DIY फॅशन

साध्या पण कार्यक्रमात आकर्षक दिसणाऱ्या या साड्यांची डिझाईन्स पाहा वापरून

Dipali Naphade  |  Jul 17, 2022
simple-saree-designs-for-any-occasions-in-marathi

साडीवरील महिलांचे प्रेम हे कोणाहीपासून लपून राहिलेले नाही आणि साडीवरील प्रेम कधीही संपत नाही. कारण साडी ही पारंपरिक काळापासून असली तरीही साडीमध्ये प्रत्येक महिला ही अत्यंत सुंदर दिसते. बऱ्याचदा महिलांना जड साड्या नेसायला आवडत नाही. हलक्या आणि आकर्षक अशा साड्या अधिक आवडतात. आपल्याकडे नेहमीच फॅशनेबल आणि वेगवेगळ्या साड्यांचे आकर्षक डिझाईन्स येत असतात. तर वॉर्डरोबमध्ये कितीही साड्या असल्या तरीही बऱ्याचदा साडी नेसायची वेळ आली की, कपाटातून हलकी आणि दिसायला अधिक सुंदर असेल अशीच साडी शोधली जाते. तुम्ही साध्या साड्या आणि त्यांच्यासह डिझाईनर ब्लाऊज घालून अधिक सुंदर दिसू शकता आणि कोणत्याही कार्यक्रमाला ही साडी तुम्ही नेसून जाऊ शकता. अशाच काही साड्यांचे डिझाईन्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

रफल डिटेलिंग साडी (Ruffle Detailing Saree)

Ruffle Detailing Saree – Instagram

आजकाल रफल साडी अधिक ट्रेंडमध्ये आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही साडी अजिबात जड नाही. नेसायला हलकी आणि दिसायलाही अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसते. तसंच तुमच्या नेहमीच्या लुकमध्ये एक नवा ताजेपणा ही साडी घेऊन येते अर्थात एक नवा टच घेऊन येते. तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नची रफल डिटेलिंग साडी दुकानातून विकत घेता येते. पण आजकाल फ्लोरल प्रिंट रफल साडी (Floral Print Ruffle Saree) अधिक ट्रेंडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही कार्यक्रमला तुम्ही अशी साडी नेसू शकता. तुम्हाला जड साड्या सांभाळता येत नसतील आणि आरामदायी साड्यांची गरज असेल तर तुम्ही या साडीचा नक्कीच आधार घेऊ शकता. ही वेगळी आणि नवीन स्टाईल तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास मिळवून देते. 

ब्लू लाईन पॅटर्न साडी (Blue Line Pattern Saree)

Blue Line Pattern Saree – Instagram

निळा रंग हा अनेकांना आवडतो आणि साडीमध्ये निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा (निळ्या रंगाच्या कपड्यांवर आकर्षक दिसतात या लिपस्टिक) या अधिक सुंदर दिसतात. विशेषतः साध्या साड्यांमध्ये निळा रंग अधिक उठावदार दिसतो. इतकंच नाही तर या रंगामध्ये साध्या साड्यांपासून ते डिझाईनर्स आणि हेवी एम्ब्रॉडयरी साड्याही मिळतात. ब्लू लाईन पॅटर्न डिझाईनमध्ये तुम्ही जर अधिक हेल्दी असाल तर बारीक दिसण्यासाठी मदत मिळते. अर्थात तुमची जाडी कमी दाखविण्यासाठी या साडीचा उपयोग करून घेता येतो. तसंच तुम्ही ही साडी अत्यंत सोप्या पद्धतीने नेसू शकता.

गुलाबी आणि पांढरी साडी (Pink And White Saree)

Pink and White Saree – Instagram

गुलाबी आणि पांढरा रंग हा सर्वांनाच सुंदर दिसतो. तुम्ही एखाद्या नाईट पार्टीसाठी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची सिक्वेन साडी (सिक्वेन साडी नेसताना टाळा या चुका) निवडू शकता. तुम्हाला हवं तर यावर कॉन्ट्रान्स्ट रंगाचा ब्लाऊज वापरू शकता. यामुळे तुमच्या साडीचा लुक वेगळा दिसेल आणि कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही अशी साडी वापरू शकता. विशेषतः रात्रीच्या पार्टीसाठी साडी थीम असेल तर ही साडी अप्रतिम दिसते. यासह तुम्ही डीप व्ही नेक ब्लाऊज घातला तर याचा लुक अधिक सुंदर दिसतो. यावर मोकेळ केस, मोत्यांचे अर्थात पर्लचे कानातले आणि न्यूड मेकअप केल्यास, तुम्ही अधिक आकर्षक दिसता. एलिगंट लुक हवा असेल तर तुम्ही अंबाडा घाला आणि त्यावर एखादे गुलाबाचे फूल लाऊन तुमच्या सौंदर्यात भर घाला. 

काळी साडी (Black Saree)

Black Saree – Instagram

साध्या साडीबाबत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काळ्या रंगाच्या साडीकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही. काळा रंग हा कोणत्याही कार्यक्रमामध्ये उठावदार असा रंग आहे. काळ्या रंगाची साडी तुम्हाला बाजारात पटकन मिळते. ऑफिसची पार्टी (Office Party Wear Saree) असो अथवा घरातील पार्टी काळ्या रंगाची डिझाईनर साडी अथवा अगदी साधी साडीही सुंदर दिसते. काळ्या साडीसह तुम्ही व्ही नेक ब्लाऊज, चोकर नेकलेस आणि काळी टिकली लावली तर तुमच्या सौंदर्याला अधिक आकर्षकता येईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक


Read More From DIY फॅशन