एक काळ असा होता जेव्हा काळे केस म्हणजे सौंदर्य म्हटलं जायचं. पण आता बदलत्या परिस्थितीनुसार, आपण आपल्या केसांचे रंगदेखील बदलू लागलो आहोत. तसंच केसांना हायलाईट करणं हा एक ट्रेंड बनला आहे. त्यासाठी आपण बऱ्याचदा प्रोफेशनल सलोनच्या फेऱ्याही मारत असतो. केसांना हायलाईट केल्यानंतर आपल्याला वापरण्यासाठी वेगळा शँपू आणि कंडिशनरदेखील देण्यात येतं. तसंच वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे सल्लेदेखील दिले जातात. केसांना हायलाईट करण्याची ही प्रक्रिया बऱ्याचदा आपल्याला भारीदेखील पडते. तसंच केमिकलमधील हे कलर्स तुमच्या केसांचं नैसर्गिक सौंदर्यदेखील कमी करू शकतात. पण मग आता तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे की, जर पार्लरमध्ये जायचं नाही तर मग केसांना नक्की हायलाईट कसं काय करायचं? तर तुम्हाला याचं उत्तर या लेखातून नक्कीच मिळेल. असे बरेच नैसर्गिक प्रकार आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्या केसांना हायलाईट करू शकता. तेदेखील कोणत्याही केमिकलचा वापर न करता. पण त्यापूर्वी हेअर कलर आणि हायलायटिंग याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
Table of Contents
- हेअर हायलायटिंग म्हणजे नेमकं काय? (What Is Highlighting?)
- नैसर्गिकरित्या केसांंना कसा रंग द्यावा (How To Highlight Hair Naturally?)
- कलर करण्याआधी तुमचा स्किन टोन कसा ओळखाल? (How To Know Your Skin Tone?)
- तुमच्या स्किन टोनसाठी कसा निवडाल रंग (How To Choose Colour For Your Skin Tone?)
- हेअर कलर करण्यापूर्वी ठेवा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात (Need To Know Things Before Hair Colour)
- केस हायलाईट करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies To Highlight Hair)
- रंग दिलेल्या केसांची काळजी कशी घ्यायची (How To Take Care Of Coloured Hair)
- केसांचा रंग अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Colour Last Longer)
- केसांना कलर करण्यासंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQs)
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
हेअर हायलायटिंग म्हणजे नेमकं काय? (What Is Highlighting?)
Shutterstock
हेअर हायलायटिंग अर्थात केसांना कलर करणं म्हणजे तुम्ही तुमच्या नैसर्गिक केसांच्या रंगाला काही प्रमाणात वेगळा रंग देणार असता.
- तुम्ही जर तुमच्या केसांना डार्क अर्थात गडद रंग देणार असाल तर त्याला लोलाईट्स (Low lights) असं म्हटलं जातं
हेअर कलर करताना तुम्ही केसांच्या मुळांपासून कलर करू नका - तसंच हेअर कलर वापरताना तुम्ही नक्की कोणत्या रंगाचा वापर करू इच्छिता हेदेखील निश्चित करा
- केसांना हायलाईट केल्यानंतर त्यांची काळजी घेणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं
- हेअर कलर केल्यानंतर तुम्ही त्यांची काळजी योग्यरित्या घेण्यासाठी व्यवस्थित वेळ काढू शकाल की नाही हेदेखील समजून घेणं आवश्यक आहे
- हायलायटिंग करणं तसं सोपं आहे पण त्याची काळजी घेणं कठीण आहे. त्यामुळे हेअर कलर केल्यानंतर त्याची योग्यरित्या काळजी घेता येईल की नाही हे आधी ठरवा
नैसर्गिकरित्या केसांंना कसा रंग द्यावा (How To Highlight Hair Naturally?)
Shuttetrstock
नैसर्गिकरित्या केसांना रंग देणं जास्त चांगलं आहे. कारण त्यामुळे केसगळती अथवा केस पुन्हा लवकर पांढरं होणं यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. तसंच केसांचा नैसर्गिक रंगही टिकून राहतो. त्यासाठी तुम्ही कोरा चहा, मेंदी अर्थात हिना यासारख्या गोष्टींचा वापर करू शकता. तुम्ही नैसर्गिक रंग केसांना देण्यासाठी कोरा चहा अथवा कॉफी तयार करून केसांना त्याचं पाणी काही वेळापर्यंत लाऊन ठेवा आणि नंतर नॉर्मल शँपूने तुमचे केस स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक हायलाईट्स मिळतात. तसंच तुमचे केस नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आणि मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. शिवाय तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागत नाही आणि पार्लरमध्ये जाऊन जितके पैसे खर्च होतात त्याच्या तुलनेत जास्त खर्च होत नाही.
लांब घनदाट केस हवे असतील तर टाळा ‘या’ चुका
हीना अर्थात मेंदीसह द्या केसांना नैसर्गिक रंग (Highlight Your Hair With Heena Mehndi)
Shutterstock
हीना अर्थात मेंदी केसांना कलर करण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. यामुळे केसांना रंग येतो असं नाही तर केसांना उत्तम पोषण देण्यासाठीही याचा उपयोग होतो. पाहूया आपण मेंदीचा उपयोग केसांसाठी करण्यासाठी काय करावं.
- त्यासाठी सर्वात पहिले आपण केसांची उंची किती आहे आहे त्यानुसार काचेच्या बाऊलमध्ये मेंदी पावडर काढून घ्या
- तुमचे केस अधिक मोठे असतील तर तुम्हाला किमान 10 ते 12 चमचे मेंदी पावडर लागेल
- लहान केसांसाठी 4 ते 6 चमचे मेंदी पावडर खूप होईल
- लक्षात ठेवा मेंदी लावण्यापूर्वी तुमचे केस व्यवस्थित साफ असायला हवेत
- आता मेंदी पावडर घेऊन त्यात संतुलित प्रमाणात पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या
- ही पेस्ट जास्त जाडी बनवू नका अथवा जास्त पातळ करू नका
- तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चहा पावडरदेखील मिसळू शकता. यामुळे केसांना लालऐवजी ब्राऊन रंग मिळतो. त्यामुळे तुमचे केस ब्राऊन कलरने हायलाईट होतात.
- आता हे मिश्रण हाताने अथवा ब्रशच्या मदतीने केसांना लावा
- हाताने लावत असाल तर ग्लोव्हज घालायला विसरून नका अन्यथा मेंदीचा रंग हातावरदेखील चढेल
- मेंदी पूर्ण लाऊन झाल्यावर पूर्ण केस एकत्र घ्या आणि वर घेऊन त्यावर शॉवर कॅप लावा
- साधारण 2- 3 तास हे केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर केस शँपूने धुवा
- तुम्हाला हवं असल्यास, कंडिशनरदेखील लावू शकता
- मेंदीचा परिणाम तुमच्या केसांवर साधारण एक महिन्यांपर्यंत राहातो. याचा वापर महिन्यातून एकदाच करा अन्यथा तुमचे केस लाल दिसू लागतील
कलर करण्याआधी तुमचा स्किन टोन कसा ओळखाल? (How To Know Your Skin Tone?)
Shutterstock
केसांना परफेक्ट कलर देण्यासाठी तुमचा नैसर्गिक केसांचा रंग आणि स्किन टोन जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरच तुमच्या त्वचेवर नक्की कोणता हेअर कलर चांगला दिसू शकेल याचा योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता. आपल्यापैकी काही जणांची त्वचा ही कूल टोन्ड असते ज्याचे अंडरटोन्स हे निळे अथवा ब्राऊन असतात. तर काही वॉर्म टोन्ड असतात ज्याचे अंडरटोन्स हे केशरी अथवा पिवळे असतात. तुमच्या हातावर पिवळसरपणा दिसून येत असेल तर तुमची त्वचा ही कूल टोन्ड आहे. जर हा पिवळसरपणा नीट दिसून येत नसेल तर तुमची त्वचा ही वॉर्म टोन्ड आहे. आपल्या शरीरात असणारं हिमोग्लोबिन आपली त्वचा कूल की वॉर्म टोन्ड आहे याचा निर्णय घेत असते. त्यामुळे यानुसार तुम्ही तुमच्या त्वचेवर कोणता रंग उठून दिसेल आणि कोणत्या रंगाचा हेअर कलर वापरून तुम्ही हेअर हायलाईट करू शकता हे कळू शकेल अथवा तुम्हाला त्याचा योग्य निर्णय घेता येईल.
केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी वापरा हेअर सीरम
तुमच्या स्किन टोनसाठी कसा निवडाल रंग (How To Choose Colour For Your Skin Tone?)
तुमच्या स्किन टोनसाठी नक्की कसा रंग निवडायचा हे कळत नसतं. तर त्यासाठी तुम्ही माहिती नक्की वाचा. तुम्ही तुमच्या स्किन टोनसाठी कसा रंग निवडायचा हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
- तुमचा कूल टोन्ड असेल तर तुमचं कॉम्प्लेक्शन हे सावळं आणि डार्क रंगाकडे झुकणारं आहे. त्यामुळे तुम्हाला ‘डार्क कूल’ असं म्हणता येईल. त्यासाठी तुम्ही अॅश – टोन्ड हेअर लाईट्स वापरून नैसर्गिक रंगाचा वापर तुमच्या केसांवर करू शकता.
- जर कूल टोन्डसह तुमची त्वचा उजळ असेल तर तुम्ही अॅश ब्लॉंड हेअर हायलाईट्सचा वापर करू शकता.
- तुम्ही जर वॉर्म टोन्ड असाल आणि तुमचं कॉम्प्लेक्शन सावळं अथवा डार्क असेल तर तुम्हाला ‘डार्क वॉर्म’ असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही रंग लावताना कॅरामल शेड्सचा वापर करणं उत्तम
- तुम्ही वॉर्म टोन्ड असून तुमचा रंग उजळ असेल अर्थात तुम्ही गोरे असाल तर तर तुम्ही न्यूट्रल गोल्ड हेअर हायलाईट्सचा वापर करू शकता
कलर करण्याआधी रिसर्च करणं गरजेचं (For Colour And Highlighting Research Is Necessary)
केसांना कलर करण्यापूर्वी त्याची योग्यरित्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. फॉईल हायलायटिंग हा सर्वात सोपा उपाय आहे. याशिवाय “बालेयाज” हा प्रकार जो पश्चिम देशांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे तोदेखील वापरता येतो. तसंच आजकाल कोणता रंग ट्रेंडमध्ये चालू आहे आणि तो रंग आपल्या स्किनवर कशाप्रकारे सूट करेल याचीदेखील इत्यंभूत माहिती करून घ्यायला हवी. यामुळे तुम्हाला अधिक चांगला लुक मिळू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. जर उदाहरणच द्यायचं झालं तर तुमचा रंग सावळा असेल आणि तुमच्या केसांवर जर हिरवा अथवा कोणताही निऑन रंगग लावला तर तो अजिबात चांगला दिसणार नाही. पण जर तुमचा रंग अधिक उजळ असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्राईट कलर्स नक्कीच वापरू शकता. तुमच्या त्वचेला कोणता रंग नक्की सूट होतोय याचा रिसर्च करणं अत्यंत आवश्यक आहे.
हेअर कलर करण्यापूर्वी ठेवा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात (Need To Know Things Before Hair Colour)
Shutterstock
कोणताही रंग तुम्ही तुमच्या केसांना लावण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पाहूया काय आहेत या गोष्टी
- कोणताही रंग हा तुमच्या केसांना कमजोर बनवतो. त्यामुळे हायलाईट्स करण्याआदी तुम्ही तुमच्या केसांची व्यवस्थित काळजी घ्या
- हेअर हायलाईट्स करण्याच्या आधी काही महिने केसांना तेल मालिश, हेअर स्पा अथवा हेअर मास्क यासारख्या स्वरूपात काळजी घेत राहायला हवी. कारण जेव्हा तुम्हाला हायलाईट्स करायचं असेल तेव्हा तुमचे केस निरोगी राहतील आणि रंगाचा परिणाम त्यावर चांगल्या स्वरूपात होऊ शकेल
- ज्या दिवशी तुम्ही तुमच्या केसांना रंग लावाल त्या दिवशी केसांवरअजिबात शँपूचा वापर करू नका आणि केस धुऊ नका. यामुळे तुमच्या केसांमध्ये अधिक गुंता होणार नाही आणि रंग टिकून राहण्यास मदत होईल
- सतत तुमच्या केसांवर रंगाचा उपयोग करू नका. त्यामुळे तुमचे केस कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांवर रंग लावताना काळजी घ्या.
- केसांसाठी नक्की कोणता रंग वापरायचा आहे हे निश्चित झाल्यावर तुमचे केस नक्की किती हायलाईट करायचे आहेत याचीदेखील तुम्हाला पूर्ण कल्पना असायला हवी. कमी करायचे आहेत की, पूर्ण अर्थात ग्लोबल करायचं आहे हे तुमचं तुम्ही नीट ठरवा
- हायलाईट करण्यापूर्वी नक्की आपण केवळ फॅशनसाठी करतोय की पांढरे केस लपवण्यासाठी करतोय हे ठरवून त्याप्रमाणे केसांना हायलाईट करा
वाचा – केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय
केस हायलाईट करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies To Highlight Hair)
घरच्या घरी तुम्हाला केस हायलाईट करता येतात. त्याची नक्की काय प्रक्रिया आहे आणि त्यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर करायचा हे आपण पाहूया –
Also Read Hair color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स
1. कॉफी पावडर (Coffee Powder)
Shutterstock
- केसांना तुम्हाला ब्राऊन रंग द्यायचा असेल तर तुम्ही कॉफी पावडरचा उपयोग करू शकता
- मेंदी पावडरमध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करा आणि त्यात पाणी मिक्स करा
- यामुळे तुमच्या केसांना सुंदर ब्राऊन रंग येईल आणि केसही मुलायम राहतील
2. बीट (Beat)
Shutterstock
- केसांना तुम्हाला जर बरगंडी (Burgundi) रंग यायला हवा असेल तर तुम्ही मेंदीमध्ये बीटाचा रस मिक्स करा
- केसांना रंग देण्यासह चांगलं कंडिशनर म्हणूनदेखील याचा उपयोग होतो.
3. दही आणि चहा पावडर (Yogurt And Tea Powder)
Shutterstock
- केसांना रेडिश ब्राऊन रंग द्यायचा असेल तर तुम्ही दही, लिंबू आणि चहा पावडरचा उपयोग करू शकता
- यासाठी मेंदीमध्ये थोडंसं दही, एक लिंबाचा रस आणि उकळलेल्या चहा पावडरचं पाणी मिसळा
- पूर्ण केसांना लावा आणि दोन तासानंतर पाण्याने केस धुवा
- केस सुकल्यावर केसांना तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी शँपूने पुन्हा धुवा
वाचा – पुण्यातील कोणते सलून हेअर कटसाठी चांगले आहे
4. लिंबू (Lemon)
Shutterstock
- लिंबामध्ये अनेक गुण असतात. त्यापैकी एक म्हणजे केसांना सुंदर रंग आणणं हादेखील आहे. केसांना चांगला रंग देण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता
- लिंबाचा रस केस हायलाईट करण्यासह केस मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त आहे
- एका स्प्रे बॉटलमध्ये कोमट पाणी भरा
- त्यामध्ये दालचिनी पावडर, लिंबाचा रस, संत्र्याचा रस आणि 3-4 थेंब कंडिशनर घालून नीट मिक्स करा
- तुम्हाला ज्या ठिकाणी हायलाईट करायचं आहे त्याठिकाणी कापसाच्या मदतीने स्प्रे करा
- रंग बदलण्यासाठी थोडा वेळ तुमच्या केसांवर ऊन येऊ द्या
- ऊनाच्या संपर्कात आल्यावर रंग बदलेल
5. गाजर (Carrot)
Shutterstock
- गाजराच्या रसाने तुम्हाला केसांना रेडिश शेड देता येते
- यासाठी काही गाजरांचा रस काढून घ्या
- पूर्ण केसांना रंग द्यायचा असेल तर आधी केस धुवून घ्या
- काही भागच रंगवायचा असेल तर तितकाच भाग धुवा
- आता हा रसस कमीत कमी एक तास तुमच्या केसांवर लावून ठेवा
- थंड पाण्याने नंतर धुवा
- एक ते दोन वेळा असं केल्यावर तुमच्या केसांना नैसर्गिक रेडिश रंग मिळेल
रंग दिलेल्या केसांची काळजी कशी घ्यायची (How To Take Care Of Coloured Hair)
केसांना हायलाईट केल्यानंतर त्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे. तुम्ही केसांची काळजी जशी आधी करत होतात त्याहीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते असं तुम्हाला वाटतं. पण किमान तितकी तरी काळजी घेणं आवश्यक आहे.
- कमीत कमी आठवड्यातून एकदा केसांना डीप कंडिशन करून घ्या
- असे हेअर प्रॉडक्ट्स निवडा जे कलर फ्रेंडली असतील अर्थात जे विशेषतः कलर केलेल्या केसांसाठीच बनवण्यात आले असतील
- केसांना रंग लावल्यानंतर सतत केस धुत राहू नका त्यामुळे केसांचा रंग लवकर निघून जातो.
- केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. त्यामुळे केसांचा रंग जास्त काळ टिकून राहातो
- केसांना हायलाईट आणि स्ट्रेटनिंग एकाच वेळी करू नका. या दोन्ही गोष्टीदरम्यान किमान दीड महिन्याचं तरी अंतर राखणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा, केस कोरडे होतात
केसांचा रंग अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Colour Last Longer)
- केसांना Hair color करण्याआधी शॅंपू करा. कारण जर तुमचे केस स्वच्छ नसतील तर त्यावर हेअर कलर व्यवस्थित बसणार नाही. जर तुम्ही केसांना शॅंपू न करता अस्वच्छ केसांवरच कलर लावला तर तो जास्त दिवस नक्कीच टिकणार नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.
- Hair color करण्यापूर्वी केसांना मेंदी लावू नका. कारण मेंदीच्या रंगावर Hair color लावल्यास काहीच फायदा होणार नाही. रंग व्यवस्थित न चढल्यामुळे तो जास्त काळ टिकणं शक्य होणार नाही. मेंदी लावलेली असल्यास, मेंदीचा रंग पूर्णपणे उतरू दया मगच केसांना Hair color लावा.
- हेअर कलर लावल्यावर केस धुताना अती गरम पाण्याचा वापर करू नका. कारण अती गरम पाण्यामुळे तुमचे केस खराब होतात. शिवाय केसांचा रंगदेखील लवकर उतरतो. यासाठीच केसांना रंग लावल्यावर शक्य असल्यास थंड अथवा कोमट पाण्यानेच धुवावे.
- केस धुण्यासाठी Hair color protection shampoo चा वापर करा. असं केल्यास तुमच्या केसांचा कलर नक्कीच जास्त काळ टिकू शकतो. मात्र लक्षात ठेवा कलर केल्यावर केसांवर फार हार्श अथवा अॅंटि डॅंड्रफ शॅंपू मुळीच करू नका. यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकतं.
- केसांना कलर केल्यावर त्यांच्यावर योग्य हेअर कंडिशनर लावणं गरजेचं असतं. कंडिशनर केसांचा पोत राखण्यासाठी आणि त्यांचे पोषण करण्यासाठी महत्त्वाची असतात.
- आठवड्यातून एकदा केसांवर तेल लावून मालिश जरूर करा. केस मजबूत होतील आणि गळणार नाहीत. शिवाय यामुळे तुमच्या केसांवरील रंगदेखील जास्त दिवस टिकण्यास मदत होईल.
केसांना कलर करण्यासंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQs)
केसांना साधारण किती दिवसांच्या फरकाने कलर करावा?
केसांना तुम्ही साधारण एक महिन्याच्या फरकाने कलर केलात तरी चालतो. पण तुमच्या केसांवर आधीचा रंग अथवा मेंदी असेल तर तुम्ही रंग करणं योग्य नाही.
केसांचा मुलायमपणा रंगामुळे निघून जातो का?
तुम्ही सतत केसांवर वेगवेगळ्या रंगाचे प्रयोग करत राहिलात तर तुमच्या केसांचा नैसर्गिक मऊपणा निघून जातो. त्यातील नैसर्गिक तेल कमी होतं. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी सतत रंगाचा वापर करू नये. केसांना श्वास घेण्यासाठी काही काळ जागा ठेवावी.
केसांना कोणता कलर द्यायचा हे कसं ठरवावं?
तुमचा स्किन टोन कोणता आहे यावरून तुमच्या केसांना कोणता रंग द्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. तसंच तुमचे केस कोणत्या रंगाचे आहेत यावरूनही तुम्ही केसांना रंग देऊ शकता.