Weight Loss

जाणून घ्या जास्वंद फुलांची माहिती मराठी (Hibiscus Flower Information In Marathi)

Dipali Naphade  |  Nov 22, 2018
Hibiscus Flower Information In Marathi

आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या झाडाला नेहमीच औषधी झाडाचा दर्जा देण्यात आला आहे. याच्या मुळापासून ते फुलापर्यंत प्रत्येक गोष्ट ही आजारावरील रामबाण उपाय आहे. दिसायला जास्वंदीचं फुल खूपच सुंदर असतं. हे नेहमी तुम्ही घरात वा अगदी बागेतही पाहिलं आहे. वास्तविक जास्वंदीचं फुल हे लाल रंगाचं असतं पण यामध्ये गुलाबी, पांढरा, पिवळा आणि वांगी हे रंगदेखील पाहायला मिळतात. जास्वंदीचं वैज्ञानिक नाव हिबिस्कस सब्दरिफा (Hibiscus Sabdariffa) असं आहे. याला हिबिस्कस फ्लॉवर असंही म्हटलं जातं. या फुलामध्ये बऱ्याच तऱ्हेचे पोषक तत्व सापडतात जसे की, कॅल्शियम, लोह, विटामिन सी आणि फायबर. जास्वंदीच्या फुलांचा वापर हा बऱ्याच औषधांमध्येही करण्यात येतो. देवाच्या पूजेसाठी वापरण्यात येणारं हे पवित्र फुल केसांसह त्वचा आणि दैनंदिन वापरातही बऱ्याच समस्यांवरील उपाय आहे आणि अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

जास्वंदीचे फायदे (Benefits Of Hibiscus Flower In Marathi)

1. वजन कमी करण्यासाठी (वेट लॉस) जास्वंदीचा उपयोग (Hibiscus For Weight Loss)

वेट लॉससाठी जास्वंदीचा उपयोग चहा म्हणून करण्यात येतो. कारण जास्वंदीच्या चहामध्ये नैसर्गिक फॅट बर्न करणारे गुण असतात. जास्वंदीच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट असतं, जे शरीरातील मेटाबॉलिजम प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं. तसंच यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यासाठी मदत करतात.

कसा बनतो जास्वंदीचा चहा (Hibiscus Tea Recipe)

२ कप पाण्यात जास्वंदीची फुलं आणि त्याची सुकी पानं टाकावीत. पाणी उकळवावं. पाणी जेव्हा अर्ध राहतं, तेव्हा हे खाली उतरवून गाळून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि काही थेंब मध मिक्स करावा. अशा प्रकारे जास्वंदीचा स्वादिष्ट चहा तयार होतो. हा चहा दिवसातून २ ते ३ वेळा प्यायल्यास, तुम्हाला स्वतःलाच तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल. तुमच्यासाठी हा चहा बनवणं कठीण असल्यास, तुम्ही कोणत्याही अन्य हर्बल ब्रँडचे हिबिस्कस टी चे पाकिट बाजारातून अथवा ऑनलाईन मागवू शकता.

2. पाळी (पिरियड्स) शी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे जास्वंद (Hibiscus For Periods)

साधारणतः महिलांना पिरियड्स उशीरा येणाची समस्या असते मात्र, असं नेहमी नेहमी होणं अथवा बऱ्याच कालावधीपर्यंत पाळी न येणं योग्य नाही. प्रत्येक स्त्रीला तिची महिन्याची पाळीची तारीख माहीत असते. कारण साधारणतः पाळीचं चक्र हे २८ दिवसांचं असतं आणि २८ किंवा ३० दिवसांनंतर पुन्हा मासिक पाळी येते. जेव्हा हे दिवस २८-३०-४० असे होतात आणि त्यानंतरही पाळी येत नाही, तेव्हा अशा अनियमित पाळीच्या समस्येतून सुटका होण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी जास्वंदीच्या पानांचा चहा नक्की प्या. कारण महिलांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजनची कमतरता असल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि याच कारणामुळे पाळीदेखील येत नाही किंवा उशीराने येते किंवा कधीकधी हेवी फ्लो होतो ज्यामुळे शरीर कमकुवत होते. पिरेड्सच्या तारखा नेहमी चुकतात, त्याची कारण आणि इलाजही आहेत. अशावेळी जास्वंदीचा चहा प्यायल्यानंतर या समस्येपासून सुटका मिळते.

3. त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्वंदीचा उपयोग (Hibiscus For Skin)

पूर्वीच्या काळात जास्वंदीचा उपयोग हा सौंदर्यसाधनांची उत्पादनं करण्यासाठी होत होता. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी जास्वंदी हे कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. बोटोक्स प्लांट म्हणूनदेखील याची ओळख आहे कारण नैसर्गिकरित्या बोटोक्स म्हणून याचा परिणाम होतो. विशेषतः ज्यांना त्वचेशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी जास्वंदी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये लोह, विटामिन सी आणि अँटी ऑक्सीडंट हे गुण असतात. याचा वापर पुरळ, पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या मिटवण्यासाठी करता येतो. हेच नाही तर, आपल्या त्वचेवरील काळेपणा दूर करून त्वचा अतिशय चमकदार आणि साफदेखील होते.

4. अँटी एजिंगसाठी जास्वंदीचा उपयोग (Hibiscus For Anti Aging)

आपण बऱ्याच काळापर्यंत तरूण दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजकालची खराब लाईफस्टाईल वेळेच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या घेऊन येते. पण, तुम्हाला माहीत आहे का? जास्वंदीची पानं ही अँटीएजिंग  (Anti-Ageing) समस्येवर औषधाप्रमाणे काम करतात. वास्तविक जास्वंदीची पानांमध्ये फ्री रेडिकल्स (Free Radicals) काढून टाकण्याची क्षमता असते. ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया हळू होते आणि आपली त्वचा तरूण दिसते.

5. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्वंदीचा असा वापर करावा

जास्वंदीची पानं उकळवून व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर त्यात थोडासा मध घालून हलक्या हातांनी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिट्सनंतर थंड पाण्याने चेहरा नीट धुऊन घ्या. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा जाऊन चेहऱ्यावर डागविरहित गोरेपणा येईल.

6. हेअर केअरमध्ये जास्वंदीचा उपयोग (Hibiscus For Hair)

जे लोक केसांच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी जास्वंदी अतिशय फायदेशीर ठरते. केसांचं गळणं, कोरडे होणं अथवा केस न वाढणं या सर्व समस्यांमध्ये जास्वंदीची पानं खूपच कामी येतात. तुम्हाला हवं तर जास्वंदीचं फुल आणि पानं यांच्या बनलेल्या पेस्टचा नैसर्गिक हेअर कंडिशनर म्हणूनदेखील तुम्ही उपयोग करू शकता. यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार होतातच पण हेल्दीदेखील होतात. आवळा पावडर आणि जास्वंदीच्या पानांना एकत्र करून मिक्सरमधून काढावं आणि मग केसांना लावून मालिश केल्यास, तुमचे केस गळणं पूर्णतः बंद होतं आणि तुमचे केस मजबूतदेखील दिसतील.

7. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जास्वंदीचा उपयोग होतो

जास्वंदीचं सरबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. विशेषतः मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी हे चांगलं आहे. हे हृदय आणि मेंदू दोन्हीसाठी एनर्जी बुस्टर म्हणून काम करतं. तुमच्या वाढत्या वयासह जर स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होत असेल तर जास्वंदीचं सरबत फायदेशीर आहे.

 
जास्वंदीचं सरबत कसं बनवावं (Hibiscus Syrup Recipe)

सर्वात पहिले जास्वंदीची ८ ते १० पानं आणि फुलं दोन्ही सुकवून वाटून घ्यावीत त्यानंतर त्याची पावडर करून घ्यावी आणि एअर टाईट डब्यामध्ये ही पावडर ठेवावी. दिवसातून कमीत कमी २ वेळा या पावडरीचं सरबत बनवावं अथवा दुधात घालून प्यावं. तुमची बुद्धी कॉम्प्युटरप्रमाणे काम करायला लागेल.

                                         वाचा – केसांसाठी केवड्याचे फायदे (Kewra For Hair In Marathi)

गळत्या केसांसाठी औषध (Hibiscus Hair Care Products In Marathi)

1. पतंजलि केश कांति अँटी डँड्रफ क्लिंजर

हा एक आयुर्वेदिक शॅम्पू आहे, जो केसांमधील कोंडा घालवण्यासाठी आणि केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करतो. याशिवाय केसांमध्ये अथवा डोक्यावर स्कॅल्प असल्यास, त्याची घाणंही साफ करतो. जर तुम्ही केमिकल हेअर उत्पानांपासून जर संतुष्ट नसाल, तर जास्वंदीपासून तयार करण्यात आलेलं हे पतंजलिचं हेअर केअर उत्पादन नक्की वापरू शकता.

2. पतंजलि हेअर कंडीशनर कलर प्रोटेक्शन

जास्वंदीपासून तयार करण्यात आलेलं हे पतंजलिचं उत्पादन खराब झालेल्या केसांमध्ये जीव आणतं. यामुळे केसांना मजबूती येऊन केस चमकदार आणि हेल्दी होतात. याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. केस धुतल्यानंतर साधारण २ ते ५ ग्रॅम इतकं हेअर कंडिशनर घेऊन केसांमध्ये लावावं आणि १ ते २ मिनिट्स ठेवावं. त्यानंतर केस साध्या पाण्याने नीट धुवावेत.

शरीरासाठी जास्वंदीचं फुल फायदेशीर आहे (Health Benefits Of Hibiscus Flower In Marathi)

केस आणि त्वचेव्यतिरिक्त जास्वंदीचं फुल आणि पानं आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. जाणून घेऊया याबाबत…

1. हाय ब्लडप्रेशर (उच्च रक्तदाब)

अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या एका संशोधनानुसार, जास्वंदीच्या पानांपासून बनलेला चहा उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रूग्णांसाठी औषधाचं काम करतो. हा चहा प्यायल्यामुळे हृदयप्रक्रिया सामान्य होते आणि शरीराला अतिशय हलकं वाटतं. तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास, दिवसातून कमीत कमी २ वेळा जास्वंदीचा चहा नक्की प्यावा.

2. अनिमिया (Anemia)

अधिकतर महिला रक्ता आणि लोहाच्या कमतरतेमुळे अनिमियाग्रस्त असतात. मात्र तुम्हाला आम्ही सांगू शकतो की, जास्वंदीच्या फुलांनी अनमियासारखे आजार बरे होतात. त्यासाठी एक महिना रोज दुधासह एक चमचा जास्वंदीची पावडर खाणं फायदेशीर ठरू शकतं.

3. सर्दी, खोकला आणि कफ (Cough & Cold)

जास्वंदीचा चहा हा सर्दी, खोकला घरगुती उपायासाठी उपयुक्त ठरतो आणि कफने तुम्ही त्रस्त असल्यास, तुम्हाला या समस्येतून नक्कीच सोडवतो. वास्तविक यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असल्यामुळे सर्दीसाठी हा चहा चांगला असतो.

4. कोलेस्ट्रॉल (Cholesterol)

जास्वंदीचा चहा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामधील अस्तित्वात असणारे पोषक तत्व आपल्या धमनीतील नलिकांमध्ये पॅलेक्यू जमवण्यास रोखते. त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी होते.

5. मधुमेह (Diabetes)

जास्वंदीचा चहा हा मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी औषध म्हणून खूपच फायदेशीर असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. कारण जास्वंदीचा आंबट चहा हा शरीरामध्ये जाऊन कोलेस्ट्रॉल आणि टायग्लिरॉईड्सचं काम करतो जे मधुमेहासारखा आजार बरा करण्यासाठी फायदेशीर असते.

6. मुतखडा (Kidney Stone)

तुम्हाला किडनी स्टोन अर्थात मुतखड्याची समस्या असल्यास, जास्वंदीचा चहा अतिशय योग्य आहे. यामुळे मुतखडा निघून जाण्यास मदत होते. यासाठी रोज जेवायच्या १ तास आधी हा चहा प्यावा.

7. तोंड येणे

बऱ्याचदा उष्णता शरीरामध्ये जास्त झाल्यास, तोंड येतं. असं झालं असल्यास, जास्वंदीची ४ ते ५ पानं चावून खावीत. त्यामुळे लाळ जास्त निर्माण होते आणि पचनशक्तीही वाढते.

जास्वंदीचं फुल वापरण्यामुळे होणारं नुकसान (Side Effects Of Hibiscus Flower In Marathi)

असं अजिबात नाही की, जास्वंदी प्रत्येकासाठी उपयुक्त असते. जास्वंदीमुळे तुमचं नुकसानदेखील होऊ शकतं. जाणून घेऊया जास्वंदीमुळे नक्की कशा तऱ्हेने त्रास होऊ शकतो.

1. गरोदर महिलांनी तर अजिबाद जास्वंदीचं कोणत्याही प्रकारे सेवन करू नये

गरोदर अर्थात प्रेगनंट असलेल्या महिलांसाठी अथवा ज्या महिलांवर फर्टिलिटी उपचार चालू आहेत अशांसाठी जास्वंदीचा चहा अजिबातच योग्य नाही. त्यांच्यासाठी हा चहा नुकसानदायी ठरू शकतो. कारण यामुळे शरीरातील अॅस्ट्रोजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे तुमची मासिक पाळी सुरु होऊ शकते. तसंच तुमचागर्भपात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

2. हार्मोन्ससाठी उपचार घेणाऱ्यांसाठीही आहे नुकसानदायी

ज्या महिला आपल्या हार्मोन्ससंबंधी उपचार घेत आहेत अथवा त्यासंबंधी औषधं घेत आहेत, त्यांच्यासाठीदेखील जास्वंदीचं सेवन करणं नुकसानदायी ठरू शकतं. तसंच गर्भनिरोधक गोळ्या घेत असलेल्या महिलांनीदेखील जास्वंदी खाणं टाळावं.

3. ड्राईव्ह करत असल्यास, हे खाऊ नका

तुम्हाला गाडी चालवायची असल्यास, त्याआधी १ तास कोणत्याही प्रकारामध्ये जास्वंदीचं सेवन करू नये. कारण जास्वंदी खाल्ल्यानंतर झोप येते. त्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक आहे.

4. कमी रक्तदाब असणाऱ्या रूग्णांनी हे खाऊ नका

कमी रक्तदाब अर्थात लो ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी जास्वंदीचा चहा कधीही पिऊ नये. यामुळं त्याचं ब्लडप्रेशर अजून कमी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्यांची तब्बेत बिघडूही शकते.

You Might Like This:

Health Benefits Of Giloy & How To Make Giloy Kadha In Marathi

Benefits Of Olive Oil For Skin, Hair & Health In Marathi

Hibiscus Benefits for Health in Hindi

Read More From Weight Loss