लग्नाच्या निमित्ताने नेहमी वेगवेगळे ट्रेंड येत असतात. या ट्रेंडमध्येच आता अजून एका ट्रेंडची भर पडली आहे. हा ट्रेंड आहे कलर्ड लेन्सचा. चला जाणून घेऊया नक्की काय आहे हा ट्रेंड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कलर्ड लेन्स आणि लग्नाचा काय संबंध आहे. तर हा ट्रेंड आहे वेडिंग ड्रेस म्हणजेच लग्नाच्या कपड्यांच्या रंगानुसार आजकाल बऱ्याचजणी लेन्सेस घालण्याला पसंती देत आहेत.
चेहऱ्याच्या सुंदरतेत डोळे महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत जन्मतः डोळ्यांचा जो रंग असेल तोच रंग आपलासा मानला जायचा. पण आपल्यापैकी बरेचजणींना अनेकदा डोळ्यांचा रंग ऐश्वर्यासारखा निळा किंवा करीनासारखा हिरवा असावा असं वाटू शकतं. खऱ्या आयुष्यात नाही निदान लग्नाच्या वेळी तरी ही हौस पूर्ण करता आली तर याच विचाराने हा ट्रेंड रूजू झाला. त्यामुळे अनेक जणी आता कलर्ड लेन्सच्या मदतीने आपल्या सौंदर्य वाढवत आहेत.
वेडिंग फॅशनचा नवा ट्रेंड
नैसर्गिक सौंदर्याची जागा आता कलर्ड ऑप्टिकल कॉटँक्ट लेन्स घेत आहेत. जिथे चष्म्याला पर्याय म्हणून लेन्स वापरले जात होते. तेच आता वेडिंगमध्येही आवर्जून वापरले जात आहेत. बॉलीवूडच्या धर्तीवर आता मोठ्या शहरांमध्येही कलर्ड लेन्सची मागणी वाढतेय. त्यामुळे बाजारात सिंगल यूज कॉटँक्ट लेन्सपासून चांगल्या दर्जाच्या लेन्सच्या खरेदीत वाढ झाली आहे. या ट्रेंडचा वापर फक्त ब्राईडचं नाहीतर मुलंही करताना दिसत आहे.
कलर्ड लेन्सचं बजेट
या लेन्समध्ये सामान्य आणि कस्टमाइज कॉटँक्ट लेंस उपलब्ध आहेत. एकदाच वापर करता येणाऱ्या कलर्ड लेन्सची किंमत किमान 300 रुपये आहे. तर चांगल्या क्वालिटीची लेन्स एक हजारपासून सात हजार रुपयांपर्यंत आहे.
लेन्समध्ये रंगांचे पर्याय
कलर्ड कॉटँक्ट लेंसमध्ये ग्रे, ब्राउन, ब्लू, ग्रीन, व्हॉयलेट, कॉम्बिनेशनमध्ये हनी, क्रीम, ब्लू, हेजल, डार्क ब्लू आणि एक्वा कलरमध्ये हे लेंसेस आरामात मिळतात. हे लेन्स वापरणंही खूप सोपं आहे. पण तरीही या लेन्सेसचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसंच ही फॅशन करण्याआधी खालील काळजी नक्की घ्या.
कलर्ड लेन्स वापरताना घ्या ही काळजी
- आपल्या कॉर्नियामध्ये 70 टक्के पाणी असतं. यामध्ये रक्त नलिका नसतात. त्यामुळे लेन्स वापरताना काळजी घ्या.
- कॉर्नियाला ऑक्सीजनची गरज असते. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे लेन्स असले तरीही वापरानंतर 8 ते 10 तासानंतर नक्की काढा.
- धूळ-माती या लेन्सला लागू देऊ नका. जर डोळे लालसर वाटले तर तुम्हाला लेन्सची एलर्जी असू शकते.
- जर लेन्स स्वच्छ नसतील तर तुम्हाला इंफेक्शनचा होण्याचा धोका वाढू शकतो.
- बऱ्याच काळ लेन्सेस वापरल्याने कॉर्नियाला इजाही होऊ शकते.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
Read More From Wedding Accessories
बहिणीच्या लग्नासाठी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात
Trupti Paradkar
लग्नसराईसाठी खास कानातले डिझाईन – कानातले झुमके डिझाईन
Aaditi Datar