तुकतुकीत सुंदर त्वचा सगळ्यांनाच आवडते. त्वचेच्या काही समस्या वगळल्या तर प्रत्येकाची त्वचा ही छान तुकतुकीत दिसू शकते. यासाठी तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचा तुकतुकीत, तरुण आणि कायम फ्रेश दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा तुम्हाला अगदी आठवड्याच्या आत जाणवेल की, तुमची त्वचा छान दिसू लागली आहे. इतर कोणत्याही स्किनकेअर प्रमाणेच या काही टिप्स आहेत. ज्या तुम्हाला अगदी सहज घरबसल्या करता येतील. या अशा गोष्टी आहेत. ज्याची तुम्ही कदाचित टाळाटाळ करता. पण त्वचेसाठी याच गोष्टी फार महत्वाच्या असतात.
कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा
शीट मास्क वापरा
सध्या स्किनकेअर रुटीमध्ये शीट मास्क हे अगदी मस्ट झाले आहे. चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्याचे काम शीट मास्क खूप चांगल्या पद्धतीने करते. पंधरा दिवसातून एकदा तरी त्वचा रिलॅक्स करण्यासाठी शीट मास्कचा उपयोग करा. शीट मास्कच्या वापरामुळे त्वचेच्या आत सीरम जाण्यास मदत होते. हे सीरम अनेकदा टी ट्री ऑईल, पपई, सी वीड, मिक्स फ्रुट्स अशा स्वरुपातील असते. ज्याच्या वापरामुळे डल किंवा कोरडी झालेली त्वचा छान तुकतुकीत दिसू लागते. पण याचा अति वापर करु नका. पंधरा दिवसातून एकदाच शीट मास्क वापरा
चेहऱ्याला द्या वाफ
चेहऱ्याचे पोअर्स उघडून त्वचा स्वच्छ करणे फार गरजेचे असते. त्यामुळे महिन्यातून दोनदा चेहऱ्याला वाफ घ्या. चेहऱ्याला वाफ घेतल्यामुळे त्वचचा स्वच्छ होण्यास खूप मदत मिळते. चेहऱ्याला वाफ घेताना जर तुमच्या त्वचेवर खूप पिंपल्स असतील तर वाफ घेताना थोडी काळजी घ्या. कारण खूप वाफ घेण्यामुळेही त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त 2 मिनिटांसाठी चेहऱ्याला वाफ घ्या.
आवळ्याचे असे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा
पोट साफ ठेवा
त्वचेसाठी पोट साफ असणे फार महत्वाचे असते. पोट स्वच्छ असेल तर तुम्हाला त्वचेचा त्रास अजिबात होणार नाही. पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फळं,प्रोटीन्स भरपूर खा. त्यामुळे फायबर आणि प्रोटीन मिळते. त्यामुळे पोट स्वच्छ राहते. त्वचा चांगली ठेवायची असेल तर तेलकट आणि मैद्याचे पदार्थ टाळा. असे पदार्थ पोटात चिकटतात जे शरीरातून बाहेर जाताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पोट साफ ठेवा.
टोनरचा करा वापर
त्वचेसाठी टोनर हे फार महत्वाचे असते. टोनर हे त्वचेचे पोअर्स मिनिमाईज करण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये टोनर असू द्या. सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपताना चेहऱ्याला टोनर लावा. टोनरच्या वापरामुळे तुमची त्वचा चांगली तर दिसते.पण ती अधिक चमकदार आणि सुंदर दिसू लागते. त्यामुळे टोनरचा वापर करत नसाल तर टोनरचा वापर करायला घ्या.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल
मेकअप काढा
सुंदर दिसणे म्हणजे मेकअप करणे आलेच. जर तुम्हाला मेकअप करायची आवड असेल तर तुम्हाला मेकअप काढणेही गरजेचे असते. मेकअप काढताना तुम्ही योग्य पद्धतीने मेकअप काढा. विशेषत: आयमेकअप हा काढणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही मेकअप योग्य पद्धतीने काढला आणि चेहरा स्वच्छ केला तर तुम्हाला मेकअपचा त्रास होणार नाही. त्यामुळे मेकअप योग्यपद्धतीने काढा
चेहऱ्याची अशा पद्धतीने काळजी घ्याल तर तुमची त्वचा नक्कीच सुंदर दिसेल .