‘‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’… वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण दिवाळी, दिपावली या नावाने ओळखला जातो. जास्तीत जास्त 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद हा फारच वेगळा असतो. अगदी महिनाभर आधीच या सणाची जोरदार तयारी सुरु होते. फराळाचा सुगंध घराघरातून दरवळू लागतो. घरी सोनपावलांनी लक्ष्मी यावी यासाठी घरी साफसफाई केली जाते.रुसवे फुगवे विसरुन नातेवाईकांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद वाटण्याचा हा काळ असतो. एकमेंकाना खास दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला खास असे महत्व आहे. तो दिवस साजरा करण्याची पद्धतही तितकीच खास आहे.दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती ही आपल्याला असायला हवी. म्हणूनच आज आपण दिवाळी सणाची माहिती मराठी (Diwali Chi Mahiti) आणि आकाश कंदील या विषयी जाणून घेणार आहोत. जाणून घेऊया दिवाळीच्या सणाची माहिती (Importance Of Diwali In Marathi)
Table of Contents
Diwali Information In Marathi – धनत्रयोदशी
धनत्रयोदशी, धनतेरेस, यमदीपदान, धन्वंतरी जयंती अशा नावाने हा दिवस ओळखला जातो..या दिवशी धन्वंतरी पूजनासोबतच लक्ष्मी आणि कुबेराची पूजाही केली जाते. दिवाळीची माहिती घेताना या दिवसाची माहिती करुन घेणे गरजेचे आहे. धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला कशाची खरेदी करावी आणि करु नये याचेही काही नियम आहेत धनत्रयोदशीबद्दल अनेक दंतकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. दिवाळीची माहिती मराठी जाणून घेताना जाणून घेऊया त्यापैकी एक आख्यायिका जाणून घेऊया.
दिनांक : मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021
दंतकथा: एकदा यमराजाने एक कथा सांगितली. एक हंस नावाचा राजा शिकार करत असताना दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाऊन पोहोचला. दुसऱ्या राज्याच्या राजाने हंस राजाचे स्वागत करत त्याचे आदरातिथ्य केले. त्याचदिवशी हेमराजाला पुत्र झाला. षष्ठीच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचे भविष्य सांगितले, राजाच्या पुत्राचा सोळाव्या मृत्यू होईल… म्हणजेच लग्नाच्या चौथ्यादिवशी तो मरेल. हे ऐकून राजा व्याकूळ झाला त्याने आपल्या पुत्राला मृत्यू येऊ नये म्हणून एका गुहेत लपवून ठेवलं. विधीवत सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे राजपुत्राचा वयाच्या सोळाव्या वर्षी हंस राजाच्या मुलीशी विवाह झाला. त्याचे प्राण घेण्यासाठी यमराज तिथे गेले. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यावेळी एवढ्या आनंदाच्या दिवशी अनर्थ कोसळलेला पाहून यमराजालाही दु:ख झाले. असा प्रसंग कोणावरही येऊ नये म्हणून त्यांनी धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही. असे सांगितले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो.
अशी केली जाते धनत्रयोदशीची पूजा:
- घरी अपमृत्यू येऊ नये म्हणून घराबाहेर यमराजाच्या नावाने एक दिवा लावला जातो. म्हणून संध्याकाळी दाराबाहेर दिवा लावावा
- धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. उत्तम आरोग्य मिळावे यासाठी धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती आणून त्याची पूजा करावी
- याच दिवशी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. काही जण धणे-गूळ आणि पैसे ठेवून लक्ष्मीची पूजा करावी.
दिवाळी सणाची महिती | नरक चतुर्थी
दिवाळीचा पहिला दिवस अर्थात नरक चतुर्थी. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे आणि अभ्यंगस्नानाचे महत्व या दिवसासाठी खास (diwali sanachi mahiti) आहे. पहाटे उठूनच या दिवसाची सुरुवात केली जाते.मस्त उटणं लावून या दिवशी आंघोळ केली जाते. उटणं लावून आंघोळ करणे म्हणजेच शरीरावरुन मल काढून शरीर शुद्धी करणे. काही जण हे घरीच उटणं बनवतात. घराबाहेर कारेटे ठेवून अनिष्ट शक्तींना पायाखाली चिरडले जाते आणि मोठ्याने ‘गोविंदा गोविंदा’असे म्हणतात. नरक चतुर्दशी किंवा नरक चतुर्थी संदर्भातही काही दंतकथा प्रचलित आहेत.
दिनांक: गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021
दंतकथा: पुराणानुसार नरकासुर नावाचा एक असूर होता. ज्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता. त्याला विष्णूपुत्र असेही म्हणत. ज्यावेळी भगवाने विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार केला त्यावेळी हा वराह अवतार जन्मला होता. लंकापती रावणाचा वध झाल्यानंतर नरकासुराचा पृथ्वीच्या गर्भातून जन्म झाला. राजा जनक यांनी त्याचे पालनपोषण केले. पुढे त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा म्हणून भगवान विष्णू यांनी घोषित केले. नरकासुर हा राजा कंस यांच्या फार जवळचा होता. माया या राजकुमारीशी त्याचा विवाह झाला. नरकासुराचे आयुष्य व्यवस्थित व्यतित होत असताना बाणासुराच्या दुष्ट संगतीत तो अडकला. त्यामुळेच वशिष्ठ ऋषींनी नरकासुराला विष्णूच्या हातूनच मृत्यू येईल असा शाप दिला. या शापातून वाचण्यासाठी त्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करत त्याचा कोणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्याने त्या वराच्या बळावर अनेक अन्याय सुरु केले. अनेक राजांना हरवून राज्यातील स्त्रिया आणि मुलींना पळवून मणिपर्वतावर आणून ठेवले. त्याच्या या उन्मत्तपणामुळे देव आणि मानवही त्रासले होते. अखेर भगवान कृष्णांनी नरकासुराचा वध करण्याचे निश्चित केले. त्याची राजधानी असलेल्या प्राग्ज्योतिषपूर येथे गरुडावर स्वार होत त्यांनी नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे केले. बंदिवासातील सगळ्या महिलांना सोडवले. त्यांना कोणी स्विकारणार नाही हे जाणून त्यांनी तब्बल 16 हजार कन्यांशी विवाह केला. या पराक्रमाची आठवण म्हणून नरक चतुर्थी साजरी केली जाते.
अशी केली जाते नरक चतुर्थी:
- पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्या आधी लहानांना तेलाने मालिश करुन मग त्यावरच उटणं लावलं जातं.
घराबाहेर रांगोळी आण दिवा लावला जातो. - तुळशी शेजारी दिवा पेटवून किंवा घराबाहेर कारेटं नावाच फळ घेऊन ते अंगठ्याने फोडले जाते. नरकासुराचा वध म्हणजेच अनिष्ट प्रवृत्तीचा वध किंवा वाईटाचा नाश म्हणत मस्त सहकुटुंब दिवाळीचा फराळ खाल्ला जातो.
Diwali Information In Marathi | लक्ष्मीपूजन
दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व आहे. व्यापारीवर्ग तर हा दिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतो. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा. घरी असलेला पैसा-अडका टिकवून राहावा यासाठी हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. लक्ष्मीपूजन नेमके का केले जाते आणि ते कसे करावे हे आता दिवाळीची माहिती मराठीतून जाणून घेऊया.
दिनांक: गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021
लक्ष्मी पूजनाविषयी धार्मिक श्रद्धा: शरद पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. शरद पौर्णिमा म्हणजे नवरात्राैत्सवानंतर येणारा कोजागिरीचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला येतो. कार्तिक अमावस्येचा हा दिवस काली मातेचा असतो. या दिवशी काली मातेची पूजा होणे अपेक्षित असते. असे म्हणतात की, शरद पौर्णिमेचा म्हणेज धवल (प्रकाशाचा दिवस) लक्ष्मीचा आणि अमावस्येचा दिवस हा कालीमातेचा असतो. पण बदलत्या काळानुसार दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजाच केली जाते. आता तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाची प्रथाच रुढ झालेली दिसते.
असे करा लक्ष्मीपूजन:
- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश , गणेश यांचीही पूजा केली जाते.
- लक्ष्मीमाता प्रसन्न राहण्यासाठी घरातील लक्ष्मी( धन-पैसा-सोनं) याची पूजा केली जाते. यामध्ये वाढ व्हावी आणि आनंद कायम टिकून राहावा अशी मनोभावे प्रार्थना केली जाते.
वाचा – Tulsi Vivah Sms Marathi
Importance Of Diwali Padwa In Marathi | बलिप्रतिपदा
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या नावाने ओळखला जाणारा हा दिवस दिवाळीतील अत्यंत महत्वाचा असा दिवस आहेत. हिंदू धर्मानुसार मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक पूर्ण मुहुर्त आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ असे म्हणतात. सोने खरेदी आणि व्यापारांसाठी नव्या वर्षाची ही सुरुवात असते. या दिवशी पतीलाही औक्षण करण्याची पद्धत आहे. दिवाळी पाडवा हा दिवस खास नवरा बायकोचा असतो. त्यामुळे या दिवशी दिवाळी पाडवा शुभेच्छा | Diwali Padwa Wishes In Marathi द्यायला विसरू नका.
दिनांक : शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021
दंतकथा :
असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचना यांचा पूत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही तो अत्यंत चारित्र्यवान, प्रजाहितदक्ष, दानी आणि विनयशीर होता. त्याचा दानशूरपणा हा त्याच्या ठायी असलेल्या सगळ्यात मोठा गूण. त्याच्या या वाढत्या शक्तीच्या प्रभावाने त्याने देवांचाही पराभव केला. त्याचा पराभव करण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळाराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देणे गरजेचे होते. हे दान घेण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनाअवतार धारण केला आणि बळीराजासमोर उभे राहिले. वामनाने बळीराजाकडे तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून दान देण्याची तयारी दाखवली. वामन रुपातील विष्णूंनी प्रचंड रुप धारण केले आणि दोन पावलांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली आता तिसरे पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे बळीराजाने नम्रपणे वाकत आपले मस्तक पुढे केले. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवत त्याला पाताळ लोकात पाठवत तेथील राज्य दिले. तो गर्विष्ठ असला तरी दानशूर आणि क्षमाशील होता. म्हणूनच भगवान विष्णूंनी त्याला वर देत कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या गुणांची पूजा करतील असे सांगितले. तोच हा दिवस बलिप्रतिपदा
असा साजरा केला जातो दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा
- दानशूर राजा बळी याची प्रतिमा काढत त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याची पूजा करत बळीचे राज्य येवो अशी कामना केली जाते.
- व्यापारांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. आर्थिक वर्षाची सुरुवात मानत या दिवशी नव्या चोपड्या आणि वह्यांचे पूजन केले जाते.
- तर नव- दांम्पत्यासाठी हा दिवस फारच महत्वाचा असतो. या दिवशी पत्नी पतीला उटण लावून आंघोळ घालते. पती तिला भेटवस्तू देतो. या दिवसाला दिवाळसण असेही म्हणतात. पहिली दिवाळी ही त्यामुळेच नव दाम्पत्यासाठी खास असते.
दिवाळी सणाची माहिती मराठी | भाऊबीज
बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा हा सण म्हणजे ‘भाऊबीज’ दिवाळीची सांगता या दिवसाने होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज अशी या सणाची ओळख आहे. या दिवसाच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. शिवाय या दिवसबाबत अनेक श्रद्धाही आहेत. असे म्हणतात की, या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व जागृत होतं. या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि तिच्या हातचे पदार्थ खाल्ल्यामुळे भावाला चांगलाच लाभ होतो. तसंच भाऊबीज स्टेटस ही आवर्जून ठेवलं जातं.
दंतकथा:
यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात. अपमृत्यूची भीती करण्यासाठी हा दिवस महत्वाचा असतो. या दिवशी यमराजाला दूर ठेवण्यासाठी ही बहीण- भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळते.
अशी साजरी केली जाते भाऊबीज:
- बहीण- भावाचा सण असल्यामुळे बहिणीने या दिवशी भावाच्या आवडीचे खास पदार्थ बनवावेत. या दिवशी भाऊ हा बहिणीकडे येतो.
- बहिणीने भावाला ओवाळावे आणि भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यावी.
- भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी अपमृत्यू निवारणार्थ यमाला दीप दान करण्याची पद्धत आहे.
दिवाळीतील रांगोळी आणि कंदीलाचे महत्व
दिवाळीत सगळं वातावरण एकदम वेगळे झालेले असते. दारोदारी रांगोळी काढली जाते. घरोघरी वेगवेगळ्या आकाराचे कंदील लावले जातात. दारात दिवे लावले जातात. रांगोळीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. कंदीलाचेही अगदी तसेच महत्व आहे. दिवाळीचे महत्व (Importance Of Diwali Festival In Marathi) जाणून घेतल्यानंतर रांगोळी आणि कंदील हे नक्की का महत्वाचे आहेत ते जाणून घेऊया.
- रांगोळी हे सौंदर्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामध्ये काढलेली प्रतीके ही मांगल्य, शक्ती, उदारपणा याची चिन्हे मानली जातात.
- रांगोळी ही सगळ्या नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचे काम करते.त्यामुळेच घरात काही आनंदाचे काही प्रसंग असतील तर त्या दिवशी अगदी हमखास रांगोळी काढलीच जाते.
- रांगोळी काढण्यामागे अशीही धारणा आहे की, त्यामुळे नशीब फळफळणे, चांगल्या गोष्टींना आमंत्रण देणे या गोष्टीसाठी रांगोळी काढली जाते.
- आकाशकंदील हे देखील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आकाशकंदीलामुळे घरात सकारात्मक प्रकाश येण्यास मदत मिळते.
- आकाशकंदीलाचा रंग आणि त्याचा आकार हा आनंद प्रदान करणारा असतो.
दिवाळी सणाची माहिती मराठी ही तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. तेव्हा दिवाळीच्या शुभेच्छां (Happy Diwali Wishes In Marath) सोबतच दिवाळीचं महत्त्व आणि माहिती (Importance Of Diwali Festival In Marathi) ही आपल्याला आणि पुढच्या पिढीला असलीच पाहिजे.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade
150+ Dhantrayodashi Wishes, Quotes And Messages In Marathi | धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Trupti Paradkar