#BBM2 चा रविवारचा एपिसोड रूपालीच्या फॅन्ससाठी धक्कादायक ठरला. पुन्हा एकदा बिचुकले आणि घरातल्यांमध्ये तणाव निर्माण होऊ लागला आहे तर शिव-वीणा ही जोडी कायम आहे. कसा साजरा झाला बिग बॉसच्या घरात फ्रेंडशिप डे हे सर्व आणि अजून बरंच काही जाणून घ्या #BiggBossMarathi वीकेंड अपडेटमध्ये.
रूपालीची अनपेक्षित एक्झिट
माधव देवचक्केनंतर जर कुणाची बिग बॉस मराठीच्या घरातून अनपेक्षित एक्झिट झाली असेल तर ती आहे रूपाली भोसलेची. रूपालीचं एलिमिनेशन कुठेतरी न पटणार होतं मात्र खर. अगदी महेश मांजरेकरांनीही रूपाली स्टेजवर आल्यावर तिला म्हटलं की, तू टॉप 5 मध्ये असशील असं मला वाटलं होतं. रूपाली ही एक अशी व्यक्ती होती, जिच्या खेळाने अनेकांचं मन जिंकलं. त्यामुळेच ती फायनल राउंडपर्यंत राहील असं सगळ्यांना वाटलं होतं. प्रत्येकाच्या मनात तिने एक जागा बनवली. ती स्वभावानेही एकदम धडाकेबाज होती आणि तितकीच हळवीही होती. आपल्या आई-बाबा आणि भाऊ अश्या कुटुंबासाठी लढणारी ही मुलगी अचनाक बाहेर गेल्याने तिच्या अनेक फॅन्सना आणि घरातील सदस्यांना नक्कीच रूखरूख लागली आहे. खरंतर वीणा असो किशोरी असो तिच्या खेळात परागनंतर कोणीही हवीशी तशी साथ दिली नाही. या घरात तिची आणि परागची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. रूपालीच्या एक्झिटआधी सर्व सदस्यांसाठी त्यांच्या खास मित्रमैत्रिणींनी पाठवलेले फ्रेंडशिप मेसेजेस दाखवण्यात आले.
बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि सत्कर्म
Big Boss मराठीच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये सर्व सदस्यांनी आपल्या आयुष्यातील केलेली सत्कर्म म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला दिलेला मदतीचा हात सांगणारे अनुभव मांडले. तर महेश मांजरेकरांनी पुन्हा एकदा बिचुकलेंना स्वच्छतेच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण विचारले असता ते चिडले. मागच्याच आठवड्यात बिचुकलेंनी आरोहला राजा आणि नोकरांची तुलना होऊ शकत नाही असं बोलून दाखवलं होतं. यावरून महेश मांजरेकरांनी बिचुकलेंना चांगलंच सुनवलं. तसचं हिनालाही प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची गरज नसल्याचं बोलून दाखवलं. दुसरीकडे वीणा आणि शिवानीमधील विस्तवही जाता जात नाही. Veena Jagtap ही Shivani Surve ला बोलली होती की, “तुझ्या कडून Negativity भेटते. “यावर शिवानीनेही तिला प्रत्युत्तर दिले की, “वीणाचे नेहमीच ते फुललेले तोंड पाहून मला Irritated होते. ” अशा प्रकारे घरात सध्या वादग्रस्त वातावरण आहे.
आरोहचं समाजकार्य
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या. आरोहने सांगितलं की, “मी ज्या दिव्यांगांच्या संस्थेसोबत काम करतो. त्या संस्थेसोबत काम करताना दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याचा डान्स करताना अपघात झाला. या अपघातात त्याच्या मानेखालचं शरीर निकामी झालं तरीही न डगमगता त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आता एक वेबसाईटही सुरू केली आहे. मला भेटलेल्या अशा अनेक असामान्य व्यक्तींमध्ये एमए इकॉनोमिक्स असलेला अपघातग्रस्त टॅक्सीचालक, संपूर्ण अंध असलेल्या एका महिला वकिलाची आणि पाय नसलेल्या बॉडीबिल्डर मि.ऑलिम्पियाची यशोगाथा मला भारावून टाकणारी होती.” आरोह वेलणकर निरनिराळ्या सामाजिक संस्थांशी संलग्न आहे. ‘आय व्होट’ या जनजागृती मोहिमेतून त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच ‘माय होम इंडिया’ या सामाजिक एकात्मतेसाठी काम करणा-या संस्थेसोबतही तो संलग्न आहे. बिग बॉसमध्ये आरोहने जे काही हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. ते अनुभव त्याला ‘नुतन गुळगुळे फाउंडेशन’ सोबत काम करताना आले होते. आरोहला जेव्हा जेव्हा चित्रीकरणातून किंवा नाटकांच्या प्रयोगांमधून वेळ मिळतो तेव्हा तो सामाजिक कार्यामधे स्वतःला गुंतवतो.
हेही वाचा –
#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत