आपलं जग

(50+ Easy) घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Based Business For Ladies In Marathi

Trupti Paradkar  |  Jun 17, 2022
(50+ Easy) घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Based Business For Ladies In Marathi

महिलांना नेहमीच घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करावं लागतं. मुळातच हुशार आणि नियोजनात परफेक्ट असल्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय महिला कोणत्याही गोष्टीत परफेक्ट असताच. पण असं असलं तरी त्यांना कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी दूर सारता येत नाही. लग्नानंतर अथवा मुल झाल्यावर नोकरी अथवा पूर्णवेळ व्यवसाय करण्यावर अनेक बंधने येतात. कामाची वेळ आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे महिलांसाठी नेहमीच तारेवरची कसरत असते. अशा वेळी पूर्णवेळ नोकरी अथवा व्यवसाय करण्यापेक्षा महिलांसाठी एखादा घरगुती व्यवसाय सुरु करणं जास्त सोयीचं असतं. कारण घरगुती व्यवसासाठी महिला सहज वेळेचं व्यवस्थापन करू शकतात. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करण्याऱ्या महिलांसाठी गहउद्योग हा बेस्ट पर्याय असतो. म्हणूनच आम्ही अशा सर्व महिलांसाठी खास महिला गृह उद्योग यादी | List Of Home Based Business Ideas For Ladies In Marathi शेअर करत आहोत. महिलांच्या डोक्यात अनेक युनिक आणि भन्नाट कल्पना असतात, काम करण्याची हटके दृष्टी असते, विविध प्रकारची कौशल्य आणि योग्य नियोजन करण्याची क्षमता असते. या सर्व गोष्टी एकत्र आल्या तर त्या कोणतेही घरी करता येणारे उद्योग यशस्वीपणे करू शकतात. घरातच उद्योग सुरू करून त्यात यश मिळवण्यासाठी निवडा आम्ही शेअर केलेले हे काही महिलांसाठी गृहउद्योग तसंच वाचा  घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी कल्पना काही सहज सोप्या (Home Business Ideas in Marathi), घरगुती पॅकिंग व्यवसाय । Gharguti Packing Vyavsay Marathi

महिला गृह उद्योग यादी | List Of Home-Based Business Ideas For Ladies In Marathi

  1. घरगुती शिकवणी  (Home Tutor)
  2. डे केअर सेंटर  (Day Care Service)
  3. ब्युटी केअर सेंटर (Beauty Care Center)
  4. घरगुती बेकरी (Start Bakery From Home)
  5. ट्रॅव्हल एजंट (Travel Agent)
  6. योगा ट्रेनर (Yoga Trainer)
  7. करिअर समुपदेशक (Career Counselor)
  8. कंटेट रायटर (Content Writer)
  9. इमेज कन्सल्टंट (Image Consultant)
  10. लाइफ कोच (Life Coach)
  11. टिफिन सर्व्हिस (Tiffin Service)
  12. फॅशन डिझाइनिंग (Fashion Designing)
  13. फोटोग्राफी (Photography) 
  14. छंद क्लास (Hobby Classes) 
  15. इंटेरिअर डिझाइनर ( Interior Designer) 
  16. पाळीव प्राणी पाळणाघर (Pet Sitter)
  17. स्टॉक ट्रेडिंग (Stock Trading)
  18. सोशल मीडिया इन्फ्लुंएन्सर (Social Media Influencer)
  19. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस (Digital Marketing Services)
  20. फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer)
  21. विवाह नियोजन (Wedding planning)
  22. डेटा एन्ट्री (Data entry)
  23. ग्राफिक्स डिझायनर (Graphic design)

महिलांसाठी कलात्मक घरगुती व्यवसाय | Creativity Based Business Ideas For Ladies In Marathi

आजकाल महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी बऱ्याचदा व्यवसाय निवडताना त्यांची द्विधा मनःस्थिती होऊ शकते. यासाठी कला क्षेत्राशी निगडीत महिलांसाठी आम्ही काही कलात्मक घरगुती व्यवसाय सूचवत आहोत.

शिवणकाम उत्तम घरगुती व्यवसाय महिलांसाठी

शिवणकाम ही एक कला आहे. पूर्वी महिला घरीच शिवणकाम करायच्या त्यामुळे घरातील मुली आणि महिलांना शिवणकाम करण्याचं ज्ञान असायचं. मात्र आजकाल शिवणकाम हे फक्त घरातील लोकांचे कपडे शिवणं अथवा फाटलेले कपडे दुरूस्त करणं इतकं मर्यादित नाही. शिवणकामातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं. यात बेसिक आणि एडवान्स असे अनेक कोर्सेस असतात. जर तुम्हाला शिवणकामात रस असेल तर तुम्ही शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकता. महिलांसाठी खास ब्लाऊज, ड्रेसेस, बाळाचे कपडे, पुरूषांचे कपडे अशा विविध कॅटगरीमध्ये तुम्ही स्वतःचा टेलरिंगचा बिझनेस सुरू करू शकता. काही फॅब्रिक कंपन्याही तुमच्या व्यवसायाशी जोडल्या जाऊ शकतात. एवढंच नाही तर इतरांना शिवणकाम शिकवण्याचा क्लासही तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता. त्यामुळे शिवणकाम हा महिलांसाठी उत्तम असा घरी करण्यासारखा व्यवसाय आहे.

मेणबत्ती बनवण्याचा महिलांसाठी घरगुती व्यवसाय 

आजही भारतात काही ठिकाणी वीजेची कमतरता आहे, लोडशेडिंग केलं जातं. अशा ठिकाणी मेणबत्तीची गरज नियमित लागते. दिवाळी अथवा एखाद्या खास प्रसंगी शहरात मोठ्या प्रमाणावर रोशनाई केली जाते. घरात मनमोहक आणि सुंगधित मेणबत्तीने सजावट केली जाते. वाढदिवसाच्या केकसाठी वयानुसार अथवा खास डिझाइनच्या मेणबत्त्या विकल्या जातात. मेणबत्तीला विशेष मागणी असल्यामुळे मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायदेखील खूप फायदा मिळवून देणारा आहे. यासाठी आजकाल अनेक महिला लघुउद्योग प्रशिक्षण केंद्रात याचे मार्गदर्शन केले जाते. शिवाय यासाठी लागणारा कच्चा माल फार महागडा नसतो. मेण, विक्स, कृत्रिम रंग, प्रॉडक्शन मशीन अशा मर्यादित गोष्टींसह आणि कमी भांडवलात महिला घरच्या घरी मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय करू शकता. कलात्मक व्यवसाय असल्यामुळे तुमच्या कौशल्यानुसार तुम्ही तुमच्या उत्पादनाची स्वतंत्र ओळख बाजारात करू शकता. 

अगरबत्ती बनवण्याचा महिला गृहउद्योग

घरात धार्मिक विधींसाठी अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. सहाजिकच भारतात सणसमारंभ आणि पूजाविधींसाठी अगरबत्तीची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. दररोज लागणारी गोष्ट असल्याने तुम्ही अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी महिलांनी अगरबत्ती बनवण्याच्या कार्यशाळेत सहभागी व्हावे आणि त्याचे रितसर प्रशिक्षण घ्यावे. अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतो ज्यामुळे महिलांसाठी घरच्या घरी करण्यासाठी हा व्यवसाय उत्तम आहे. कमी भांडवलासह चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी महिलांनी घरीच अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मात्र यासाठी तुम्ही योग्य कौशल्य, गुणवत्ता आणि ब्रॅंडिंगवर भर द्यावा. ज्यामुळे तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि मार्केटमध्ये तुमच्या उत्पादनाची मागणी वाढेल.

मेहंदी काढणे हा व्यवसाय करा घरच्या घरी

मेंहदी काढणे ही एक कला आहे. घरात सणसमारंभ, कार्यक्रम, लग्नसोहळ्यात मेंहदी काढली जाते. त्यामुळे अनेक महिलांना मेंहदी काढण्याचा सराव असतो. जर तुमच्याकडे मेंहदी काढण्याचे कौशल्य असेल तर त्याचा वापर तुम्ही व्यवसायासाठी करू शकता. लग्नकार्यात अथवा कार्यक्रमांसाठी मेंदी काढणे, मेंहदीचे कोन करून विकणे, मेंहदी शिकवण्याचे क्लासेस घेणे असे विविध व्यवसाय तुम्ही या कलेतून करू शकता. जर तुमच्याकडे मेंहदी काढण्याचे ज्ञान नसेल तर तुम्ही आधी याचे रितसर प्रशिक्षण घ्यावे आणि मगच महिलांना घरी हा व्यवसाय सुरू करावा. शिवाय मेंहदीचे ट्रेंड हे नेहमी बदलत असतात. त्यामुळे ग्राहकांना काय आवडते त्यानुसार तुमच्या व्यवसायात बदल करावे. ज्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो. शिवाय या व्यवसायासाठी तुम्हाला मेंदीच्या कोन शिवाय कोणतेही भांडवल लागणार नाही.

ज्वेलरी मेकिंगने महिलांनी सुरू करा गृहउद्योग

दागिने हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सणसमारंभ असो वा एखादा खास कार्यक्रम महिलांना दागिने घालण्याची हौस असते. महिला दररोजही काही दागिने नियमित वापरतात. जर तुमच्याजवळ कलाकुसर करण्याचे ज्ञान असेल तर तुम्ही दागिन्यांचा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता. आजकाल ज्वेलरी मेंकिंगचे क्लासेस घेतले जातात. कमीत कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. दागिने बनवण्याचे रितसर प्रशिक्षण घेतल्यास या व्यवसायात तुम्हाला चांगली गती मिळू शकते. आजकाल इमिटेशन ज्वेलरीचा जमाना आहे. त्यामुळे या प्रकारातील ट्रेंडमध्ये असलेले दागिने बनवण्याचे कौशल्य आत्मसात करा. ज्यामुळे महिलांना घरच्या घरी या व्यवसायात वेगाने प्रगती करता येईल.

महिलांसाठी ऑनलाईन केले जाणारे घरगुती व्यवसाय | Online WFH Business Ideas For Ladies In Marathi

आजकालचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील तीन वर्षांपासून संपूर्ण जग ऑनलाईन व्यवहार करण्यात पुढे सरसावलं आहे. ऑनलाईन व्यवसायांसाठी कोणतेही भांडवल लागत नाही. यासाठी जाणून घ्या असे कोणते व्यवसाय आहेत, जे तुम्ही ऑनलाईन करू शकता.

वेब डिझायनिंग शिकून महिला गृह उद्योग करू शकतात

महिलांसाठी वेब डिझायनिंग हा उत्तम घरगुती व्यवसाय आहे. अनेक लोकांना आजकाल खरेदी विक्री ऑनलाईन पद्धतीने करणं सुरक्षित वाटतं. सहाजिकच विक्रेत्यांना ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी वेबसाईटचा आधार घ्यावा लागतो. ज्यामुळे अनेक उद्योजकांनी स्वतःची वेबसाईट सुरू केलेली असते. सेवा, खरेदी विक्री अशा कोणत्याही व्यवहारासाठी ग्राहक वेबसाईटवर संपर्क साधू शकतात. यासाठी वेब साइट चा व्यवसाय म्हणजेच वेबसाईट तयार करणे आणि तिची देखभाल करण्यासाठी लोकांना वेब डिझायनर नेमावे लागतात. वेबसाईट तयार करण्यासाठी लागणारे ग्राफिक्स, कंटेट, कोडिंग असे विविध प्रकारचे काम वेबसाईट तयार करण्याच्या व्यवसायामध्ये करावे लागते. या व्यवसायासाठी ऑफिसची गरज नसते. घरी राहून तुम्ही वेबसाईट तयार करणे अथवा वेब डिझायनिंगचे काम करू शकता. 

युट्यूबर बनून महिला घरगुती उद्योग करू शकतात

युट्यूबर (YouTube) होणं हा एक महत्त्वाचा व्यवसाय आजकालच्या काळात तेजीने सुरू आहे. जर तुमच्याजवळ एखाद्या गोष्टीचे ज्ञान असेल आणि ते लोकांसमोर मांडण्याची हातोटी असेल तर कोणतीही महिला घरच्या घरी युट्यूबर होऊ शकते. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर तुमचे युट्यूब चॅनल सुरू करावे लागेल. तुमच्या जीमेल अकाउंटवरून तुम्ही तुमचे युट्यूब चॅनल सुरू करू शकता. तुम्हाला ज्या विषयातील आवड आहे अथवा तुम्ही ज्या विषयावरील व्हिडिओ तयार करणार आहात त्यानुसार तुमच्या चॅनेलला नाव द्या आणि ठराविक वेळेतील आणि सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ त्यावर अपलोड करून युट्यूबर व्हा. जर तुमच्या चॅनेलचे सबस्क्राबर्स वाढले आणि लोकांनी ते लाईक, शेअर केले तर युट्यूब तुम्हाला त्यासाठी काही ठराविक रक्कम देते. मात्र यासाठी तुम्हाला सातत्याने तुमच्या चॅनेलवर लोकांना आवडेल असा कंटेट क्रिएट करून अपलोड करावा लागेल. शिवाय तुमचं चॅनेल चांगलं चालू लागल्यावर तुम्हाला जाहिरात मिळू लागतील. ज्यामुळे तुम्हाला जास्तीचे उत्पादन मिळू लागेल.

लेखक बनून महिला घरच्या घरी पैसे कमवू शकतात

लेखक म्हणूनही तुम्ही तुमचा स्वतंत्र घरगुती व्यवसाय सुरू करू शकता. आजकाल लोकांना लेखन क्षेत्रातील फ्रीलान्सर हवे असतात. एखाद्या वेबसाईट, दैनिक, मासिकासाठी महिला लेखक  लेख लिहून त्यातून पैसे कमवू शकतात. स्वतःचे पुस्तक प्रकाशित केल्यास त्यावर तुम्हाला रॉइलिटी मिळू शकते. इतरांच्या पुस्तकांसाठी अनुवादक, प्रूफ रिडर अथवा कंटेट रायटर म्हणून तुम्ही सेवा देवू शकता. मात्र यासाठी तुमचे लेखन कौशल्य सुवाच्च आणि काळानुरूप असायला हवं. तुम्ही यासाठी तुमच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार स्वतःचे सोशल मीडियावर प्रोफाईल तयार करू शकता. ज्यामुळे तुमच्याकडून लेखन सेवा प्राप्त करून घेण्यासाठी इतर लोक तुमच्याशी संपर्क साधू शकतात.  महिलांना लेखनाचा व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातूनही हा व्यवसाय सहज करू शकता. 

महिलांनी घरच्या घरी विका ऑनलाइन कपडे 

कोरोनामुळे बाजारात अथवा मॉलमध्ये जाऊन कपडे खरेदी करण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. त्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगला जास्त प्राधान्य दिले जात आहे. ज्याचा परिणाम असा झाला की गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांनी ऑनलाईन कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. महिलासांठी हा एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे. कारण यासाठी तुम्हाला दुकानाचे भाडे, कर्मचारी, विजेचं भाडं अशा गोष्टींवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही सोशल मीडियावर लाईव्ह द्वारे अथवा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून तुमचा माल लोकांसमोर आणू शकता. ग्राहक स्क्रीन शॉट घेऊन त्यांना हवी असलेली वस्तू तुम्हाला सांगतात. जी कुरिअर द्वारे तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहचवू शकता. आजकाल महिलांना अशा प्रकारे साडी अथवा कपड्यांचा व्यवसाय सुरू करून फायदा मिळवला आहे. तुम्ही देखील घरातूनच हा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला कपडे विकण्याचे ज्ञान, ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आणि कुरिअर व्यवस्था या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतील

ऑनलाइन बुकिंगचा महिलांसाठी घरगुती व्यवसाय

आजकाल तिकीट असो वा हॉटेल ऑनलाईन बुकिंगची मागणी वाढत आहे. तुमच्याजवळ चांगल्या स्पीडची इंटरनेट सेवा असेल आणि इंटरनेट हाताळ्याचे योग्य ज्ञान असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. लोकांना हव्या असणाऱ्या बुकिंग सेवा तुम्ही त्यांच्यासाठी करून त्या बदल्यात कमिशन मिळवू शकता. ट्रेन, विमान, बस तिकीटचं बुकिंग, हॉटेल बुकिंग, वेकेशनचे प्लॅन, प्रवासाचे नियोजन करून तुम्हाला चांगले उत्पन्न घरबसल्या कमावता येऊ शकते. महिलांसाठी ऑनलाईन बुकिंग हा एक उत्तम घरगुती व्यवसाय असू शकतो.

शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी घरगुती व्यवसाय कल्पना

ज्या महिलांना घरातच राहून घरगुती व्यवसाय (gharguti kam) अथवा (gruh udyog in marathi) सुरू करायचा आहे. पण त्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्यांच्यासाठी बेस्ट आहेत हे (Education Sector Related Home Based Business Ideas) शैक्षणिक लघुउद्योग

बालवाडी शिकवणी महिला घरी सुरु करू शकतात

शाळेत अॅडमिशन घेण्यापूर्वी लहान मुलांना नर्सरी अथवा बालवाडीत प्रवेश दिला जातो. ज्यामुळे मुलांमध्ये हसत खेळत शिक्षण घेण्याची आवड निर्माण होते. बालवाडीत अथवा नर्सरीत मुलं पहिल्यांदाच घरापासून लांब बाहेरील वातावरणात येतात. त्यामुळे मुलांना समाजात वावरण्याची, इतर मुलांशी मैत्री करण्याची, घरापासून काही काळ लांब राहण्याची, अभ्यास करण्याची सवय लावावी लागते. नर्सरी अथवा बालवाडी शिक्षकांना यासाठी खास प्रशिक्षण दिलं जातं. महिलांसाठी बालवाडी प्रशिक्षक होणं खूप सोपी गोष्ट आहे. कारण मुलांना सांभाळण्याचे ज्ञान त्यांच्याकडे उपजत असते. जर तुम्हाला लहान मुलांसोबत कसं वागावं याचं ज्ञान असेल आणि तुम्ही बालवाडी प्रशिक्षण घेतलेलं असेल तर महिला घरी बालवाडी शिकवणी घेऊ शकता.

कोचिंग क्लास महिला घरी सुरु करू शकतात

बालवाडीच नाही जर तुम्ही उत्तम शिक्षक असाल तर तुम्ही घरी राहून पुढील वर्गाच्या शिकवणी अथवा कोचिंग क्लास घेऊ शकता. महिलांसाठी हा देखील एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे. कारण यातून तुम्हाला ज्ञानादानाचे पुण्य आणि पैसे कमावण्याचे साधन घर बसल्या मिळू शकते. आजकाल काही मुलांना घरी येऊन शिकवणारे शिक्षक हवे असतात. ज्यामुळे त्या मुलांवर नीट लक्ष दिले जाते. जर तुम्हाला अशा प्रकारच्या शिकवण्या घ्यायच्या असतील तर तोही पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असतो. शिवाय घरीच तुम्ही तुमचा छोटा कोचिंग क्लास सुरू करू शकता. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार विविध वर्गासाठी, विविध भाषेतील कोचिंग क्लास सुरू करू शकता.  वर्ग वाढू लागल्यास तुम्ही मदतनीस ठेवून तुमच्या क्लासचा विस्तार करू शकता.

संगीत शिकवणी सुंदर असा महिलांसाठी घरगुती व्यवसाय आहे

संगीत ही एक साधना आहे. सहाजिकच संगीत शिकण्यासाठी तज्ञ्ज प्रशिक्षकांची गरज असते. आजकाल मोठमोठे संगीत क्लासेस अथवा विद्यालये उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही संगीतातील कौशल्य हस्तगत केलेलं असेल तर तुम्ही तुमच्या घरीच संगीताची शिकवणी सुरू करू शकता. गायन, वादन अशा संगीतातील विविध कलांमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करण्यासाठी तुमची मदत होऊ शकते. शिवाय या शिकवणीतून तुम्हाला अर्थाजन होऊ शकतं. ज्यातून तुमचा छंद जोपासला जाईलच पण इतरांना ज्ञान वाटून मोठं केल्याचं पुण्यही तुम्हाला मिळेल. म्हणूनच संगीत शिकवणी सुरू करणं महिलांसाठी एक उत्तम गृहउद्योग असू शकतो.

शिवणकाम शिकवणी देऊन महिला गृह उद्योग करू शकतात

शिवणकामाचे ज्ञान तुमच्याजवळ असेल पण तुम्हाला स्वतःचा शिवणकामातील उद्योग सुरु करायचा नसेल तर तुम्ही शिवणकामाचे ज्ञान इतरांना शिकवून त्यांना ज्ञानी करू शकता. ज्ञान इतरांना देणे यासारखे महान कार्य नाही. त्यामुळे महिला स्वतःजवळील शिवणतंत्राचे ज्ञान आणि कौशल्य इतरांना देऊन फीमधून पैसे कमावू शकतात. शिवाय तुम्ही शिकवलेले विद्यार्थि पुढे जाऊन या ज्ञानामुळे स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यामुळे शिवणकाम शिकवणी घेणं हा ही घरबसल्या करण्यासारखा चांगला उद्योग आहे.

योगा टिचर व्हा आणि घरगुती व्यवसाय करा

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्याची किंमत प्रत्येकाला पटली आहे. त्यामुळे आजकाल सर्वजण फिटनेस सांभाळ्यासाठी व्यायाम आणि योगासन प्रकारांचा सराव करत आहेत. जर तुम्ही योगाभ्यासातील तज्ञ्ज असाल तर तुम्ही स्वतःचे योगा क्लासेस घेऊ शकता. योगा टिचर होण्यासाठी आजकाल विविध प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या प्रशिक्षण वर्गातून तुम्ही आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्य यासाठी मिळवू शकता. आजकाल शाळांमध्येही योग टिचरची गरज असते. योगा टिचरसाठी तुम्हाला फक्त सकाळी आणि संध्याकाळी काही तास द्यावे लागतील. शिवाय आजकाल ऑनलाईन क्लासेस घेण्याची पद्धत रूजत आहे. त्यामुळे महिला घरातून  हा व्यवसाय नक्कीच सुरु करू शकतात. यासाठी वाचा योगवरील मराठी पुस्तके

करिअर समुपदेशक – घरगुती व्यवसाय महिलांसाठी

दहावी, बारावी, पदवी मिळाल्यावर नेमकं करिअर कशात करावं याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम केलेलं असेल तर तुमच्याकडे विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्याचे कौशल्य नक्की असू शकते. त्यामुळे एखाद्या मोठ्या पदवीवरून निवृत्त झाल्यावर, लग्न झाल्यावर तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली असेल तर तुम्ही करिअर समुपदेशनाचे काम करू शकता. ज्यामुळे इतरांना करिअरसाठी मदत केल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. रितसर करिअर समुपदेशनाचे काम केल्यास यातून तुम्हाला फी स्वरूपात पैसे देखील मिळतील. करिअर समुपदेशनाचा व्यवसाय महिलांसाठी घरीच करण्यासारखा आहे.

लाइफ कोच – महिला गृह उद्योग

लाइफ कोच होणं हा करिअरचा नवा पर्याय उपलब्ध झालेला आहे. लाइफ कोच हे असे प्रशिक्षित लोक असतात जे इतरांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. वाढती आणि जीवघेणी स्पर्धा आणि बदललेली जीवनशैली यात तग धरून राहण्यासाठी लोकांना लाइफ कोचची गरज असते. एखाद्यामधील कौशल्य आणि सकारात्मक विचार वाढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम लाइफ कोच करतात. इतरांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना यशाच्या शिखरावर नेण्यात या लाइफ कोचता हातखंडा असतो. जर तुम्ही असेच सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांचे असाल तर तुम्ही इतरांसाठी लाइफ कोच होऊ शकता. आजकाल उद्योग, खेळ, अध्यात्म, अर्थकारण, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील लोकांना लाइफ कोचची गरज असते. तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर लोकांचे लाइफ कोच होऊ शकता. महिला आजकाल सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यामुळे लाइफ कोच होणं महिलांसाठी नक्कीच सहज सोपं आहे. यासाठी वाचा 10 बेस्ट प्रेरणादायी पुस्तके(Best Motivational Books To Read In Marathi)

महिलांसाठी सेवा क्षेत्रातील घरगुती व्यवसाय कल्पना | Service Sector Home Based Business Ideas For Ladies In Marathi

तुमच्या जवळ असलेल्या ज्ञान आणि कौशल्याची सेवा पूरवुन तुम्ही सेवा क्षेत्रातील व्यवसायात भरारी घेऊ शकता. यासाठी जाणून घ्या हे महिलांसाठी असलेले काही सेवा क्षेत्रातील घरगुती व्यवसाय


पाळणाघर चालवणे उत्तम महिला गृह उद्योग आहे

घरात पाळणाघर सुरु करून इतरांच्या मुलांची काळजी घेणं हा महिलांसाठी उत्तम व्यवसाय ठरू शकतो. कारण लहान मुल सांभाळण्याचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी लागणारे कौशल्य प्रत्येक महिलेमध्ये जन्मजात असते. आपल्या मुलांप्रमाणे इतरांच्या मुलांना सांभाळलं तर त्यातून लहान मुलांचे प्रेम आणि उत्पन्न दोन्ही मिळू शकते. आजकाल घरात स्त्री आणि पुरूष दोघेही कमावते असतात. नोकरी, व्यवसायानिमित्त महिलांना घराबाहेर पडावे लागते. मुल झाल्यावर करिअर न सोडता काही महिला मुलांना पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घेतात. कारण आजकालच्या काळात सर्वांना नोकरी सोडण्याचा धोका पत्करता येत नाही. अशा गरजू महिलांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली तर पालक आपल्या मुलांच्या संगोपनासाठी चांगली रक्कम देऊ करतात. त्यामुळे घरातच तुम्ही पाळणाघर सुरू करून ही सेवा देऊ शकता.

घरातून विविध वस्तूंची विक्री

एखादी वस्तू विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी आता दुकान सुरु करण्याची मुळीच गरज नाही. कारण कोणताही बिझनेस सध्या घरातून करता येतो. ज्यामुळे तुमचे भांडवलावर लागणारे पैसे वाचतात आणि बिझनेस सुरू करण्याची संधी त्वरित उपलब्ध होते. यासाठी तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात तो तुम्ही घरातून सुरू करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमच्या वस्तू इतरांपर्यंत पोहचवू शकता. त्या त्यांना आवडल्या तर ते ऑनलाईन बुकींग करून तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतात. तुम्ही कुरिअर द्वारे त्या वस्तू इतरांपर्यंत पोहचवू शकता. त्यामुळे महिलांना घरातून व्यवसाय करणं आता सर्वांसाठी खूप सोपं झालं आहे.

ब्युटी पार्लरचा घरगुती व्यवसाय महिलांसाठी

सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रीला नैसर्गिक रित्या वाटत असतं. कारण सौंदर्य ही स्त्रीला निसर्गाकडून मिळालेली देणगीच आहे. याच सौंदर्याची निगा राखण्यासाठी तुम्ही घरी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्हाला सौंदर्याची निगा राखण्याची आवड असेल तर या क्षेत्रातील विविध कोर्सेस करून यातील अधिक कौशल्य तुम्हाला नक्कीच मिळू शकते. ब्युटी पार्लरसाठी दुकान अथवा जागा शोधण्यापेक्षा घरातच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा. पुढे व्यवसाय वाढल्यास तुम्हाला स्वतंत्र जागा या व्यवसायासाठी नक्कीच घेता येईल. मात्र सुरूवात करण्यासाठी ब्युटी पार्लर हा एक चांगला घरगुती व्यवसाय आहे. 

अकाऊंट कीपिंग करून महिला घरगुती व्यवसाय करू शकतात

जर तुम्ही कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलेलं असेल तर तुमच्याजवळ अकाऊंटिंगचे ज्ञान असेल. अनेक लहान उद्योजकांना अकाऊंट सेवा देणारी माणसे हवी असतात. मात्र लहान व्यवसाय असल्यामुळे ते अकाऊंंटटची पूर्णवेळ नोकरी देऊ शकत नाही. अशा लोकांसाठी तुम्ही घरातूनच अकाऊंट कीपिंग सेवा पुरवू शकता. ज्यासाठी तुम्हाला योग्य ते मानधन मिळू शकतं. विशेष म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक उद्योगांसाठी ही सेवा देऊन पैसे कमावण्याचे साधन स्वतःसाठी घरातच निर्माण करू शकता. हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी फायदेशीर आहेच पण त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारा देखील आहे.

विवाहसंस्था चालक 

भारतात विवाह हा एक सोहळा असतो. मात्र लग्नासाठी अनुरूप जोड्या जमवणं वाटतं तितकं सोपं नाही. जर तुम्ही घरीच विवाह जमवणारे कार्यालय सुरू केले तर तुमच्याकडे विविध प्रकारच्या उपवर मुलामुलींचे फोटो आणि माहिती येत. ज्यातून तुम्ही योग्य जोड्या जुळवून लग्न जुळवण्याचे काम घरातून करू शकता. महिलांना माणसं ओळखण्याचे नैसर्गिक ज्ञान असते. त्यामुळे तुम्ही लग्नासाठी उत्तम मॅचिंग करू शकता.  तुम्हाला विवाह जुळल्यानंतर या कामातून चांगले कमिशन मिळू शकते. शिवाय हा व्यवसाय करण्यासाठी महिलांना कोणत्याही भांडवलाची गरज नाही. तुम्ही तुमची दैनंदिन कामे करता करता थोडा वेळ देत हा व्यवसाय घरातून सांभाळू शकता.

इव्हेंट प्लॅनिंग – महिलांसाठी कमी गुंतवणुकीचा घरगुती व्यवसाय

भारतात सणसमारंभ आणि मंगल कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असतात. लग्न, बारसं, मुंज, साखरपुडा, डोहाळजेवण असे कार्यक्रम तर सतत होत असतात. आजकाल अशा कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजर नेमण्याची पद्धत आहे. ज्यामुळे यजमानांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. यासाठी कार्यक्रम नियोजकांना कमिशन दिले जाते. एवढंच नाही तर सामाजिक आणि व्यवयायिक कार्यक्रमांसाठीदेखील इव्हेंट प्लॅनिंगची गरज असते. जर तुमच्याजवळ अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे कौशल्य असेल. तर तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी फक्त यजमानांना भेटणे, त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे नियोजन करणे आणि कार्यक्रम पार पडेपर्यंत जातीने त्यात लक्ष घालणे तुम्हाला करावे लागेल. मात्र हा पूर्णवेळ व्यवसाय नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार यासाठी वेळ काढू शकता. शिवाय यासाठी एखादे कार्यालय न घेता तुम्ही घरातूनच हा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र कार्यक्रमासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लोकांचे संपर्क आणि पुरेशी ओळख तुम्हाला असायला हवी. महिलांसाठी हा गृहउद्योगही खूप फायद्याचा ठरेल.

ब्लॉगर – कमी गुंतवणूक करून सुरू होणार घरगुती व्यवसाय महिलांसाठी

घरच्या घरी करण्यासारखा एक उत्तम घरगुती व्यवसाय म्हणजे ब्लॉग लिहीणे. यासाठी तुम्ही इंटरनेटच्या मदतीने स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकता. ज्यात तुमच्या आवडीच्या विषयावरील सविस्तर माहिती, अनुभव तुम्हाला लिहीता येतील. तुमचा अनुभव आणि माहिती इतरांसाठी उपयोगी ठरू शकते. आजकाल खाद्यसंस्कृती, रेसिपी, अर्थकारण, आरोग्य, सौंदर्य, फॅशन, लाईफस्टाईल, वेडिंग, ट्रॅव्हल अशा विविध विषयावरील ब्लॉग लिहीले जातात. लोकांची तुम्ही लिहीलेल्या लिखाणविषयी मागणी वाढली, तुमच्या ब्लॉगला लाईक्स आणि शेअर्स मिळाले तर तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळवण्याचे साधन निर्माण होऊ शकते. मात्र यासाठी तुम्ही सातत्याने एखाद्या विषयाबद्दल ज्ञान लोकांपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्याजवळ असेल लेखन कौशल्य तर  महिलांनी सुरु करावा स्वतःचा घरच्या घरी व्यवसाय, आणि वाचा जाणून घ्या स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा (How To Start Blog In Marathi)

खाद्यसंस्कृती हा विषय खूप मोठा आणि सखोल आहे. कारण प्रत्येक देशाची, राज्याची, शहराची, गावची एक विशिष्ट खाद्यसंस्कृती असते. तुम्ही विविध खाद्यसंस्कृतीचा अभ्यास केला असेल अथवा तुम्हाला पदार्थ बनवण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याची आवड असेल तर तुम्ही घरातून फूड बिझनेस सुरू करू शकता.

घरगुती लोणचं बनवून महिला गृह उद्योग करू शकतात

लोणचं मुरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. पूर्वीच्या काळी आई, आजी संपूर्ण कुटुंबासाठी वर्षभर टिकेल इतकं लोणचं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवून ठेवत असत. मात्र आजकालच्या धकाधकीच्या काळात लोणचं बनवण्यासाठी वेळ काढणं सर्वांना शक्य होत नाही. ज्यामुळे बाजारात मिळणारं तयार लोणचं विकत आणलं जातं. मात्र तयार लोणच्याला घरच्या लोणच्यासारखी चव नसते. त्यामुळे घरगुती तयार केलेल्या लोणच्याला बाजारात खूप मागणी असते. जर तुमच्याजवळ लोणचं तयार करण्यासाठी लागणारे योग्य ज्ञान आणि पुरेसा वेळ असेल तर महिला घरगुती तयार केलेलं लोणचं विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. 

पापड बनवून महिला गृह उद्योग करू शकतात

पावसाळा सुरू होण्यासाठी पूर्वी घरोघरी पापड बनवले जायचे. मात्र यासाठी पुरेसा वेळ आजकाल प्रत्येकाकडे नाही. त्यामुळे घरी तयार केलेले पापड, कुरड्यांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. तुम्हाला पापड, कुरडया करण्याची आवड आणि वेळ असेल तर तुम्ही घरातून पापडाचा व्यवसाय सुरू करू शकता. घरगुती पापड आणि कुरड्यांना खूप मागणी असल्यामुळे तुमचा व्यवसाय नक्कीच चांगला चालेल. 

शेवया बनवणे – घरगुती व्यवसाय महिलांसाठी

शेवया बनवणे हा एक पारंपरिक खाद्य प्रकार आहे. गावाकडे आजही उन्हाळ्याआधी वर्षभराच्या शेवया तयार केल्या जातात. शेवयांसाठी पीठ मळणे, यंत्रातून शेवया काढणे, शेवया सुकवणे अशी वेळकाढू कामे करावी लागतात. शहरातील लोकांकडे यासाठी वेळ नसल्यामुळे आजकाल विकत शेवया घेण्यावर भर दिला जातो. त्यामुळे घरात शेवया तयार करून विकणे हा महिलांसाठी एक उत्तम गृहउद्योग असू शकतो. महिला बचत गटाच्या मदतीने तुम्हाला लोणचे, पापड अथवा शेवया बनवण्याच्या व्यवसायाला चांगला ग्राहक वर्ग मिळू शकतो.

तूप उत्पादन व्यवसाय

तुम्ही गावाकडील भागात राहत असाल तर गाईम्हशींचे दूध जास्त प्रमाणात उपलब्ध असते. ज्यातून नियमित तूप काढून विकणे हा घर बसल्या व्यवसाय करता येतो. शहरातही कमी प्रमाणात तूप काढून विकण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो. बाजारातील तूपापेक्षा घरात काढलेल्या साजूक तुपाला ग्राहकांकडून जास्त मागणी असते. त्यामुळे कोणतेही भांडवल न वापरता तूप उत्पादन करण्याचा व्यवसाय महिलांना घरातून करता येतो.

घरगुती बेकरीघरगुती व्यवसाय महिलांसाठी

घरी केक, पाव, बिस्किटे बनवणे आणि विकणे हा सध्या एक ट्रेंडिंग घरगुती व्यवसाय बनत चालला आहे. कोरोनाच्या काळात लोकांकडे घरी बसण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यामुळे अनेकांनी केक बनवण्याचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतले. तुम्ही देखील असे घरी केक बनवत असाल तर ते बनवून विकणे हा तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय ठरेल. आजकाल लोकांना त्यांच्या आवडीनुसार केकचे आकार आणि थीम हव्या असतात. घरगुती केक व्यवसायात ते करणे सहज शक्य होते. शिवाय रासायनिक प्रक्रिया न करता घरी तयार केलेल्या केकना आजकाल चांगली मागणी आहे. त्यामुळे महिलांनी हा गृहउद्योग सुरू करण्यास काहीच हरकत नाही.

मिठाई व्यवसाय – घरगुती व्यवसाय महिलांसाठी

भारतात सणसमारंभानां घरी गोडाधोडाचा स्वयंपाक करण्याची पद्धत आहे. मात्र वेळेअभावी घरात गोडधोडाच्या मिठाई करता येत नाहीत. मात्र जर तुमच्याजवळ पुरेसा वेळ असेल तर मागणीनुसार तुम्ही इतरांसाठी घरातून मिठाईचा व्यवसाय सुरू करू शकता. पुरणपोळी, बासुंदी, बर्फी, वड्या, गुलाबजाम, रसगुल्ले, रसमलाई, विविध प्रकारचे लाडू असे पदार्थ घरात बनवून तुम्ही विकू शकता. यासाठी कमी भांडवल लागत असल्याने महिला घरातून हा व्यवसाय सुरू करू शकता.

घरगुती खानावळ अथवा टिफीन सर्व्हिस

कामानिमित्त अनेक घरापासून दूर एखाद्या शहरात राहत असतात. कामाची वेळ सांभाळत अशा लोकांना घरात स्वयंपाक करणं शक्य नसतं. काही विद्यार्थी शिक्षणानिमित्त दूर राहत असतात. अशा लोकांसाठी घरगुती खानावळ अथवा टिफिन सर्व्हिस खूप गरजेची असते. जर तुमच्याजवळ स्वयंपाकाचे कौशल्य असेल तर तुम्ही घरातून अशी खानावळ अथवा टिफिन सर्व्हिस सुरू शकता. कॉलेज अथवा एखाद्या कंपनीमध्ये संपर्क केल्यास तुम्हाला असे अनेक ग्राहक मिळतील ज्यांना अशा खानावळींची गरज असते. महिलांसाठी घरच्या घरी करण्यासाठी हा व्यवसाय अगदी बेस्ट आहे. यासाठी वाचा सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi

कुकिंग क्लासेस

स्वयंपाक करण्यासोबत तो इतरांना शिकवणंही ही एकदेखील एक मोठी कला आहे. कारण जरी तुम्ही सुगरण असला तरी तुम्हाला ती कला इतरांना शिकवता येईलच असं नाही. पण जर तुमच्याजवळ शिकवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही घरीच कुकिंग क्लासेस अथवा स्वयंपाक शिकवणी घेऊ शकता. आजकाल लोकांमध्ये स्वयंपाक शिकण्याची आवड वाढताना दिसत आहे. त्यामुळे तुमच्या कुकिंग क्लासमध्ये नक्कीच गर्दी वाढू शकते. यासाठी घरीच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांनी जरूर विचार करावा.

महिलांसाठी गृहउद्योग आणि निवडक प्रश्न – FAQ 

प्रश्न – कमी भांडवलात महिलांना व्यवसाय सुरू करता येतो का ?

उत्तर – कोणताही व्यवसाय हा छोटा अथवा मोठा नसतो. जर तुमच्याकडे व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरातून अनेक व्यवसाय सुरू शकता ज्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. सेवा क्षेत्रातील व्यवसायांसाठी तर तुम्हाला भांडवल मुळीच लागत नाही.

प्रश्न – महिलांसाठी कोणता घरगुती व्यवसाय बेस्ट आहे ?

उत्तर – आम्ही या लेखात दिलेले सर्व व्यवसाय महिलांसाठी घरातून सुरू करण्यासारखे आहेत. तुमची आवड आणि वेळ यानुसार कोणता व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे हे ठरू शकतं. त्यामुळे तुमच्या आवडीनिवडी आणि कौशल्यानुसार व्यवसायाची निवड करा. 

प्रश्न – एखाद्या महिलेला स्वतःचा गृहउद्योग सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते ?

उत्तर – सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास, कारण जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. एखाद्या महिलेला स्वतःचा गृहउद्योग सुरू करण्यासाठी यासोबत एखाद्या विशिष्ट गोष्टीचे ज्ञान, कौशल्य, घरच्यांचे पाठबळ आणि लोकांची संवाद साधण्याचे कौशल्य असणं गरजेचं आहे. 

Conclusion – घरगुती व्यवसाय महिलांसाठी

उद्योग अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं भांडवल आणि जागा लागेल असं मुळीच नाही. एखाद्या छोट्या घरगुती व्यवसायातूनही तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता. पुढे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जेव्हा तुम्हाला मोठ्या भांडवलाची गरज लागेल तो पर्यंत तुम्ही त्या व्यवसायात नक्कीच जम बसवलेला असेल तेव्हा वाट कसली पाहतात… आत्ताच सुरू करा तुमचा घरबसल्या स्वतःचा व्यवसाय त्यासाठी जाणून घ्या ही महिला गृह उद्योग यादी, घरी करता येणारे उद्योग, स्त्रियांसाठी घरगुती व्यवसाय, बेस्ट घरगुती व्यवसाय महिलांसाठी, महिलांसाठी गृहउद्योग खास तुमच्यासाठी

Read More From आपलं जग