खाणंपिण आणि नाइटलाईफ

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

Aaditi Datar  |  Jun 25, 2019
Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

गरमागरम पोळी खाताना अगदी छान वाटतं. मऊ आणि चांगल्या पोळ्या करण्यासाठी गृहिणी अनेक किचन टिप्सचा (kitchen tips in marathi) वापरही करतात. पोळी हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. पण कधी कधी गृहिणी वेळ वाचवण्यासाठी दिवसातून एकदाच पोळ्यांसाठी लागणारी कणीक (dough) मळून ठेवतात आणि फ्रिजमध्ये ठेवून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हे तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तुमचीही सवय सगळ्यांच्याच आरोग्यासाठी हानीकारक आहे. चला जाणून घेऊया फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक तुमच्या आरोग्याला कशाप्रकारे अपायकारक ठरू शकते. 

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक अपायकारक

आरोग्य विशेषज्ञांच्यामते नेहमी ताज्या कणकेच्या पोळ्या करून खाव्यात. कारण मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवल्यावर फ्रिजमधील हानीकारक किरणांमुळे त्यातील पोषक तत्त्व पूर्णतः नष्ट होतात. तसंच या कणकेने बनवलेल्या पोळ्या चांगल्याही लागत नाहीत आणि आरोग्यदायीही नसतात.

आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स

आयुर्वेद काय सांगते

आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे की, एकदा मळलेली कणीक दुसऱ्यांदा वापरणं तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. एकवेळ तुम्ही शिळ्या पोळ्या खाल्ल्या तरी चालेल पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करून नये. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकतं.

Instagram

वेदशास्त्र काय सांगतं

शास्त्रांनुसार, शिळ्या कणकेपासून बनवलेल्या पोळ्यांना ‘भूत भोजन’ असं म्हटलं जातं. असं म्हणतात की, हे जेवण जेवणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य नेहमी रोग आणि समस्यांनी घेरलेलं असतं. तसंच शिळ्या कणकेच्या पोळ्यांचा समावेश जेवणात असल्यास लोक आळशी किंवा रागीट होतात.

आरोग्यासाठी नुकसानदायक

वरील सर्व कारणांसोबतच शिळ्या कणीकेच्या पोळ्या खाल्ल्यामुळे गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठ यासारख्या आजारांनी तुमचं शरीर ग्रस्त होईल. त्यामुळे तुमच्या आणि घरातील सदस्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आजपासूनच फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करणं बंद करा.

लक्षात कोणताही पदार्थ ताजा आणि बनवल्या बनवल्या खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्व तुम्हाला फायदेशीर ठरतात. पण फ्रिजमध्ये ठेवून किंवा शिळं खाल्ल्यास त्यातील आरोग्यदायी घटकांचा नाश होतो. त्यामुळे ते शरीराला अपायकारक ठरतात. म्हणूनच जेवण आणि इतर खाद्यपदार्थ ताजे असतानाच त्यांचा आस्वाद घ्या. 

हेही वाचा –

VastuTips: तुमच्या किचनमधील हे वास्तूदोष आजच दूर करा

जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या ’20’ किचन ट्रीक्स आणि टीप्स नक्कीच उपयोगी पडतील 

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ