DIY सौंदर्य

केसांना हवा तसा रंग द्यायचा असेल तर मेंदी अशी तयार करा

Dipali Naphade  |  Sep 30, 2020
केसांना हवा तसा रंग द्यायचा असेल तर मेंदी अशी तयार करा

केसांमध्ये दिसणारा सफेद केस कोणालाच नको असतो. काही जण केस पांढरे व्हायला लागल्यानंंतर डाय करायला लागतात. पांढरा रंग लपविण्यासाठी बरेचदा अमोनिया असणारा रंग वापरला जातो. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. केसांना रंग देण्यासाठी मेंदीचाही वापर सर्रास केला जातो. यामुळे केसांचे नुकसान होत नाही. पण बऱ्याचदा असे वाटते की, मेंदीचा रंग उतरायला लागल्यावर केस लाल दिसू लागतात आणि मेंदीने केसांना एकच रंग मिळतो. पण असे नाही. मेंदीमुळेही तुम्हाला हवा तसा रंग केसांना देता येतो. तुम्ही मेंदी तयार करताना काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला हवा तसा रंग तुम्हाला केसांना देता येतो आणि तेही कोणत्याही केमिकलयुक्त रंगाशिवाय. मेंदीने तुम्ही केसांना लाल, ब्राऊन आणि बरगंडी असे कलर नक्कीच देऊ शकता. यामुळे मुळात केसांना कोणतेही नुकसान पोहचत नाही आणि तुमचे केसही व्यवस्थित राहतात. जाणून घेऊया कशा प्रकारे मेंदीमधून हे रंग तुम्ही केसांना  देऊ शकता. 

केसांना ब्राऊन रंग देण्यासाठी

Shutterstock

तुम्हाला केसांना जर ब्राऊन रंग द्यायचा असेल तर तुम्ही मेंदीमध्ये कॉफी मिसळा. मेंदी तयार करताना तुम्ही लवंगदेखील यामध्ये वापरू शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळेल. मेंदी तयार करण्यासाठी तुम्ही दोन कप पाणी त्यात दोन चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा लवंग घालून पाणी उकळून घ्या. यामध्ये तुम्ही पाणी थंड झाल्यावर मेंदी मिक्स करा. ही मेंदी रात्रभर तशीच भिजू द्यावी. यामध्ये तुम्ही सकाळी आवळा पावडरही मिक्स करू शकता. असं केल्याने तुमचे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत मिळते. त्यानंतर तुम्ही मेंदी केसांना लावा सुकल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. तुमचे केस अधिक मुलायम आणि मऊ तर होतीलच त्याशिवाय तुम्हाला अगदी पार्लरमध्ये कलर केल्याप्रमाणे केसांना ब्राऊन कलर येईल. हा रंग खूपच खुलून दिसतो.

चमकदार आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा मेंदीसह हेअर पॅक्स

केसांना अशा प्रकारे द्या लाल रंग

Shutterstock

केसांना लाल रंग देण्यासाठी तुम्ही मेंदीमध्ये बीटरूट पावडर वापरू शकता. आपल्याला नेहमी वाटतं की, केसांना रंग देण्यासाठी बाहेरील कलर वापरणं गरजेचं आहे. पण तुम्ही नैसर्गिकरित्या अशा तऱ्हेने केसांना मेंदीतून रंग देऊ शकता. गरम पाण्यात बीटरूट पावडर मिक्स करून घ्या. त्यानंतर या पाण्यात मेंदी मिक्स करा. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही विटामिन ई कॅप्सुल ऑईलही मिक्स करू शकता. जेणेकरून केसांना अधिक मजबूती देता येईल. हे मिश्रण साधारण 7-8 तास तसंच राहू द्या. यानंतर मेंदी केसांना लावा. सुकल्यावर थंड पाण्याने केस धुवा. तुमच्या केसांना तुम्हाला हवा तसा सुंदर लाल रंग मिळेल. 

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

काळ्या केसांसाठी भिजवा अशा प्रकारे मेंदी

Shutterstock

काही जणांना काळे केस जास्त आवडतात. तुम्हाला पण काळा रंग केसांना हवा असेल तर तुम्ही मेंदीसह कत्था मिसळा. सर्वात पहिल्यांदा तुम्ही चहाच्या पाण्यासह लवंग उकळून घ्या. यामध्ये मेंदी भिजवा. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे कत्था पावडर मिक्स करा. यामध्ये 8-10 थेंब मेंदी तेलदेखील मिक्स करा आणि साधारण  7-8 तास तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर तुम्हाला मेंदीवर काळे पाणी जमा झालेले दिसून येईल. नीट मिक्स करा आणि केसांना लावा. यामुळे तुमचे केस मेंदी लावल्यानंतर काळे दिसतील. मेंदीचा लालसरपणा दिसून येणार नाही. 

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

बरगंडी रंग मिळण्यासाठी अशी भिजवा मेंदी

Shutterstock

बऱ्याच जणांना केसांना बरगंडी रंग देणं आवडतं. तुम्हालाही असा रंग हवा असेल तर तुम्ही बीटरूटचा वापर करा. सर्वात पहिले बीटाचा रस काढा. या ज्युसमध्ये दोन कप पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करा. तुम्हाला जर लाईट बरगंडी रंग हवा असेल तर तुम्ही पाणी आणि लिंबाच्या रसाचं प्रमाण हे समान ठएवा. तुम्हाला गडद बरगंडी रंग हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त आणि लिंबाचा रस कमी प्रमाणात घ्या. 70-30 असा रेशो ठेवा. अशा प्रकारे हे मिश्रण घेऊन त्यात मेंदी मिक्स करा. 7-8 तास तशीच मेंदी राहू द्या. नंतर ती मेंदी तुम्ही केसांना  लावा आणि सुकल्यावर कोमट पाण्याने केस धुवा आणि मिळवा मस्त बरगंडी कलर. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य