Festive

अशाप्रकारचे कपडे घातल्यास दिसणार नाही तुमचं #tummyfat

Aaditi Datar  |  Jul 2, 2019
अशाप्रकारचे कपडे घातल्यास दिसणार नाही तुमचं #tummyfat

वजन कसं कमी करायचं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. या प्रश्नाच्या उत्तरादाखल तुम्ही व्यायाम केला असेल आणि डाएटही फॉलो केलं असेल. पण पोटावर जमा झालेली चरबी हा असा प्रकार आहे जो सहजासहजी तुमचा पिच्छा सोडणार नाही. खरंतर तुम्ही जसं खाता तसं तुमचं शरीर दिसतं. अनेकदा असंही होतं की, तुम्ही जाड नसता पण तुमच्या पोटाचा घेर मात्र दिसतो. त्यामुळे जेव्हा तुमचा मूड टाईट फिटींगचे कपडे घालण्याचा होतो तेव्हा नेमके ते पोटामुळे घालता येत नाहीत. अशा वेळी काय करावं ट्रेंडी आणि स्टाईलिश तर दिसायचं पण #tummyfat चं काय? म्हणूनच जाणून घ्या स्टाईलिंगच्या ट्रिक्स, ज्यामुळे लपवता येईल तुमचं #tummyfat.

असे निवडा टॉप्स

रफल टॉप हे फक्त दिसायलाच स्टाईलिश नसतात तर पोटावरची चरबीही हमखास लपवण्यात उपयोगी ठरतात. जर तुम्हाला बेल स्लीव्ह्जवाला रफल टॉप मिळाला तर प्रश्नच मिटला. लगेच तुमच्या वॉर्डरोबमध्ये त्याला जागा द्या. रफल टॉपप्रमाणेच पेपलम टॉपसुद्धा तुम्हाला सूट होईल. हा टॉप पोटाच्या वरपर्यंत फिटींगला असतो आणि नंतर फ्लेयर असतो. खासकरून चुणीदार टॉप किंवा कुर्ते घाला म्हणजे पोटाची चरबी लपवणं सोपं जातं आणि लुकही स्टाईलिश दिसतो. 

पोटाची चरबी कशी कमी करावी हे देखील वाचा

हाय वेस्ट जीन्स आहे प्रभावी

तुम्ही जितकी लो वेस्ट जीन्स घालाल तेवढं तुमचं पोटं दिसतं. लो वेस्ट जीन्मद्ये लांबूनच तुमच्या पोटाच्या चरबीचा घेर दिसून येतो. त्यामुळे #tummyfat लपवण्यासाठी हाय वेस्ट जीन्स हा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोटाची चरबीही लपेल आणि तुम्हीही फिटही दिसाल.

तुमच्याकडे असलंच पाहिजे टमी टकर

जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी सुंदर लेहंगा घालायचा असेल किंवा काही वेस्टर्न घालायचा मूड आहे का? पण प्रश्न आहे की, पोट दिसता कामा नये. मग तुम्ही कधी टमी टकर वापरलं आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहीत नसेल तर लगेचच बाजारात जाऊन टमी टकर किंवा बॉडी शेपर विकत घ्या. हे खास करून वेस्टर्न ड्रेसेसमध्ये पोट लपवण्यासाठी उत्तम ठरतं. इतक्या बेमालूमपणे पोट लपतं की, कळतचं नाही तुम्ही पोटाची चरबी लपवण्यासाठी टमी टकर घातलं आहे. 

बायसेप कर्ल बद्दल देखील वाचा

फ्लेयर्ड कुर्तीची कमाल

जर तुम्ही जास्त वेस्टर्न आऊटफिट्स घालत नसाल किंवा तुम्हाला इंडियन वेअर आवडत असल्यास तुम्ही अनारकली आणि फ्लेयर्ड हेमलाईनचा कुर्ता घालू शकता. तुमचं पोट लपवण्यासाठी हा कुर्त्याचा प्रकार नक्कीच मदत करेल. फ्लेयर्ड हेमलाईन असलेला कुर्ता तुम्हाला ऑफिसवेअर आणि कॅज्युअल वेअर म्हणूनही घालता येईल. लग्नात जाताना तुम्ही अनारकली पॅटर्नला पसंती देऊ शकता.

स्कर्ट आणि पँटची निवड

जर तुम्हाला ऑफिसला जाताना फॉर्मल वेअर घालायचं पण पोटाची चरबी लपवायची असल्यास तुमच्या वॉर्डरोबमध्ये सामील करा पेन्सिल स्कर्ट. पेन्सिल स्कर्ट चांगल्या फिटींगचा असेल तर तो कोणावरही चांगला दिसतो. त्यावर घाला लूज टॉप आणि विसरा तुमच्या पोटाची चरबी. फॉर्मल वेअर म्हणून तुम्ही प्लीटेड पँट्सही घालू शकता. कारण या पँट्स हाय वेस्टलाईनच्या असतात. या पँटमुळे तुम्ही उंचही दिसाल आणि प्लीट्समुळे तुमच्या पोटाकडे कोणाचं लक्षही जाणार नाही.  

ड्रेसेसमध्ये आहेत खूप ऑप्शन्स

जर तुम्हाला ड्रेस किंवा वनपीस घालायची आवड असेल तर निवड करा रॅप ड्रेसेसची. नेहमी लक्षात घ्या की, ड्रेस निवडताना व्हर्टिकल पॅटर्नचा ड्रेस घ्या. ज्यामुळे तुम्ही दिसाल उंच आणि #tummyfat ही लपेल. तसंच फ्लेयर्ड ड्रेसही तुमच्यावर चांगला दिसेल. आजकाल हे ड्रेस फारच ट्रेंडमध्ये आहेत. 

टिप – कधीही कोणताही ड्रेस किंवा कपडे घेताना तुमच्या बॉडीशेपचा नक्की विचार करा आणि मगच खरेदी करा. 

हेही वाचा –

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टिप्स

जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!

#Pregnancy मध्येही राहा फॅशनेबल

Read More From Festive