DIY सौंदर्य

चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी शिळ्या पोळीपासून तयार करा फेस स्क्रब

Trupti Paradkar  |  Nov 26, 2020
चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी शिळ्या पोळीपासून तयार करा फेस स्क्रब

हिवाळा असो वा उन्हाळा त्वचेवर धुळ, माती, प्रदूषणाचा थर सतत बसत असतो. एवढंच नाही तर प्रखर सुर्यकिरणांमुळे त्वचेवर टॅनिंग आणि डेड स्किनमुळे राठपणा निर्माण होतो. त्वचेवरील हा राठपणा कमी करून त्वचा तजेलदार करण्यासाठी चेहऱ्यावर नियमित स्क्रबरचा वापर करायला हवा. कारण नुसतं मॉईस्चराईझर लावून त्वचा मऊ होणार नाही. यासाठी आधी त्वचा मुळापासून स्वच्छ करणं गरजेचं असतं. स्किन केअर रूटिनमध्ये यासाठीच स्क्रबिंग करण्यावर जास्त भर दिला जातो. तुमच्या त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी जर तुम्ही एखादा बेस्ट फेस स्क्रब घरीच तयार करण्याचा विचार करत असाल तर हा फेस स्क्रब तुमच्या नक्कीच फायद्याचा आहे. यासाठी तुम्ही घरातील शिळ्या पोळीचा (चपाती) वापर करू शकता. स्वयंपाक घरातील शिळी पोळी वापरून चेहऱ्यासाठी फेस स्क्रब कसा तयार करायचा हे अवश्य जाणून घ्या.

शिळ्या पोळीपासून कसा तयार कराल स्क्रब –

फेस स्क्रबसाठी लागणारं साहित्य –

फेस स्क्रब तयार करण्याची कृती –

फेस स्क्रबचा वापर कसा कराल –

Instagram

या फेस स्क्रबचा असा होईल फायदा –

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर पोळीतील घटकांमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा एक्फोलिएट होईल. हळदीमुळे तुमच्या  त्वचेच्या समस्या कमी  होण्यास मदत होईल कारण  हळद अॅंटि बॅक्टेरिअल आहे. शिवाय या फेसे स्क्रबमध्ये  मलई अथवा दुधाच्या सायीचादेखील वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने मऊ  आणि मुलायम होईल. त्वचेवरील डेड स्किन, ब्लॅकहेडस्, धुळ, माती, प्रदूषण कमी झाल्यामुळे त्वचेला पुरेसं ऑक्सिजन मिळेल आणि त्वचेचं रक्ताभिसरणही सुधारेल. ज्याचा परिणाम तुमची त्वचा नैसर्गिक रित्या ग्लो करू लागेल. हा फेस स्क्रब सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त  आहे. त्यामुळे जर तुमची त्वचा तेलकट  असेल तरी तो तुम्ही वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि पिंपल्सची समस्यादेखील कमी होईल.  म्हणूनच त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक पद्धतीने चमकदार करण्यासाठी घरच्या घरी हा साधा आणि सोपा उपाय जरूर करून पाहा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

यंदा हिवाळ्यात ट्राय करा या बेस्ट कोल्ड क्रिम (Best Cold Creams For Face In Marathi)

हिवाळ्यात करा केळ्याचे फेशियल आणि करा कोरडेपणा दूर

त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्याच्या सोप्या पद्धती

Read More From DIY सौंदर्य