लाईफस्टाईल

पाऊस कोट्स मराठी | Rain Quotes In Marathi

Leenal Gawade  |  Jun 21, 2021
rain quotes_fb

चिंब पावसानं रानं झालं आबादानी…. पाऊस आला की, मनात कितीतरी पावसाची गाणी दाटून येतात. येणारा प्रत्येक पाऊस मनात एक आनंद घेऊन येतो. या पावसात मस्त चिंब भिजावं, बाहेर फिरायला जावं कित्येकांचे असे प्लॅन लगेच बनू लागतात. पावसाचा हा आनंद शाळेत जाणाऱ्या मुलांसाठीही खास असतो कारण मुलांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरु होते. त्यांना नवी छत्री, रेनकोट, पावसाळी चपला, वह्या- पुस्तके घेतली जातात. पर्यायी पाऊस जास्त झाला की, त्यांना छान सुट्टीही मिळते. जोडप्यांसाठीही पावसाळा प्रेमाची नवी उब घेऊन येतो. मस्त पावसात भिजत जोडीदारासोबत वेळ घालवावासा वाटतो. तर कधी कधी तर या पावसाने सुट्टी दिली तर घरात बसून मस्तपैकी चहाचा घोट आणि भजी किंवा वड्यावर ताव मारावासा वाटतो. असा हा पाऊस सगळ्यांना आनंद देण्याचे काम करत असतो. या पावसाचा आनंद मस्त घरी बसून घेताना तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा तुमच्या जवळ नसलेल्या जोडीदाराला पावसाची ही आठवण करुन देण्यासाठी खास पावसाचे स्टेटस मराठी (Rain Quotes In Marathi) शोधून काढले आहेत. जे तुम्ही  नक्की पाठवा आणि पावासाचा हा आनंंदोत्सव साजरा करायला विसरु नका.

पाऊस कोट्स मराठी – Rain Quotes In Marathi

Rain Quotes In Marathi

पाऊस आला वारा आला…. अशा या मस्त पावसाळी वातावरणात तुम्ही अगदी हमखास काही कोट्स ठेवायला हवेत. जाणून घेऊयात पाऊस कोट्स मराठी (Paus Quotes In Marathi)

1. पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे
फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या कायम मनाला

2. आज पुन्हा धुक्याची पहाट आली,
प्रत्येक पानावर तुझी प्रतिमा तयार झाली,
मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला,
आणि तू प्रत्येक थेंबात विलीन झालीस- वैभव वाघमारे

3. पावसाची सर आता
नुकतीच बरसली
आणि आठवणींची पाऊलवाट
पुन्हा एकदा हिरवळली

4. आज पावसात चिंब मी भिजले,
तुझ्या आठवणींच्या झुल्यात जणू झुलले
पाऊस जाग्या करतो आठवणी तुझ्या माझ्या
देतो एक वेगळाच विसावा..

5. हळुवार दाटती मेघ नभी
हळुवार पसरतो गारवा
सर्वांग फुलते आगमनाने
भरुन वाहतो मनी,
स्पर्श नवा, हर्ष नवा

6. पाऊस आला भुई भिजली
मृदगंधाने मोहिनी घातली
हिरवी तरु मोहरुनी गेली
तव गालावर लाली आली

7. तहानलेल्या त्या धरतीला
आता चिंब भिजायचं
पहिल्या पावसाच्या थेंबात
मला धुंद व्हायचंय

8. धो धो कोसळत होता
आता लागोलाग पडली उन्हे,
आपण जरा कौतुक करावे,
तर पाऊस करते नखरे जुने

9. पावसात ओलं होणे आणि चिंब भिजणे यात जितका फरक आहे
तितका फरक आयुष्य जगण्यात आणि नुसतं अस्तित्वात असण्यात आहे

10. मनात चिंब भिजण्याची आस आहे पाऊस मला तुझी आस आहे
बरस एकदा आणि भिजव मला तुझ्या थेंबात मला चिंब भिजायचे आहे

वाचा – पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं

पाऊस स्टेटस मराठी – Paus Status In Marathi

Paus Status In Marathi

स्टेटस ठेवण्याचा विचार असेल तर पावसाचे स्टेटस मराठी (Monsoon Status In Marathi) खास शोधून काढले आहेत जे तुमच्या सोशल मीडियासाठी एकदम परफेक्ट आहेत.

1. ओल्या ओल्या तुझ्या स्पर्शाला
मंद मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तो पाऊस
ज्यामध्ये अडकलेला माझा श्वास आहे

2. बरसणाऱ्या पावसामध्ये
कोणी शोधतोय हरवलेले क्षण
कोणी पावसात अश्रू लपवून
हलके करतोय आपले मन

3. कोसळतोय तो पाऊस
हलक्या सरींनी
सोनेरी त्या उन्हात
रिमझिम पाऊस हा तुझ्या प्रेमाचा
ओथंबून वाहतोय
अगदी तसाच माझ्या मनात

4. पावसाने भिजवले मला
मनाने चिंब झाले मी आता
पावसाच्या आठवणी करतात मला ओल्या
चिंब भिजायला तुम्हीही तयार राहा

5. झिम्मड पाऊस, अल्लड गाणी
कोणाच्या मनात, पाऊस गाणी

6. पाऊस आला मनी आनंद झाला,
पावसाच्या सरींनी मला आनंद दिला

7. पाऊस आला दाटून
मनी आला आठवणींचा पूर
या पुरात मला वाहून जायचे आहे
पावसाच्या या पाण्यात मला चिंब भिजायचे आहे

8. पावसाच्या सरींनी मला चिंब भिजवले
आठवणींच्या सरींनी मला आनंदमयी केले

9. पाऊस आला वारा आला… आनंदाचा क्षण हा आला

वाचा – पावसाळ्यात आवर्जून खायला हवीत ही 5 चविष्ट फळं

पहिला पाऊस स्टेटस मराठी – Pahila Paus Status In Marathi

Pahila Paus Status In Marathi

पहिला पाऊस असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारा येतो. अशा या पहिल्या पावसाची प्रत्येकाची काही ना काही आठवण नक्की असेल ही आठवण शब्दरुपाने शेअर करण्यासाठी खास स्टेटस. 

1. पहिल्या पावसाच्या सरीने
भिजवून मला अंगभर
जागवून तिच्या आठवणी
जगण्यास सोडून दिले रात्रभऱ- सुरज रतन जगताप

2. पहिल्या पावसात शिवार
दरवळतं नव्या सुगंधात
हिरवंगार एक स्वप्न उभारी येतं,
धरतीच्या मनात- अमर

3. पाऊस गारा, धुंद वारा
बेभान हा आसमंत सारा…
हातात आहे हात तुझा..
श्वासांनाही आता तुझाच निवारा- नुतन

4. पहिला पाऊस नि पहिला शब्द
टिपले कवितेत यमक पूर्ण
नजरेत या घेऊन मोजले थेंब
काळोख्या ढगात अंधारला उजेड
प्रीत सखी तू उतरली कवितेत

5. आभाळाकडे नजर एकटक
आस एकच… पहिला पाऊस
सुकले डोळे… भोगाळली भुई
नको रे इतकी ओढ लावूस- संजय गुरव

6. पहिला पहिला पाऊस अंगावर होता
गार गार वारा झोंबला अंगाला
पावसाच्या सरीत स्पर्श तुझाच होता
तुझीच आठवण करुन देत होता

7. तो पहिला पाऊस
ती पहिली आठवण
बरसते जेव्हा अंगावर
कविता होते माझी
अन ओघळते अंगावर

8. पहिला पाऊस येताना
फक्त पाऊस घेऊन येत नाही,
तो सोबत घेऊन येतो
चिंब भिजलेल्या आठवणी

9. पहिला पाऊस पडतो तेव्हा
एकच काम करायचं
हातातली काम टाकून
पहिलं पावसात जाऊन भिजायचं

10. पहिल्या पावसाचा आनंद जणू
तुझी सतत आठवण काढत आहे
मला तुझ्या प्रेमाची आस आहे

वाचा – पावसाळ्या वरील सुंदर कविता

मान्सून मेसेज मराठी – Monsoon SMS In Marathi

Monsoon SMS In Marathi

पाऊस म्हणा की मान्सून याची आठवण प्रत्येकाला चिंब करते. अशा या पावसासाठी खास मान्सून मेसेज मराठी.

1. थंड हवा,
ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर,
आणि मातीचा गंध
कडक चहा,
चिंब भिजायला तयार राहा

2. रिमझिम पाऊस एक कप चहा आणि फक्त तू…

3. पाऊस आला भिजवून घेला.. चला आता बाहेर जाऊया

4. पावसाच्या सरींनी मला भिजवून केले धुंद आता वाटे जावे होऊन मुक्तछंद

5. पावसाची वाट पाहतो मी… तुझ्या आठवणीत विसावतो मी

6. पावसाने यावे हळूच बरसावे, स्पर्शावे मला
तु्झ्या प्रेमाच्या मिठीत ठेवावे मला

7. तुझ्या मिठीत मला विसावायचे आहे
पावसात आनंदाने भिजायचे आहे.

8. पाऊस असताना तू जवळ हवीस
तरच त्या पावसाची खरी मजा आहे

9. कुणी सांगावं या पावसाला
मन चिंब व्हायला हवं
पडणाऱ्या सरीसोबत बालपण परतायला हवं

10. तिच्या आठवणीत पाऊस वारंवार येतो
आणि हलक्याच माझ्या पापण्या ओल्या करुन जातो.

आता हा पावसाळा करा या कोट्सनी मस्त चिंब आणि शेअर करा मस्त पावसाळी कोट्स. पावसाळ्यात चिंब भिजून मित्र आजारी पडला तर उपयोगी पडतील गेट वेल सून मेसेज (Get Well Soon Message In Marathi) नक्की वाचा.

You Might Like These:

मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita)

प्रवासात प्रेरणा देतील असे कोट्स

Read More From लाईफस्टाईल