xSEO

ज वरून मुलांची नावे | J Varun Mulanchi Nave Marathi

Vaidehi Raje  |  May 19, 2022
J Varun Mulanchi Nave

लहान मुले ही देवाघरची फुलेच असतात. लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या सानिध्यात गेल्यावर आपण आपले सगळे टेन्शन, ताणतणाव विसरून जातो. लहान मुलांच्या निरागस विश्वात नकारात्मकतेला जागा नसते. त्यांच्या बरोबर वेळ घालवताना आपणही त्या निरागस सुंदर विश्वाचा भाग होतो आणि आपले मन आनंदाने भरून जाते. आपली नकारात्मकता कमी होते. एखाद्या घरात जर लहान मूल असेल त्या घरातील वातावरण आपसूकच आनंदी व उत्साही होते. लहान मुले म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा झरा असतात.  म्हणूनच घरात लहान बाळ आल्यावर र घरातील वातावरण छान प्रसन्न आणि आनंददायी होते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या घरातील लोकांना आधीपासूनच या आनंदाचे वेध लागतात आणि येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट बघत असताना सगळ्यांच्याच मनात त्या बाळाच्या स्वागतासाठी काय काय करायचे याचे प्लॅनिंग सुरु होते. घरात बाळ येणार हे कळल्यापासूनच घरातील सगळे सदस्य  बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी उत्सुक असतात. होणाऱ्या  छोट्या बाळाच्या छोट्याश्या ताई-दादांपासून ते आजी-आजोबांपर्यंत, आत्या -काकांपासून ते मावशी मामा पर्यंत सगळे बाळाच्या आईबाबांना छान छान नावे सुचवतात आणि मग आईबाबा त्यांना आवडलेले नाव बाळाला देतात. बाळाला आईवडिलांकडून मिळणारी आयुष्यातील सर्वात पहिली आणि सुंदर भेट म्हणजे त्याचे नाव होय.ही भेट बाळाच्या आयुष्यभर पुरणारी असते.  त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते. बाळासाठी कृष्णाची नावे ठेवायला अनेकांना आवडते. तुमच्या बाळाचे आद्याक्षर ‘ज’ आले असेल किंवा तुम्ही ज वरून मुलांची नावे (J Varun Mulanchi Nave) शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ‘ज वरून मुलांची नावे’ (J Varun Mulanchi Nave Marathi) असलेली एक यादी आणली आहे. यामध्ये नावाबरोबरच अर्थ देखील दिलेला आहे जेणे करून तुम्हाला तुमच्या बाळासाठी सुंदर नाव निवडणे सोपे जाईल. 

ज वरून मुलांची नावे | J Varun Mulanchi Nave 

ज वरून मुलांची नावे

भगवान शिव वरून मुलांची नावे ठेवणे शुभ मानले जाते. नव्या आईबाबांना आपल्या बाळासाठी एक सुंदर नाव निवडण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ येथे दिले आहे.तर बघूया ज वरून मुलांची नावे-

नाव नावाचा अर्थ 
जय विजय , सूर्य 
जयेश विजेता 
जीवन आयुष्य , आत्मा 
जितेंद्र इंद्रियांवर विजय मिळवणारा 
जीत विजय 
जगत पृथ्वी 
जगदीश जगाचा स्वामी 
जगजीत जग जिंकणारा 
जगन ब्रह्माण्ड 
जगजीवन जगाचे चैतन्य 
जयदीप प्रकाश 
जगदीश्वर जगाचा स्वामी 
जगजेठी परमेश्वर 
जगदबंधू विश्वभ्राता 
जतींद्र यतींचा मुख्य 
जनक मिथिलेचा राजा , पिता 
जगमोहन जगाला भुलविणारा / श्रीकृष्ण 
जगन्नाथ श्रीविष्णू / मुघलकालीन पंडितकवी 
जतीन महादेव शंकर / यती 
जन्मेजय भगवान विष्णू 
ज वरून मुलांची नावे

अधिक वाचा – स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे

ज वरून मुलांची नावे

जर तुम्हीही तुमच्या बाळासाठी ज वरून मुलांसाठी प्रसिद्ध नावे शोधत असाल व तुम्हाला तुमच्या बाळासाठी चांगले नाव सापडत नसेल तर आता काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी काही चांगल्या नावांची यादी तयार केली आहे. यातून तुम्हाला तुमच्या  बाळासाठी एखादे सुंदर नाव शोधण्यास नक्कीच मदत होईल. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मुलांसाठी खास हनुमानाची नावे निवडू शकता.

जनानन्द लोकांचा आनंद 
जगेश जगाचा ईश 
जनप्रिय लोकांना प्रिय असलेला 
जिनेंद्र ईश्वर 
जनार्दन श्रीविष्णू 
जयकृष्ण विजयी कृष्ण 
जयकुमार विजयी 
जयकिशन श्रीकृष्ण 
जमुनादास यमुना देवीचा दास 
जयगोपाल श्रीकृष्ण 
जयचंद्र एका राजाचे नाव 
जगदयाळ  
जयघोष जयघोष 
जसराज प्रसिद्धी 
जयराज विजय 
जयन विजय 
जयनाथ विजय 
जयप्रकाश विजयाचा प्रकाश 
जयराम श्रीराम 
जयवर्धनसतत वृद्धिंगत होणारा विजय 
ज वरून मुलांची नावे

अधिक वाचा – प वरून मुलांची नावे जाणून घ्या

ज वरून मुलांची युनिक नावे | J Varun Mulanchi Unique Nave

ज वरून मुलांची नावे

घरात नवीन बाळ येण्याची नुसती जरी चाहूल लागली तरी सर्वात प्रथम लोक त्या बाळासाठी एक सुंदर, अर्थपूर्ण व बाळाला शोभेल असे नाव शोधण्याची सुरुवात करतात. पण कधी कधी बाळासाठी छान नाव शोधताना आपल्याला कसरत करावी लागते. तुमच्या बाळासाठी अर्थासह श्री गणेशाची आधुनिक नावे तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या बाळासाठी ज या अक्षरावरून नाव हवे असेल तर खालील यादी वाचा. 

जयशंकर भगवान शंकर 
जयवल्लभ श्रीविष्णू 
जयवंत विजयी 
जयंत विजयी / चंद्रमा
जलदेव जलाचा देव 
जलेश्वर जलाचा देव 
जयसेन 
जलेंद्र इंद्रदेव 
जालिंदरनाथ नवनाथांपैकी एक दत्तसंप्रदायातील गुरु 
जवाहर 
जयवीर विजयी वीर 
जसवीर प्रसिद्ध वीर 
जानकीराम श्रीराम 
ज्वाला अग्नी , ज्योत 
ज्वालादत्त अग्नीने दिलेला 
जुगराजयुगाचा राजा 
जुगल युगुल / जोडी 
जोगेश योगेश्वर / श्रीकृष्ण 
जीवराज जीवाचा स्वामी 
जोगिंद्र योगेंद्र / श्रीकृष्ण / भगवान शंकर 
ज वरून मुलांची नावे

अधिक वाचा – जुळ्या मुला मुलींची नावे, युनिक नावे तुमच्यासाठी

ज वरून मुलांची नावे

ज अक्षरावरून नाव असलेल्या व्यक्ती धैर्यवान असतात. जरी त्यांना त्यांच्या क्षेत्रात गॉडफादर मिळाला नाही तरीही ते त्यांच्या हिमतीच्या आणि कष्टाच्या जोरावर यश मिळवतात आणि आपले व घराण्याचे नाव उज्वल करतात. तुम्हाला तुमच्या बाळासाठी ज वरून मुलांची ट्रेंडिंग व नवीन नावे हवी असतील तर या यादीत काही अर्थपूर्ण नावे दिलेली आहेत. 

ज्योतीचंद्र इंद्रदेव 
ज्योतिप्रकाश प्रकाश 
ज्योतिरंजन 
ज्योतिरथ ध्रुवतारा 
जगदीशचंद्र परमेश्वर 
ज्योतिर्मय तेजस्वी 
जक्ष कुबेर 
ज्योतिर्धर ज्योत धारण करणारा 
जैनेश ईश्वर 
जलस सुखदायक 
जपेश भगवान शंकर 
जाग्रत जागृत असलेला 
जमीर देवाने भेट दिलेला 
ज्योतिरादित्य सूर्य 
जयकृत जिंकणारा 
जियान नेहेमी आनंदी असणारा 
जयदेव यश देणारा देव 
जयशेखर भगवान शंकर 
जपन जप जाप्य 
ज्योतींद्र ज्योती धारण करणारा 
ज वरून मुलांची नावे

जर तुम्हालाही तुमच्या बाळाचे नाव ज वरून ठेवायची इच्छा असेल तर आम्ही याठिकाणी खास तुमच्यासाठी चांगल्या  व अर्थपूर्ण नावांची यादी दिली आहे.आम्हाला खात्री आहे कीं तुम्हाला तुमच्या मुलासाठी ज वरून मुलांची नावे असलेल्या यादीतील एखादे चांगले नाव नक्कीच आवडेल.

अधिक वाचा – ध वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह

Read More From xSEO