लाईफस्टाईल

फक्त प्रेग्नंसी नाही तर या कारणांनीही मिस होऊ शकतात पिरीयडस (Home Remedies For Irregular Periods In Marathi)

Aaditi Datar  |  Mar 1, 2019
फक्त प्रेग्नंसी नाही तर या कारणांनीही मिस होऊ शकतात पिरीयडस (Home Remedies For Irregular Periods In Marathi)

आपल्या सगळ्यांनाच माहित्येय की, आता आपली लाईफस्टाईल पहिल्यासारखी राहिली नाही. अनेक फायद्यांसोबत आपल्याला अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. ज्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतात. साधारणतः अनेक महिलांना उशिरा पिरीयडस येण्याची समस्या असते. पण असं सारखं होणं हे चांगलं नाही. प्रत्येक महिलेला हे माहित असतं की, आपले महिन्याचे पिरीयड्स किती तारखेला येणार आहेत. कारण साधारणतः पिरीयड्सची सायकलही 28 दिवसांची असते, 28 किंवा 30 दिवसानंतर पिरीयड्स येतात. पण हेच जर 28-30-40 दिवस होऊनही पिरीयड्स आले नाहीतर काळजी वाटू शकते. पण यामध्ये घाबरण्याचं कारण नाही. प्रेग्नंसीशिवाय पिरीयड्स उशिरा येण्याची अजूनही कारण असू शकतात. चला तर जाणून घेऊया कोणती कारणं आणि त्यावरील घरगुती उपाय –

अनियमित आणि पीरियड्स मिस होण्याची कारणं (Reasons For Missed & Irregular Periods)

1. स्ट्रेस किंवा डेली रुटीनमधील बदल (Changes In Daily Routine)


जर तुमच्या डेली रूटीनमध्ये अचानक बदल झाला किंवा कोणत्या गोष्टीमुळे आलेल्या तणावानेही पिरीयड्स सायकल गडबडू शकते. वर्किंग वुमन्सना ही समस्या जास्त जाणवते. कारण त्यांच्यावर ऑफिसच्या कामाचं प्रेशर तर असतंच त्यासोबतच घराचीही जवाबदारीमुळेही तणाव असतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिडा स्वभाव होऊन पिरीयड्सवर प्रभाव पडू शकतो.   

तसेच गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्याव्यात हे देखील वाचा

2. जाडेपणा आणि शरीराला जडत्व येणं 

जर तुमचं वजन सामान्य वजनापेक्षा जास्त वाढल्यास आणि तुम्हाला जडत्व जाणवत असल्यास तुम्ही जाडेपणाच्या विळख्यात सापडल्या आहात. पिरीयड्स उशिरा येण्याचं एक कारण वाढलेलं वजन हेही असू शकतं खरंतर वजन वाढल्यामुळे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे पिरीयड्स उशिरा येण्याची समस्या जाणवू शकते.

3. पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (PCOS)

पिरीयड्स उशिरा येण्याचं अजून एक कारण म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) हेही असू शकतं. बदलत्या लाईफस्टाईलमुळे महिलांच्या हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे ही समस्या उद्भवते. या समस्येमुळे चेहऱ्यावर आणि छातीवर केस येऊ लागतात. तसचं वजनही वाढू लागतं. आजकाल कमी वयातच महिलांना या समस्येला सामोरं जावं लागतं. अशावेळी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर या समस्येमुळे केस गळणं, शुगर, मूल न होणं आणि हृदयरोगही होऊ शकतो.

Also Read Benefits Of Using A Period Tracker In Marathi

4. थायरॉइड आणि क्रॉनिक समस्याही जवाबदार (Thyroid and Chronic Problems)

जर तुम्हाला थायरॉईडची लक्षणे दिसत असतील तर वेळीच त्याकडे लक्ष द्या कारण थायरॉईड्समुळे पिरीयड्स मिस होऊ शकतात. अशा परिस्थितीत थायरॉईड ग्रंथी जास्त काम करू किंवा कमी हार्मोन्स निर्मितीमुळे महिलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. तर दुसरीकडे क्रॉनिक समस्या म्हणजेच लिव्हर किंवा किडनीची समस्या यामुळे पिरीयड्स उशिरा येतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

5. असंतुलित हार्मोन्समुळे (Unbalanced Hormones)


बदलत्या लाईफस्टाईलमुळे बरेचदा शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो, ज्यामुळे महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक समस्या म्हणजे अनियमित पिरीयड्स येणं. खरंतर शरीरामध्ये अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टॅरोन हार्मोनच्या असंतुलनामुळे पिरीयड्स अनियमित येऊ शकतात. यामुळे अनेकदा 2 महिन्यानंतर किंवा यापेक्षाही जास्त काळाने पिरीयड्स येऊ शकतात.

6. अचानक कमी झालेलं वजन (Sudden Weight Loss)

फिटनेसमुळे आजकाल अनेक महिला डायटींग करतात आणि खाणंपिणं सोडतात. पाळी लवकर येण्याचे उपाय करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रीशन मिळत नाही आणि वजन झपाट्याने कमी होतं. याचा वाईट परिणाम अॅस्ट्रोजन हार्मोन्सवरही होतो. जसं पिरीयड्स मिस होण्याची समस्या जाणवू लागते. तर काही महिलांमध्ये गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने पिरीयड्स पूर्णतः येणं थांबू शकतं.

7. गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे (Contraceptive Pills)

गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन एक वर्षापेक्षा जास्त काळ केल्यासही पिरीयड्स तीन ते चार महिने उशिरा येऊ शकतात. तसंच कमी दिवसासाठी येऊ शकतात.

8. या पदार्थांचं जास्त सेवन केल्याने

खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असेल की, काही खाल्ल्याने किंवा एखाद्या गोष्टीचं खुप सेवन केल्यानेही पिरीयड्स उशिरा येतात. जसं अल्कोहोल म्हणजेच ड्रींक्स घेणं, सिगरेट, जास्त प्रमाणात सोडा, कॅफेन, गोड पदार्थ इत्यादी पदार्थ याला जवाबदार आहेत. जर शक्य असल्यास या गोष्टीना तुमच्या रूटीनमध्ये कमीतकमी जागा द्या किंवा शक्य असल्यास सेवन करू नका.

अनियमित कालावधीसाठी घरगुती उपचार (Home Remedies For Irregular Periods)

डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी पाळीच्या दुखण्याकरिता घरगुती उपचार करून पहा.

1.  वाटलेली दालचिनी (Crushed Cinnamon)

असं मानलं जातं की, दालचिनी तुमच्या शरीराचं तापमान वाढवते. दालचिनीचं हेच वैशिष्ट्यं अनियमित पिरीयड्स नियमित करण्यास मदत करतं. दालचिनीमध्ये हायड्रोऑक्सिचलकोन असतं. जे इन्शुलिनच्या पातळीला पिरीयड्सच्या काळात नियंत्रित ठेवतं.

असा करा दालचिनीचा वापर –

स्टेप 1- दालचिनी वाटून एका कपमध्ये घ्या

स्टेप 2- आता त्यात उकळलेलं पाणी घाला.uj

स्टेप 3- 10 मिनिटानंतर यामध्ये टी-बॅग घालून  2-3 मिनिटांसाठी ठेऊन द्या.

स्टेप 4- आता तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर किंवा मध घाला. हे रोज घेतल्यास खूपच फायदेशीर ठरेल.

2. कच्ची पपई (Raw Papaya)

खरंतर कच्ची पपई तुमच्या पिरीयड्स सायकलला नियमित करण्यात खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पपईमधील अँटी-प्रोव्होग वैशिष्ट्यांमुळे तुमच्या मासिक चक्रातील सर्व समस्या दूर होतात. तसंच आर्यन, कॅल्शिअम आणि व्हिटामिन ए आणि सी चं प्रमाण भरपूर असतं. पपई खाण्याने तुमच्या पोषण तत्त्वांशी निगडीत समस्या दूर होते.

असा करा पपईचा वापर –

स्टेप 1- पिरियड्सच्या तारखेचा एक किंवा दोन दिवस आधी कच्ची पपई आणा

स्टेप 2- पपईचे छोटे तुकडे करून एका वाडग्यात घ्या

स्टेप 3- आता यामध्ये एक मोठा चमचा दही घाला

स्टेप 4- सकाळच्या नाश्त्याला आणि संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खा

3. वाटलेली हळद (Powdery Turmeric)

जेव्हा बॉडी हार्मोन्सच्या संतुलनाची बाब येते तेव्हा हळदीची वैशिष्ट्यं विसरता कामा नये. हळदीमधील अँटी इन्फ्लमेटरी गुण पिरीयड्सच्या अनियमिततेला बरं करण्यात मदत करतात.

असा करा हळदीचा वापर

स्टेप 1- ¼ टी-स्पून हळद एका कपात घ्या

स्टेप 2- गुळाचा छोटा तुकडा, एक टी-स्पून मध आणि गरम दूधात घाला

स्टेप 3- आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून प्या. असं रोज करा.

4. ताजं आलं (Fresh Ginger)

जर तुम्हाला पिरीयड्स उशिरा येण्यासोबत फ्लो सामान्यपेक्षा कमी असल्यास तुम्ही रुटीनमध्ये आलं या घटकाला सामील करण्याची गरज आहे. मग तुम्ही आलं कच्चं खा (छोटे तुकडे तोंडात घेऊन चॉकलेटसारखं चघळा) किंवा आल्याचा रस घ्या. दोन्ही प्रकारे आल्याचा वापर केल्यास तुमच्या फ्लो आणि पिरीयड्स सायकल दोन्ही बॅलन्स होईल.

असा करा आल्याचा वापर –

स्टेप 1- एक पूर्ण आल्याचा तुकडा किंवा किसलेलं आलं एका स्टीलच्या वाडग्यात घ्या.

स्टेप 2- थोडं पाणी घालून ते गरम करा.

स्टेप 3- आता यामध्ये साखर घाला आणि 5 मिनिटं मंद आचेवर ठेऊन नंतर गॅस बंद करा.

स्टेप 4- हे मिश्रण गरमगरम प्या. असं रोज करा.

5. बडीशेप (Natural Fennel Seed)

किचनमध्ये सहजासहजी मिळणारी गोष्ट म्हणजे बडीशेप, जी आपल्या मासिक पाळी चक्राला नियमित करते आणि फ्लो वाढण्यासही मदत करते. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.  

असा करा बडीशेपचा वापर –

स्टेप 1- एक ग्लास पाण्यात 2 टी-स्पून बडीशेप घ्या.

स्टेप 2- रात्रभर तसंच ठेवा.

स्टेप 3- सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि प्या. असं रोज करा, फरक जाणवेल.

6. कडू कारलं (Healthy Bitter Gourd)

तुम्हाला कारल्याची चव आवडत नसेल पण कारल्याची चव सोडल्यास यामध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. कारल्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस आणि व्हिटीमीन्स आढळतात. जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.

कारल्याचा असा वापर करा –

स्टेप 1- एक कारलं कापून मिक्सरमध्ये ज्यूस करून घ्या

स्टेप 2- या ज्यूसमध्ये एक चमचा साखर घालून लगेच प्या. पिताना थोडा त्रास होईल पण एका घोटात पिऊन टाका. कारण चांगल्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे.

7. जिऱ्याचा ज्यूस (Juicy Parsley)

जिऱ्यामध्ये औषधीय गुणांचं भंडार आहे, जे तुमच्या स्वयंपाकघराशिवाय आयुर्वेदातही खूप वापरलं जातं. याचं नियमित सेवन केल्यास पिरीयड्सही नियमित होतात.  

जिऱ्याचा असा वापर करा –

स्टेप 1- हिरवीगार कोथिंबीर आणि जिऱ्याची पानं मिक्सरमध्ये वाटून घ्या.

स्टेप 2- आता या ज्यूसमध्ये साखर मिसळून प्या.

8. तीळ (Yummy Sesame Seeds)

तीळ आपल्या शरीराला ऊर्जा देतात. या वैशिष्ट्यांमुळे आपल्या पिरीयड नियमित होण्यास मदत होते.

असा करा तीळाचा वापर –

स्टेप 1- तीळाची पावडर करून घ्या.

स्टेप 2- आता त्यात एक टेबल स्पून मध मिसळा.

स्टेप 3- हे चांगलं मिक्स करून घ्या.

नोंद: पिरीयड्स उशिरा होणं हे सामान्य नाही जर तुम्हालाही समस्या असेल तर काळजी घ्या. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य ते बदल करा. चांगली डाएट, व्यायाम, योगाद्वारे सकारात्मक बदल करा आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवा. जर तरीही समस्या दूर झाली नाहीतर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा –

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

‘प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा’ यासारखे काही गैरसमज आणि त्यामागील तथ्य

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा ‘हे’ थोडेसे बदल

पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय

रजोनिवृत्तीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

What is Vagina in Hindi

Read More From लाईफस्टाईल