आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांच्यामुळे आपण खूप प्रभावित होतो. बालपण हे संस्कारक्षम वय असते. याच वयात माणसाचे व्यक्तिमत्व घडते. अशा वेळी जर आजूबाजूला किंवा घरात योग्य मार्गदर्शन करणारी , प्रेम करणारी माणसे असतील तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप चांगले विकसित होते. आपल्या आयुष्यात असणारे असे ते खास लोक म्हणजे आपले आजी-आजोबा होत. आजी-आजोबा आपल्यावर खूप प्रेम करतात, आपल्याला पाहताच त्यांचे चेहरे उजळतात. आजोबा हे नातवाचे आयुष्यातील पहिले मित्र असतात आणि नातू त्यांचा शेवटचा मित्र असतो.घरात आजोबांचे अस्तित्व असणे हे संपूर्ण कुटुंबासाठीच खूप महत्वाचे आहे. कुटुंबात वडीलधारी मंडळी असणे आवश्यक आहे. ज्या घरात आजी-आजोबांच्या रूपाने वडीलधारी माणसे असतात त्यांना त्यांचा आधार वाटतो. जिथे वडीलधाऱ्यांचा सल्ला ऐकला जात नाही, त्या घरांमध्ये भांडणे होतात. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेले आजी-आजोबा आपल्याला प्रत्येकाला चांगले ज्ञान देतात. आजच्या काळात विभक्त कुटुंबांचा कल वाढला असला तरी प्रत्यक्षात नातवंडांना जे प्रेम व गुण त्यांच्या आजी-आजोबा, आजी-आजोबांकडून मिळतात, ते क्वचितच इतर कोणी देऊ शकेल. कुटुंब जर वटवृक्ष असेल तर आजी-आजोबा त्याच्या मुळासारखे असतात, जे संपूर्ण घराला मजबूत प्रेमाने बांधून ठेवतात. एवढेच नाही तर अनेक गुण नकळत आजी-आजोबांकडून घरातील निरागस मुलांना वारसाहक्काने मिळतात. म्हणूनच असे म्हणतात की प्रत्येक घरात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. तुम्हालाही प्रेमळ आजी-आजोबा लाभले असतील तर तुम्ही भाग्यवान आहात. अशा आजोबांचा वाढदिवस असेल तर आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Grandfather In Marathi) पाठवा. तुमच्या प्रेमळ शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Grandfather In Marathi) वाचून आजोबांना नक्कीच आनंद होईल.
Table of Contents
- आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Grandfather In Marathi
- आजोबांसाठी वाढदिवसाचे स्टेटस – Birthday Status For Grandfather In Marathi
- वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा आजोबांसाठी – Happy Birthday Wishes For Grandfather In Marathi
- आजोबांसाठी वाढदिवस कोट्स – Happy Birthday Ajoba Quotes In Marathi
- आजोबांसाठी ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 75th Birthday Wishes For Grandfather In Marathi
अधिक वाचा – आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Grandfather In Marathi
आजी-आजोबा कुटुंबाचे मूळ म्हणून ओळखले जातात. आपल्या अनुभवातून आणि ज्ञानातून ते नवीन पिढ्यांना पुढे जाण्यास मदत करण्यासाठी ते त्यांना मौल्यवान धडे देतात. ते निःस्वार्थपणे त्यांच्या मुलांवर आणि नातवंडांवर प्रेम करतात आणि त्यांना यशस्वी व चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतात. तुमचेही आजोबा असेच प्रेमळ असतील ना! मग त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर पाठवायलाच हव्यात. असेच जर लाडक्या वडिलांचा वाढदिवस असेल तर त्यांनाही खास शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.
आजोबा तुम्ही कायम सुखी राहावे व तुमचे आशीर्वाद मला कायम मिळत राहावेत एवढीच माझी इच्छा!
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
ज्याप्रकारे बाबा मला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात त्याचप्रकारे आजोबा आमच्यावर उत्तम विचार विचारांचे संस्कार करतात. आयुष्यभर पुरेल एवढी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आदरणीय आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
बाबांच्या मारापासून आई वाचवते आणि आईच्या मारापासून फक्त आजोबाच वाचवू शकतात. मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण मला तुमच्या सारखे प्रेमळ आजोबा मिळाले. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार…
आयुष्यात येणाऱ्या संकटांशी दोन हात करून त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो .. आजोबा, माझे गुरू झाल्याबद्दल तुमचे शतश: आभार… वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा, आजोबा!
सुखी आणि समृद्ध आयुष्य तुम्ही जगला आहात. तुम्ही आमच्या आयुष्यातला भक्कम आधार आहात..
आजोबा तुमच्या लाडक्या नातवाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
या वयातही प्रत्येक कामात असणारा तुमचा उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या आनंदी, उत्साही स्वभावामुळे तुमच्या वाढत्या वयाची आठवण आम्हाला होत नाही. आजोबा, असेच कायम आमच्या सोबत राहा
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार, आजोबा!
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला बघतो, तेव्हा मला तुमच्यासारखे प्रेमळ आणि कर्तृत्ववान बनावेसे वाटते
तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात कितीही संकटे आली तरीही चेहेरा हसतमुख ठेवून आनंदी कसं राहायचं हे तुम्ही मला शिकवलंत! आजोबा मला कायम असेच चांगले धडे देत राहा. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजोबा तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. माझ्या पाठीशी तुम्ही नेहेमीच खंबीरपणे उभे असता, नेहमी मला हसवता, नेहेमी मला प्रेरणा देता! तुम्ही अजून शंभर वर्षे जगावे हीच देवाकडे प्रार्थना! तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण तुमच्यासारख्या खास व्यक्तीचा वाढदिवस आहे.
तुमचा सहवास असाच वर्षानुवर्षे आम्हाला मिळो हीच देवाकडे प्रार्थना! आजोबा तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचा – मुलीसाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आजोबांसाठी वाढदिवसाचे स्टेटस – Birthday Status For Grandfather In Marathi
जेव्हा मुले त्यांच्या वाढत्या वयाच्या अवस्थेत असतात आणि त्यांना आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची, मौल्यवान धडे शिकण्याची आवश्यकता असते, तेव्हा पालक अनेकदा त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त असतात आणि त्यांना जीवनातील चांगल्या-वाईटाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवू शकत नाहीत.आजी-आजोबा या बाबतीत जास्त अनुभवी असतात आणि मुलांसोबत जास्त वेळ घालवू शकतात. अशा प्रकारे संयुक्त कुटुंबात राहणारी मुले चांगली नैतिक मूल्ये आणि जीवनासाठी आवश्यक असलेले इतर मौल्यवान धडे शिकू शकतात. तुमच्याही आजोबांनी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेच असेल. अशा प्रेमळ आणि गोड आजोबांचा वाढदिवस आहे म्हटल्यावर तो खास करण्यासाठी आजोबांसाठी वाढदिवसाचे स्टेटस ठेवा आणि आजोबांवरचे आपले प्रेम व्यक्त करा. आजोळी गेलो की आजी आजोबांप्रमाणेच मामाही आपले तितकेच लाड करतो. त्यामुळे मामाचाही वाढदिवस लक्षात ठेवायला हवाच.
मला तुम्ही अंगाखांद्यावर खेळवले, चांगले आयुष्य जगणे शिकविले. ती मुले खरंच भाग्यवान असतात ज्यांना तुमच्यासारखे प्रेमळ आजोबा मिळतात. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार.
आयुष्यात खूप माणसे येतात आणि जातात. पण लहानपणापासून माझ्यासोबत असणाऱ्या, माझी साथ कधीही न सोडणाऱ्या माझ्या बालमित्राला म्हणजेच माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुख असो की दुःख, माझ्या चांगल्या काळात माझा आनंद वाटून घेणाऱ्या आणि वाईट काळात मला आधार देणाऱ्या माझ्या मागे खंबीरपणे उभे असणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
माझ्या जडणघडणीत आईवडिलांबरोबरच त्यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. अशा माझ्या प्रेमळ आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जशी झाडाची मुळे संपूर्ण झाडाला भक्कम आधार देत असतात तसेच आजोबा संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शन,मदत आणि आधार देत असतात. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आजोबा!
लहानपणी जेवढा आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात व्हायचा, तसा आनंद तर आता लाखो रुपयांच्या गाडीत फिरूनही मिळत नाही. माझे बालपण सुंदर असावे यासाठी झटणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही माझे आजोबा तर आहातच. पण त्याबरोबरच तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड देखील आहात. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
संपूर्ण कुटुंबाचे जीवन सुंदर बनवणाऱ्या प्रेमळ व्यक्तीला म्हणजेच माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजोबा जेव्हा मी तुमच्या वयाचा होईन तेव्हा माझाही स्वभाव तुमच्यासारखाच प्रेमळ आणि गोड असू दे हीच माझी इच्छा आहे आणि तुमचा सहवास आम्हाला वर्षानुवर्षे मिळू देत हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
जेव्हा जेव्हा मी निराश होतो तेव्हा मला प्रेरणा दिल्याबद्दल, माझा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल, संकटांत मला आधार दिल्याबद्दल मी तुमचे किती आणि कसे आभार मानू? देवाकडे इतकेच मागणे आहे की असे आजोबा प्रत्येक व्यक्तीला मिळू देत. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
Miss You Father Quotes in Marathi
वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा आजोबांसाठी – Happy Birthday Wishes For Grandfather In Marathi
आजोबांचा वाढदिवस म्हणजे एकदम खास दिवस असतो. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही खास करून आजोबांवरील प्रेम व्यक्त करत असतो. आजोबांना आपल्या नातवंडांकडून असे प्रेम मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलते. तुम्हालाही आजोबांवरचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्यांना वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवा. तसेच आजीचा वाढदिवस लक्षात ठेवून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायला विसरू नका.
जर प्रत्येक मुलासाठी त्यांचे बाबा जर हिरो असतील तर आजोबा हे सुपरहिरो आहेत. माझ्या चेहेऱ्यावर कायम हसू फुलवणाऱ्या अशा माझ्या सुपरहिरो आजोबांना वाढदिवसाच्या सुपर शुभेच्छा!
तुमचा प्रगाढ अनुभवाचा फायदा फक्त तुम्हालाच नाही तर आम्हालाही होतो कारण तुम्ही आम्हाला नेहमी योग्य मार्गदर्शन करता आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करता. माझे गुरु असणाऱ्या अशा माझ्या प्रेमळ आजोबांना त्यांच्या लाडक्या नातीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
लहानपणापासूनच आम्हाला श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगून आमच्यावर उत्तम संस्कार कसे होतील याची काळजी घेणाऱ्या, आम्हाला योग्य शिकवण देणाऱ्या आमच्या आजोबांचा आज वाढदिवस! देव करो असे आजोबा सर्वांना मिळो आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या जगातील माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजोबा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
तुमच्या लाडक्या नातवंडांवर असेच प्रेम कायम राहू द्या. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…
आमच्या कुटुंबाचा आधार आणि अनुभवाचे समृद्ध भांडार असलेल्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुम्ही नेहमी निरोगी राहावे आणि तुमचे जीवन नेहमी सुखी असावे एवढीच माझी इच्छा! आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आणि तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहे. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांचा खिसा रिकामा असला तरी आजवर त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी कधी नकार दिला नाही. माझ्या आजोबांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजवर पाहिली नाही. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
मला एक प्रामाणिक आणि स्वाभिमानी व्यक्ती बनवल्याबद्दल आजोबा तुमचे खूप खूप आभार! प्रिय आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार!
वाचा – 60 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा
आजोबांसाठी वाढदिवस कोट्स – Happy Birthday Ajoba Quotes In Marathi
नातवंडांसाठी आजी-आजोबा खूप महत्वाचे असतात. आजी-आजोबांसोबत राहणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक आनंदी आणि निरोगी असतात. आजी-आजोबा त्यांच्या नातवंडांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, लागेल ती सगळी मदत करतात. आजी-आजोबा ही एकमेव व्यक्ती आहेत जी नातवंडांना जुन्या संस्कृतीशी, श्रद्धा, परंपरांशी जोडू शकतात.ते आपल्याला सगळ्या चांगल्या सवयी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.आपले आयुष्य घडवणाऱ्या आजी आजोबांवर नातवंडांचेही तेवढेच प्रेम असते. अशा प्रेमळ आजोबांचा वाढदिवस असेल तर त्यांना पाठवण्यासाठी वाचा आजोबांसाठी वाढदिवस कोट्स –
जर प्रत्येकाला तुमच्यासारखे प्रेमळ आजोबा मिळाले तर या जगात कोणीही दुःखी राहणार नाही. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या आनंदात ज्यांना आनंद होतो अशा खूप कमी व्यक्ती या जगात आहेत. त्यापैकीच एक निस्वार्थी प्रेम करणारे माझे आजोबा आहेत. माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजोबा, तुम्ही रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात. आम्ही थकल्यावर स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात. माझ्या आयुष्यातल्या सुखांच्या पेटीची चावी आहात. प्रिय आजोबा, तुम्हाला Happy Birthday!
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य बघून जे स्वतःचे दुःख विसरतात असे माझे आजोबा माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. माझ्या लाडक्या आजोबाना त्यांच्या लाडक्या नातीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
सूर्याची सोनेरी किरणांबरोबर तुमच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येवो, फुलणारी फुले तुम्हास सुखाचा सुगंध देवो! .
आम्ही तुम्हाला काहीही दिले तरी ते कमीच असेल म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुख देवो तुम्हास.. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहानपणापासून तुमच्या अंगाखांद्यावर खेळलो. तुमच्या संस्कारांच्या मुशीत मी घडलो! जेव्हाही कधी धडपडलो तेव्हा तुमच्याच कुशीत जाऊन दडलो! माझे आयुष्य घडवणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देवो…
कोणी विचारले की अशी कोणती जागा आहे जिथे सर्व गुन्हे माफ आहेत. मी हसून उत्तर दिले, ती जागा म्हणजे माझ्या आजोबांचे हृदय आहे. अशा माझ्या प्रेमळ आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
माझे पहिले शिक्षक, माझे प्रेरणास्थान आणि पहिले जिवलग मित्र असणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
समस्त कुटुंबाचा भक्कम पाया असलेले माझे आजोबा माझा आधारस्तंभ आहेत. अशा माझ्या प्रिय आजोबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण खूप खास आहेत. पुढील अनेक जन्मातही देवाने मला मला तुमचाच नातू म्हणून जन्म द्यावा अशी माझी प्रार्थना आहे. हॅपी बर्थडे आजोबा…
वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आजोबांसाठी ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – 75th Birthday Wishes For Grandfather In Marathi
आजी आजोबांचे वय दिवसेंदिवस वाढत असले तरी आपली इच्छा असते की त्यांनी कायम आपल्याबरोबर राहावे आणि आपल्याला त्यांचे प्रेम मिळत राहावे. तसा तर प्रत्येकच वाढदिवस हा खास असतो पण 75 वा वाढदिवस खूप खास असतो. हा वाढदिवस अनेक घरांत थाटामाटात साजरा होतो. तुमच्या आजोबांचा 75वा म्हणजेच अमृतमहोत्सवी वाढदिवस असेल तर त्यावेळी आजोबांना खास शुभेच्छा पाठवा. वाचा आजोबांसाठी ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा –
मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही आपला 75 वा वाढदिवस देखील पंचवीस वर्षांच्या तरुणाला लाजवेल अशा स्फूर्तीने आणि उत्साहाने साजरा करीत आहात. आजोबा तुम्हाला ७५ व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व नमस्कार…
गातील सर्वात चांगल्या व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे संपूर्ण आयुष्य सुखी असो व परमेश्वर तुम्हाला कायम निरोगी व उत्साही ठेवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आजोबा!
आपल्या वाटेतील दुःखरूपी काटे दूर होऊन सुखाच्या पायघड्या घातल्या जाव्यात. जगातील सर्व सुखे आपल्यासमोर हात जोडून उभी असावीत, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच देवाकडे प्रार्थना! आजोबा, आपणास 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत व तुम्हाला आनंद सुख आणि ,मन:शांती लाभो..Happy Birthday आजोबा!
चालतात वाकून आणि हळू आहे त्यांची चाल, वय जरी वाढले आहे तरी माझे आजोबा आहेत कमाल. अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा!
जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत तुम्ही माझे Guide होता, तुमच्याकडे पाहून मला नेहमी मला तुमचा अभिमान वाटतो. आजोबा, तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजोबा, तुम्ही मला लहानपणापासूनच दया, धैर्य आणि प्रेमाने वागण्याची शिकवण दिली आहे. मी आज जे काही मिळवले आहे ते तुमच्या शिकवणीमुळे शक्य झाले आहे. असेच मला कायम योग्य मार्ग दाखवा. Happy Birthday आजोबा!
प्रत्येक क्षणी आमच्या सुखाचा विचार करतात, आमच्यावर दुःखाची वादळे कधीही येऊ देत नाहीत, आमच्या समोर सुरक्षाकवच म्हणून उभे राहतात. असे माझे आजोबा अजूनही सगळ्या कुटुंबाला आधार देतात. आजोबा, तुम्हाला अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
परमेश्वराचे खूप खूप आभार की आज ७५ वर्षानंतरही तुम्ही निरोगी आणि उत्साही आहात. देवाकडे माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे तुमचे असेच निरोगी व स्वस्थ आयुष्य राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा!
त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये खरंच खूप ताकत असते. जे हात आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात. प्रत्येक समस्येत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
असे आढळून आले आहे की मुलांना आपल्या आजी-आजोबांसोबत राहणे आवडते. आजी-आजोबा आपल्या नातवंडांवर इतके प्रेम करतात की त्यांना प्रेमाची कमतरता कधीच जाणवत नाही आणि ते नेहमी आनंदी असतात. आजी-आजोबा असले की आपल्याला सुरक्षित वाटते. आजी-आजोबांनी दिलेले प्रेम आपल्याला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते. जसे आजी-आजोबा आपल्यावरचे प्रेम आपले लाड करून व्यक्त करतात तसेच आपणही त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त केले तर त्यांना मनापासून आनंद होतो. तुम्हालाही हे प्रेम शब्दांत व्यक्त करायचे असेल तर आजोबांच्या वाढदिवशी आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Grandfather In Marathi) पाठवा व बघा त्यांच्या चेहेऱ्यावर कसे हसू उमलते.
अधिक वाचा –
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा