लाईफस्टाईल

जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi)

Trupti Paradkar  |  Aug 9, 2019
Spiritual Quotes In Marathi

आध्यात्मिक वातावरणामुळे मनाला शांतता आणि आत्मिक समाधान मिळते. आध्यात्मिक सुविचार (Marathi Spiritual Quotes) तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. हे आध्यात्मिक विचार मराठी (Spiritual Quotes In Marathi) भाषेतील असून समाधान कोट्स (Samadhan Quotes In Marathi), अध्यात्मिक सुविचार मराठी (Adhyatmik Vichar In Marathi), शांतता सुविचार हेही शेअर करत आहोत. भगवत गीता श्लोक मराठी तुम्ही वाचू शकता.

सोशल मीडियासाठी आध्यात्मिक सुविचार (Marathi Spiritual Quotes For Social Media)

Marathi Spiritual Quotes For Social Media

1. उठा जागे व्हा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका – स्वामी विवेकानंद 

2. समजदार व्यक्तीसोबत काही मिनीटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासमान आहे – स्वामी विवेकानंद

3. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार – सद्गुरू श्री वामनराव पै

4. तुमचे मानसिक समाधानच तुमच्या शत्रूंना पराभूत करेल – चाणक्य

5. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू हे – सदगुरू श्री वामनराव पै

6. पर्यावरण हाच खरा नारायण आहे – सदगुरू श्री वामनराव पै

7. आधि मन घेई हाती, तोचि गणराज गणपती – संत तुकाराम

8. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणें मुक्ती चारी साधियेल्या – संत ज्ञानेश्वर

9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – श्री स्वामी समर्थ

10. हेंचि दान देगा देवा| तुझा विसर न व्हावा|| – संत ज्ञानेश्वर 

11. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्याचा जाण्याचा सोपा मार्ग – अज्ञात

12. अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही – अज्ञात

13. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हिच आहे खरी ईश्वरभक्ती – सदगुरू श्री वामनराव पै

14. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले – संत तुकाराम

15. प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे ? – संत तुकाराम

16. साधुसंत येती घरा| तोचि दिवाळीदसरा|| – संत तुकाराम 

17. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी – संत तुकाराम

18. अमृताहूनि गोड तुझें नाम देवा – संत नामदेव 

19. विचार बदला नशीब बदलेल – सदगुरू श्री वामनराव पै

20. जेव्हा सर्व काही संपले आहे असं वाटत असतं तिच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची – स्वामी विवेकानंद

21. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे – संत रामदास स्वामी

22. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधूनि पाहे – संत रामदास स्वामी 

23. मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचें कारण || – संत तुकाराम 

24. नित्य नेमी नामीं ते प्राणी दुर्लभ| लक्ष्मी वल्लभ तयां जवळी|| संत ज्ञानेश्वर

25. सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे – संत ज्ञानेश्वर

गुरुपौर्णिमा कोट्स मराठी

सुखी जीवनासाठी आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi For Happy Life)

Spiritual Quotes In Marathi For Happy Life In Marathi

1. मना वीट मानू नको बोलण्याचा |

    पुढे मागुता राम जोडेल कैचा ||

    सुखाची घडी लोटता सुख आहे

    पुढे सर्व जाईल काही न राहे || – संत रामदास स्वामी

2. मनाची एकाग्रता ही ध्यानसाधनेची गुरूकिल्ली आहे – स्वामी विवेकानंद

3. देवाच्या दरबारात माणसाच्या सर्व कर्मांचा जमा-खर्च असतो- गुरूनानक

4. जसा विचार तसा जीवनाला आकार – सद्गुरू श्री वामनराव पै

5. भगवंत माणासाच्या माध्यामातून जन्माला येत असतो – रविंद्रनाथ टागोर

6. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो विद्वान पुरूष त्यामुळे दुःखी होत नाही – महर्षी व्यास

7. देव त्यालाच मदत करतो जो लोकांची मदत करण्यास तयार असतो- डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम 

8. आध्यात्मिक जीवन म्हणजे पूर्ण निस्वार्थता आहे – शिवानंद महाराज

9. देवाचे अखंड नामस्मरण केल्याने संसार चांग आणि परमार्थ सांग होतो – सदगुरू श्री वामनराव पै

10. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर ती तुमच्यासाठी कधीच हिताची नव्हती हे समजा – अज्ञात

11. चिंता चिता समान आहे – अज्ञात

12. जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे, जनीं वंद्य ते सर्व भावे करावे – संत रामदास स्वामी 

13. शुद्ध ज्याचा भाव झाला | दुरी नाही देव त्याला|| – संत ज्ञानेश्वर

14. जस जसं भय जवळ येईल तस तसा त्याच्यावर हल्ला करा आणि त्याचा सर्वनाश करा – चाणक्य 

15. संकटात कुठेतरी संधी दडलेली असते – चाणक्य 

16. परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे व सच्चिनानंद स्वरूपाने तो ह्रदयात आहे – सद्गुरू श्री वामनराव पै

17. भ्रमाला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणदे अहंकार – सदगुरू श्री वामनराव पै

18. जनात पाहिजे अर्थ आणि मनात पाहिजे परमार्थ – सदगुरू श्री वामनराव पै

19. जो जीभ जिंकेल तो मन जिंंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल – सदगुरू श्री वामनराव पै

20. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही – स्वामी विवेकानंद

21. व्यक्तिमत्व चांगलं नसेल तर सुंदर दिसण्यात काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे – स्वामी विवेकानंद

22. तुमच्या कर्मावर जर तुमची भक्ती असेल तरच तुमचं कर्म सार्थकी लागू शकतं – रामकृष्ण परमहंस

23. फुल उमललं की त्याच्या वासाने मधमाशी त्याच्याजवळ येते अगदी तसंच तुमच्या गुणांमुळे जग तुमचे गुणगाण गावू लागतं – रामकृष्ण परमहंस

24. जीवनावर प्रेम करणं म्हणजेच देवावर प्रेम करणं – अज्ञात

25. मुलं ही देवाघरची फुलं असतात – अज्ञात 

आम्ही दिलेले हे सुविचार तुमच्या जीवनात कसे क्रांतीकारक ठरले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये  जरूर कळवा.

स्वामी समर्थ कोट्स

अध्यात्मिक विचार मराठी (Adhyatmik Vichar In Marathi)

Adhyatmik Vichar In Marathi

अध्यात्मिक विचारांचा आपल्यावर नेहमी सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे सुखी जीवनासाठी अध्यात्मिक विचार (Spiritual Thoughts In Marathi) यांचा आधार नक्की घ्या. 

1. जीवनावर प्रेम करण्याचा अर्थ आहे देवावर प्रेम करणं. 

2. अध्यात्मिक जीवन पूर्ण निस्वार्थता आहे. 

3. कर्तव्य हेच धर्म आहे, प्रेम हेच ईश्वर आहे, सेवा हीच पूजा आहे, सत्य हीच भक्ती आहे.

4. देवाला हे नका सांगू की, समस्या बिकट आहे, उलट समस्येला सांगा की, देव माझ्या जवळ आहे. 

5. प्रत्येक जण सांगतो की, ईश्वर दिसत नाही पण खरं तर हे आहे की, संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव साथ देत असतो. 

6. भय हे विश्वासाच्या विपरीत असतं. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण देवाला हा संदेश पोचवतो की, आपला त्याच्यावर विश्वास नाही. 

7. फळं लागल्यावर झाडाच्या फांद्या खाली वाकतात, जसं सज्जन लोकं धन आणि ज्ञानप्राप्ती होताच विनम्र होतात. 

8. सर्व स्वप्न त्याग करा काहीतरी वेगळं करण्यासाठी, जसं रामाने बरंच काही गमावलं श्रीराम होण्यासाठी. 

9. जो चिंता करतो तोच दुःखी असतो. जो चिंतन करतो तो सुखी असतो. 

10. संसार सोडून परमात्मा मिळत नाही, परंतु परमात्मा मिळण्यासाठी जग मात्र आपोआप सुटत जातं. 

11. देवाच्या दरबारात प्रत्येक कर्मांचा लेखाजोखा असतो. 

12. रागाने भ्रम निर्माण होतो, भ्रमाने बुद्धी भ्रष्ट होते. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा तर्क नष्ट होतात. जेव्हा तर्क नष्ट होतो व्यक्तीचं पतन होऊ लागतं. 

13. सार्थक आणि प्रभावी उपदेश तो आहे जो तुमच्या वाणीने नाही तर तुमच्या आचरणातून दिसतो. 

14. दुसऱ्यांच्या अध्यात्मिकतेचा मनापासून आदर करण्यानेच मनुष्यामध्ये अध्यात्मिकता उत्पन्न होते. 

15. देवाकडून काही मागितल्यावर न मिळाल्यास नाराज नका होऊ कारण देव ते देत नाही जे तुम्हाला आवडतं. उलट देव ते देतो जे तुमच्यासाठी नेहमी चांगल ठरेल.

अधिक वाचा :

जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार

जाणून घ्या गुरूपौर्णिमा आणि गुरूपूजनाचे महत्त्व

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार

जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य

आयुष्यावर गौतम बुद्ध यांचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Life)

Karma Status In Marathi

Read More From लाईफस्टाईल