तुम्ही जर स्वयंपाकघरामध्ये तयार झालेल्या रोजच्या नाश्त्याला कंटाळले असाल तर आणि तुम्हाला वेगळा काहीतरी नाश्ता सकाळी हवा असेल तर काही महाराष्ट्रीय पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत. काही पदार्थ हे बनवायला सोपे असतात आणि चवीलादेखील अप्रतिम असतात. तसंच तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये असे महाराष्ट्रीय तीन झटपट पदार्थ बनवणे सोपे होईल. याचा खास रेसिपी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्हीही नेहमीच्या पदार्थांपेक्षा हे तीन सोपे आणि चविष्ट पदार्थ करून पाहा.
फराळी थालीपिठ
थालीपिठासाठी लागणारे साहित्य
- पाव किलो उकडलेली रताळी
- 200 ग्रॅम उकडलेले बटाटे
- 150 ग्रॅम भिजलेले साबुदाणे
- शेंगदाणे
- 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या
- आल्याची पेस्ट
- दही
- स्वादानुसार मीठ
- काळी मिरी पावडर
- साखर स्वादानुसार
- लिंबाचा रस एक चमचा
वापरण्याची पद्धत
- एक मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले रताळे आणि बटाटे घेऊन मॅश करा. मॅश केलेल्या या सारणात साबुदाणे मिक्स करा
- त्यानंतर त्यामध्ये मीठ, काळी मिरी पावडर, साखर, दही, शेंगदाणे आणि लिंबाचा रस मिक्स करा
सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याची चव पाहून त्यामध्ये मीठ अथवा साखर अजून लागणार का हे पाहून घ्या - त्याचे गोळे करा आणि मग तेल अथवा तूप लाऊन थालिपीठ थापा
- तव्यावर तूप अथवा तेल घालून (तुम्हाला आवडत असल्यास, बटर लावा) त्यावर थालिपीठ भाजा
- दोन्ही बाजूने कुरकुरीत झाल्यावर हिरवी चटणी अथवा शेंगदाण्याच्या चटणीसह खायला द्या
उरलेल्या पोळ्यांपासून बनवा कुरकुरीत कटलेट्स, 15 मिनिट्समध्ये चविष्ट नाश्ता
ज्वारीचे धिरडे
धिरड्यासाठी लागणारे साहित्य
- एक कप ज्वारीचे पीठ
- 2 चमचे बेसन
- पाव कप हळदी पावडर
- अर्धा चमचा मिरची पावडर
- 1 कापलेला कांदा
- अर्धा कप किसलेले गाजर
- दोन चमचे कापलेली कोथिंबीर
- स्वादानुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
- गरजेनुसार पाणी
वापरण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये सर्व सुके पदार्थ घाला आणि मिक्स करून घ्या. गुठळ्या होणार नाहीत असे पाणी घालून त्याचे मिश्रण करा
- एका पॅनमध्ये किंवा तव्यावर तेल घाला आणि मग त्यावर हे बॅटर घाला आणि पसरवून ते शिजवा
- हे धिरडे तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटा आणि शिजू द्या
- दोन्ही बाजूंनी शेकल्यानंतर दह्यासह अथवा चटणीसह खायला द्या. सॉसबरोबरही तुम्ही खाऊ शकता
कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता
दडपे पोहे
दडपे पोह्यासाठी लागणारे साहित्य
- पातळ पोहे
- बारीक कापलेला कांदा
- खरवडेले ओले खोबरे
- एक चमचा लिंबाचा रस
- स्वादानुसार साखर
- स्वादानुसार मीठ
- मोहरी
- जिरे
- हिंग
- कापलेली हिरवी मिरची
- कडिपत्ता
- कोथिंबीर
वापरण्याची पद्धत
- एका मोठ्या भांड्यात कांदा, खोबरे, लिंबाचा रस, मीठ आणि साखर सर्व एकत्र करून घ्या
- तयार साहित्य पोह्यावर घाला आणि मिक्स करा
- पोहे नरम होणार नाहीत याची काळजी घ्या
- एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, मिरच्या आणि कडिपत्ता टाकून फोडणी तयार करा
- ही फोडणी वरून पोह्यांवर घाला आणि नीट मिक्स करा आणि वरून कोथिंबीर पसरा आणि ओलं खोबरं घाला आणि खायला द्या
अत्यंत कमी वेळात या तीनही महाराष्ट्रीय डिश तयार होतात. त्यामुळे नक्की तुम्ही नाश्त्याला या चविष्ट पदार्थांचा स्वाद घ्या.
सकाळच्या नाश्त्याला निवडा तांदळाच्या उकडीचा झटपट पर्याय
मग महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा शेअर करताना आपल्या जवळच्यांना या झटपट होणाऱ्या महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट डिशेसची मेजवानीही द्या.