DIY सौंदर्य

नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका, सोपे घरगुती उपाय

Dipali Naphade  |  Jul 8, 2020
नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका, सोपे घरगुती उपाय

एखाद्या  विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. पण या सुरकुत्यांपासून (wrinkles) सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला घरगुती उपाय करता येतात. सुरकुत्या येणे हा अर्थातच वाढत्या वयाचा संकेत आहे. पण आजकाल इतकं तणावग्रस्त आयुष्य असतं, त्यात सतत प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. तुम्हाला जर सुरकुत्यांपासून सुटका हवी असेल तर सर्वात महत्त्वाचं आपली लाईफस्टाईल बदलणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच तणाव, प्रदूषण आणि केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांपासून वाचण्याचा प्रयत्न  करायला हवा. आम्ही तुम्हाला इथे काही सोपे घरगुती उपाय देत आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही नुकसानशिवाय सुरकुत्या घालवण्यासाठी वापर करू शकतो.  

सुरकुत्या घालविण्यासाठी घरगुती उपाय

सुरकुत्या घालविण्यासाठी तुम्ही घरातील वस्तू वापरूनच उपाय करू शकता. त्यासाठी खर्चिक सलॉनमध्ये जाऊन वेगवेगळे उपचार घेण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःसाठी घरी थोडा वेळ काढून हे उपाय करता येतात. 

मका – ज्वारीचे पीठ आणि मलई

Shutterstock

मका आणि ज्वारीचे पीठ आणि मलई घेऊन एकत्र नीट मिक्स करा. सुकल्यानंतर तुम्ही व्यवस्थित चेहरा धुऊन घ्या. ज्वारीचे पीठ तुमच्या चेहऱ्यावरील डेड सेल्स काढून टाकण्यास मदत करतात. तर मक्याचे पीठ हे चेहरा अधिक कसदार करण्यास मदत करतात. मलई त्वचेमध्ये मुलायमपणा अर्थात मॉईस्चराईजर आणते. त्यामुळे तुम्ही या तिन्ही वस्तूंचे मिश्रण वापरल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

ओठांजवळ आलेल्या सुरकुत्या 5 मिनिटात करा कमी, वाचा कसे

बेसन, हळद आणि ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

1 चमचा बेसन, अगदी चुटकीभर हळद, 5-6 थेंब ऑलिव्ह ऑईल एकत्र करून नीट मिक्स करून घ्या. साधारण 20 मिनिट्सनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तोपर्यंत हे मिश्रण चेहऱ्यावर सुकते. सुरकुत्यांपासून सुटका मिळविण्यासाठी हा अतिशय सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. यामुळे चेहऱ्यालाही कोणतेही नुकसान पोहचत नाही. 

वाचा – आमचूर पावडरचा वापर आणि फायदे

दही आणि उडीद डाळ

Shutterstock

एक चमचा दही घ्या आणि त्यामध्ये उडीद डाळीची पावडर घालून मिक्स करा. याची बनलेली पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. पेस्ट सुकल्यावर पाण्याचे हबके मारा आणि त्यानंतर ओल्या फडक्याने अथवा कापसाने तुमचा चेहरा पुसून घ्या. अजिबात पाण्याने खसाखसा घासून चेहरा धुऊ नका. तुम्हाला सुरकुत्या घालवायच्या असतील हा नक्कीच एक परिणामकारक घरगुती उपाय आहे. 

कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

अंडी, टॉमेटो आणि लिंबू

Shutterstock

अंड्याचा आतील भाग काढून घ्या. त्याच्या भागाइतकाच टॉमेटो आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा. सुरकुत्यांपासून सुटका मिळविण्यासाठी हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की वापरून बघा. अंड्यातील पोषणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जातात आणि चेहऱ्याला अधिक चांगला कसाव येतो. तसंच लिंबामुळे चेहरा अधिक तजेलदार दिसतो.

वाचा – रोज दोन अंडी खाण्याचे फायदे अनेक आहेत

मिल्क पावडर, अंडे आणि मध

Shutterstock

एक चमचा स्किम्ड मिल्क पावडर (चेहऱ्याकरिता मिल्क पावडरचे फायदे अधिक असतात) घेऊन त्यात अंड्याचा पांढरा भाग आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. याची  पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण 15 मिनिट्स तसेच चेहऱ्यावर ठेवा. सुकू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा प्रयोग तुम्ही नियमित केल्यास, सुरकुत्या निघून जातात आणि त्वचेच्या रंगातही फरक पडतो. तसंच त्वचा अधिक उजळते आणि तकाकी येते. 

वयस्कर दिसत असाल, तर सोडा ‘या’ सवयी

टॉमेटो, संत्रे आणि पपई

Shutterstock

1 टॉमेटो आणि, अर्धी पपई, 1 संत्र्याचा गुदा (आतील भाग) घेऊन त्यात 1-1 चमचा गुलाबपाणी आणि ग्लिसरीन मिसळा. ही पेस्ट करून घ्या आणि 20 मिनिट्स चेहऱ्याला लावा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमचा चेहरा अधिक तजेलदार दिसेल आणि तुमची त्वचाही उजळेल. तसंच सुरकुत्या नाहीशा होऊन तुम्ही अधिक तरूण दिसाल. 

Read More From DIY सौंदर्य