DIY सौंदर्य

नारळाच्या तेलानेही करता येतं Shave, कसं ते जाणून घ्या

Dipali Naphade  |  Aug 15, 2019
नारळाच्या तेलानेही करता येतं Shave, कसं ते जाणून घ्या

हा विषय वाचल्यानंतर तुम्हाला थोडं आश्चर्य नक्कीच वाटलं असेल, हो ना? पण हे खरं आहे. आपल्याला पार्लरमध्ये जाऊन बऱ्याचदा वॅक्स करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग वॅक्स करण्यासाठी कधी कधी घरी पण वेळ नसतो. तर घाईघाईत रेजरने साबणाचा वापर करत आपण शेव्ह (shave) करतो. पण त्याचा परिणाम त्वचा काळी पडण्यावर अथवा पुन्हा केस येताना अधिक टोकदार येण्यावर होत असतो. त्यामुळे अशावेळी अजून एक पर्याय शेव्ह करण्यासाठी तुम्ही निवडू शकता आणि तो पर्याय म्हणजे नारळाचं तेल. नारळाचं तेल केस वाढवण्यासाठी वापरतात हे सर्वांनाच माहीत आहे पण असं शेव्ह करण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो हे थोडं आश्चर्यकारक आहे. पण हे होऊ शकतं. नारळाच्या तेलामध्ये लिनोलिक अॅसिड आणि ओमेगा-6 अॅसिड असतं जे नैसर्गिक स्वरूपात अँटिइन्फ्लेमेट्रीचं काम करतात. हे फक्त सुपर हायड्रेडिंगच नाही तर अँटीबॅक्टेरियलदेखील आहे. जे कापल्यावर अथवा जळल्यावर त्वचेवर चांगला परिणाम करतं. आता प्रश्न असा येतो की, तुम्ही नारळाच्या तेलाने कसं शेव्ह करणार? तर आम्ही तुम्हाला सांगतो. 

‘तुम क्यो इतना रेझर घुमा रहे हो!’ जाड केस यायला नकोत तर हे वाचा

नारळाच्या तेलाने Shave करण्याची पद्धत

Shutterstock

1 . तुम्ही तुमच्या हातावर shave करण्यापूर्वी नीट स्क्रबिंग करून घेतलेलं जास्त चांगलं. तुम्ही यासाठी कोणताही नियमित वापरात असलेला स्क्रबर (जर तुम्ही घरी साखरेचा स्क्रबर म्हणून वापर करत असाल तर तोदेखील चालेल) लावा

2 . तुमच्याजवळ एक स्वच्छ कपडा ठेवा. शेव्हिंग करण्यापूर्वी तुम्ही तुमचं शेव्हिंग ब्लेड नीट तपासून घ्या. कारण हे जुनं असेल तर तुम्हाला शेव्हिंगसाठी जास्त वेळ लागू शकतो आणि शेव्हिंगदेखील नीट होईल की नाही हे सांगता येत नाही. 

3 . आता नारळाचं तेल तुम्ही तुमच्या हातावर आणि पायावर लावून घ्या

4 . आता ज्या दिशेने केसांची ग्रोथ आहे त्याच्या उलट बाजूला शेव्ह करा. शेव्हिंग फोमच्या तुलनेत तुम्ही नारळाच्या तेलाने केस पटकन शेव्ह झालेले पाहू शकता तसंच न दुखता अगदी आरामात तुम्ही शेव्ह करू शकता

5 . शेव्ह केल्यावर तुम्ही नेहमी ब्लेड साफ करूनच ठेवा

6 . शेव्ह करून झाल्यावर हात आणि पाय सुक्या टॉवेलने पुसून घ्या. तसंच हे तुम्ही कोमट पाण्याने साफ करून घ्या

घरच्या घरी करा Ingrown Hair वर उपाय

Shutterstock

लक्षात ठेवा की, नारळाच्या तेलाने शेव्ह केल्याने तुमची त्वचा अतिशय मुलायम होईल. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला त्वचेवर बॉडी लोशन अथवा मॉईस्चराईजर लावण्याची गरज नाही. तसंच नारळाचं तेल त्वचा जळली असेल तर त्यावरही उपयुक्त आहे. त्यामुळे शेव्ह करताना तुम्हाला कुठेही कापलं असेल आणि जळजळ होत असेल तर त्यावर लगेच नारळ तेल लावा. यामुळे त्वरीत आराम मिळेल. नारळाचं तेल हे विविध गोष्टींसाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे त्याचा शेव्ह करण्यासाठीही घरच्या घरी उपयोग होऊ शकतो. तुम्ही घरच्या घरी हा प्रयोग वर सांगितल्याप्रमाणे करून पाहू शकता. 

बिकिनी शेव्ह करायचं असेल तर पहिले ‘या’ 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

आम्ही तुम्हाला खालील नारळ तेलाचा वापर करण्याचा सल्ला देत आहोत-

Parachute 100% Pure Coconut Oil

Paul Penders Coconut Oil Moisture Bar

Forest Essentials Organic Cold Pressed Virgin Coconut Oil

Read More From DIY सौंदर्य