बिग बॉस

#BBM2 : धक्कादायक निकालात माधव देवचके झाला एलिमिनेट

Aaditi Datar  |  Jul 28, 2019
#BBM2 : धक्कादायक निकालात माधव देवचके झाला एलिमिनेट

बिग बॉस मराठीच्या घरात कधी कधी जी अपेक्षा केलेली असते त्याच्या उलटंच होतं, असं चित्र आहे. हेच वाक्य महेश मांजरेकर यांनी वीकेंडचा डावमध्ये सांगितलं आणि तेच खरं ठरलं. धक्कादायक निकालात घरातील स्ट्राँग कटेस्टंटपैकी एक असलेल्या माधवला घरातून बाहेर पडावं लागलं.

आधीच लागली होती कुणकुण

खरंतर सुत्रांकडून दुपारीच माधव देवचके घराबाहेर जाणार याची माहिती मिळाली होती. पण तेव्हा या बातमीवर कुणाचाही विश्वास बसला नसता. पण अखेर ही बातमी खरी ठरली. रविवारी वीकेंडच्या डावात शेवटी घरातील सर्व सदस्य सेफ झाल्यानंतर माधव आणि किशोरीपैकी एक जण घराबाहेर जाणार होतं. फक्त वीणाने किशोरी सेफ असतील असं म्हटलं होतं आणि बाकी सर्वांनी सेफ कटेस्टंट म्हणून माधवचं नाव घेतलं होतं. पण अखेर बाहेर गेला तो माधव. हा निकाल घरातल्या सदस्यांसाठीही धक्कादायक होता. हा निकाल कळताच शिवानी आणि नेहाला त्यांच्या अश्रूंना आवर घालता आला नाही. कारण या तिघांची तिकडी बिग बॉस मराठीच्या घरात आधीपासून होती.

माधवला येत होत्या अनेक शुभेच्छा

बिग बॉस कंटेस्टंट माधव देवचकेला बिग बॉसच्या घरात राहून दोन महिने झाले होते आणि शेवटच्या महिन्यातही त्याने घरात राहावं, म्हणून माधवच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक मित्र त्याच्यासाठी उभे राहिले होते. माधवच्या जवळच्या मित्रांपैकी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातले स्पर्धक रेशम टिपणीस आणि आस्ताद काळे, तसंच बिग बॉस-11 मधला कंटेस्टंट पुनीश शर्मा आणि अभिनेता शरद केळकर यांनी माधवला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. माधवने सिनेसृष्टीतल्या यशस्वी अभिनय कारकिर्दीत त्याने अनेक मित्र जोडले आहेत. त्याच्या सगळ्या मित्रांना आपला लाडका मित्र या आठवड्यातही सेफ व्हायला हवा होता. सोशल मिडीयावर माधवच्या या मित्रांकडून आणि चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

Instagram

अभिनेता शरद केळकर म्हणाला होता की, “माझा खूप छान मित्र माधव देवचके बिग बॉसमध्ये आहे आणि तो घरात राहण्यासाठी त्याला तुम्ही भरभरून वोट करा.” बिग बॉसच्या पहिल्या पर्वातला कंटेस्टंट आणि अभिनेता आस्ताद काळे म्हणाला होता की, “ बिग बॉस मराठीमध्ये माझा मित्र माधव देवचके नॉमिनेटेड आहे. या प्रवासात त्याने पूढे जाण्यासाठी त्याला मतं द्या.” बिग बॉसच्या पहिल्या पर्वातली कंटेस्टंट आणि अभिनेत्री रेशम टिपणीस म्हणाली होती की, “माधव आता खूप उत्तमरितीने खेळू लागलाय आणि सध्या तो नॉमिनेटेड आहे. त्यामुळे माधवला मत देऊन वाचवा. म्हणजे तो घरात राहीलं आणि आपल्याला चांगला गेम खेळून एन्टरटेन करू शकेल.”

माधवच्या चाहत्यांनीही वेळोवेळी बिग बॉसच्या घरात असूनही त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचेच कौतुक केले आहे. क्रिकेट, कबड्डी, स्विमिंग अश्या विविध खेळांमध्ये अव्वल असलेल्या माधवने आपल्या स्पोर्ट्समन स्पिरिटचं वेळोवेळी दर्शन घडवून दिलं होतं. बिग बॉसचे खेळ हे शांत राहून, युक्तीवादाने खेळता येतात, हे माधवने वेळोवेळी दाखवून दिलं होतं. बिग बॉसच्या अनसीन अनदेखामध्ये तो म्हणाला होती की, “बिग बॉसमध्ये, न भांडणं, शांत राहणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठे चॅलेंज होतं. पण इथे आल्यापासून मी स्वतःला बरच कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. माझा राग कमी झालाय. मी भांडत नाही.” 

Instagram

माधवचा दिवसेंदिवस उत्तमोत्तम होत चाललेला खेळ सध्या सगळे पाहत होते. केवळ सिनेसृष्टी नव्हे तर त्याच्या चाहत्यांनाही वाटतं होतं की, माधव स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तो सहज टॉप 5 मध्ये सहज पोहचू शकेल. माधवला मिळत असलेला पाठिंबा पाहता ही चाहत्यांची इच्छा सत्यात उतरायला हवी होती. पण झालं उलटंच. 

आता पुढे काय?

प्रत्येक एलिमिनेशननंतर बिग बॉस मराठीचा खेळ अजूनच रंगतदार होतोय. जाता जाता मिळणाऱ्या स्पेशल पावरने माधवने नेहाला सेफ केलं आहे. माधवचं एलिमिनेशन झाल्यामुळे आता शिवानी घरात एकटी पडणार की नेहा आणि ती सोबत मिळून गेम खेळणार. माधवची जागा आरोह भरून काढणार का? माधवच्या जाण्यामुळे शिव आणि अभिजीतच्या ग्रुपला नक्कीच फायदा होणार आहे. अशा अनेक घडामोडी येत्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – 

#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

 

Read More From बिग बॉस