Combination Skin

चेहऱ्यावर काहीही Try करण्यापूर्वी जाणून घ्या आपला Skin Type

Dipali Naphade  |  Jun 17, 2019
चेहऱ्यावर काहीही Try करण्यापूर्वी जाणून घ्या आपला Skin Type

बऱ्याचदा लोकांना तुम्ही आपापल्या Skin Type बद्दल बोलताना ऐकलं असेल. काही जणींची त्वचा ही तेलकट अर्थात ऑईली असते तर काहींची त्वचा कोरडी असते. तुम्ही बऱ्याचदा आपल्या स्किन टाईपनुसार बऱ्याच ठिकाणी स्किन केअर रूटीन (Skin care routine) जाणून घेतलं असलं. पण तरीही बऱ्याच जणांना आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारची आहे हेदेखील माहीत नसतं. आजकाल तर स्किन केअर प्रॉडक्ट्स (फेस वॉश, मॉईस्चराईजर, सनस्क्रिन इत्यादी) आणि मेकअप उत्पादनंदेखील स्किन टाईपनुसार बाजारात उपलब्ध असतात. असं असताना जर तुम्ही चुकीचे उत्पादन वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या त्वचेला अधिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य स्किन केअर रूटीन आणइ योग्य उत्पादन वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या त्वचेचा टाईप माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमचा स्किन टाईप जाणून घेण्यासाठी मदत करणार आहोत.

तुमची स्किन टाईप जाणून घेण्यासाठी मदत करतील या Tests –

टिश्यू पेपर Test (Tissue Paper Test)

Shutterstock

पहिल्या टेस्टसाठी काही टिश्यू पेपर आणि तुमच्या सुंदर चेहऱ्याची गरज आहे.

सर्वात पहिले तुम्ही तुमचा चेहरा mild cleanser ने धुऊन घ्या. चेहऱ्यावरील सर्व धूळ आणि अधिक तेल निघून जाईल इतका व्यवस्थित धुऊन घ्या. जास्त चेहरा धुऊ नका आणि कोणत्याही वेगळ्या क्लिन्झर अथवा फेस वॉश (ऑईल फ्री फेस वॉश) याचा वापर करू नका. चेहरा धुतल्यावर एक तास वाट पाहा. मात्र चेहऱ्याला अजिबात हात लावू नका. तसंच यादरम्यान एसी अथवा उन्हात जाऊ नका. नॉर्मल तापमानात बसा. असं केल्यामुळे नैसर्गिक स्वरूपात तुमची त्वचा राहील त्यामुळे तुमच्या त्वचेचा योग्य टाईप शोधून घेणं सोपं जाईल. तुम्ही ही टेस्ट सकाळीच उठल्यानंतर करू शकता. पण लक्षात ठेवा की, सकाळी काम सुरु करण्यापूर्वी पहिले ही टेस्ट करून घ्या जी अगदी नैसर्गिक स्वरूपात तुम्ही करू शकता.

मिरर Test (Mirror Test)

Shutterstock

ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ आरसा (Mirror) ची गरज आहे.

ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला टिश्यू पेपर टेस्टप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. फक्त टिश्यूच्या जागी तुम्हाला आरशाचा वापर करायचा आहे. आरसा तुम्ही तुमच्या कपाळावर, नाकावर आणि गालावर प्रेस करा. तुमच्या चेहऱ्याचा प्रत्येक भाग हा आरशाला टेकायला हवा. आरसा काही वेळ तुम्ही तुमच्या त्वचेवर प्रेस करून ठेवा आणि त्यानंतर स्किन गाईड वाचा आणि आपला स्किन टाईप जाणून घ्या. या टेस्टमध्ये टिश्यू पेपरऐवजी आरसा घेऊन तुमची तेलकट, कोरडी आणि लालसर त्वचा जाणून घेऊ शकता.

आपला स्किन टाईप कसा ओळखावा – How to know your Skin Type in Marathi

सामान्य त्वचा (Normal Skin)

Shutterstock

कोणत्याही टिश्यू पेपर वर ऑईल अथवा ड्राय फ्लेक्स नसतील तर तुमच्या त्वचा सामान्य अर्थातच नॉर्मल स्किन आहे. याचा अर्थ असा की, या टिश्यूवर तुम्हाला तेल नाही दिसणार आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे डाग दिसणार नाहीत. अशा त्वचेवर पोअर्स दिसत नाहीत आणि त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते. या टाईपच्या त्वचेला जास्त काळजी करण्याची गरज नसते आणि त्याशिवाय स्किन केअर रूटीन जे नेहमी केलं जातं ते यासाठी पुरेसं आहे. पण बऱ्याच कमी लोकांची त्वचा इतकी नॉर्मल असते. तुमच्याजवळ अशी त्वचा असेल तर तुम्ही नक्कीच नशीबवान आहात.

तेलकट त्वचा (Oily Skin)

Shutterstock

तुमच्या टिश्यूवर जर ऑईल असेल विशेषतः गाल, नाक आणि कपाळाच्या ठिकाणी तेल जमलेलं दिसलं तर तुमची त्वचा तेलकट आहे हे समजा. या स्किन टाईपमध्ये पोअर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि जास्त तेलामुळे त्वचा चमकते. पण त्वचेवर पिंपल्स येण्याचं हे मुख्य कारण असतं. अशी त्वचा नेहमी साफ ठेवणं अत्यंत गरेजचं आहे, जेणेकरून तुमच्या त्वचेवर तेल जमा होऊ नये. ऑईल फ्री स्किन प्रॉडक्ट्सचाच नेहमी तुम्ही वापर करणं गरजेचं आहे.पण हे खरं आहे की, तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना सुरकुत्या लवकर येत नाही आणि त्यांना एजिंगचा प्रॉब्लेमही होत नाही.

कोरडी त्वचा (Dry Skin)

Shutterstock

तुमच्या टिश्यूवर जर डेड स्किनचे फ्लेक्स येत असतील तर तुमची त्वचा कोरडी आहे हे लक्षात ठेवा. धुतल्यानंतरही जर तुमची त्वचा ओढली जात असेल अथवा टाईट दिसत असेल. तर तुमची त्वचा कोरडी आहे. या त्वचेवर छोटे छोटे पोअर्स असतात. या त्वचेसाठी मॉईस्चरची खूपच आवश्यकता असते. तसंच यासाठी मॉईस्चराईज्ड फेस मास्क आणि क्रिम्सचादेखील वापर करा आणि तुमची त्वचा तुम्ही नेहमी मॉईस्चराईज करा.

कॉम्बिनेशन त्वचा (Combination Skin)

Shutterstock

तुमच्या T-zone अर्थात नाक आणि कपाळावर जर तेल जमा होत असेल आणि बाकी ठिकाणी जर ड्राय फ्लेक्स असतील तर तुमची त्वचा ही कॉम्बिनेशन स्किन आहे. हा स्किन टाईप दोन तऱ्हेचा असतो, एक म्हणजे ऑईली नॉर्मल आणि ऑईली ड्राय. अशा त्वचेवर वेगवेगळ्या तऱ्हेचे स्किन प्रॉडक्ट्स वापरणं गरजेचं आहे. तेलकट भागावर ऑईल फ्री मॉईस्चराईजर आणि कोरड्या अथवा नॉर्मल त्वचेवर मॉईस्चराईजर लावा. चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर स्किन टाईपच्या हिशेबाने नीट ट्रीट करा. बऱ्याच महिलांचा हाच स्किन टाईप असतो.

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin)

Shutterstock

संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) ही सर्वात जास्त त्रासदायक त्वचा असते. ही अडचण कोरड्या आणि तेलकट त्वचेच्या दोन्ही बाबतीत दिसून येते. अशा त्वचेच्या बाबतीत टिश्यूवर ड्राय फ्लेक्स येतात, त्वचा टाईट होते आणि रेडनेस, खाज आणि इरिटेशन असा त्रास सुरु होतो. वातावरणात बदल झाल्यावर आणि ब्युटी उत्पादनाच्या अलर्जिक रिअॅक्शन अशा नेहमी या त्वचेवर होत असतात. अशी त्वचा अतिशय डेलिकेट असून या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते.

हेदेखील वाचा – 

त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया

त्वचा मॉश्चराईझ करण्यासोबत बॉडीलोशनचे आहेत हे आणखी ‘7’ फायदे

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान

Read More From Combination Skin