण्यात उकळून घेऊन त्याची चूळ भरल्यास,  दातांचे आजार बरे होतात. तसंच पिंपळाची ताजी वेल घेऊन रोज तुम्ही त्याने दात घासले तर दात मजबूत होतात. तसंच दातदुखी बंद होते. तसंच हिरड्यांची सूज आणि तोंडातून येणारी दुर्गंधीदेखील निघून जाते. याशिवाय तुम्ही पिंपळाची साल, कत्था आणि 2 ग्रॅम काळी मिरी एकत्र करून वाटून घ्या आणि याची पावडर तुम्ही रोज दाताला लावलीत तर तुम्हाला  दातांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल. 

तापावर गुणकारी

Peepal Leaves Benefits In Mararhi For Fever

 

तापावर औषध म्हणून पिंपळाचा खूपच फायदा होतो. त्यासाठी तुम्ही 10-20 पिंपळाची पानं घेऊन पाण्यात उकळवा. हा काढा तयार झाल्यानंतर तो प्या. याचं सेवन केल्याने तुमचा ताप उतरण्यास सुरूवात होते. पिंपळ हा थंडावा देत असल्यामुळे तुमचा ताप लवकर निघून जातो.

सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठी

 

पिंपळाची फळं आणि सालं दुधामध्ये घालून उकळवा. त्यामध्ये साखर आणि मध मिसळून प्यायल्यास,  सेक्शुअल स्टॅमिना वाढतो. तसंच पिंपळाची फळं अथवा मूळ सुंठीसह मिसळून दुधात घालून उकळून घ्या आणि तेदेखील तुम्ही पिऊ शकता. तसंच यामध्ये खडीसाखर अथवा मध मिसळून तुम्ही सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास, शारीरिक कमतरता निघून जाते.

जुलाब

 

पिंपळाची वेल, धणे अथवा खडीसाखर याचा समसमान भाग तुम्ही एकत्र करून घ्या. रोज सकाळ संध्याकाळ साधारण 3-4 ग्रॅम तुम्ही हे मिश्रण खाल्ल्यास, तुम्हाला नक्की लाभ होईल. तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असल्यास, लगेच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

टायफॉईड

 

टायफॉईड हा नक्कीच गंभीर ताप आहे. यावरील उपाय म्हणून तुम्ही पिंपळाच्या सालीचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सालीचं चूर्ण करून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी तुम्ही मधासह हे चाटण खा. यामुळे तुमचा टायफॉईड निघून जायला मदत होते.

क्षयरोग

 

क्षयरोग हादेखील एक गंभीर आजार आहे. वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. मुळात हा आजार झाल्यानंतर तुम्ही घाबरून जायची अजिबात गरज नाही. यावर अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे पिंपळाचं मूळ. याचं रोज सेवन केल्यास, क्षयरोगाच्या रूग्णांना त्याचा फायदा होतो. क्षयरोग बरा होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. 

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

पोटदुखी

Peepal Leaves Benefits In Marathi For Stomach Problem

 

पोटदुखी ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी होतच असते. त्यासाठी तुमच्याकडे पिंपळ हा सोपा उपाय आहे. पिंपळाची पानं घेऊन तुम्ही त्याचा काढा तयार करा. हा काढा पिऊन तुमचं पोट साफ होतं आणि तुमची बद्धकोष्ठतेची समस्यादेखील दूर होते. तसंच नुसती पिंपळाची पानं खाल्ली तरीही तुमची पोटदुखी बंद होते. पिंपळाची काही पानं वाटून तुम्ही त्यामध्ये गूळ मिक्स करा आणि याच्या गोळ्या करा. हे दिवसातून तुम्ही 3-4 वेळा खाल्लं तर बद्धकोष्ठासारखा आजार पळून जातो. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला जर खूप आधीपासून असेल तर तुम्ही नियमित पिंपळाची 5-10 फळं खायला हवीत.

नाकातून येणाऱ्या रक्तावर परिणामकारक

Peepal Leaves Benefits In Marathi For Nose Infection

 

काही जणांना वातावरणातील बदलानुसार नाकातून रक्त येण्याची समस्या असते. यावर तुम्हाला नक्की काय उपाय करायचा असाही प्रश्न पडतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या पानाचं चूर्ण खडीसाखरेबरोबर योग्य प्रमाणात बनवून घ्या. हे चूर्ण रोज दिवसातून तीन वेळा तुम्ही पाण्यातून नियमित प्या. असे केल्यास, नाकातून अथवा कानातून रक्त येण्याची समस्या दूर होईल

रक्तविकारावरही होतो फायदा

 

वातरक्त अथवा रक्तविकारांवरही पिंपळाच्या सालांचा उपयोग होतो. तुम्ही साधारण पिंपळाच्या 40 मिली काढ्यामध्ये 5 ग्रॅम मध मिसळा. हे तुम्ही रक्तविकार असणाऱ्या रूग्णाला द्या. 1-2 ग्रॅम पिंपळाच्या बियांचं चूर्ण तुम्ही मधासह रोज चाटल्यास, तुमचं रक्त शुद्ध होतं हे लक्षात ठेवा.  

हृदयरोगासाठी

Peepal Leaves Benefits In Marathi For Heart Disease

 

आजकालची खराब लाईफस्टाईल आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या वाढत आहेत. त्यातच महत्त्वाची समस्या म्हणजे हृदयरोग. हृदरोगापासून वाचायचे असेल तर तुम्ही पिंपळाची 15-20 पानं घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून गाळून घ्या. हा काढा तुम्ही दर तीन तासाने दिवसभर प्या. असं केल्याने तुम्हाला हार्टअटॅक येण्याचा धोका कमी होतो.

खोकला

Peepal Leaves Benefits In Marathi For Cough

 

सर्दी, खोकला हे तर अगदी कॉमन आहे. तसंच जसं वातावरण बदलतं  तसा सर्वात पहिला त्रास होतो तो सर्दी आणि खोकल्याचा. त्यासाठी तुम्ही पिंपळाची पाच पानं दुधामध्ये उकळून घ्या आणि त्यामध्ये साखर घाला आणि दिवसातून दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही हे प्यायलात तर तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळेल.

कावीळ

 

कावीळ हा असा आजार आहे ज्यावर आयुर्वेदीक औषधांचा परिणाम जास्त लवकर होतो. पिंपळाची पानं हा यावरील एक रामबाण उपचार आहे. तुम्ही पिंपळाची 3-4 नवी पानं खडीसाखरेसह साधारण 250 मिली. पाण्यात बारीक करून वाटा. हे सरबत तुम्ही दिवसातून 2 वेळा प्या. साधारण 3 ते 5 दिवस तुम्ही याचा प्रयोग करून पाहा. तुम्हाला कावीळीपासून नक्की सुटका मिळेल

मधुमेह

Peepal Leaves Benefits For Diabetes

 

मधुमेह एकदा झाला की त्याची खूपच काळजी घ्यावी लागते. पण तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर त्यासाठी पिंपळाची पानं हा चांगला उपाय आहे. पिंपळाच्या झाडाची साल काढा आणि हे साल पाण्यातून उकळून घ्या. हे नंतर पाणी गाळून घ्या. हे गाळलेलं पाणी तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी मदत मिळते. 

उलटी

 

तुम्हाला जर उलटी आणि जास्त उचकी लागण्याचा अथवा जास्त तहान लागण्याची समस्या असेल तर त्यावरही पिंपळाची पानं गुणकारी आहेत. त्यासाठी तुम्ही पिंपळाची 50-100 ग्रॅम साल कोळशाच्या पाण्यात काही काळ ठेवा. हे पाणी नीट साफ करून प्यायल्यास तुम्हाला यापासून नक्की आराम मिळतो. 

 

पिंपळाच्या पानाचा उपयोग (Pimpalachya Panacha Upyog)

Pimpalachya Panacha Upyog

आरोग्याशिवाय पिंपळाच्या पानाचे इतरही फायदे आहेत. तुमच्या त्वचेसाठीदेखील याचा फायदा तुम्हाला करून घेता येतो. पाहूया नक्की पिंपळाचे पानाचे फायदे काय आहेत –  

जखमेवर उत्तम उपाय

पिंपळाच्या पानांची पेस्ट तुम्ही जखमेवर चोळून लावली तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळामुळे रक्त शुद्ध होतं. तर तुमची जखम भरून निघण्यासदेखील मदत होते. 

त्वचेवरील लालसरपणा होतो दूर

त्वचेवर बऱ्याचदा हवेतील वातावरणाने अथवा प्रदूषणामुळे लालसरपणा निर्माण होत असतो. पण तुम्ही त्यावर पिंपळाच्या पानाच्या पेस्टचा वापर नियमित केल्यास, तुमचा हा त्रास निघून जाण्यास नक्कीच मदत होईल. त्याशिवाय तुमच्या त्वचेवर फोडही येणार नाहीत. 

त्वचेवरील पुरळांवर ठरते फायदेशीर

Skin Benefits Of Peepal Leaves In Marathi

तुमच्या शरीरावर येणाऱ्या लहानमोठ्या पुरळांवरीलदेखील पिंपळाची पानं फायदेशीर ठरतात. पिंपळाची साल पाण्यात घालून तुम्ही पुरळ आलेल्या ठिकाणी लावा आणि त्यावर ओली पट्टी बांधा त्याचा तुम्हाला फायदा मिळतो. तसंच पिंपळाची ताजी पानं तुम्ही गव्हाच्या पिठात घालून पेस्ट बनवल्यास, ती त्यावर लावा. यामुळे पुळ्या आणि त्यामुळे आलेली सूज निघून जाण्यास मदत होते.

सुरकुत्यांवर रामबाण इलाज

पिंपळाची पानं त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतात. तुमच्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्हाला याचा वापर करता येऊ शकतो. पिंपळाची ताजी पानं भिजवून तुम्ही त्वचेवर याचा लेप द्या. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. 

डोळ्यांसाठी लाभदायक

डोळ्यांच्या अनेक आजारांवर पिंपळ फायदेशीर ठरतो. पिंपळाची पानं डोळ्यांचे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पिंपळ्याच्या पानातून निघणारा चीक हा डोळ्यांना लावल्यास, डोळ्यांमध्ये काही खुपत असल्यास, ते लवकर बरे होते. पिंपळाचं पानं हे डोळ्यांना थंडावा देतं.

पायांवरील भेगांसाठी

Benefts Of Peepal Leaves In Marathi For Crack On Heels

घरात काम करणाऱ्या महिलांना नेहमीच पायाला भेगा पडण्याची समस्या उद्भवते. तुम्हाला तुमचे पाय अधिक कोमल आणि मऊ मुलायम हवे असतील तर तुम्ही पिंपळाच्या पानांचा चीक अथवा रस पायांना लावा. यामुळे तुम्हाला पायांवरील भेगांपासून सुटका मिळेल. 

पिंपळाचा वापर किती प्रमाणात करावा? (Consumption Of Peepal Leaves In Marathi)

Consumption Of Peepal Leaves In Marathi

तसं तर पिंपळाचा उपयोग तुम्ही व्यवस्थित प्रमाणात केलात तर त्याचा तुम्हाला लाभच मिळतो. त्यामुळे प्रत्येक औषध हे दिलेल्या प्रमाणात तुम्ही घेणं योग्य आहे. तुम्ही त्यासाठी योग्य डॉक्टरांकडून सल्ला घेऊनच त्याचं सेवन करणं योग्य आहे. पिंपळाची पानं असोत अथवा त्याचा काढा. त्याचा कसा आणि किती उपयोग करावा याचा सल्ल्यानुसारच वापर करावा. सामान्यतः त्याचं प्रमाण काय  असावं हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण तुमच्या शरीराला नक्की काय झेपेल हे तुम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलेलं योग्य – 

पिंपळाचा काढा – 50 – 100 ml. 

पिंपळाचं चूर्ण – 3-6 ग्रॅम

पिंपळाचा चीक – 1-20 मिली

पिंपळाच्या पानाचे तोटे (Side Effects Of Peepal Leaves In Marathi)

प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसेच तोटेही असतात. पिंपळाच्या झाडाचे जास्त तोटे नाहीत. पण तरीही तुम्ही पिंपळाचे जे काही पदार्थ बनवणार असाल ते तुम्ही योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं योग्य आहे. अन्यथा तुम्हाला पोटदुखी आणि डोकेदुखीसारख्या समस्यांना जास्त सामोरं जावं लागतंं. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात त्याचं सेवन करत आहात की नाही हे पाहणं तुमच्याच हातात आहे. 

प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. पिंपळाची झाडं नक्की कुठे सापडतात?

पिंपळाचे झाड हे भारतात अनेक ठिकाणी असतं.  पश्चिम बंगाल अथवा मध्य भारतात तुम्हाला जास्त सापडतात. हिंदू तसंच बौद्ध धर्मात पिंपळाच्या झाडाला जास्त महत्त्व असल्याने मंदिराच्या आसपास ही झाडं लावली जायची. त्याशिवाय नेपाळ आणि इंडोनेशियामध्येदेखील तुम्हाला ही झाडं सापडतात. 

2. डोळ्यांवर पिंपळाच्या पानांचा उपयोग लाभदायक आहे का?

पिंपळाची पानं डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. रोज तुम्ही 3-4 ग्रॅम पिंपळाच्या पानाचं सेवन केल्यास, डोळ्यांच्या आजारांपासून सुटका होते. इतकंच नाही पानातून येणारा चीक तुम्ही डोळ्यांना लावल्यास, तुमच्या डोळ्यांना अधिक थंडावा मिळतो आणि आजार नाहीसे होतात. 

3. पिंपळाच्या झाडाचा सर्वात मोठा फायदा काय आहे?

असं म्हटलं जातं की, पिंपळाचं झाड हे दिवसातील 24 तास तुम्हाला ऑक्सिजन पुरवतं. तसंच पिंपळाचं झाड हे इतर झाडांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली आही. 

4. पिंपळ नक्की कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं?

पिंपळाला इंग्रजीमध्ये पिपल ट्री (Peepal tree), द बो ट्री (The Bo tree), बोद्ध ट्री (Bodh Tree) म्हटलं जातं. तर उर्दू मध्ये पिंपळाला पिपल आणि गुजरातीमध्ये पिपरो असं संबोधलं जातं. पंजाबी आणि नेपाळीमध्येही पिपलचं म्हणतात.

You Might Like This:

ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Broccoli In Marathi)

 

Read More From घर आणि बगीचा