Recipes

गुढीपाडव्यासाठी पारंपरिक आणि स्पेशल 14 पदार्थ | Gudhi Padwa Special Recipes in Marathi

Trupti Paradkar  |  Mar 7, 2022
Gudi Padwa Special Recipes in Marathi

गुढीपाडवा महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कारण  या सणापासून मराठी नव वर्षाची सुरूवात होते. त्यामुळे घराची सजावट करून, गुढी उभारून, गुढीपाडव्यासाठी रांगोळी काढून, नटून थटून नववर्षाचं स्वागत करण्याची पद्धत आहे. यासाठी जाणून घ्या गुढीपाडवा सणाची माहिती आणि महत्त्व (Gudhi Padwa Information In Marathi). एवढंच नाही तर गुढीपाडव्याला खास महाराष्ट्रीय पदार्थांचा बेतही आखला जातो. या दिवशी कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत अगदी खास  साग्रसंगीत पद्धतीत पंगतीचेही जेवण केले जाते. महाराष्ट्रीयन थाळी म्हटली की समोर येतात ते पदार्थ म्हणजे श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, पापड, कोथिंबीर अथवा अळूच्या वड्या, बटाटवडे अथवा भजी. या महाराष्ट्रीयन थाळीत सर्व प्रकारच्या चवी आणि रंगाचा समावेश असतो. जणू काही खाद्यपदार्थही आपल्या स्वाद आणि रंगातून नववर्षाचं स्वागत करत असतात. तेव्हा यंदा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी काही खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ घरी आवर्जून करायलाच हवेत. यासाठी आम्ही तुमच्यासोबत गुढीपाडव्याला केले जाणारे काही खास पारंपरिक खाद्यपदार्थ… यासोबतच सर्वांना द्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा (Gudhi Padwa Wishes In Marathi)

श्रीखंड – Shrikhand Recipe For Gudhi Padwa In Marathi

श्रीखंड

गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी आवर्जून केला जाणारा एक खास पदार्थ म्हणजे श्रीखंड अथवा आम्रखंड. आजकाल बाजारात विविध फ्लेवर्सचे श्रीखंड तयार मिळतात. मात्र घरी स्वतःच्या हाताने श्रीखंड बनवण्याची मजा काही निराळीच आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडव्यासाठी थोडा खास वेळ काढा आणि घरी चक्का तयार करून बनवा सणासाठी खास श्रीखंड

श्रीखंड तयार करण्यासाठी साहित्य –

गुढीपाडव्यासाठी श्रीखंड तयार करण्याची कृती –

श्रीखंड तयार करण्यासाठी तुम्हाला एक दिवस आधीपासून तयारीला लागावं लागेल. यासाठी दोन दिवस आधी छान दही लावून घ्या आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दह्यापासून चक्का तयार करा. चक्का तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला आठ ते दहा तास दही सुती कापडात घट्ट पिळून टांगून ठेवायचं आहे. ज्यामुळे त्यातील संपूर्ण पाणी निघून जाईल आणि छान चक्का तयार होईल. एकदा चक्का तयार झाला की श्रीखंड बनवणं खूपच सोपं आहे. जितका चक्का तयार केला असेल त्याचप्रमाणात चक्क्यामध्ये साखर मिसळा आणि ती विरघळेपर्यंत ठेवून द्या. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेले मिश्रण चाळणीत गाळून घ्या. त्यानंतर त्यात वरून जायफळ आणि वेलची पावडर टाका. जर तुम्हाला आम्रखंड करायचं असेल तर त्यात तुम्हाला आंब्याचा रस अथवा पल्प मिसळावा लागेल. ज्यामुळे त्याला आम्रखंडाचा स्वाद येईल. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे श्रीखंड बनवू शकता. 

वाचा गुढीपाडव्याला कडुलिंबाचे नक्की काय महत्त्व आहे

पुरणपोळी – Puran Poli Recipe For Gudhi Padwa In Marathi

पुरणपोळी – Puran Poli Recipe

पुरणपोळी हा महाराष्ट्रातील आणखी असा एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे हो विविध सणांसाठी घरोघरी केला जातो. गुढीपाडव्याला मराठमोळी पुरणपोळी पानात वाढलेली असेल तर घरची मंडळी नक्कीच खुश होतील. पुरणपोळी चवीला छान लागतेच शिवाय तिच्यामुळे महाराष्ट्रीय थाळीची शोभा अधिकच वाढते.

पुरळपोळी तयार करण्यासाठी साहित्य –

गुढीपाडव्यासाठी पुरणपोळी तयार करण्याची कृती –

पुरणपोळी करणं सहजसोपं नसलं तरी कठीण नक्कीच नाही. प्रमाण व्यवस्थित असेल तर पहिल्यांदा करूनही तुमच्या पोळ्या मस्त मऊ लुसलुशीत होऊ शकतात. यासाठी हरबरा डाळ मस्त कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळीतील सर्व पाणी काढून त्यात किसलेला गुळ टाका आणि मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड टाका आणि डाळ मिक्सर अथवा पुरणयंत्रात वाटून घ्या. चमचाभर तेल लावून सैलसर कणीक मळून घ्या. कणकेची पारी तयार करून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि अलगद पारीचे तोंड बंद करा. पोळ्या पांढऱ्या शुभ्र हव्या असतील तर मैदा वापरा चवीला छान हव्या असतील तर गव्हाचे पीठ वापरा. मैदा आणि गव्हाचे पीठ मिसळूनही तुम्ही पोळ्या बनवू शकता. पुरण भरलेला गोळा लाटून पोळी तुपावर खरपूस शेकवून घ्या. गरमागरम पोळी तूप, दूध आणि कटाच्या आमटीसोबत अगदी मस्त लागते. एकदा पुरणपोळी छान जमली की ट्राय करा या निरनिराळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या

कटाची आमटी – Katachi Aamti Recipe In Marathi

पुरणपोळी म्हटलं की सोबत कटाची आमटी ही आलीच. यासाठी पोळीसोबत यंदा या आमटीचाही बेत करा.

साहित्य – 

गुढीपाडव्यासाठी कटाची आमटी करण्याची कृती – 

डाळ आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावी. खोबरं,काळिमिरी, जिरे, दालचिनी वाटून त्याचा मसाला डाळीच्या पाण्यात मिसळावा.  डाळीत आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ, मीठ, हळद घालून आमटीला उकळ आणावी. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता, हिंग टाकून तडतडू द्यावे. आमटीला वरून फोडणी द्यावी. तसंच यासोबत ट्राय करा या विभिन्न प्रकारच्या आमटी रेसिपीज (Amti Recipe In Marathi)

पुरी भाजी – Puri Bhaji Recipe For Gudhi Padwa In Marathi

पुरी भाजी – Puri Bhaji Recipe For Gudhi Padwa

नैवेद्याच्या पान भरताना नेहमी पुरी भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. यासाठी सणासुदीच्या पारंपरिक जेवणात पोळी ऐवजी पुरी आणि बटाट्याची पिवळी भाजी बनवली जाते.  ृ

भाजीसाठी लागणारे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी बटाटा पुरी भाजी करण्याची कृती –

सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून शिजवून मध्यम आकाराचे तुकडे करावेत. तुकड्यांवरच थोडी साखर, हिंग, हळद आणि चवीपुरतं मीठ घालावं. (कढईत हे असं टाकल्यास, सर्व बटाट्याला त्याची व्यवस्थित चव लागते) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हवं असल्यास, आल्याचे तुकडे घालावेत. थोडं परतून त्यावर बटाट्याच्या फोडी परताव्यात. एक वाफ काढावी. गरमागरम भाजी तयार. त्यावर कोथिंबीर चिरून घालावी. तुम्हाला आवडत असल्यास, खरवडलेलं खोबरं घातलं तरीही चालेल.पण नेवैद्यासाठी करण्यात येणाऱ्या बटाट्याच्या भाजीत कांदा घालत नसल्यामुळे कांदा घालणं सहसा टाळलं जातं. पण तुम्हाला नैवेद्यात भाजी ठेवायची नसेल तर मस्त कांदा घालून चमचमीत बटाटा भाजी तुम्ही करू शकता. तुम्हाला प्रत्येक पदार्थामध्ये बटाटा घालायला आवडत असेल तर खास तुमच्यासाठी बटाट्याच्या या काही खास रेसिपीज (Batata Recipe In Marathi)

पुरीसाठी लागणारे साहित्य –

पुरी करण्याची कृती –

गव्हाचं पीठ तेल, मीठ घालून पाण्याने भिजवून ठेवा. कणीक नेहमीपेक्षा थोडं घट्ट भिजवा. पुरीचं पीठ हे पोळीच्या पिठाप्रमाणे सैलसर नसावे. कारण सैलसर भिजवल्यास पुरी फुगत नाही. त्यानंतर तुम्हाला जर पटापट पुरी करायची असेल आणि गोलाकार आकाराचीच हवी असेल. तर पोळपाटभर एक थोडी जाडी पोळी लाटून घ्या आणि मग स्टीलच्या काठ असलेल्या वाटीने त्यावर छाप मारा. म्हणजे एका आकारात पुऱ्या दिसतात.

वाचा – गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

डाळिंबी उसळ – Dalimbi Usal Recipe For Gudhi Padwa In Marathi

डाळिंबी उसळ – Dalimbi Usal Recipe

डाळिंबीची उसळ हा पदार्थ महाराष्ट्रीन स्वयंपाकात नेहमी असतोच. कारण सणसुद असू दे अथवा घरातील लग्नकार्य पंगतीच्या जेवणात डाळिंबी उसळ असायलाच हवी. काहीजण या भाजीला बिरडं अथवा वालाची भाजी असं म्हणतात. डाळिंब्यांची उसळ करण्याची तयारी मात्र आधीचकरावी लागते. यासाठी दोन दिवस आधी वाल भिजत घाला आणि  एक दिवस भिजलेल्यानंतर आदल्या दिवशी ते एका सुती कापडात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे त्याला छान मोड येतील.

डाळिंबी उसळ करण्याचे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी डाळिंबी उसळ करण्याची कृती –

मोड आलेले वाल कोमट पाण्यात भिजवून सोलून ठेवा ज्यामुळे ते सोलणं सोपं जाईल. कढईत किसलेला सुका नारळ, जिरे भाजून मिक्सरमध्ये वाटून वाटण तयार करा. कढईत तेलाची फोडणी करून त्यात जिरे, हिंग, तिखट कढीपत्ता, कोथिंबीर घालून डाळिंब्या परतून घ्या. पाणी टाकून त्यात जिरे आणि खोबऱ्याचे वाटण टाका. भाजी शिजून उकळ आली की आमसूल आणि मीठ टाका. गॅस बंद करून ओले खोबरे पेरा.

खीर – Kheer Recipe For Gudhi Padwa In Marathi

खीर – Kheer Recipe For Gudhi Padwa

खीर हा झटपट होणारा गोड पदार्थ असल्यामुळे घरी नैवेद्यासाठी बऱ्याचदा खीर बनवण्यात येते. खरंतर खीर अनेक प्रकारच्या असतात. जसं की तांदूळ, गळू, रवा, साबुदाणे, शेवया अशा पारंपरिक खीर महाराष्ट्रात सणासुदीला घरोघरी केल्या जातात. मात्र यंदा गुढीपाडव्याला तुम्ही तयार शेवयांची खीर बनवू शकता.

खीर तयार करण्यासाठी साहित्य – 

गुढीपाडव्यासाठी खीर करण्यासाठी लागणारी कृती –

शेवया तूपामध्ये भाजून घ्याव्यात. त्यानंतर दूध गरम करून घ्यावं. शेवया भाजून झाल्यानंतर त्यात गरम दूध, साखर घालून त्याला मंद आचेवर उकळी देत राहावं. नंतर त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास वेलची पावडर आणि इतर ड्रायफ्रूटस घालावेत.

बटाटा वडा – Batatavada Recipe For Gudhi Padwa In Marathi

बटाटा वडा – Batatavada Recipe For Gudhi Padwa

बटाट वडा मराठमोळी थाळीत अगदी शोभून दिसतो. सदासर्वकाळ खाण्यासारखा हा स्नॅक्सचा एक प्रकार असल्यामुळे तो घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडतो. मात्र थाळीसाठी करायचे बटाटेवडे हे आकाराने थोडे छोटे करावेत. 

बटाटावडा करण्याचे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी बटाटावडा करण्याची कृती –

बटाटे स्वच्छ धुवा, उकडा आणि स्मॅश करून घ्या. कढईत थोडं तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, हिरवी मिरची- आल्याची पेस्ट परतून घ्या. त्यात बटाटा टाका आणि मीठ टाकून एकजीव करा. हळद आणि लिंबाचा रस मिसळा. कोथिंबीर टाकून गॅस बंद करून मिश्रण थंड करा. बेसण, तांदळाचे पीठ, हळद सैलसर भिजवून घ्या. त्यात थोडं मीठ टाका. अगदी छोट्या आकाराचे वडे करून ते तळून घ्या. यासोबतच बनवा असा विभिन्न प्रकारचा बटाटावडा (Batata Vada Recipe In Marathi)

गाजरचा हलवा – Gajar Halwa Recipe For Gudhi Padwa In Marathi

गाजर हलवा हा पदार्थ अगदी मराठमोळा नसला तरी गुढीपाडव्यासाठी करायला काहीच हरकत नाही. कारण गोड जरी असला तरी त्यातून तुमच्या पोटात पौष्टिक घटक जास्त जातात.

गाजराचा हलवा साहित्य –

गुढीपाडव्यासाठी गाजर हलवा बनवण्याची कृती 

सर्वात आधी गाजर धुवून,सोलून स्वच्छ पुसून किसून घ्या. कढईत तूप गरम करा आणि त्यात गाजराचा किस टाका. किस परतून घेतल्यावर वरून साखर मिसळा. साखर वितळू लागली की वरून दूध टाका आणि दुधात  गाजर चांगले शिजू द्या. दूध आटून हलवा घट्ट झाला की वरून वेलची पावडर आणि सुकामेव्याने सजवा आणि पानात वाढा. Gajar Halwa Recipe In Marathi | गाजर हलवा रेसिपी मराठी अधिक सविस्तरपणे जाणून घ्या

बासुंदी – Basundi Recipe For Gudhi Padwa In Marathi

बासुंदी – Basundi Recipe For Gudhi Padwa In Marathi

बासुंदी हा राजेमहाराज्यांच्या काळात केला जाणारा शाही पदार्थ आहे. त्यामुळे सणासुदीला घरी शाही जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर बासुंदी पुरीचा बेत करायलाच हवा.

बासुंदीसाठी लागणारे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी बासुंदी करण्याची कृती –

दूधात साखर आणि केशर टाकून ते उकळत ठेवावे. दूध आटून अर्धे होईपर्यत ते उकळत ठेवायचे आहे. मात्र या दरम्यान गॅस मंद असावा. दूध पातेल्याला लागू नये यासाठी खाली एकादा तवा अथवा पातळ पत्रा ठेवावा. दूधात वाटी उलटी टाकून ठेवल्यास दूध उतू जात नाही. दूध आटल्यावर त्यात सुकामेव्याचे तुकडे टाकावे आणि केशराने सजवावे. 

कोथिंबीर वडी – Kothimbir Vadi Recipe For Gudhi Padwa In Marathi 

कोथिंबीर वडी – Kothimbir Vadi Recipe For Gudhi Padwa

मराठमोळ्या थाळीत पानाची शोभा वाढवण्यासाठी आणि पोटाचे समाधान होण्यासाठी डावीकडचे, उजवीकडचे असे अनेक पदार्थ असतात. मात्र एवढे पदार्थ जरी तुम्ही बनवले नाहीत. तरी पापड, लोणच्यासोबत खास कोथिंबीर वडी तुम्ही नक्कीच बनवू शकता.

कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी कोथिंबीर वडी बनवण्याची कृती –

कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. पाणी निथळून त्यामध्ये बेसन आणि सर्व साहित्य मिक्स करा. मिश्रणाचा रोल तयार करून घ्या वर त्याला वरून तीळ लावा.  स्टिमरला तेल लावून रोल उकडून घ्या. थंड झाल्यावर वड्या पाडा आणि कुरकुरीत तळा अथवा शॅलो फ्राय करा. यासोबतच जाणून घ्या कोथिंबीर खाण्याचे फायदे जाणून घ्या (Coriander Powder And Leaves Benefits In Marathi)

मसाले भात रेसिपी – Masale Bhat Recipe For Gudhi Padwa In Marathi

 मसाले भात रेसिपी – Masale Bhat Recipe For Gudhi Padwa

मसालेभाताशिवाय महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होऊ शकत नाही. कारण वरणभातासोबत सणासुदीला साखरभात, दहीभात अथवा मसालेभात असे भाताचे निरनिराळे प्रकार पानात वाढले जातात. चमचमीच भात जेवल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नसेल तर मसालेभात ट्राय करायलाच हवा.

मसालेभातासाठी लागणारे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी मसालेभात करण्याची कृती –

सर्वात आधी तांदूळ धुवून कमीतकमी अर्धा तास निथळत ठेवा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून नेहमीप्रमाणे फोडणी तयार करा. कढीपत्ता, काजू टाकून परतून घ्या. त्यावर मटार आणि आवडीप्रमाणे भाज्या टाकून परतून घ्या. परतेल्या भाज्यांवर तांदूळ टाकून परतून घ्या आणि वरून मीठ, तिखट, गोडा मसाला, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून पाच ते सात मिनटे आणखी काही मिनीट भात परतून घ्या. भात लवकर शिजण्यासाठी वरून तिप्पट गरम पाणी घाला आणि उकळी आल्यावर गॅस मंद करा. बारा ते पंधरा मिनीटे वाफ येवू द्या. त्यानंतर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने सजवा.

कोशिंबीर रेसिपी – Koshimbir Recipe For Gudhi Padwa In Marathi

कोशिंबीर रेसिपी – Koshimbir Recipe For Gudhi Padwa

नैवेद्याच्या पानात विविध प्रकारच्या कोशिंबीर असल्या की पानाची शोभा जास्त वाढते. शिवाय सणासुदीच्या जेवणात जास्त तळलेले पदार्थ असतात. यासाठी त्यासोबत थोडं फायबरयुक्त पदार्थ जसे की सलाड, रायतं, कोशिंबीर खाणं खूप गरजेचं असतं

कोशिंबीरीसाठी लागणारे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी कोशिंबीर करण्याची कृती –

काकडी, टोमॅटोप्रमाणे सलाडसाठी तुम्ही इतर कोणतीही कंदमुळं जसं की गाजर, बीट, कांदा आवडीप्रमाणे वापरू शकता. हे पदार्थ बारीक चिरून घ्या. त्यात मीठ, साखर, हिरवी मिरची, दही टाका आणि मिक्स करून वरून कोथिंबीर पेरा.

मिक्स भाज्यांचे लोणचं – Mix Pickle Recipe For Gudhi Padwa In Marathi

मिक्स भाज्यांचे लोणचं – Mix Pickle Recipe For Gudhi Padwa

पंगतीच्या जेवणात नेहमी आयत्यावेळी तयार केलेलं मिक्स लोणचं पानात वाढलं जातं. साठवणीच्या लोणच्यापेक्षा या लोणच्याची चव थोडी वेगळी असते. यासाठी गुढीपाडव्याला बनवा हे खास मिक्स लोणचं आणि वाढवा करा तुमची महाराष्ट्रीयन थाळी अधिक डेकोरेटिव्ह

मिक्स भाज्यांचे लोणचे तयार करण्याचे साहित्य –

गुढीपाडव्यासाठी मिक्स भाज्यांचे लोणचे करण्याची कृती –

गाजर, फ्लॉवर, मटार अशा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या स्वच्छ धुवून त्याच्या फोडी तयार करा  करा. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, हिंग टाकून चांगले मिक्स करा. मोहरीची जाडसर पावडर करून त्यात टाका. तेलाची फोडणी तयार करा. त्यात मेथी, मोहरी घालून फोडणी द्या आणि ही फोडणी भाज्यांवर पसरवा. लिंबाचा रस घालून लोणचे तयार करा. 

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे गुढीपाडव्यासाठी पारंपरिक आणि स्पेशल पदार्थ तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही या रेसिपीज ट्राय केल्या का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

Read More From Recipes