लग्नाला जायचं म्हटलं की, अगदी साडीपासून ते कानातल्यांपर्यंत सगळं परफेक्ट असलं पाहिजेच. कारण नुसती साडी, मेकअप आणि हेअरस्टाईलच चांगली असून उपयोग नाहीतर कानातलेही तितकेच छान हवेत. यासाठीच या लेखात POPxoMarathi ने शेअर केले आहेत खास लग्नाला घालता येतील, असे हँगिग किंवा स्टेटमेंट इअरिंग्ज्सचे डिझाईन्स. तुम्हालाही नक्कीच आवडतील या वेगवेगळ्या आणि सुंदर कानातले डिझाईन नवीन ज्यामध्ये आहेत, अगदी पारंपारिक महाराष्ट्रीयन कानातल्यांपासून चांदबाली आणि शँडलिअर कानातले. मग पाहा हे सुंदर कानातले (Earring Designs For Wedding In Marathi).
Table of Contents
- कानातले झुमके डिझाईन लाल सोनेरी कुंदन ड्रॉप
- कानातले डिझाईन नवीन ईअर कफ
- गोल्ड प्लेटेड पारंपारिक कानातले डिझाईन
- गोल्ड प्लेटेड झिंक फिनिश मोर कानातले झुमके
- गोल्ड टोन पीकॉक मोती झुमर कानातले डिझाईन
- टेंपल डिझाईन कानातले झुमके
- गोल्ड टोन्ड कंटेपररी कानातले झुमके
- गोल्ड प्लेटेड कुंदन आणि पर्ल्स कानातले झुमके
- गोल्ड प्लेटेड हँडक्राफ्टेड कानातले डिझाईन नवीन
- गोल्ड टोन्ड आणि व्हाईट गोल्ड प्लेटेड कानातले झुमके
- गोल्ड टोन ट्रॅडिशनल कुंदन कानातले डिझाईन
- कानातले डिझाईन नवीन टॉप्स
कानातले झुमके डिझाईन लाल सोनेरी कुंदन ड्रॉप
रेड वाईन रंगातले हे कानातले आहेत ईमली स्ट्रीटने डिझाईन केलेले. ज्यावर मिक्स मेटलवर कुंदन स्टोन्स, व्हाईट पर्ल चेन आणि रेड वाईन स्टोनस आहेत. तुम्ही एखाद्या जवळच्या नातेवाईकांच्या किंवा मित्रमैत्रिणीच्या लग्नाला जाताना हे फेस्टिव्ह लुक कानातले घालू शकता. या रंगाचे कानातले कोणत्याही साडी किंवा कुर्तीवर अगदी छान पेअर होतील.
कानातले डिझाईन नवीन ईअर कफ
संपूर्ण कानाला झाकून त्यांची सुंदरता वाढवणारे हे पारंपारिक आणि मराठमोळे कानातले आहेत. सोनचाफाचे हे ईअर कफ तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हवे. तुम्ही जर लग्नासाठी टिपीकल महाराष्ट्रीयन नऊवारी नेसणार असाल तर हे कानातले त्यावर नक्कीच उठून दिसतील आणि तुमचा लुक परिपूर्ण करतील. गुलाबी, हिरव्या, पांढऱ्या रंगाच्या स्टोन आणि मोतीचं यावर वर्क करण्यात आलं आहे. या ईअर कफला खास अँटीक गोल्डन पॉलिश्ड कॉपरचे हे कानातले आहेत. यामध्ये अजूनही व्हरायटी मिळते. जसं डायमंड्स किंवा पूर्ण गोल्डमधले ईअर कफ्स.
गोल्ड प्लेटेड पारंपारिक कानातले डिझाईन
या कानातल्यांची फॅशन खरंतर बाहुबली चित्रपटापासून आली. देवसेना या बाहुबली चित्रपटातील नायिकेने हे कानातले घातल्याचे दिसलं तेव्हापासून हे डिझाईन ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये आता बरेच प्रकार आले आहेत. हे कानातले घातल्यावर फारच सुंदर दिसतात. त्यामुळे बऱ्याच महिन्यांपासून ही स्टाईल ट्रेंडिंगच आहे. केस मोकळे असो वा अंबाडा बांधलेला असो कोणत्याही हेअरस्टाईलवर हे कानातले छान दिसतात.
वाचा – लग्नसमारंभात किंवा खास कार्यक्रमांसाठी घरीच करा अशी ‘अंबाडा’ हेअरस्टाईल
गोल्ड प्लेटेड झिंक फिनिश मोर कानातले झुमके
मोरांचं डिझाईन असलेल्या या झुमकीही फारच ट्रेंडमध्ये आहेत. खालील डिझाईनमध्ये गोल्ड प्लेटेड झिंक फिनिश झुमकी आहेत. पण यामध्ये तुम्हाला मल्टीकलर मोर झुमकीही बाजारात मिळतील. जर तुम्हाला हँगिंग कानातले आवडत असतील तर असं डिझाईन तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये असलंच पाहिजे. कोणत्याही साडीवर हे कानातले छानच दिसतात.
गोल्ड टोन पीकॉक मोती झुमर कानातले डिझाईन
तुम्हाला वरील मोराचे कानातले आवडले नसतील आणि अजून वेगळं डिझाईन हवं असल्यास हे कानातले बेस्ट आहेत. कारण यात फक्त मोराचंच डिझाईन नाहीतर झुमर लुकसुद्धा आहे. असे झुमर कानातले कोणत्याही साडीवर, कुर्त्यावर किंवा अगदी ट्रेडिशनल वनपीसवरही छान दिसतील. या कानातल्यांमध्ये पर्ल्सही आहेत आणि अँटीक लुकसुद्धा आहे.
टेंपल डिझाईन कानातले झुमके
तुम्हाला जर पारंपारिकच कानातले आणि त्यातही झुमके घालायचे असतील तर सोनचाफाच्या वेबसाईटवरील झुमके अगदी सुंदर आहेत. नेहमीच्या झुमक्याच्या डिझाईनपेक्षा हे झुमके वेगळे आहेत. हे आहेत खास पेशवाई कलेक्शनमधील झुमके. जास्त लांब कानातले न आवडणाऱ्यांसाठीही हे डिझाईन अगदी छान आहे. यावरील बारीक काम कोणत्याही सिल्क साडीवर सुंदर पेअर अप होईल. तांब्यावर गोल्ड प्लेटेड असलेले हे झुमके असून याला खाली मोत्याचे डूलही आहेत.
गोल्ड टोन्ड कंटेपररी कानातले झुमके
जर तुम्ही मॉर्डन झुमकी डिझाईनच्या शोधात असाल तर वरील डिझाईनपेक्षा वेगळे असलेलं कंटेपररी झुमका डिझाईन आहे. हे झुमकेही गोल्ड प्लेटेड असून त्यावर आर्टिफिशियल स्टोन्स आणि बीड्सचं काम करण्यात आलं आहे. तसंच खाली मोतीसुद्धा आहेत. हे कानातले तुमच्या ट्रेडीशनल कुर्ती किंवा थोड्या ट्रेंडी साडीवर अगदी उठून दिसतील.
गोल्ड प्लेटेड कुंदन आणि पर्ल्स कानातले झुमके
लग्नसराईत कुंदनला पर्याय नाही. झुमक्यांमधील हे अजून एक सुंदर डिझाईन आहे. ज्यामध्ये एक नाहीतर पाच छोटेछोटे झुमके आहेत. झवेरी पर्ल्सने डिझाईन केलेले हे झुमके दिसायला तर रिच आहेतच पण किंमतही अगदी बजेट फ्रेंडली आहे. तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर जरी हे कानातले महाग वाटले तरी तुमच्या बजेटमध्ये हे नक्कीच बसतील. मग तुम्हालाही कुंदन ज्वेलरी आणि झुमके आवडत असल्यास हे कानातले नक्की घ्या.
गोल्ड प्लेटेड हँडक्राफ्टेड कानातले डिझाईन नवीन
तुम्हाला लांब कानातले आवडत असतील तर हे कानातल्यांचं डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. ग्लोड प्लेटेड आणि हँडक्राफ्टेड डोम शेप्ड हे कानातले असून त्यावर स्टोन्स आणि बीड्सच काम केलं आहे. याच मटेरियल ब्रास असून ते गोल्ड प्लेटेड आहेत. या कानातल्यांचा डोम शेप अगदीच हटके आहे. तुम्ही लग्नात हे कानातले घातल्यास चारजणांचं तुमच्याकडे नक्कीच लक्ष जाईल.
गोल्ड टोन्ड आणि व्हाईट गोल्ड प्लेटेड कानातले झुमके
जर तुम्हाला डोम शेपमध्येच पण जास्त लांब कानातले नको असतील तर हे कानातले पाहा. हे डोम आकारातही आहेत आणि लांबीलाही जास्त मोठे नाहीत. हे कानातले कॉपरचे असून त्यावर कुंदन वर्क आणि गोल्ड प्लेटींग करण्यात आलं आहे. दिसायला लहान असले तरी हे थोडे महाग आहेत. पण हे कानातले झुमके घातल्यावर तुमचा वेडिंग लुक नक्कीच क्लासी दिसेल.
गोल्ड टोन ट्रॅडिशनल कुंदन कानातले डिझाईन
स्टेटमेंट ज्वेलरी हा प्रकार तुम्हाला आवडत असेल तर हे कानातले तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. कोणत्याही साडीवर किंवा अगदी वनपीसवरही तुम्ही हे कानातले घालू शकता. ते नक्कीच लक्ष वेधून घेतील. या कानातल्यावर कुंदन वर्क करण्यात आलं आहे. तसंच हे कानातले डिझाईन नवीन असून किमतीच्या मानाने फारच बजेट फ्रेंडली आहेत.
कानातले डिझाईन नवीन टॉप्स
जर तुम्हाला वरील मोरांचे झुमके आवडले असतील पण टॉप्सच्या प्रकारात हवे असल्यास हे डिझाईन पाहा. हे मोराचे कानातले टॉप्स पॅटर्नमध्ये आहेत. या कानातल्यांना मॅट-गोल्ड फिनीश देण्यात आला आहे. तसंच यावर केम्प स्टोन आणि पर्ल बीड्स वर्क आहे. हे कानातले डिझाईन खूपच नाजूक पण सुंदर आहेत.
तुम्हालाही आवडले का वरील कानातल्यांची डिझाईन. मग लग्नाला जाताना तुम्हीही नक्की असे सुंदर कानातले नक्की घाला आणि लग्नाचा लुक पूर्ण करा.
हेही वाचा –
मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी
Read More From Wedding Accessories
बहिणीच्या लग्नासाठी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात
Trupti Paradkar
लग्नात सुंदर दिसण्यासाठी वाढतोय कलर्ड लेन्सचा ट्रेंड
Aaditi Datar