साड्यांची महाराणी म्हणजे ‘पैठणी’ प्रत्येक महिलेच्या कपाटात एक तरी पैठणी अगदी हमखास असते. पैठणी हे महावस्त्रच असं आहे की, त्यांच्या प्रेमात पडल्यावाचून राहता येणार नाही. त्यामुळेच प्रत्येकाच्या कपाटात एक तरी पैठणी साडी अगदी हमखास असते. एखादी पैठणी जुनी झाली की, लगेचच काढून टाकण्याची इच्छा होत नाही आणि तिचा रंग किंवा ती जुनी झाल्यामुळे नेसण्याचीही इच्छाही होत नाही. तुमच्याकडे असलेल्या पैठणीमुळे तुम्ही ही अशा द्विधा मन:स्थितीत असाल तर तुम्ही देखील जुन्या पैठणीला एक नवी झळाळी देऊ शकता. पैठणीपासून तुम्हाला काय काय बनवता येईल याच्या काही आयडियाज आम्ही शोधल्या आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करा.
पैठणी जॅकेट
हल्ली बाजारात रेडिमेड असे पैठणीचे जॅकेट मिळते. पण तुमच्याकडे आधीच तुमच्या आवडीची पैठणी असेल तर तुम्ही तुमच्यासाठी ड्रेस किंवा एखाद्या इंडो-वेस्टर्न लुकला साजेसे होईल असे जॅकेट अगदी हमखास घालू शकता. स्लिवलेस किंवा फुल हँड असे हे जॅकेट्स फारच रिच दिसतात. पैठणीचा मुख्यपदावरील मोर या जॅकेटमध्ये वापरण्यात येते. आता तुम्ही जॅकेटच कोणता पॅटर्न निवडणार आहात. त्यानुसार मग तुम्ही जॅकेट्स शिवू शकता.
टिप: एखादा अनारकली ड्रेस, सिल्कचा कुडता किंवा स्ट्रेट फिट पँटवर थ्री फोर्थ जॅकेट असा लुक करुन तुम्हाला हे जॅकेट्स वापरता येतात. यासाठी एक योग्य टेलर आणि पॅटर्नची निवड करणे फारच गरजेचे असते.
पैठणी दुपट्टा
एखाद्या ड्रेसवर हेव्ही आणि सुंदर ओढणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पैठणीचा दुपट्टा वापरायलाच हवा. पैठणीच्या काठाचा आणि पदरावरील मोराचा उपयोग करुन ती शिवली जाते. पैठणीचा हा दुपट्टा तुम्हाला एखाद्या प्लेन ड्रेसवर खूपच उठून दिसतो. पैठणीची ही ओढणी तुम्ही नीट जपली तर तुम्हाला जास्त काळासाठी टिकवता येते. तुम्ही त्याला हवा तसा लुक देऊ शकता. आता हा दुपट्टा कोणत्या रंगाच्या शेडमध्ये आहे ते पाहून मग तुम्ही तुमच्या ड्रेसची निवड करा. तरच ते चांगले दिसतात.
टिप : पैठणी साडीचा जो रंग असतो. त्याचा शेड हा पदरामध्येही असतो. त्यामुळे तुम्ही त्या रंगाला जाईल असा ड्रेसच निवडा.
पैठणीचा ड्रेस
खूप जण हल्ली पैठणीचा ड्रेस बनवतात. पैठणी ड्रेस हे खूपच डिमांडमध्ये आहेत. नव्या पैठणीपासूनही अशाप्रकारे पैठणीचा ड्रेस बनवला जातो. तुम्हीही अगदी तसाच पैठणीचा ड्रेस बनवून घेऊ शकता. एखादा गाऊन, अनारकली ड्रेस यामध्ये तुमची पूर्ण पैठणी वापरली जाते. त्यामुळे ती पैठणी व्यवस्थित वापरली जाते.जर तुम्हालाही काही वेगळं आणि ट्रेडिशनल हवं असेल तर तुम्ही पैठणीपासून अशा प्रकारे ड्रेस बनवून घेऊ शकता. लग्नसराईच्या दिवसात महाराष्ट्रीयन ब्रायडल साड्यांसोबत हेही ट्रेंड ट्राय करायला काहीच हरकत नाही.
टिप: पैठणीचा ड्रेस शिवायला देताना तुम्ही चांगला टेलर बघा.कारण जर या ड्रेसची उत्तम फिटिंग झाली तरच तो ड्रेस चांगला दिसतो.
आता पैठणी टाकून देऊ नका तर त्याचा असा वापर करा.