BiggBossMarathi च्या घरात सध्या नेमकं कोण कोणाच्या बाजूने आहे हेच कळेनासं झालंय. मंगळवारच्या टास्कआधी एकमेकांशी भांडणारे आरोह आणि वीणा नंतर एकत्र खेळले. तर पहिल्या टास्कच्यादरम्यान शिव आरोहला चावला आणि नंतर याच गोष्टीवरून वीणाकडे रडला..जाणून घ्या काय चालंलय बिग बॉसच्या घरात.
BiggBossMarathi2 च्या मंगळवारच्या एपिसोडमध्ये खूपच घडामोडी घडल्या. एकीकडे कॅप्टन्सीच्या रेसमध्ये असणारा शिव थेट नॉमिनेट झाला तर दुसरीकडे त्याच्यात आणि वीणामध्ये दुरावा आल्याचंही दिसतंय.
आरोह आणि शिवानीने टार्गेट केलं वीणाला
अचानक आरोहने वीणाला टार्गेट केल्याचं बिग बॉसच्या घरात दिसलं. आरोहच्या जोडीला शिवानीनेही मग वीणाला तिच्या आणि शिवच्या वागण्यावरून बरंच सुनावलं. आश्चर्य म्हणजे या सर्व वादात शिव कुठेच दिसला नाही. तर वीणाने काही वेळाने या वादात हार मानत चुप्प राहणं पसंत केलं.
जेव्हा शिव आरोहला चावला
बिग बॉसने कॅप्टन्सीसाठी दिलेल्या टास्कमध्ये आरोह आणि शिवमध्ये झालेल्या वादात शिव आरोहला चावला. यामुळे बिग बॉसने हे टास्क रद्द केलं. आरोहने या घटनेमुळे यापुढे टास्क न खेळण्याचं बिग बॉसला सांगितलं. तर बिग बॉसने शिक्षा म्हणून कॅप्टन्सीच्या रेसमध्ये असलेल्या शिवला थेट नॉमिनेट करत किशोरीला घराची कॅप्टन म्हणून घोषित केलं.
वीणा आणि शिवमध्ये दुरावा
अभिजीतच्या एलिमिनेशननंतर शिव आणि वीणामध्ये काहीसा दुरावा आल्याचं चित्र आहे. अचानक वीणाने शिवानी आणि नेहाशी दोस्ती केली आहे. पण तरीही शिवानीने तिच्याशी वाद केलाच. पण या सगळ्यांमध्ये घरात नेमका कोणता ग्रुप आहे ते कळेनासं झालंय. तसंच आरोह आणि शिवानीने वीणाशी केलेल्या भांडणानंतर वीणाच्या स्वभावातही थोडा बदल झाल्याचं दिसतंय. म्हातारीचा बूट या पहिल्या टास्कनंतर वीणाने दुसऱ्या टास्कमध्ये शिवचं नाव न घेता हिना आणि शिवानीचं नाव घेतलं. जे खूपच आश्चर्यकारक होतं. तरीही यावेळच्या नॉमिनेशन्समध्ये हिना आणि शिव आलेच.
या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर शिव अक्षरशः वीणासमोर रडला. तो आता भावनिकरित्या अस्थिर आणि कोसळल्यासारखा वाटू लागलाय. आता याच कारण अभिजीत आणि वैशालीची घरातील अनुपस्थितीही असू शकते. कारण हे दोघं शिवचे आधारस्तंभ होते. एकूणच बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये जसं जसं दिवस जात आहेत आणि कंटेस्टंट कमी होत आहेत. घरातील समीकरणही कळेनाशी होत आहेत.
घरात होणार कोणाची एंट्री
सूत्रानुसार, बिग बॉसच्या बुधवारच्या एपिसोडमध्ये मागच्या सीझनमधील विनर मेघा धाडे आणि अजून काही कंटेस्टंट घरात येणार आहेत. यामुळे तरी बिग बॉसच्या घरातील वातावरण थोडं बदलेलं अशी आशा करूया.
हेही वाचा –
#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत
#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक