DIY सौंदर्य

वापरा मुलतानी माती फेसपॅक आणि मिळवा 2 दिवसात चेहऱ्यावर चमक (Multani Mitti Face Packs)

Dipali Naphade  |  Apr 16, 2020
वापरा मुलतानी माती फेसपॅक आणि मिळवा 2 दिवसात चेहऱ्यावर चमक (Multani Mitti Face Packs)

सलॉनमध्ये फेशियल अथवा स्क्रब करणे तसं तर आपल्याला महागच ठरते. इतकंच नाही तर घरच्या  घरी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे त्वचेची काळजी घेता येते. आपल्या बजेटमध्ये आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर आपण नैसर्गिक उपा म्हणून मुलतानी मातीचा वापर करू शकतो. अगदी अनादी काळापासून मुलतानी मातीचा वापर फेसपॅक म्हणून करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचेला चमक मिळवून देण्यासाठी मुलतानी मातीइतका चांगला उपाय नाही. मुलतानी माती केवळ त्वचेला चमकदार बनवत नाही तर त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी आणि तुमचा स्किन टोन सुधारण्यासाठीही याची मदत मिळते. तुमच्या त्वचेवर साठलेली धूळ,  माती आणि डेड स्किन सेल्स काढण्यासाठी याची मदत मिळते. या लेखातून आपण मुलतानी माती कशी तयार होते आणि मुलतानी माती वापरून त्याचे फेसपॅक कसे तयार करायचे आणि अगदी दोन दिवसात चेहऱ्यावर कशी चमक आणायची हे जाणून घेणार आहोत. याचे फेसपॅक पाहण्याआधी आपण मुलतानी माती कशी तयार होते त्यात कोणते घटक असतात पाहूया.

मुलतानी माती कशी तयार होते आणि त्यातील घटक (Properties of Multani Mitti)

Shutturstock

मुलतानी मातीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यामध्ये तेल, पाणी आणि रंग शोषून घेण्याची क्षमता असते. याशिवाय यामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स असतात. मुख्य स्वरूपात हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेट असतं आणि त्याशिवाय मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियमचंदेखील खूप चांगलं प्रमाण असतं. वास्तविक ही माती दिसायला अतिशय साधारण दिसते. पण याचे कण अतिशय बारीक असतात आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. साधारण मातीपेक्षा याचं वेगळेपण म्हणजे यातील पाणी आरामात शोषून घेतलं जातं. ही माती कोणत्याही गोष्टीतील रंग हटवू शकते आणि कोणत्याही गोष्टी शोषून घेऊ शकते. त्यामुळे चेहरा असो वा शरीर अथवा केस, तेल शोषून घेण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करण्यात येतो.

वाचा – तुमच्या त्वचेसाठी केळं का आहे फायदेशीर

मुलतानी मातीचे फेसपॅक (Multani Mitti Face Packs In Marathi)

मुलतानी मातीपासून आपल्याला आपल्या चेहऱ्याला चमक देण्यासाठी अनेक फेसपॅक तयार करता येतात. त्यामध्ये काय साहित्य वापरायचे आणि त्याचा आपल्या त्वचेसाठी काय फायदा होतो हे आपण बघूया 

मुलतानी माती आणि गुलाबपाणी फेसपॅक (Multani Mitti and Rose Water)

Shutterstock

 

फायदे 

तुमची त्वचा तेलकट  असेल आणि जर तुम्हाला चेहऱ्यावर जास्त  मुरूमं येत असतील तर तुम्ही हा फेसपॅक वापरा. मुलतानी माती आणि गुलाबपाण्यापासून तयार करण्यात आलेला हा फेसपॅक काही दिवस लावल्यानंतर तुमच्या त्वचेला अगदी चमत्कारी फायदा मिळतो. मुलतानी माती आणि गुलाबपाण्याचा मास्क त्वचेची पीएच लेव्हल बॅलेन्स्ड करण्यासाठी मदत करतो.  हे त्वचा नैसर्गिक स्वरूपात थंड करते आणि त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकण्यासदेखील मदत करते. बाहेरली त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठीही याचा फायदा होतो. तसंच तुमची त्वचा ऑईल फ्री आणि अधिक चमकदार बनवण्यासाठी फायदा होतो. 

साहित्य 

कसे बनवयाचे 

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून तीन वेळा वापरू शकता

वापर करा घरगुती नैसर्गिक क्लिंन्झरचा आणि मिळवा चमकदार त्वचा

मुलतानी माती, बदाम आणि दूध फेसपॅक (Multani Mitti, Almond and Milk)

Shutterstock

फायदे 

तुम्हालाही अगदी लहान मुलांसारखी त्वचा हवी असेल तर तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकता. मुलतानी मातीमध्ये जेव्हा बदाम आणि दूध मिक्स करण्यात येते तेव्हा तुम्हाला अप्रतिम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हा फेसपॅक तुमच्या त्वचेला अधिक उजळ आणि चमकदार करण्यासाठी मदत करतो. तुम्ही जर बाजारातील अनेक फेसपॅकचा वापर करून थकलात तर तुम्ही घरगुती या हर्बल फेसपॅकचा वापर करून बघा आणि हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही. विशेषतः त्या व्यक्तींना ज्यांची त्वचा कोरडी आणि त्यांना त्वचा नेहमी ओढल्यासारखी वाटते. 

साहित्य 

कसे बनवयाचे

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – चेहरा अधिक मुलायम होण्यासाठी हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता

वाचा – DIY Masoor Dal Face Packs In Marathi 

मुलतानी माती आणि टॉमेटोचा रस फेसपॅक (Multani Mitti and Tomato Juice)

Shutterstock

फायदे 

तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग आले असतील आणि त्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही त्यासाठी टॉमेटोचा रस वापरायला हवा. डेड स्किन काढून टाकण्यासाठी याचा फायदा होतो. पण हा टॉमेटोचा रस तुम्ही मुलतानी मातीसह वापरला तर तुमची त्वचा अधिक चमकदार होईल आणि त्वचेवरील सर्व डागही निघून जाण्यास मदत मिळेल. मुलतानी माती, टॉमेटो रस आणि चंदन पावडर एकत्र करून बनणारा फेसपॅक हा चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यास अत्यंत उपयुक्त आहे. पण तुम्हाला त्वचा अधिक चमकदार बनवायची  असेल तर तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभर हळदही मिक्स करू शकता. 

साहित्य 

कसे बनवयाचे

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राहावी म्हणून याचा रोजही वापर करू शकता. 

मुलतानी माती आणि मध फेसपॅक (Multani Mitti and Honey)

Shutterstock

फायदे 

तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज असेल तर तुम्ही हा फेसपॅक नक्की वापरा. प्रदूषण आणि सूर्यकिरण यामुळे बऱ्याच जणांची त्वचा कोरडी पडते. त्याचा परिणाम त्वचा निस्तेज होण्यावर जास्त होतो. तुम्हाला नैसर्गिक तऱ्हेने या समस्येवर तोडगा हवा असेल तर तुम्ही या फेसपॅकचा वापर करून नक्की फायदा मिळवू शकता. कारण हा फेसपॅक एखाद्या एसपीएफप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर काम करतो. 

साहित्य  

कसे बनवयाचे

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – चेहरा अधिक मुलायम होण्यासाठी हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता

त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती (Multani Mitti Benefits In Marathi)

मुलतानी माती आणि पुदीना फेसपॅक (Multani Mitti and Mint Leaves)

Shutterstock

फायदे 

तुमचा चेहरा चांगला असेल पण त्यावर सुरकुत्या आल्या असतील तर तुम्हाला नक्कीच ही समस्या वाटत असणार. तुम्हाला या सुरकुत्यांपासून सुटका मिळवून देण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने असतीलही. पण त्याचा  फायदा किती होतो हेदेखील बघावे लागते. मात्र मुलतानी माती, पुदीन्याची पाने आणि दह्याचा फेसपॅक यावर उत्तम फायदा मिळवून देतो. एक महिन्यात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. 

साहित्य 

कसे बनवयाचे

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राहावी म्हणून याचा रोजही वापर करू शकता. 

मुलतानी माती आणि चंदन पावडर (Multani Mitti and Sandalwood)

Shutterstock

फायदे 

तुम्हालाही एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे टोन्ड आणि ऑईल फ्री त्वचा हवी असेल तर तुम्ही या फेसपॅकचा उपयोग करून घेऊ शकता. चंदन पावडर आणि मुलतानी मातीच्या एकत्रितपणामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतले जाते आणि तुम्हाला त्याचा चेहरा चमकदार दिसण्यासाठी फायदा मिळतो. 

साहित्य 

कसे बनवयाचे

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे

उत्कृष्ट परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता.  

मुलतानी माती आणि पपई पल्प फेसपॅक (Multani Mitti and Papaya Pulp)

Shutterstock

फायदे 

तुमच्या त्वचेवर अधिक चमक आणण्यासाठी पपई नेहमीच गुणकारी ठरते. वाढते वय कमी दाखवण्यासाठीही याचा फायदा होतो. पपईमध्ये चेहऱ्यावर चमक आणणारे  अधिक गुण आढळतात. त्यामुळे मुलतानी माती आणि पपईचा पल्प एकत्र केल्यास याचा उत्कृष्ट परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. 

साहित्य 

कसे बनवयाचे

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – तुमचा चेहरा डागविरहीत दिसण्यासाठी तुम्ही याचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच करू शकता.

मुलतानी माती आणि अंड्यांचा पांढरा भाग (Multani Mitti and Egg White)

Shutterstock

फायदे 

तुम्हाला चेहऱ्यावर जर हवी तशी रंगत येत नसेल अर्थात एकसारखा रंग चेहऱ्यावर दिसत नसेल तर तुम्ही  या फेसपॅकचा वापर करावा. काही भागावर एक रंग आणि काही भागावर दुसरा रंग असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. सूर्यकिरणांमुळे असं घडतं. पण तुम्हाला जर एकसारखा स्किनटोन हवा असेल तर तुम्ही मुलतानी माती आणि अंड्याच्या सफेद भागाचा वापर करून तयार केलेल्या फेसपॅकचा फायदा मिळवू शकता. 

साहित्य 

कसे बनवायचे 

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा वापरू शकता 

मुलतानी माती आणि गाजराचा पल्प फेसपॅक (Multani Mitti and Carrot Pulp)

Shutterstock

फायदे

पिगमेंटेड त्वचा अथवा चेहऱ्यावरील डागांपासून सुटका मिळवणे हे खरं तर सोपे आहे. तुम्ही मुलतानी मातीसह गाजराच्या पल्पचा वापर केल्यास तुम्हाला हे अगदी सोप्या रितीने घालवता येतील. तुम्ही हा फेसपॅक करताना ऑलिव्ह ऑईलदेखील वापरू शकता. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे तुम्हाला चेहरा अधिक चमकदार होताना दिसेल. 

साहित्य 

कसे बनवायचे 

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – उत्कृष्ट परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता. 

मुलतानी माती आणि नारळाचे पाणी फेसपॅक (Multani Mitti and Coconut Water)

Shutterstock

फायदे 

त्वचा टॅन होणे ही भारतामध्ये त्वचेसाठी समस्याच आहे. यासाठी नारळाच्या  पाण्यासह मुलतानी मातीचा फेसपॅक अप्रतिम उपाय आहे. मुलतानी माती आणि नारळ पाणी हे दोन्ही त्वचेला नैसर्गिक थंडावा देणारे घटक आहेत. त्यामुळे केवळ टॅन दूर न करता त्वचा अधिक चमकदारही बनवतात. 

साहित्य 

कसे बनवायचे 

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे

उत्कृष्ट परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता. 

मुलतानी माती आणि लिंबाचा रस फेसपॅक (Multani Mitti and Lemon Juice)

Shutterstock

फायदे 

चेहऱ्यावरून निघाणारे अतिरिक्त नैसर्गिक तेल आणि चेहऱ्यावर चिकटणारी धूळ यामुळे अॅक्ने आणि मुरूमांसारख्या समस्या होतात. तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवून देण्यासाठी मुलतानी माती आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक उत्तम आहे. यामध्ये असणारे विटामिन सी हे तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक आणण्यास फायदेशीर ठरते. 

साहित्य 

कसे बनवायचे 

कसे लावायचे 

किती वेळा वापरावे – उत्कृष्ट परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा याचा वापर करू शकता. 

केसांना अधिक घनदाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी वापरा मुलतानी माती

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. किती वेळा मुलतानी मातीचा वापर करता येतो?

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही फेसपॅक बनवण्यासाठी आणि चेहऱ्यावर लावण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करू शकता.  याने तुमच्या त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही.  

2. याचे काही नुकसान आहे का?

माती असो वा मुलतानी माती कधी ना कधी तरी तुम्हालाही खावी असं वाटलं असेल ना? पण तुम्हाला माहीत आहे का ही एक इटिंग डिसऑर्डर अर्थात खाण्याचा आजार आहे. बऱ्याचदा तुमच्या शरीरातील काही कमतरतेमुळे तुम्हाला माती खावीशी वाटते. पण मातीमधील काही तत्व ही तुमच्या शरीरासाठी बाधक असतात.

3. मुलतानी माती चेहऱ्यावर लावताना मी काही काळजी घेणे गरजेचे आहे का?

तशी तर काहीच गरज नाही. पण तुमची त्वचा अगदीच संवेदनशील असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर करण्यापूर्वी तुमच्या हाताच्या त्वचेवर याचा वापर करून पाहा. 

 

Read More From DIY सौंदर्य