DIY सौंदर्य

व्हजायनल हेअर स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय (How To Remove Pubic Hair At Home In Marathi)

Dipali Naphade  |  Oct 15, 2020
How To Remove Pubic Hair At Home

व्हजायनल हेअर (pubic hair) स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाय असतात. खरं तर व्हजायनल हेअर हे योनीच्या सुरक्षेसाठी असतात. पण बरेचदा मासिक पाळी असताना या केसांचा त्रासही होतो. गुप्तांगावरील केस स्वच्छ करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी काय काय घरगुती उपाय करता येऊ शकतात याच्या काही सोप्या टिप्स आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. बऱ्याचशा महिलांना आपल्या योनिवरील केस काढून टाकणे योग्य वाटते. पण काही जणांना रेझर अथवा अन्य उपाय करणे योग्य वाटत नाही. मग अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून व्हजायनल हेअर स्वच्छ करू शकता. हे उपायदेखील अत्यंत सुरक्षित असून तुम्हाला अन्य उपायांच्या तुलनेत याची चिंता करण्याची गरज भासत नाही. जाणून घेऊया काय आहेत घरगुती उपाय. 

गुप्तांगावरील केस काढणे घरगुती उपाय (How To Remove Pubic Hair At Home In Marathi)

मुळात व्हजायनल हेअर (गुप्तांगावरील केस) स्वच्छ करण्यासाठी रेझर, क्रिम अशा अनेक गोष्टींचा वापर करण्यात येतो. पण बऱ्याचदा क्रिमने होणारी जळजळ अथवा रेझरमुळे तो भाग कापण्याची शक्यता अथवा भीती असते. मग अशावेळी व्हजायनल हेअर स्वच्छ  करण्यासाठी घरगुती उपाय करणं योग्य ठरतं. असे कोणकोणते घरगुती उपाय आहेत ते आपण पाहूया. यासाठी तुम्ही MyGlamm च्या वाईपआऊटचाही वापर करून घेऊ शकता. 

 

 

साखर, लिंबू आणि मध

shutterstock

 

तुम्हाला नैसर्गिक स्वरूपात जर व्हजायनल हेअर स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही साखर, लिंबू आणि मधाचा वापर करू शकता. नैसर्गिक स्वरूपातील हे मिश्रण गुप्तांगावरील केस काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. हा सर्वात उत्तम घरगुती उपाय आहे. हे केसांना नैसर्गिकरित्या कमजोर करण्याचे काम  करते. 

कसा करावा वापर

 

मध आणि लिंबू

योनीची माहिती सर्वांना असते, ही अत्यंत संवेदनशील जागा आहे. त्यामुळे या भागावर केस काढणं हेदेखील तितकंच संवेदनशील आहे. बऱ्याचदा या ठिकाणी पुरळ येण्याची अथवा फोड येण्याची शक्यता असते. पण व्हजायनल हेअर काढताना असे काही होऊ नये यासाठी तुम्ही लिंबाचा उपयोग करून घेऊ शकता. लिंबामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हे त्वचेची सुरक्षा राखण्यास मदत करते. 

कसा करावा वापर

 

कोरफड आहे गुणकारी

Shutterstock

 

आपल्याला आतापर्यंत सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफड आणि त्याच्या जेलचा वापर करण्यात येतो हे माहीत आहे. पण योनिचे केस अर्थात व्हजायनल हेअर काढण्यासाठीदेखील याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. मुळात कोरफड हे अत्यंत गुणकारी असून त्वचेला यामुळे कोणतीही हानी पोहचत नाही. तसंच तुमची त्वचा तितकीच नितळ आणि चांगली राखण्यासही कोरफड मदत  करते. त्यामुळे Pubic Hair काढण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय आहे आणि तितकाच चांगला उपायदेखील आहे. 

कसा करावा वापर

 

बेसनही ठरते फायदेशीर

 

बेसन अर्थात चण्याच्या पिठाचाही तुम्ही यासाठी वापर करून घेऊ शकता. जसे चेहऱ्यासाठी उटणं म्हणून बेसनाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे गुप्तांगावरील केस काढणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करून घेऊ शकता. नैसर्गिकरित्य व्हजायनल हेअर काढण्यासाठी असणारा हा घरगुती उपाय थोडा जास्त वेळ घेतो. मात्र अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि त्वचा अत्यंत व्यवस्थित ठेवण्यासही बेसन मदत करते. त्यामुळे याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता.  

कसा करावा वापर

 

अंड्याचा करा वापर

 

अंड्याचा आणि त्यासह कॉर्नस्टार्चचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने घरतल्या घरात व्हजायनल हेअर काढून टाकू शकता. केस काढून टाकण्यासाठी नैसर्गिक घटक अंड्यामध्ये आढळतात. तसंच अंडे हे त्वचेला पोषण देते आणि मॉईस्चराईजही करते. हा घरगुती उपाय अधिक परिणामकारक करण्यासाठी यामध्ये कॉर्नस्टार्च मिक्स करून त्याची पेस्ट करावी आणि त्याचा वापर करावा. व्हजायनल हेअर कोणताही त्रास न होता पटकन गुप्तांगावरील केस काढणे गरजेचे आहे. गुप्तांगावरील केस व्यवस्थित काढण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. 

कसा करावा वापर

 

पपईचा करा असा वापर

Shutterstock

 

त्वचा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी नेहमीच पपईचा वापर केला जातो. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही पपईचा वापर करण्यात आलेले दिसून येते. त्याचप्रमाणे तुम्हाला व्हजायनल हेअर काढण्यासाठीही पपईचा वापर करून घेता येतो. विशेषतः कच्च्या पपईचा वापर करावा. याचा वापर केल्याने केस पुन्हा पटकन येत नाहीत. याचा परिणाम जास्त चांगला आहे. पपईमुळे त्वचा अधिक चांगली राहाते आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम त्वचेवर होत नाही. तसंच पपई त्वचा अधिक सुरक्षित ठेवते. ज्यांना जास्त त्रास सहन करता येत नाही त्यांनी हा उपाय नक्की करून पाहा.

कसा करावा वापर

 

हळदीचे खोड

 

हळदीचे खोड व्हजायनल केस काढून टाकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. हे लावल्यानंतर व्हजायनल भाग काही काळासाठी पिवळा होतो हे जरी खरे असले तरीही याचा परिणाम अधिक चांगला आहे. कायमस्वरूपी जर व्हजायनल हेअर अर्थात Pubic hair चा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही हळदीच्या खोडाचा वापर करून घेऊ शकता. याबरोबर तुम्ही कच्च्या पपईचादेखील वापर करून घेऊ शकता.

कसा करावा वापर

 

तिळाचे तेल

Shutterstock

 

व्हजायनल हेअर पटकन काढून टाकायचे असतील तर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करणे हा योग्य घरगुती उपाय आहे. नियमित तिळाच्या तेलाचा वापर केल्यास व्हजायनल हेअर कायमचे निघून जाण्यास मदत मिळते. रेझर अथवा शेव्हिंगने होणारी जळजळ अथवा येणारी खाज या सगळ्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर तिळाच्या तेलाचा वापर हा उत्तम उपाय आहे. मात्र याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही व्हजायनल हेअर स्वच्छ करून नीट धुवायला हवेत. त्यानंतरच तुम्ही याचा प्रयोग करा. यासह तुम्ही कच्च्या पपईचा रस मिसळा आणि त्याचा वापर करा. 

कसा करावा वापर

 

लेंटिल आणि बटाट्याची पेस्ट

 

व्हजायनल हेअर काढण्यासाठी घरगुती उपायामध्ये लेंटिल आणि बटाट्याची  पेस्ट याचा वापर हादेखील एक चांगला उपाय आहे. बटाटा हा त्वचेला उजळपणा देतो आणि त्वचेवरील काळपटपणा घालविण्यासाठी उपयोगी ठरतो. बऱ्याचदा व्हजायनल भागाची नीट स्वच्छता राखली गेली नाही तर त्यावर काळपटपणा येतो. त्यामुळे अशावेळी केस काढताना तुम्ही या मिश्रणाचा वापर केल्यास, त्वचा अधिक स्वच्छ  राहते आणि उजळतेदेखील. मुळात याचा वापर करून कोणताही दुष्परिणाम होत नाही. तसंच याचा वापर करणंही अत्यंत सोपं आहे. 

कसा करावा वापर

 

अंडे आणि साखर

Shutterstock

 

कदाचित हे कॉम्बिनेशन तुम्हाला थोडे वेगळे वाटू शकते. पण अंडे आणि साखर यामुळे व्हजायनल हेअर काढणे सोपे होते. साखरेचा चिकटपणा हा तुम्हाला वॅक्सिंगप्रमाणे फील देतो आणि अंड्यामुळे त्वचेवर ताण येत नाही आणि केस पटकन निघण्यास मदत होते. तसंच अंडे हे त्वचेसाठी नेहमीच उत्तम काम करते हे सर्वांनाच माहीत आहे.  

कसा करावा वापर

 

व्हजायनल हेअर शेव्ह करताना घ्यायची काळजी (Care Tips While Removing Pubic Hair)

Shutterstock

घरगुती उपायांनी जरी व्हजायनल हेअर स्वच्छ करायचे असतील तर काही प्रमाणात शेव्ह करावे लागते. त्यासाठी काय काळजी घ्यायची हेदेखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

शेव्ह करण्यापूर्वी ट्रिम करा (Trim Before Shaving): ट्रिम करताना त्वचेच्या अधिक जवळ जाऊ नका कारण चुकून त्वचा कापण्याची शक्यता असते. तसंच व्यवस्थित पाहण्यासाठी हँड मिररचा वापर करा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की त्वचेला नुकसान पोहचत आहे तेव्हा शेव्ह करणे बंद करा. व्हजायनल हेअर केवळ कमी करणे हेच तुमचे लक्ष्य आहे हे लक्षात ठेवा. अगदी मुळापासून कापू नका. 

गरम पाण्याची आंघोळ (Warm Shower): व्हजायनल हेअर शेव्ह करण्यापूर्वी महिलांनी गरम पाण्याची आंघोळ करावी. विशेषज्ज्ञांनुसार शरीरावर केसांपेक्षा व्हजायनल हेअर हे अधिक जाड आणि कडक असतात. त्यामुळे त्यांना नरम करण्यासाठी 5-7 मिनिट्स गरम पाण्याने भिजू देणं योग्य आहे. गरम पाणी आपली त्वचा नरम करण्याचे काम करते आणि रोमछिद्रांनाही आराम मिळतो. यामुळे शेव्हिंग करणे सोपे होते. 

शेव्हिंग क्रिम वा जेलचा करा वापर (Use Shaving Cream Or Gel): व्हजायनल हेअर शेव्ह करण्यासाठी तुम्ही मॉईस्चराईंजिंग शेव्हिंग क्रिम अथवा जेलचा वापर करावा. पण हे जेल अथवा क्रिम योनीमध्ये जाणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्यायला हवी. केस असणाऱ्या ठिकाणीच हे क्रिम लावा आणि मग शेव्ह करा. शेव्हिंग क्रिमच्या जागी कंडिशनरचा वापर करू शकता. मात्र शँपूचा वापर करू नये.  

योग्य दिशेने  करा शेव्ह (Direction): शेव्हिंग क्रिम  लावल्यानंतर तुम्ही केसांच्या वाढीच्या दिशेने रेझरचा उपयोग करा. तसंच शेव्ह करताना सतत रेझर धुवा. अन्यथा केस अडकण्याची शक्यता असते. तुमची त्वचा सोलली जाऊ नये यासाठी योग्य काळजी घ्या आणि अगदी हलक्या हाताने शेव्ह करा. 

त्वचेची स्वच्छता (Skin Cleaning): व्हजायनल हेअर शेव्ह केल्यानंतर तुम्ही त्याची व्यवस्थित स्वच्छता राखायला हवी. चुकूनही कापल्यास, व्यवस्थित धुऊन घ्यावे. त्यावर कोणतेही आपल्या मनाने औषध न लावता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्वचा जपावी.  

बेबी ऑईल अथवा कोरफड वापरावी (Use Baby Oil Or Aloe Vera): बऱ्याचदा शेव्हिंग केल्यानंतर पुरळ येण्याची शक्यता असते. पण बेबी ऑईल पुरळमुक्त त्वचा राखण्यास मदत करते. तर संवेदनशील त्वचेसाठी कोरफड जेल उपयुक्त आहे. त्यामुळे शेव्हिंग झाल्यावर बेबी ऑईल अथवा आफ्टरशेव्ह मॉईस्चराईजरचा उपयोग करा आणि शेव्ह केल्यावर तुम्ही साधारण आठवड्यानंतर व्हजायनल हेअर काढून टाकण्याचा प्रयत्न करा. 

स्वच्छतेसाठी तुम्ही MyGlamm चे वाईपआऊटदेखील वापरू शकता.  

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. व्हजायनल हेअर काढण्यासाठी उत्तम घरगुती उपाय कोणता?

व्हजायनल हेअर काढण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. मात्र साखर, लिंबू आणि मधाचा वापर हा उत्तम आणि अतिशय सोपा उपाय आहे.  

2. घरातल्या घरात Pubic hair कायमस्वरूपी घालवण्याचा काय उपाय आहे?

घरातल्या घरात तुम्ही अनेक वस्तूंचा वापर करून व्हजायनल हेअर काढू शकता. त्यापैकी वरील बरीच माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल.  अंडी, साखर, लिंबू, मध, कच्ची पपई, कोरफड, बेसन याचा वापर तुम्ही करू शकता. 

3. व्हजायनल हेअर काढण्यासाठी वीटचा वापर करू शकतो का?

याचा वापर करणं थोडंसं इन्फेक्शन देणारं ठरू शकतं. यामुळे त्वचेवर रॅश येऊन त्रास होण्याचीही शक्यता असते.  त्यामुळे सहसा न वापरणं योग्य आहे. 

4. व्हजायनल हेअर काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा कसा वापर करावा?

सर्वात पहिल्यांदा स्वच्छ बाऊल घेऊन त्यात बेकिंग सोडा  आणि पाणी घालून मिक्स करून पेस्ट बनवावी. नंतर ही पेस्ट व्हजायनल हेअरला लावावी आणि सुकल्यावर धुवावे.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य