Periods

योनीकडील जागा सतत होते कोरडी,तर काळजी घेण्याची आहे गरज

Leenal Gawade  |  May 2, 2021
योनीकडील जागा सतत होते कोरडी,तर काळजी घेण्याची आहे गरज

 

योनी हा भाग स्त्री आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच महत्वाचा आहे. सेक्सपासून ते अगदी मुलांना जन्म देईपर्यंत अगदी लहान अशा भागाचे कार्य फार महत्वाचे असते. पण तुम्हाला योनी मार्ग संदर्भातील कोणता त्रास झाला आहे का? योनी कडील भाग सुजणे, योनी भागातून पांढरे जाणे आणि योनी कोरडी पडणे असे काही त्रास प्रामुख्याने होऊ लागतात.योनी कोरडी पडण्याचा त्रास तुम्हाला सतत होत असेल तर तुम्हाला तुमच्या योनीकडील भागाची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे हे योनीची माहिती देताना आम्ही एका लेखातून तुम्हाला सांगितले आहे.

म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या या मागील कारणे आणि उपाय (How To Whiten Vaginal Area In Marathi)

 

सेक्सला अडथळा 

योगीकडील जागा ही कोरडी असेल तर त्याचा सगळ्यात आधी त्रास हा सेक्ससाठी होतो. सेक्स करताना योनीमार्ग हा ओला असावा लागतो. तसे झाले नाही तर मात्र सेक्सला अडथळा येऊ शकतो. खूप जणांना फोर प्ले केल्यानंतरही योनी मार्ग ओला वाटत नाही. अशावेळी सेक्स करताना ती जागा खूप दुखू लागते. शिवाय खूप दुखतेही. जर तुम्हालाही सेक्सदरम्यान असे जाणवत असेल आणि खूप जास्त दुखापत होत असेल तर तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येणार नाही. 

खाज आणि येते सूज 

योनी स्वच्छ आणि चांगली राहण्यासाठी खूप जण योनी स्वच्छ करण्यासाठी खास जेल किंवा क्रिम वापरतात.  त्यामुळे योनीतून होणारा स्राव यामुळे कमी होतो. योनी मार्ग हा कोरडा असणे अजिबात चांगला नाही. त्यामुळे योनीला सूज येऊ शकते. जर योनी मार्ग कोरडा झाला की, त्या ठिकाणी सतत खाज येऊ लागते. अशी खाज जास्त आली की, खूप त्रास होतो. खूप महिलांना अस्वस्थ वाटू लागते.  योनीला सतत खाजवूनही आतला भाग लालसर होऊ शकतो. 

त्रासदायक कोरडेपणा
ज्या प्रमाणे जेल या लावल्यामुळे योनी मार्ग कोरडा होतो. अगदी त्याचप्रमाणे गरम पाणी आणि स्विमिंग पुलमधील क्लोरिनयुक्त पाण्यामुळेही योनी मार्ग कोरडा होतो. जर तुम्ही गरम पाण्याचा वापर योनी स्वच्छ करण्यासाठी करत असाल तर तो करु नका. कारण त्यामुळे अतिरिक्त कोरडेपणा येण्याची शक्यता असते. त्या जागेला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही की, तेथील त्वचा ही काळवंडलेलीसुद्धा दिसते. 

गर्भधारणा कशी टाळावी, उपाय आणि माहिती (How To Avoid Pregnancy In Marathi)

असा घालवा योनीचा कोरडेपणा

 

योनीचा कोरडेपणा घालवण्यासाठी काही सोपे उपाय आणि काळजी घेता येणे अगदी शक्य आहे. 

लैंगिक आजारांकडे करु नका दुर्लक्ष, होतील गंभीर त्रास

Read More From Periods